काय फरक पडतो,म्हणणार्याची श्रद्धा जर बळकट असेल तर यथोचित अॅडिशनने फरक पडेल का?
संकटी पावावे आणि संकष्टी पावावे एवढा फरक असेल तर ठिक आहे हा आक्षेप पण हेल धरण्यासाठी गौरी शंकरा स्वामी शंकरा असा फरक केल्यास भक्तीत आणि देवाच्या रागलोभात फार काही फरक पडेल का?
भक्ताचा भक्तीभाव समजून घ्यायला देवाला ठराविक ओळीच लागतात का?
हां आता आरत्या फिल्मी गाण्यांच्या चालीवर किंवा ढिंका चिका म्हटल्या तर त्याला आक्षेप घेणे एकवेळ समजू शकतो.
साती, दृश्य तत्कालिक फरक कशानेच पडणार नाहीये, दिसणार नाहीये.
इथे आक्षेप आहे तो म्हणणार्याच्या श्रद्धेबाबत/भक्तिभावाबाबत नाही तर "संतान्च्या" रचनेचे "चालीच्या/हेल काढण्याच्या निमित्ते" जाणीवपूर्वक केलेले "विडम्बन" आरती म्हणुन समाजात रुजवावे का यास आहे. एक म्हणतो म्हणून दुसरा म्हणतो करत ही चाल साथीच्या रोगाप्रमाणे पसरत जाते आहे अन मूळ रचानाच नव्हे तर रचनाकर्ता देखिल हरवला जातो आहे.
अन मग येवढेच असेल, तर स्वतः आरती रचावी अन म्हणावी, दुसर्यान्नी खास करुन संतान्नी रचलेल्या आरतीत स्वतःची / कुणाची तरी ऐकुन, धेडगुजरी भर घालू नये ही इच्छा!
नशिब, उद्या चालीत म्हणायला सोप्पे जाते म्हणून अन काय फरक पडतोय म्हणून "राष्ट्रगीतात" देखिल तशीच भर घालाल, वंदेमातरम मधे पण घालाल., त्यापुढे जाऊन कुणी वावदूक काहीच फरक पडत नाही म्हणून त्याची कायद्याने सक्ती आहेका असा कीसही काढतील अन लालुसारखे नरपुन्गव राष्ट्रगीत सुरू असताना उभे रहाणार नाहीत, अन अर्थातच हे असे धाडस या अशा आरती सदृष मजकुरात मनमानी फरक करत गेल्याच्या बेशिस्त कृतिन्नीच निर्माण होतय हे आमच्या अतिसन्वेदनशील मनाला पटणारच नाही. नै का?
असो.
मी विषय माण्डला आहे. हाच विषय काही वर्षान्पूर्वी दाते पन्चागात एक दोन ओळीत मान्डल्याचे पुसटसे आठवते.
Submitted by limbutimbu on 7 September, 2011 - 02:45
साती, हा मुद्दा, चूकीची आरती म्हणल्याने "भक्ताला देव पावेल की नै, त्याच्या भक्तित काही कमतरता असेल की कै" वगैरे स्वरुपाचा नसून, जर "सुखकर्ता दुखहर्ता" ही आरती सामुहिक स्वरुपात म्हणायला सुरुवात केली तर जे पुस्तकाबरहुकुम मूळ रचने नुसार म्हणत जातात त्यान्च्या म्हणण्यात, अशा प्रकारे घातलेली, "पुन्हा साथीच्या रोगाच्या लागणीप्रमाणे हल्ली सामुहीकच" भर, सुग्रास घासातील खड्याप्रमाणे टोचते. शिवाय, हिन्दू धर्मीय साधी आरती देखिल शिस्तबद्धरित्या एकसूरात "एकरचनेत" म्हणू शकत नाहीत हे पुनः पुनः सिद्ध होत रहाते. सूरान्चे एकवेळ समजु शकेल, पण शब्दान्ची रचना? ती तर कोण्या संताने केलेली कायमस्वरुपी आहे ना? मग तिच्यात बदल का करावा? काय अधिकारात करावा? की फरक पडत नाही असे म्हणत काहीही चालवुन घ्यावे/चालवावे?
अन आम्ही मारे मायबोलीकरता कैतरी शीर्षकगीत का कैसेसे तयार करवुन घेतोय, त्याकरता स्पर्धा घेतोय. विचार करा, की एखादे शीर्षकगीत ठरले, पण चालीत बसवायला वा हेल काढायला सोईचे पडते म्हणून ठरलेल्या त्या शीर्षकगीताचीही तोडमोड/भर केली गेली तर ती चालेल का? तसेच हे.
इथे भक्ति/श्रद्धा वगैरेचा सम्बन्ध नसुन सांस्कृतिक "शिस्तीचा" संबन्ध आहे.
असो.
Submitted by limbutimbu on 7 September, 2011 - 03:01
शिस्तीचा मुद्दा पटतोय लिंबुशेठ!
खरंच, आरती एकाच पद्धतीने गावी हेही म्हणणं पटतंय...पण...
मुळातच आपला हिंदू धर्म इतका पसरट आहे की त्यात हे असे बदल..हवे तर सोयिस्कर बदल असे म्हणूया...होतच असतात...झालेले बदल मूळ रचनेला विशोभित करत नसतील तर असू द्यावेत अशाही मताचा मला आदर आहे.
थोडक्यात,’असा मी असामी’ मधल्या बेंबट्यासारखे...मला सगळ्यांचे सगळं पटतंय.
Submitted by प्रमोद देव on 7 September, 2011 - 03:06
मूळ जय नावाचा इतिहास आणि त्याचं झालेलं महाभारतात रूपांतर हे अश्याच भर टाकण्यातून होत गेलं ना. प्रत्येक वेळेला भर टाकणारा व्यासमुनींच्याच तोडिचा होता असे नाही.
मूळ जय नावाच्या इतिहासात भर टाकली गेलीये अन महाभारतात रुपान्तर केल गेलय हेच मला तितकेसे मान्य होण्यासारखे नाहीये, अन भर असेलच तर ती कथानकाची टाकली गेलीये, मूळ रचना तशीच ठेवून भर टाकली गेलीये, मूळ रचनान्ना धक्का लावलेला नाहीये असे म्हणता येईल. शिवाय महाभारत व वर्तमानकाळ यादरम्यानचा कालखन्ड विचारात घेता हेतूपुरस्सर घातलेली भर, अन ही आरतीतील "मनाला आले म्हणून, गायकी करता, स्वतःचे वेगळेपण सिद्ध करण्याकरता" वगैरे पद्धतीने घातलेली गेल्या केवळ वीसपन्चवीस वर्षातील भर आहे. यान्ची तुलनाच होऊ शकत नाही.
हां, पण या सबबीनिमित्ते, नेमकी आरती म्हणण्याची शिस्त पाळण्याची पळवाट सापडत असेल तर सापडू द्या बोवा. तसही हे आरतीकर्ते कुठे येणारेत आभाळातुन इथे जाब विचारायला की का हो माझ्या रचनेचे अशी लान्डगेतोड चालविली आहे? ते कुठे येणारेत कॉपीराईट्टचा अधिकार गाजवायला? पण फक्त ज्या कुणाला अशा बदलत्या स्वरुपात आरत्या म्हणायच्या असतील नीरजे, त्यान्नी त्यान्च्या रचना/कलाकृती कुणी ढापुन/चोरुन बदलुन स्वतःच्या वा कुणाच्या नावावर "खपविल्या" म्हणून गळे काढण्याचा नैतिक अधिकारही गमावला असेल असे निदान मला तरी वाटते.
या अशा भर टाकण्याच्या "बेशिस्त" प्रवृत्तीमुळेच तर वेद व वेदान्गभूत/प्रणित मन्त्र/श्लोक इतकी शतके सामान्यान्पासून दूर ठेवले नसतील ना? हो ना! अथर्वशीर्षाच्या फलश्रुतीमधे स्पष्ट सान्गितले आहे की हे अशिष्याला देऊ नये, जो या मोहात पडेल तो पापी! तर अशिष्य म्हणजे तोच तर अभिप्रेत नसेल ना जो स्वतःची दीडशहाणी अक्कल पाजळवून आहे त्या रचनेची तोडमोड करेल?
असो.
(वैयक्तिक नव्हे तर विचारान्वरील वैचारिक शाब्दिक प्रतिक्रिया आहेत या!
बाकी नीरजे, मला तुझे एक समजत नाही, तिकडे ते कुठे दूर आडबाजुला कोकणात असलेले कौलारू जाम्भ्या चिर्यान्च्या गणपति मन्दिराचे बदलून सिमेण्टकॉन्क्रीटचे मन्दिर होणार, जुने सौन्दर्य जाणार म्हणून हळहळतेस, अन इथे मात्र संतान्नी लिहीलेल्या "जुन्याच" आरतीन्मधे केलेल्या शब्दान्च्या "भेसळीचे" जाणिवपूर्वक वा अजाणता कुठलीतरी उदाहरणे देऊन समर्थन करतेस? मग नेमकी खरी नीरजा कोणती? <--- हा वैयक्तिक उल्लेखाचा प्रश्न मात्र खर्रोखर्र पडला हे बर का )
Submitted by limbutimbu on 7 September, 2011 - 04:03
लिंबुटींबुजी, आपलं आरत्यांसंबधीचं म्हणणं व तळमळ समजूं शकतों; पण, << या अशा भर टाकण्याच्या "बेशिस्त" प्रवृत्तीमुळेच तर वेद व वेदान्गभूत/प्रणित मन्त्र/श्लोक इतकी शतके सामान्यान्पासून दूर ठेवले नसतील ना? >> हा स्फोटक निष्कर्ष कृपया काढूं किंवा सुचवूं नका, ही नम्र विनंति.
Submitted by भाऊ नमसकर on 7 September, 2011 - 04:12
संतांनी / कवींनी रचलेल्या मूळ आरत्या अतिशय सुश्राव्यच आहेत असे वाटत नाही. चालीचे हेल काढण्यासाठी काही अॅडिशन्स केल्या तर वावगे वाटत नाहीत. ही वैयक्तीक मते आहेत. कोणाला उद्देशून काही नाही.
(अवांतर - अनेक मूळ आरत्यांमध्ये मात्रादोष आहेत व ते उच्चारताना काहीशी भंबेरी उडू शकते.)
उदाहरणार्थः
नीळकंठ नाम .... प्रसिद्ध झाले - येथे 'नाम'नंतर उगाच यती घ्यावा लागतो.
भाऊ, तो विचार वा तात्पुरता "नि:ष्कर्ष" स्फोटक आहे की नाही ते माहीत नाही, तो सुचविलेलाही नाही, तर माझ्या मनात आलेला तत्कालिक सार्वजनिक विचार आहे. त्यावर मनन चिन्तन झाल्याखेरीज त्याचे ठाम मतात वा नि:ष्कर्षात मी रुपान्तर करुन घेणे अशक्य.
तरीही, ...... मराठी लिहायचेय? काय गरजे व्याकरणाची? देवनागरीच कशाला हवी? मूळात मराठीच का? कशावरुन ती आमचि मातृभाषा हे? देवनागरी ऐवजी रोमन का नको? काय गरजे र्हस्वदीर्घाचे नियम पाळायची? भाव पोचल्याशी मतलब ना?, इतके अचूक हवेच कशाला? अन नसेल एखाद्याला एखादी गोष्ट जमत, तर मग तरीही ती गोष्ट तशीच व्हावी हा आग्रह का? असे कुठल्या नियमात लिहीलय? का म्हणून पाळायचे आम्ही हे नियम? आम्हाला वाटेल ते करण्यास म्हणण्यास व्यक्तिस्वातन्त्र्यानुसार आम्ही स्वतन्त्र आहोत ना? जग कुठल्या कुठे मन्गळावर चाललय अन तुम्ही काय आरतीतल्या एखाद्या ध्रुवपदाची वा कडव्याचि चिन्ता वहाताय? मोडेना का मोडले कडवे वा ध्रुवपद तर, त्याने काय आभाळ कोसळणारे की आमच्या रोजच्या जगण्यात फरक पडणारे? इत्यादी इत्यादी अनेक..... ही विचारधारा काही गेल्या पाचपन्चवीस वर्षातील नसणार, ती मानवी वृत्ती आहे, हजारो वर्षे चालत आली असणार. म्हणून मला ती वरील शन्का आली, विचारार्थ मान्डली.
Submitted by limbutimbu on 7 September, 2011 - 04:26
समजा 'उच्चाराप्रमाणे' मात्रा करायच्या असे ठरवले तरः
जयदेव जयदेव जय श्री शंकरा = १९
आरती ओवाळु तुज कर्पुरगौरा = २०
============================
अगदी उच्चाराप्रमाणे घेऊनही पहिल्या ओळीत दुसरी ओळ बसत नाही हे दिसेल. असे असल्यास उलट ठेक्यासाठी (इत्यादी) समजा अॅडिशन्स झाल्या तरी हरकत घेतली जाउ नये असे आपले माझे मत!
आपले कवित्व नविन आरती रचून सिद्ध करा
न की मूळ आरतीची तोडमोड करून.
(ना कि मूल आरती की तोडमोड करके -- असलं काही तरी वाचायला आलं )
दुसरी ओळ जरा खटकते आहे. हिंदी बातम्या ट्रान्स्लेट करून असले विचित्र मथळे सध्या वर्तमानपत्रांत पहायला मिळतात.
मराठी भाषेच्या शुद्धतेचे काय??
दुसरी गोष्ट, आरत्यांच्या मूळ प्रती कुठे पहावयास मिळतील? उदा. संत नरहरी सोनार यांच्या हस्ताक्षरातील दुर्गे दुर्घट भारी इ.?? म्हणजे मूळ अन नक्कल ताडून पहाता येईल.
तिसरी गोष्ट, या आरत्यांना चाली 'ऑफिशिअली' कुणी लावल्यात? त्या कोणत्या?
लता मंगेशकरांनी गायिलेले सुखकर्ता वेगळ्या चालीत आहे, प्रचलित असलेले वेगळे. या चाल बदलण्याचा निषेध करावा काय??
तोच प्रश्न राष्ट्रगीताचा. खुशाल चाल बदलून अपमान केलेला आहे. या गीताची 'ऑफिशिअल' चालच वापरली गेली पाहिजे. तशी आचारसंहिता पण उपलब्ध आहे. मी limbutimbu महोदयांशी येथे १००% सहमत.
चौथी गोष्ट, मंगलमूर्ती ऐवजी, श्रीमंगलमूर्ती म्हटल्याने विडंबन कसे होते?? आपण मराठी लोक देवाला एकेरी हाक मारतो. उत्तर भारतीय अहो जाहो करतात. उदा. गणेशजी. तसं कुणी तरी आदरार्थी वाटावं म्हणून केले असेल का? हे म्हणजे प्रत्येक गोष्टीची पॉसिटिव्ह बाजू पहाण्याचा प्रयत्न म्हणून.
बेफिकीर, या ओळिही मूळात तश्याच आहेत की नाही याची काय हमी? कदाचित त्यात बदल झाल्यानेही आता तुम्ही म्हणत असल्याप्रमाणे मात्रा बदल करावा लागत असेल.
लिंबूटिम्बू.. माझ्या मते, आरती कोणत्या चालीत म्हणावी याला बंधन नसावे. कारण मूळ आरत्याही कदाचित वेगवेगळ्या पंथांच्या चालीत म्हटल्या जात असाव्यात. त्यामूळे तुम्ही आता ज्या चालीत म्हणता आहात ही चालही मूळ चाल म्हणून तुम्ही चालू शकत नाही.
बेफिकिर, मात्रा अन गायकीचा तुमचा अभ्यास दान्डगा आहे हे गृहित धरुनही, इथे प्रश्न आहे तो "संतान्नी रचलेल्या (कवि/गझलकार/व्याकरणपन्डीत वगैरेन्नी नाही) आरती जशाच्या तशा म्हणायच्या की नाही!
वरील उदाहरणातच गौरा शब्दातील रा वाढवुन घेऊन कमी साधली जाऊन गेली असन्ख्यवर्षे म्हणण्यात अडथळा आला नाही, तर आताच का म्हणावे? "मन्त्रवत" या शब्दाचा अनुल्लेखच करायचा ठरल्यास मात्र ज्याला जसे आवडेल ते ते तसे म्हणावे असेच मानावे लागेल.
Submitted by limbutimbu on 7 September, 2011 - 04:33
पण माझ्या माहितीनुसार या आरत्यांच्या अगदी अलीकडच्याही छापिल आवृत्त्यांमध्ये या जास्तीच्या ओळी घातलेल्या आढळत नाहीत. तेव्हा इतक्या वर्षांनंतरही मूळ कलाकृती शाबूत आहेत आणि राहतील म्हणायला हरकत नाही. माझे वैयक्तिक मत असे की, या आरत्या सर्वसामांन्यांसाठी रचल्या गेलेल्या असाव्यात आणि त्यांनी भोळ्या-भाबड्या भावाने त्यात गेयता येण्यासाठी काही समांतर शब्द घातले तर तो इतका जोरदार आक्षेप घेण्याइतका गंभीर स्वरूपाचा गुन्हा ठरू नये.
दुसरी ओळ जरा खटकते आहे. हिंदी बातम्या ट्रान्स्लेट करून असले विचित्र मथळे सध्या वर्तमानपत्रांत पहायला मिळतात.
मराठी भाषेच्या शुद्धतेचे काय?? <<<< LT, आणि त्या ओळींच्या खाली स्वाक्षरीत कंसात 'भाषाप्रेमी' लिहिलंयस की काय?
>>>> चौथी गोष्ट, मंगलमूर्ती ऐवजी, श्रीमंगलमूर्ती म्हटल्याने विडंबन कसे होते?? <<<<
इब्लिसराव, मंगलमूर्ति ऐवजी श्रीमंगलमूर्ति असे म्हणले जात नसून, मंगलमूर्ति नन्तर "होऽऽ (अथवा ओऽऽ) श्रीमंगलमूर्ति अशि भर घातली जाते. अशा कोणत्याही भरीस मूळ आक्षेप आहे.
Submitted by limbutimbu on 7 September, 2011 - 04:41
>>>"मन्त्रवत" या शब्दाचा अनुल्लेखच करायचा ठरल्यास मात्र ज्याला जसे आवडेल ते ते तसे म्हणावे असेच मानावे लागेल.
मन्त्रवत म्हणजे नक्की काय? मन्त्र व आरती मधे फरक काय व कोणते? आपला या बाबतीत व्यासंग आहे, कृपया शंकानिरसन करावे.
संतान्नी रचल्या आहेत म्हणून त्यात बदल करण्या आक्षेप आहे, कि त्या बदलांनी दैवतांचा अपमान / उपमर्द होतो आहे म्हणून?
>>>> पण माझ्या माहितीनुसार या आरत्यांच्या अगदी अलीकडच्याही छापिल आवृत्त्यांमध्ये या जास्तीच्या ओळी घातलेल्या आढळत नाहीत. तेव्हा इतक्या वर्षांनंतरही मूळ कलाकृती शाबूत आहेत आणि राहतील म्हणायला हरकत नाही. <<<<
गजाभौ, गेल्या वीसपन्चवीस वर्षातीलच या भरी आहेत, अन अजुन वीसपन्चवीस वर्षानन्तर (माहीत नाही मी बघायला शिल्लक असेन की नाही ते पण) छापिल आवृत्तीन्मधे या तोडमोडी येण्याची वाट बघायची का? मला खात्री नाही की तेव्हा मूळ आरती शाबूत असतील. असत्य जसे पुन्हा पुन्हा घोकले की सत्यासारखे भासू लागते तसेच येत्या पाचपन्चवीस वर्षात सामान्य लोक मूळ आरती काही वेगळी होती हे देखिल विसरुन जातिल. अन नेमके काय ते बघायला कुणाला सवडही नसेल.
१) मंगलमूर्ती म्हणल्यावर पुन्हा श्रीमन्गलमूर्ती ची भर कशासाठी? म्हणजे जो सरळ पुस्तकाप्रमाणे म्हणत असेल तो मधेच हा श्रीमन्गलमूर्ति शब्द आल्यावर दगडाला ठेचकाळल्यासारखा अडखळणार.
२) दर्शनमात्रे मन म्हणल्यावर पुन्हा स्मरणेमात्रे मन कशाला? स्मरण करुनच भागत असेल तर शिन्च्यान्नो देवाची मूर्ति आणली तरी कशाला? ही भर अचाटच आहे.
३) महिषासूरमर्दिनी नन्तर पुन्हा दैत्यासूरमर्दिनी काय कारणे? महिषासूर हा दैत्य नव्हता का? उगीचच काहीही यमके जुळवलेली....
४) आरती ओवाळू नन्तर भावार्थे ओवाळू.... हे भावार्थे कस ओवाळायच अस्त? की उगीचच र ला ट जोडत केल्याप्रमाणे शब्द वापरायचे?
५) जय पान्डूरन्गा म्हणल्यानन्तर पुन्हा हरी पान्डूरन्गा कशाला हवय? हरि असे काही वेगळे विशेषण आहे का? अन जे मूळ रचनेत नाहीच्चे त्याची मनमानी भर कशासाठी? वेगळेपण दाखविण्यासाठी? की सांस्कृतीक भेसळ? बेशिस्तीतुन गोन्धळ माजविणे?
६) भक्तजन येति नन्तर साधुजन का? साधू हे वेगळे कुणी अस्तात का? ते भक्त नस्तात का? पुन्हा तेच यमके जुळविण्याची स्वतःची हौस भागविण्याकरता केलेली भेसळ
७) केशवासी नामदेव, नन्तर माधवासी नामदेव........ अगाध अगाध, यमके जुळविण्याच्या आचरटपणाची परिसीमा ती ही अशी... केशव नि माधव ही एकाच देवाची दोन नावे... मूळ रचनेत एकाच देवाचे दुसरे नाव घुसडवुन त्या अनाम भेसळकर्त्याने कसली खुमखुमी जिरवुन घेतलीये देव जाणे, पण सामान्य लोक मात्र या असल्या भेसळीला अन्नातील भेसळीप्रमाणेच बळी पडत आहेत असे माझे स्पष्ट मत आहे.
Submitted by limbutimbu on 7 September, 2011 - 04:55
बेफिकीर, या ओळिही मूळात तश्याच आहेत की नाही याची काय हमी>>> देवा, खरे आहे, पण मी हमी देता येईल असे म्हणत नाही आहे. मला असे म्हणायचे आहे की आज ज्या प्रचलीत आरती आहेत त्यांच्या मात्रा इत्यादी असे असे आहे.
लिंबुटिंबू - माझा अभ्यास येथे फारसा रिलेव्हंट नाही. (तसेच, अभ्यासही फारसा नाहीच, कोणताही कवी / गझलकार हे दाखवून देऊ शकेल.)
<<<<वरील उदाहरणातच गौरा शब्दातील रा वाढवुन घेऊन कमी साधली जाऊन गेली असन्ख्यवर्षे म्हणण्यात अडथळा आला नाही, तर आताच का म्हणावे? >>>>
येथे मात्र टेक्निकल बोलावे लागेल. वरील उदाहरणात 'रा' वाढवणे नाही तर 'कमी' करने आवस्यक आहे म्हणजे त्याही ओळीच्या मात्र १९ होतील. याचाच अर्थ असंख्य वर्षे अडथळा आलेला आहे.
मंत्र व आरती यात फरक आहे. हे आपणही जाणताच.
आरती ही सर्वतोमुखी व्हावी व श्रद्धा व्यक्त करण्यास सहज बोली माध्यम असावे या दृष्टिने तर मंत्र काही विशिष्ट प्राप्ती किंवा (इतर, जसे आध्यात्मिक वगैरे) लाभाम्साठी निर्माण झालेले आहेत.
>>> संतान्नी रचल्या आहेत म्हणून त्यात बदल करण्या आक्षेप आहे, कि त्या बदलांनी दैवतांचा अपमान / उपमर्द होतो आहे म्हणून?
संतांनी रचल्या आहेत म्हणून आक्षेप आहेच आहे. शिवाय कोणत्याही मूळ रचनेत रचनाकर्त्याच्या परवानगीशिवाय बदल करण्याचा नैतिक अधिकार कुणालाही नाही.
या रचना शेकडो वर्षे आहे त्या स्वरुपात लाखोन्कडून अगणितवेळा म्हणल्या गेल्याने, उच्चारणामुळे, त्यान्ना मन्त्रवत शक्ति प्राप्त आहे अशी आमचि धार्मिक समजुत आहे. त्यामुळेही या आरत्यान्च्या मूळ रुपातील मन्त्रवत उच्चारणातील भेसळीला आक्षेप आहे.
स्वतःत्र नविन आरती रचा, पन्नासवेळा काय, हजारोवेळा म्हणा, त्यास आक्षेप नाही. पण मूळ रचनेत धेडगुजरी भेसळ करु नका / भेसळ चालवुन घेऊ नका ही समस्त भक्तजनान्ना अत्याग्रहाची विनन्ती!
Submitted by limbutimbu on 7 September, 2011 - 04:59
१. केशवासी नामदेव हे (माधवासी नामदेव न म्हणताही) अडखलण्यास कारणीभूत होते.
२. दुसरे असे की आपला आक्षेप बहुधा असा असावा की दहा जण आरती म्हणत असल्यास दोघांनीच हे भरीचे शब्द (व यमके इत्यादी) उच्चारल्याने इतर आठ जण अडखळतात व ते दोन जण शहाणपणाने इतरत्र बघतात. आपला असा आक्षेप नसल्यास नेमका काय ते कृपया सांगावेत. मी खरे तर कोणत्याच बाजूने नाही, मात्र हे मला खासकरून नमूद करावेसे वाटते की मुळ आरत्याही अडखळायला कारणीभूत ठरू शकतात.
दर ५० वर्षानी हिंदुंचा देव बदलतो. मंत्रही बदलतात.. वैदिक देव गेले. मग विष्नू आला.. मग शैव, राम, कृष्ण आले. तेही गेले. मग विठोबा, संत आले.. मग स्वामी समर्त वगैरे आले.. आणि आता अनिरुध्ह बापू वगैरे आले. त्याअनुषंगाने मंत्र, आरत्या, भूपाळ्या, आरध्यदैवत जप सगळेच बदलते.. आमच्या घराजवळ एक महाराजांचा मठ आहे. मी त्या लोकानी केलेला अमूक अमूक महाराजाय धीमही / तमूक महाराज प्रचोदयात असा महाराजगायत्री मंत्रही ऐकलेला आहे. या सगळ्यापुढे आरतीतील बदल म्हणजे किरकोळच म्हटले पाहिजेत. भक्ती महत्वाची, हा युक्तीवाद तयार असतोच.
आरतीमध्ये वर सांगितलेले बदल हे सगळीकडेच दिसतात, हेही नवलच. अचानक लोकानी हे बदल कसे काय केले कुणास ठाउक.
Submitted by जागोमोहनप्यारे on 7 September, 2011 - 05:09
<< ही विचारधारा काही गेल्या पाचपन्चवीस वर्षातील नसणार, ती मानवी वृत्ती आहे, हजारो वर्षे चालत आली असणार. म्हणून मला ती वरील शन्का आली, विचारार्थ मान्डली. >> मान्य. पण, ज्या "सामान्यां"पासून वेद/वेदांग इ.इ. दूर ठेवायचे/ठेवले ते "सामान्य" कोण हे ठरवण्याची तेंव्हाची पद्धतही या संदर्भात लक्षात नको का घ्यायला ? कांही खुली स्पर्धा/ कसोटी होती का त्यासाठी ? ग्यानबाची मेख तिथंच तर आहे ! मी बर्याच वेळा सोनोपंत दांडेकरांच्या प्रवचन/किर्तनाला पूर्वी गेलो आहे. त्यांच्यामागे ३०-३५ टाळकरी उभे असायचे. बहुतेक माथाडी कामगार व वारकरी. सोनोपंतानी मागे वळून बघतांच किर्तनातल्या कथेचा संदर्भ अचूक पकडून नेमका अभंग स्वच्छ उच्चारात, योग्य चालीत व शिस्तीत ते एकसूरात म्हणत. याबाबतीत ते असामान्य असूनही वेद, वेदांत इत्यादींच्या बाबतीत "सामान्य" म्हणून त्याना दूरच ठेवलं गेलं असतं. म्हणूनच मला केवळ << या अशा भर टाकण्याच्या "बेशिस्त" प्रवृत्तीमुळेच तर वेद व वेदान्गभूत/प्रणित मन्त्र/श्लोक इतकी शतके सामान्यान्पासून दूर ठेवले नसतील ना? >> हा निष्कर्ष/ शंका रास्त व तर्कशुद्ध वाटत नाही .
Submitted by भाऊ नमसकर on 7 September, 2011 - 05:09
बेफिकीरजी, आपला १४.३० चा प्रतिसादः
मूळात आरत्या ज्याकुणी रचल्या त्या विशिष्ट भावावस्थेत रचल्या असे मानले जाते, त्या रचताना त्यात गेयता/वृत्ते/मात्रान्चे गणित अचूक हवेच हवे या हेतूपेक्षाही, मूळ अर्थवाही भावपूर्ण रचना जशी सुचत गेली तशी रचत जाणे व हे सुचणे ही देखिल इश्वरी आशिर्वाद मानुन तयार झालेली शब्दरचना इश्वराचा प्रसाद मानण्याचा प्रघात अजुनही आहे. सबब, या रचनान्मधे " चालीत म्हणताना अडखळायला होते" म्हणून रचनेत बदल करावा हे मान्य नाही.
मी दिलेल्या उदाहरणात जे ठेच लागल्याप्रमाणे किम्बहुना मुस्काटात भडकविल्याप्रमाणे म्हणता म्हणता शब्द गिळण्यास लावणारे अडखळणे होते, ते अन तुम्ही वर्णन करीत असलेल्या चालीतील गेयतेच्या दृष्टीने अडखळण्यात प्रचंण्ड महदंतर आहे.
काहीही असले तरी मूळ रचनेच दुसर्याकुणीतरी उठून कोणत्याही निमित्ते स्वैराचारी बदल घडवुन तो प्रचारात आणणे हा खरतर सांस्कृतिक व धार्मिक अधिक्षेपाचा भाग आहे असे मला वाटते.
Submitted by limbutimbu on 7 September, 2011 - 05:14
हे बघा
हे बघा
काय फरक पडतो,म्हणणार्याची
काय फरक पडतो,म्हणणार्याची श्रद्धा जर बळकट असेल तर यथोचित अॅडिशनने फरक पडेल का?
संकटी पावावे आणि संकष्टी पावावे एवढा फरक असेल तर ठिक आहे हा आक्षेप पण हेल धरण्यासाठी गौरी शंकरा स्वामी शंकरा असा फरक केल्यास भक्तीत आणि देवाच्या रागलोभात फार काही फरक पडेल का?
भक्ताचा भक्तीभाव समजून घ्यायला देवाला ठराविक ओळीच लागतात का?
हां आता आरत्या फिल्मी गाण्यांच्या चालीवर किंवा ढिंका चिका म्हटल्या तर त्याला आक्षेप घेणे एकवेळ समजू शकतो.
साती, दृश्य तत्कालिक फरक
साती, दृश्य तत्कालिक फरक कशानेच पडणार नाहीये, दिसणार नाहीये.
इथे आक्षेप आहे तो म्हणणार्याच्या श्रद्धेबाबत/भक्तिभावाबाबत नाही तर "संतान्च्या" रचनेचे "चालीच्या/हेल काढण्याच्या निमित्ते" जाणीवपूर्वक केलेले "विडम्बन" आरती म्हणुन समाजात रुजवावे का यास आहे. एक म्हणतो म्हणून दुसरा म्हणतो करत ही चाल साथीच्या रोगाप्रमाणे पसरत जाते आहे अन मूळ रचानाच नव्हे तर रचनाकर्ता देखिल हरवला जातो आहे.
अन मग येवढेच असेल, तर स्वतः आरती रचावी अन म्हणावी, दुसर्यान्नी खास करुन संतान्नी रचलेल्या आरतीत स्वतःची / कुणाची तरी ऐकुन, धेडगुजरी भर घालू नये ही इच्छा!
नशिब, उद्या चालीत म्हणायला सोप्पे जाते म्हणून अन काय फरक पडतोय म्हणून "राष्ट्रगीतात" देखिल तशीच भर घालाल, वंदेमातरम मधे पण घालाल., त्यापुढे जाऊन कुणी वावदूक काहीच फरक पडत नाही म्हणून त्याची कायद्याने सक्ती आहेका असा कीसही काढतील अन लालुसारखे नरपुन्गव राष्ट्रगीत सुरू असताना उभे रहाणार नाहीत, अन अर्थातच हे असे धाडस या अशा आरती सदृष मजकुरात मनमानी फरक करत गेल्याच्या बेशिस्त कृतिन्नीच निर्माण होतय हे आमच्या अतिसन्वेदनशील मनाला पटणारच नाही. नै का?
असो.
मी विषय माण्डला आहे. हाच विषय काही वर्षान्पूर्वी दाते पन्चागात एक दोन ओळीत मान्डल्याचे पुसटसे आठवते.
साती, हा मुद्दा, चूकीची आरती
साती, हा मुद्दा, चूकीची आरती म्हणल्याने "भक्ताला देव पावेल की नै, त्याच्या भक्तित काही कमतरता असेल की कै" वगैरे स्वरुपाचा नसून, जर "सुखकर्ता दुखहर्ता" ही आरती सामुहिक स्वरुपात म्हणायला सुरुवात केली तर जे पुस्तकाबरहुकुम मूळ रचने नुसार म्हणत जातात त्यान्च्या म्हणण्यात, अशा प्रकारे घातलेली, "पुन्हा साथीच्या रोगाच्या लागणीप्रमाणे हल्ली सामुहीकच" भर, सुग्रास घासातील खड्याप्रमाणे टोचते. शिवाय, हिन्दू धर्मीय साधी आरती देखिल शिस्तबद्धरित्या एकसूरात "एकरचनेत" म्हणू शकत नाहीत हे पुनः पुनः सिद्ध होत रहाते. सूरान्चे एकवेळ समजु शकेल, पण शब्दान्ची रचना? ती तर कोण्या संताने केलेली कायमस्वरुपी आहे ना? मग तिच्यात बदल का करावा? काय अधिकारात करावा? की फरक पडत नाही असे म्हणत काहीही चालवुन घ्यावे/चालवावे?
तसेच हे.
अन आम्ही मारे मायबोलीकरता कैतरी शीर्षकगीत का कैसेसे तयार करवुन घेतोय, त्याकरता स्पर्धा घेतोय. विचार करा, की एखादे शीर्षकगीत ठरले, पण चालीत बसवायला वा हेल काढायला सोईचे पडते म्हणून ठरलेल्या त्या शीर्षकगीताचीही तोडमोड/भर केली गेली तर ती चालेल का?
इथे भक्ति/श्रद्धा वगैरेचा सम्बन्ध नसुन सांस्कृतिक "शिस्तीचा" संबन्ध आहे.
असो.
हिन्दू धर्मीय साधी आरती देखिल
हिन्दू धर्मीय साधी आरती देखिल शिस्तबद्धरित्या एकसूरात "एकरचनेत" म्हणू शकत नाहीत हे पुनः पुनः सिद्ध होत रहाते
पूर्वीचं सोडनं आणि काहीतरी नवीन करणं हे हिंदु धर्माचं व्यवच्छेदक लक्षण आहे म्हणे. !![Proud](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/proud.gif)
मुद्दा लक्षात आला. पटला.
मुद्दा लक्षात आला. पटला.
शिस्तीचा मुद्दा पटतोय
शिस्तीचा मुद्दा पटतोय लिंबुशेठ!![Happy](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/happy.gif)
खरंच, आरती एकाच पद्धतीने गावी हेही म्हणणं पटतंय...पण...
मुळातच आपला हिंदू धर्म इतका पसरट आहे की त्यात हे असे बदल..हवे तर सोयिस्कर बदल असे म्हणूया...होतच असतात...झालेले बदल मूळ रचनेला विशोभित करत नसतील तर असू द्यावेत अशाही मताचा मला आदर आहे.
थोडक्यात,’असा मी असामी’ मधल्या बेंबट्यासारखे...मला सगळ्यांचे सगळं पटतंय.
मूळ जय नावाचा इतिहास आणि
मूळ जय नावाचा इतिहास आणि त्याचं झालेलं महाभारतात रूपांतर हे अश्याच भर टाकण्यातून होत गेलं ना. प्रत्येक वेळेला भर टाकणारा व्यासमुनींच्याच तोडिचा होता असे नाही.
मूळ जय नावाच्या इतिहासात भर
मूळ जय नावाच्या इतिहासात भर टाकली गेलीये अन महाभारतात रुपान्तर केल गेलय हेच मला तितकेसे मान्य होण्यासारखे नाहीये, अन भर असेलच तर ती कथानकाची टाकली गेलीये, मूळ रचना तशीच ठेवून भर टाकली गेलीये, मूळ रचनान्ना धक्का लावलेला नाहीये असे म्हणता येईल. शिवाय महाभारत व वर्तमानकाळ यादरम्यानचा कालखन्ड विचारात घेता हेतूपुरस्सर घातलेली भर, अन ही आरतीतील "मनाला आले म्हणून, गायकी करता, स्वतःचे वेगळेपण सिद्ध करण्याकरता" वगैरे पद्धतीने घातलेली गेल्या केवळ वीसपन्चवीस वर्षातील भर आहे. यान्ची तुलनाच होऊ शकत नाही.
)
हां, पण या सबबीनिमित्ते, नेमकी आरती म्हणण्याची शिस्त पाळण्याची पळवाट सापडत असेल तर सापडू द्या बोवा. तसही हे आरतीकर्ते कुठे येणारेत आभाळातुन इथे जाब विचारायला की का हो माझ्या रचनेचे अशी लान्डगेतोड चालविली आहे? ते कुठे येणारेत कॉपीराईट्टचा अधिकार गाजवायला? पण फक्त ज्या कुणाला अशा बदलत्या स्वरुपात आरत्या म्हणायच्या असतील नीरजे, त्यान्नी त्यान्च्या रचना/कलाकृती कुणी ढापुन/चोरुन बदलुन स्वतःच्या वा कुणाच्या नावावर "खपविल्या" म्हणून गळे काढण्याचा नैतिक अधिकारही गमावला असेल असे निदान मला तरी वाटते.
या अशा भर टाकण्याच्या "बेशिस्त" प्रवृत्तीमुळेच तर वेद व वेदान्गभूत/प्रणित मन्त्र/श्लोक इतकी शतके सामान्यान्पासून दूर ठेवले नसतील ना? हो ना! अथर्वशीर्षाच्या फलश्रुतीमधे स्पष्ट सान्गितले आहे की हे अशिष्याला देऊ नये, जो या मोहात पडेल तो पापी! तर अशिष्य म्हणजे तोच तर अभिप्रेत नसेल ना जो स्वतःची दीडशहाणी अक्कल पाजळवून आहे त्या रचनेची तोडमोड करेल?
असो.
(वैयक्तिक नव्हे तर विचारान्वरील वैचारिक शाब्दिक प्रतिक्रिया आहेत या!
बाकी नीरजे, मला तुझे एक समजत नाही, तिकडे ते कुठे दूर आडबाजुला कोकणात असलेले कौलारू जाम्भ्या चिर्यान्च्या गणपति मन्दिराचे बदलून सिमेण्टकॉन्क्रीटचे मन्दिर होणार, जुने सौन्दर्य जाणार म्हणून हळहळतेस, अन इथे मात्र संतान्नी लिहीलेल्या "जुन्याच" आरतीन्मधे केलेल्या शब्दान्च्या "भेसळीचे" जाणिवपूर्वक वा अजाणता कुठलीतरी उदाहरणे देऊन समर्थन करतेस? मग नेमकी खरी नीरजा कोणती? <--- हा वैयक्तिक उल्लेखाचा प्रश्न मात्र खर्रोखर्र पडला हे बर का
लिंबुटींबुजी, आपलं
लिंबुटींबुजी, आपलं आरत्यांसंबधीचं म्हणणं व तळमळ समजूं शकतों; पण, << या अशा भर टाकण्याच्या "बेशिस्त" प्रवृत्तीमुळेच तर वेद व वेदान्गभूत/प्रणित मन्त्र/श्लोक इतकी शतके सामान्यान्पासून दूर ठेवले नसतील ना? >> हा स्फोटक निष्कर्ष कृपया काढूं किंवा सुचवूं नका, ही नम्र विनंति.
संतांनी / कवींनी रचलेल्या मूळ
संतांनी / कवींनी रचलेल्या मूळ आरत्या अतिशय सुश्राव्यच आहेत असे वाटत नाही. चालीचे हेल काढण्यासाठी काही अॅडिशन्स केल्या तर वावगे वाटत नाहीत. ही वैयक्तीक मते आहेत.
कोणाला उद्देशून काही नाही.
(अवांतर - अनेक मूळ आरत्यांमध्ये मात्रादोष आहेत व ते उच्चारताना काहीशी भंबेरी उडू शकते.)
उदाहरणार्थः
नीळकंठ नाम .... प्रसिद्ध झाले - येथे 'नाम'नंतर उगाच यती घ्यावा लागतो.
दिंड्या पताका .... वैष्णव नाचती - पताकानंतर उगाच यती घ्यावा लागतो
अंबे तुजवाचून .. कोण.. पुरवील आशा - कोण मुळे मात्रा वाढल्याचे सहज जाणवावे.
अशा अनेक ओळी आहेत मात्र आत्ता लगेच आठवत नाही आहेत.
-'बेफिकीर'!
भाऊ, तो विचार वा तात्पुरता
भाऊ, तो विचार वा तात्पुरता "नि:ष्कर्ष" स्फोटक आहे की नाही ते माहीत नाही, तो सुचविलेलाही नाही, तर माझ्या मनात आलेला तत्कालिक सार्वजनिक विचार आहे. त्यावर मनन चिन्तन झाल्याखेरीज त्याचे ठाम मतात वा नि:ष्कर्षात मी रुपान्तर करुन घेणे अशक्य.
तरीही, ...... मराठी लिहायचेय? काय गरजे व्याकरणाची? देवनागरीच कशाला हवी? मूळात मराठीच का? कशावरुन ती आमचि मातृभाषा हे? देवनागरी ऐवजी रोमन का नको? काय गरजे र्हस्वदीर्घाचे नियम पाळायची? भाव पोचल्याशी मतलब ना?, इतके अचूक हवेच कशाला? अन नसेल एखाद्याला एखादी गोष्ट जमत, तर मग तरीही ती गोष्ट तशीच व्हावी हा आग्रह का? असे कुठल्या नियमात लिहीलय? का म्हणून पाळायचे आम्ही हे नियम? आम्हाला वाटेल ते करण्यास म्हणण्यास व्यक्तिस्वातन्त्र्यानुसार आम्ही स्वतन्त्र आहोत ना? जग कुठल्या कुठे मन्गळावर चाललय अन तुम्ही काय आरतीतल्या एखाद्या ध्रुवपदाची वा कडव्याचि चिन्ता वहाताय? मोडेना का मोडले कडवे वा ध्रुवपद तर, त्याने काय आभाळ कोसळणारे की आमच्या रोजच्या जगण्यात फरक पडणारे? इत्यादी इत्यादी अनेक..... ही विचारधारा काही गेल्या पाचपन्चवीस वर्षातील नसणार, ती मानवी वृत्ती आहे, हजारो वर्षे चालत आली असणार. म्हणून मला ती वरील शन्का आली, विचारार्थ मान्डली.
मराठीत सहसा अक्षरछंद वापरला
मराठीत सहसा अक्षरछंद वापरला गेला.
त्यामुळे अक्षरांची संख्या महत्वाची!![Happy](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/happy.gif)
जयदेव जयदेव जय श्री शंकरा - १४ अक्षरे
आरती ओवाळू तुज कर्पूरगौरा - १३ अक्षरे
=============================
समजा मात्रा मोजायच्या असे ठरवले तरः
जयदेव जयदेव जय श्री शंकरा = १९
आरती ओवाळू तुज कर्पूरगौरा = २२
=============================
समजा 'उच्चाराप्रमाणे' मात्रा करायच्या असे ठरवले तरः
जयदेव जयदेव जय श्री शंकरा = १९
आरती ओवाळु तुज कर्पुरगौरा = २०
============================
अगदी उच्चाराप्रमाणे घेऊनही पहिल्या ओळीत दुसरी ओळ बसत नाही हे दिसेल. असे असल्यास उलट ठेक्यासाठी (इत्यादी) समजा अॅडिशन्स झाल्या तरी हरकत घेतली जाउ नये असे आपले माझे मत!![Happy](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/happy.gif)
-'बेफिकीर'!
बिघडते काय आळवून आळवून म्हटलं
बिघडते काय आळवून आळवून म्हटलं तर?? देव हा भावाचा भुकेला आणि बदल हा नेहेमीच अपरिहार्य आहे, असतो, रहाणार - माझ्या मते..![Happy](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/happy.gif)
)
(हे माझे पहिले अन शेवटचे पोस्ट
वरील फोटू मधील शेवटचे
वरील फोटू मधील शेवटचे वाक्यः
आपले कवित्व नविन आरती रचून सिद्ध करा
न की मूळ आरतीची तोडमोड करून.
(ना कि मूल आरती की तोडमोड करके -- असलं काही तरी वाचायला आलं )
दुसरी ओळ जरा खटकते आहे. हिंदी बातम्या ट्रान्स्लेट करून असले विचित्र मथळे सध्या वर्तमानपत्रांत पहायला मिळतात.
मराठी भाषेच्या शुद्धतेचे काय??
दुसरी गोष्ट, आरत्यांच्या मूळ प्रती कुठे पहावयास मिळतील? उदा. संत नरहरी सोनार यांच्या हस्ताक्षरातील दुर्गे दुर्घट भारी इ.?? म्हणजे मूळ अन नक्कल ताडून पहाता येईल.
तिसरी गोष्ट, या आरत्यांना चाली 'ऑफिशिअली' कुणी लावल्यात? त्या कोणत्या?
लता मंगेशकरांनी गायिलेले सुखकर्ता वेगळ्या चालीत आहे, प्रचलित असलेले वेगळे. या चाल बदलण्याचा निषेध करावा काय??
तोच प्रश्न राष्ट्रगीताचा. खुशाल चाल बदलून अपमान केलेला आहे. या गीताची 'ऑफिशिअल' चालच वापरली गेली पाहिजे. तशी आचारसंहिता पण उपलब्ध आहे. मी limbutimbu महोदयांशी येथे १००% सहमत.
चौथी गोष्ट, मंगलमूर्ती ऐवजी, श्रीमंगलमूर्ती म्हटल्याने विडंबन कसे होते?? आपण मराठी लोक देवाला एकेरी हाक मारतो. उत्तर भारतीय अहो जाहो करतात. उदा. गणेशजी. तसं कुणी तरी आदरार्थी वाटावं म्हणून केले असेल का? हे म्हणजे प्रत्येक गोष्टीची पॉसिटिव्ह बाजू पहाण्याचा प्रयत्न म्हणून.
बेफिकीर, या ओळिही मूळात
बेफिकीर, या ओळिही मूळात तश्याच आहेत की नाही याची काय हमी? कदाचित त्यात बदल झाल्यानेही आता तुम्ही म्हणत असल्याप्रमाणे मात्रा बदल करावा लागत असेल.
लिंबूटिम्बू.. माझ्या मते, आरती कोणत्या चालीत म्हणावी याला बंधन नसावे. कारण मूळ आरत्याही कदाचित वेगवेगळ्या पंथांच्या चालीत म्हटल्या जात असाव्यात. त्यामूळे तुम्ही आता ज्या चालीत म्हणता आहात ही चालही मूळ चाल म्हणून तुम्ही चालू शकत नाही.
बेफिकिर, मात्रा अन गायकीचा
बेफिकिर, मात्रा अन गायकीचा तुमचा अभ्यास दान्डगा आहे हे गृहित धरुनही, इथे प्रश्न आहे तो "संतान्नी रचलेल्या (कवि/गझलकार/व्याकरणपन्डीत वगैरेन्नी नाही) आरती जशाच्या तशा म्हणायच्या की नाही!
वरील उदाहरणातच गौरा शब्दातील रा वाढवुन घेऊन कमी साधली जाऊन गेली असन्ख्यवर्षे म्हणण्यात अडथळा आला नाही, तर आताच का म्हणावे? "मन्त्रवत" या शब्दाचा अनुल्लेखच करायचा ठरल्यास मात्र ज्याला जसे आवडेल ते ते तसे म्हणावे असेच मानावे लागेल.
मूळ कलाकृतीत इतरांनी ढवळाढवळ
मूळ कलाकृतीत इतरांनी ढवळाढवळ करणे चूकच.
पण माझ्या माहितीनुसार या आरत्यांच्या अगदी अलीकडच्याही छापिल आवृत्त्यांमध्ये या जास्तीच्या ओळी घातलेल्या आढळत नाहीत. तेव्हा इतक्या वर्षांनंतरही मूळ कलाकृती शाबूत आहेत आणि राहतील म्हणायला हरकत नाही. माझे वैयक्तिक मत असे की, या आरत्या सर्वसामांन्यांसाठी रचल्या गेलेल्या असाव्यात आणि त्यांनी भोळ्या-भाबड्या भावाने त्यात गेयता येण्यासाठी काही समांतर शब्द घातले तर तो इतका जोरदार आक्षेप घेण्याइतका गंभीर स्वरूपाचा गुन्हा ठरू नये.
(अनघा_ मिरा यांना अनुमोदन !)
(अनघा_ मिरा यांना अनुमोदन !)
दुसरी ओळ जरा खटकते आहे. हिंदी
दुसरी ओळ जरा खटकते आहे. हिंदी बातम्या ट्रान्स्लेट करून असले विचित्र मथळे सध्या वर्तमानपत्रांत पहायला मिळतात.![Proud](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/proud.gif)
मराठी भाषेच्या शुद्धतेचे काय?? <<<< LT, आणि त्या ओळींच्या खाली स्वाक्षरीत कंसात 'भाषाप्रेमी' लिहिलंयस की काय?
>>>> चौथी गोष्ट, मंगलमूर्ती
>>>> चौथी गोष्ट, मंगलमूर्ती ऐवजी, श्रीमंगलमूर्ती म्हटल्याने विडंबन कसे होते?? <<<<
इब्लिसराव, मंगलमूर्ति ऐवजी श्रीमंगलमूर्ति असे म्हणले जात नसून, मंगलमूर्ति नन्तर "होऽऽ (अथवा ओऽऽ) श्रीमंगलमूर्ति अशि भर घातली जाते. अशा कोणत्याही भरीस मूळ आक्षेप आहे.
>>>"मन्त्रवत" या शब्दाचा
>>>"मन्त्रवत" या शब्दाचा अनुल्लेखच करायचा ठरल्यास मात्र ज्याला जसे आवडेल ते ते तसे म्हणावे असेच मानावे लागेल.
मन्त्रवत म्हणजे नक्की काय? मन्त्र व आरती मधे फरक काय व कोणते? आपला या बाबतीत व्यासंग आहे, कृपया शंकानिरसन करावे.
संतान्नी रचल्या आहेत म्हणून त्यात बदल करण्या आक्षेप आहे, कि त्या बदलांनी दैवतांचा अपमान / उपमर्द होतो आहे म्हणून?
>>>> पण माझ्या माहितीनुसार या
>>>> पण माझ्या माहितीनुसार या आरत्यांच्या अगदी अलीकडच्याही छापिल आवृत्त्यांमध्ये या जास्तीच्या ओळी घातलेल्या आढळत नाहीत. तेव्हा इतक्या वर्षांनंतरही मूळ कलाकृती शाबूत आहेत आणि राहतील म्हणायला हरकत नाही. <<<<
गजाभौ, गेल्या वीसपन्चवीस वर्षातीलच या भरी आहेत, अन अजुन वीसपन्चवीस वर्षानन्तर (माहीत नाही मी बघायला शिल्लक असेन की नाही ते पण) छापिल आवृत्तीन्मधे या तोडमोडी येण्याची वाट बघायची का? मला खात्री नाही की तेव्हा मूळ आरती शाबूत असतील. असत्य जसे पुन्हा पुन्हा घोकले की सत्यासारखे भासू लागते तसेच येत्या पाचपन्चवीस वर्षात सामान्य लोक मूळ आरती काही वेगळी होती हे देखिल विसरुन जातिल. अन नेमके काय ते बघायला कुणाला सवडही नसेल.
१) मंगलमूर्ती म्हणल्यावर पुन्हा श्रीमन्गलमूर्ती ची भर कशासाठी? म्हणजे जो सरळ पुस्तकाप्रमाणे म्हणत असेल तो मधेच हा श्रीमन्गलमूर्ति शब्द आल्यावर दगडाला ठेचकाळल्यासारखा अडखळणार.
२) दर्शनमात्रे मन म्हणल्यावर पुन्हा स्मरणेमात्रे मन कशाला? स्मरण करुनच भागत असेल तर शिन्च्यान्नो देवाची मूर्ति आणली तरी कशाला? ही भर अचाटच आहे.
३) महिषासूरमर्दिनी नन्तर पुन्हा दैत्यासूरमर्दिनी काय कारणे? महिषासूर हा दैत्य नव्हता का? उगीचच काहीही यमके जुळवलेली....
४) आरती ओवाळू नन्तर भावार्थे ओवाळू.... हे भावार्थे कस ओवाळायच अस्त? की उगीचच र ला ट जोडत केल्याप्रमाणे शब्द वापरायचे?
५) जय पान्डूरन्गा म्हणल्यानन्तर पुन्हा हरी पान्डूरन्गा कशाला हवय? हरि असे काही वेगळे विशेषण आहे का? अन जे मूळ रचनेत नाहीच्चे त्याची मनमानी भर कशासाठी? वेगळेपण दाखविण्यासाठी? की सांस्कृतीक भेसळ? बेशिस्तीतुन गोन्धळ माजविणे?
६) भक्तजन येति नन्तर साधुजन का? साधू हे वेगळे कुणी अस्तात का? ते भक्त नस्तात का? पुन्हा तेच यमके जुळविण्याची स्वतःची हौस भागविण्याकरता केलेली भेसळ
७) केशवासी नामदेव, नन्तर माधवासी नामदेव........ अगाध अगाध, यमके जुळविण्याच्या आचरटपणाची परिसीमा ती ही अशी... केशव नि माधव ही एकाच देवाची दोन नावे... मूळ रचनेत एकाच देवाचे दुसरे नाव घुसडवुन त्या अनाम भेसळकर्त्याने कसली खुमखुमी जिरवुन घेतलीये देव जाणे, पण सामान्य लोक मात्र या असल्या भेसळीला अन्नातील भेसळीप्रमाणेच बळी पडत आहेत असे माझे स्पष्ट मत आहे.
बेफिकीर, या ओळिही मूळात
बेफिकीर, या ओळिही मूळात तश्याच आहेत की नाही याची काय हमी>>> देवा, खरे आहे, पण मी हमी देता येईल असे म्हणत नाही आहे.
मला असे म्हणायचे आहे की आज ज्या प्रचलीत आरती आहेत त्यांच्या मात्रा इत्यादी असे असे आहे.
लिंबुटिंबू - माझा अभ्यास येथे फारसा रिलेव्हंट नाही. (तसेच, अभ्यासही फारसा नाहीच, कोणताही कवी / गझलकार हे दाखवून देऊ शकेल.)
<<<<वरील उदाहरणातच गौरा शब्दातील रा वाढवुन घेऊन कमी साधली जाऊन गेली असन्ख्यवर्षे म्हणण्यात अडथळा आला नाही, तर आताच का म्हणावे? >>>>
येथे मात्र टेक्निकल बोलावे लागेल. वरील उदाहरणात 'रा' वाढवणे नाही तर 'कमी' करने आवस्यक आहे म्हणजे त्याही ओळीच्या मात्र १९ होतील.
याचाच अर्थ असंख्य वर्षे अडथळा आलेला आहे.
मंत्र व आरती यात फरक आहे. हे आपणही जाणताच.![Happy](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/happy.gif)
आरती ही सर्वतोमुखी व्हावी व श्रद्धा व्यक्त करण्यास सहज बोली माध्यम असावे या दृष्टिने तर मंत्र काही विशिष्ट प्राप्ती किंवा (इतर, जसे आध्यात्मिक वगैरे) लाभाम्साठी निर्माण झालेले आहेत.
-'बेफिकीर'!
>>आरती ओवाळू नन्तर भावार्थे
>>आरती ओवाळू नन्तर भावार्थे ओवाळू
ते भावारती ओवाळू असे आहे.
>>> संतान्नी रचल्या आहेत
>>> संतान्नी रचल्या आहेत म्हणून त्यात बदल करण्या आक्षेप आहे, कि त्या बदलांनी दैवतांचा अपमान / उपमर्द होतो आहे म्हणून?
संतांनी रचल्या आहेत म्हणून आक्षेप आहेच आहे. शिवाय कोणत्याही मूळ रचनेत रचनाकर्त्याच्या परवानगीशिवाय बदल करण्याचा नैतिक अधिकार कुणालाही नाही.
या रचना शेकडो वर्षे आहे त्या स्वरुपात लाखोन्कडून अगणितवेळा म्हणल्या गेल्याने, उच्चारणामुळे, त्यान्ना मन्त्रवत शक्ति प्राप्त आहे अशी आमचि धार्मिक समजुत आहे. त्यामुळेही या आरत्यान्च्या मूळ रुपातील मन्त्रवत उच्चारणातील भेसळीला आक्षेप आहे.
स्वतःत्र नविन आरती रचा, पन्नासवेळा काय, हजारोवेळा म्हणा, त्यास आक्षेप नाही. पण मूळ रचनेत धेडगुजरी भेसळ करु नका / भेसळ चालवुन घेऊ नका ही समस्त भक्तजनान्ना अत्याग्रहाची विनन्ती!
लिंबुटिंबू, आपला ४.५५ चा
लिंबुटिंबू, आपला ४.५५ चा प्रतिसादः
१. केशवासी नामदेव हे (माधवासी नामदेव न म्हणताही) अडखलण्यास कारणीभूत होते.
२. दुसरे असे की आपला आक्षेप बहुधा असा असावा की दहा जण आरती म्हणत असल्यास दोघांनीच हे भरीचे शब्द (व यमके इत्यादी) उच्चारल्याने इतर आठ जण अडखळतात व ते दोन जण शहाणपणाने इतरत्र बघतात. आपला असा आक्षेप नसल्यास नेमका काय ते कृपया सांगावेत. मी खरे तर कोणत्याच बाजूने नाही, मात्र हे मला खासकरून नमूद करावेसे वाटते की मुळ आरत्याही अडखळायला कारणीभूत ठरू शकतात.![Happy](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/happy.gif)
दर ५० वर्षानी हिंदुंचा देव
दर ५० वर्षानी हिंदुंचा देव बदलतो. मंत्रही बदलतात.. वैदिक देव गेले. मग विष्नू आला.. मग शैव, राम, कृष्ण आले. तेही गेले. मग विठोबा, संत आले.. मग स्वामी समर्त वगैरे आले.. आणि आता अनिरुध्ह बापू वगैरे आले. त्याअनुषंगाने मंत्र, आरत्या, भूपाळ्या, आरध्यदैवत जप सगळेच बदलते.. आमच्या घराजवळ एक महाराजांचा मठ आहे. मी त्या लोकानी केलेला अमूक अमूक महाराजाय धीमही / तमूक महाराज प्रचोदयात असा महाराजगायत्री मंत्रही ऐकलेला आहे.
या सगळ्यापुढे आरतीतील बदल म्हणजे किरकोळच म्हटले पाहिजेत. भक्ती महत्वाची, हा युक्तीवाद तयार असतोच.
आरतीमध्ये वर सांगितलेले बदल हे सगळीकडेच दिसतात, हेही नवलच. अचानक लोकानी हे बदल कसे काय केले कुणास ठाउक.
<< ही विचारधारा काही गेल्या
<< ही विचारधारा काही गेल्या पाचपन्चवीस वर्षातील नसणार, ती मानवी वृत्ती आहे, हजारो वर्षे चालत आली असणार. म्हणून मला ती वरील शन्का आली, विचारार्थ मान्डली. >> मान्य. पण, ज्या "सामान्यां"पासून वेद/वेदांग इ.इ. दूर ठेवायचे/ठेवले ते "सामान्य" कोण हे ठरवण्याची तेंव्हाची पद्धतही या संदर्भात लक्षात नको का घ्यायला ? कांही खुली स्पर्धा/ कसोटी होती का त्यासाठी ? ग्यानबाची मेख तिथंच तर आहे ! मी बर्याच वेळा सोनोपंत दांडेकरांच्या प्रवचन/किर्तनाला पूर्वी गेलो आहे. त्यांच्यामागे ३०-३५ टाळकरी उभे असायचे. बहुतेक माथाडी कामगार व वारकरी. सोनोपंतानी मागे वळून बघतांच किर्तनातल्या कथेचा संदर्भ अचूक पकडून नेमका अभंग स्वच्छ उच्चारात, योग्य चालीत व शिस्तीत ते एकसूरात म्हणत. याबाबतीत ते असामान्य असूनही वेद, वेदांत इत्यादींच्या बाबतीत "सामान्य" म्हणून त्याना दूरच ठेवलं गेलं असतं. म्हणूनच मला केवळ << या अशा भर टाकण्याच्या "बेशिस्त" प्रवृत्तीमुळेच तर वेद व वेदान्गभूत/प्रणित मन्त्र/श्लोक इतकी शतके सामान्यान्पासून दूर ठेवले नसतील ना? >> हा निष्कर्ष/ शंका रास्त व तर्कशुद्ध वाटत नाही .
बेफिकीरजी, आपला १४.३० चा

Pages