स्टॉबेरी मिल्क शेक विथ व्हॅनिला आइस्क्रीम
![facebook_-1079290972.jpg](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/u39579/facebook_-1079290972.jpg)
साहित्य :- मेणबत्ती अर्थात वॅक्स, पिंक रंग आणि चेरीसाठी फक्त क्ले.
कृती : मिल्कशेकसाठी वॅक्स आधी गॅसवर एक भांडे ठेवून त्यात ते विरघळून घ्यायचे, त्यातील निम्मा भाग एका भांड्यात काढून त्यात पिंक रंग मिक्स करावा आणि ते आइस्क्रीम ग्लास मध्ये ओतावे.आता राहीलेल्या मिश्रण हॅन्ड मिक्सरने एकदम पफी होईपर्यत हालवावे. मग ते मिश्रण हळूहळू चमच्याने पसरावे. नंतर लाल क्ले घेऊन त्याला चेरी म्हणून सजवावे.
ह्युस्टनच्या गणपतीची क(व्य)था
आला आला गणेशोत्सव आला! पुण्या मुम्बईत आला! बाप रे!
लोकमान्य टिळकांनी गणेशोत्सवाला सार्वजनिक स्वरूप दिले.
प्रश्न हा आहे कि आज इतक्या वर्षानंतर आपण गणेशोत्सवाचे जे स्वरूप पाहतो आहोत ते खरोखरच योग्य आहे का?
आपण एक सुसंस्कृत प्रजा म्हणून,जे चालू आहे ते तसेच चालू राहू द्यायचे आहे का?
आजच्या परिस्थितीची काही उदाहरणे घेऊया.-हि यादी खूप मोठी होऊ शकते - पण तरी...
अमेरीकेत सुमा फूड व्यतिरीक्त पेणच्या गणेश मूर्ती कुठे मिळतील? काही वर्षांपूर्वी आमच्या मंडळासाठी मी ऑर्डर केली होती. सध्या सुमा फूडसकडे पेणच्या गणेश मूर्ती मिळत नाहीयेत. कृपया काही माहिती असल्यास सांगा.
मायबोली गणेशोत्सव २०१० साठी ज्या मायबोलीकरांना स्वयंसेवक म्हणून काम करायची इच्छा आहे त्यांनी या धाग्यावर आपली नावे कळवा. गणेशोत्सवासाठी साधारण महिनाभर दिवसातली काही मिनिटे ते काही तास इतका वेळ द्यावा लागेल. इथे नाव दिलेल्या सभासदांशी संयोजक संपर्क साधतील.
गणेशोत्सवातील कामाचे साधारण स्वरूप हे वेगवेगळ्या स्पर्धा तसेच कार्यक्रम आयोजित करणे, त्यासाठी प्रवेशिका मागवणे, स्पर्धेचा निकाल जाहीर करणे असे असेल.
यंदाच्या गणेशोत्सवात अनेक मायबोलीकरांनी संयोजकांनी केलेल्या घोषणा तसेच जाहिराती आवडल्याचं आवर्जून सांगितलं. त्याबद्दल सर्वांना मन:पूर्वक धन्यवाद !
ह्या जाहिराती आम्ही गप्पांच्या पानांवर पोस्ट केलेल्या असल्याने बर्याच जणांनी त्या दिसल्या नाहीत असंही नमूद केलं. ज्यांना जाहिराती बघता आल्या नाहीत, त्यांच्या साठी हे जाहिरातींचं दालन उघडत आहोत.
![Ganeshotsav_spardha_ghoshana2.jpg](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/u313/Ganeshotsav_spardha_ghoshana2.jpg)
***************************************************
मेरा जूता है जपानी, ये पतलून इंग्लिस्तानी, सर पे लाल टोपी रुसी, फिर भी दिल है हिंदुस्थानी |
हे दिल जसं हिंदुस्थानी आहे तशी आपल्या जीभेची चवही अस्सल हिंदुस्थानी नाही का ? पिझ्झा हट मधल्या तंदूरी पिझ्झ्यावर उगीच का उड्या पडतात?
ह्या अस्सल हिंदुस्थानी जीभेचे चोचले पुरवण्यासाठी तुम्हीही कधी घरातल्या घरात फ्युजन पाककृती निर्माण केल्या असतील. आपल्या मराठी पदार्थांखेरीज कध्धी काहीही न खाणार्या सासुबाईंकडून पसंतीची पावती मिळवली असेल.
पण फक्त चाटून पुसून स्वच्छ झालेल्या ताटाकडे बघून समाधान मानू नका तर आपल्या पाककृती मायबोलीच्या गणेशोत्सव पाककृती स्पर्धेत सादर करुन सर्वांचीच दाद मिळवा!!
"रंगपेटी उघडू चला..!!!"
गणेशोत्सवानिमित्त मायबोलीच्या विस्तारित परिवारासाठी एक नवीन स्पर्धा!!
१३ वर्षांपूर्वी मायबोली सुरु झाली तेंव्हा बहुतांश मायबोलीकर एकटेदुकटे होते. पण काळ सरला तसे बर्याच मायबोलीकरांचे दोनाचे चार हात झाले. अन आता तर त्यांच्या संसार वेलींवर फुलेही उमलू लागली.
मायबोली आता आपले दोन्ही हात पसरून या छोट्यांना आपल्यात सामावून घेत आहे.
गणेशोत्सवानिमित्त यंदा प्रथमच मायबोलीकरांच्या चिमुकल्यांसाठी खास चित्रकला स्पर्धा!!
*******************************************************