गणेशोत्सवानिमित्ते पोस्टर- मंत्रवत आरत्यांची परवड थांबवा

Submitted by limbutimbu on 7 September, 2011 - 02:09

Poster yogya Arati mhaNaa 2011.JPG

Groups audience: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

माझ्यापण डोक्यात जात.. ते रेकून आरत्या म्हणणं वगरे.. चं शांत आवाजात म्हणा कि आरत्या बाप्पाला पण बर वाटेल..

विशेह्त : दशावताराच इअर्ती आणि येई ओ विठ्ठले...

>>> कांही खुली स्पर्धा/ कसोटी होती का त्यासाठी ? <<<<
भाऊ, या बीबीचा हा विषय नाही, पण, .....
वेद राहुदेत बाजुला, आपण जर संस्कृतमधुन नुस्ते रुद्र/सप्तशती इत्यादिकान्चे पठण जरी शिकण्यास आजही गेलात तर संथा नामक घोकंपट्टीचा प्रकार असतो तो करावाच लागतो, न करणार्‍या कुणासही तिथे स्थान नसते. अशी संथा घेऊन शिकलेले व "मजसारखे" वरवर वाचुन्/ऐकुन उच्चारण/पाठान्तर शिकलेले यात आचार्यपदी उच्च श्रेणी ही संथा घेतलेल्यान्चीच आजही मानली जाते व मजसारखे लोक दुय्यम स्तरावरच असतात. अन अर्थातच या संथान्मध्ये अचूक योग्य स्वरातील उच्चारणाकडे विशेष लक्ष पुरविले जाते. (सामान्यान्मधे मी सर्व जातीतील सामान्य धरतोय, विशिष्ट जाती विचार करीत नाहीये).
दुसरे असे की, वेदान्गाचे यथायोग्य ज्ञान जनसामान्यान्पर्यन्त पोचविण्यासाठीची तत्कालिक प्रवचनकार/किर्तनकार यान्चेबरोबरच देवीचे भुत्ये/गोन्धळी/पिन्गळे इत्यादिकान्ची रचना सर्व जातीतून होती जी आता कालौघात केवळ नष्टच होत चालली नसून विसरली देखिल जाते आहे. तुमचा आक्षेप या विसरण्यातूनच तर आला नाही ना?

मूळात आरत्या ज्याकुणी रचल्या त्या विशिष्ट भावावस्थेत रचल्या असे मानले जाते, त्या रचताना त्यात गेयता/वृत्ते/मात्रान्चे गणित अचूक हवेच हवे या हेतूपेक्षाही, मूळ अर्थवाही भावपूर्ण रचना जशी सुचत गेली तशी रचत जाणे व हे सुचणे ही देखिल इश्वरी आशिर्वाद मानुन तयार झालेली शब्दरचना इश्वराचा प्रसाद मानण्याचा प्रघात अजुनही आहे. >>>

मान्य आहे. Happy

या रचनान्मधे " चालीत म्हणताना अडखळायला होते" म्हणून रचनेत बदल करावा हे मान्य नाही.>>>

आता एक उदाहरण देतो. लहान मुले पाढे शिकतात तेव्हा:

बे एक बे

असे 'प्लेनली' न म्हणता ....

बेए एक्कं बेए

अशी जोड लावून म्हणतात. हे नैसर्गीक असून यात आपोआप दोन उद्देश साध्य होतात. ठेक्यामुळे पाठांतर सहज होते व सोबत पाढे म्हणणारे इतरजण त्या ठेक्यामुळे सुसूत्रपणे एकत्रीतरीत्या पाढे म्हणू शकतात. (साधारण एकाच वयोगटातील तीन चार मुले असण्याच्या काळात हे सोपेपणाने मान्य होऊ शकले असते.) Happy

आरती रचणार्‍यांचा हेतू काहीही असला (व कितीही पवित्र व श्रद्धायुक्त असला) तरीही अनेक वर्षांनी ती आरती म्हणणार्याचा हेतू बराच डायल्यूट झालेला असू शकतो हे विधान मान्य होत अस्ल्यास त्यात लोक आणखीन अ‍ॅडिशन्स करत राहणार व त्यामुळे त्यांच्या मनातील (असलेल्या किंवा नसलेल्या) भक्तिभावात फारसा फरक पडणार नाही असे वाटते. Happy

आपल्याला हे मत पटले किंवा नाही हे जाणून घ्यायला आवडेल.

धन्यवाद!

जागोमोहनप्यारे | 7 September, 2011 - 14:39

>>>दर ५० वर्षानी हिंदुंचा देव बदलतो. मंत्रही बदलतात.. वैदिक देव गेले. मग विष्नू आला.. मग शैव, राम, कृष्ण >>>आले. तेही गेले. मग विठोबा, संत आले.. मग स्वामी समर्त वगैरे आले.. आणि आता अनिरुध्ह बापू वगैरे आले. >>>त्याअनुषंगाने मंत्र, आरत्या, भूपाळ्या, आरध्यदैवत जप सगळेच बदलते.. आमच्या घराजवळ एक महाराजांचा >>>मठ आहे. मी त्या लोकानी केलेला अमूक अमूक महाराजाय धीमही / तमूक महाराज प्रचोदयात असा >>>महाराजगायत्री मंत्रही ऐकलेला आहे. फिदीफिदी या सगळ्यापुढे आरतीतील बदल म्हणजे किरकोळच म्हटले >>>पाहिजेत. भक्ती महत्वाची, हा युक्तीवाद तयार असतोच.

>>>आरतीमध्ये वर सांगितलेले बदल हे सगळीकडेच दिसतात, हेही नवलच. अचानक लोकानी हे बदल कसे काय >>>केले कुणास ठाउक.

लिंबू महोदयांचा आक्षेप फक्त 'संतांनी लिहिलेल्या' आरत्यांची मोडतोड करण्यास आहे. कारण त्या 'मन्त्रवत' आहेत. हे महाराजगायत्री वगैरे एक तर संतान्नी लिहिलेले नाही, वरून स्वरचित आहे. तिथे काय वाट्टेल ते करण्या मुभा आहे. मन्त्र"वत" असेल तर बोला. मन्त्र डायरेक्ट असेल तर बहुधा अधिक्षेप होत नसावा.

limbutimbu महोदय,
यांचे जरा उद्बोधन करावे ही विनंती.

बेफिकिरजी, बेकम्बेच काय, पूर्वी पावकीनिमकीपाऊणकीसवायकीदीडकीअडीचकी असायची, आम्ही पण घोकली आहे. उदाहरण म्हणून ठीक आहे, मी तर बेकम्बेच्या पाढ्यावर लग्नात घ्यायचे उखाणे रचून माझ्याच लग्नात घेतले होते, सान्गू? Proud
बे एके बे बे दुणे चार लिम्बीचा नि माझा, वनात संचार,
बे त्रिक सहा बे चोक आठ, लिम्बीची नि माझी साता जन्माची गाठ,
बे पन्चे दहा बे सक बारा, लिम्बी नि माझा संसार खरा
बे सात्ती चौदा बे आठी सोळा, लिम्बी नि माझ्या लग्नाला गाव सारा गोळा
बे नव्वे अठरा बे दाहे वीस, अग अग लिम्बे इथे अशी बैस Proud
तर सान्गायचा मुद्दा असा की, पाढे म्हणताना ठेका पुढेमागे केला/सुर बदलला गेला तर समजु शकते, पण त्याच पाढ्यात तुमच्या उदाहरणातील ती मुले बेकम्मबे बेदुणेचार म्हणल्यावर पुढे "लिम्बीचा नि माझा, वनात संचार" अस्ल काही म्हणतात का? वरील आरतीतील भर ही मात्र या स्वरुपाची आहे असे माझे मत.... बाकि तुमचे तुम्ही ठरवा बुवा. Wink

इब्लिसराव, इब्लिसगिरीवर तुम्ही देखिल तुमच्या स्वकर्तुत्वे मन्त्रवत गायत्री / आरत्या लिहू शकताच की! कुणी बन्दी केली नाहीये! Proud फक्त तेवढ्या सन्ख्येने जपजाप्य मात्र व्हावे लागते बर का!

ही लिम्बादेवींची आरती का? असो.

दिवे घ्या.

पण ते एक पुन्हा आठवण केल्या शिवाय रहावत नाही -
पोस्टरवर म्हट्लं आहे -

'संतमहात्म्यांनी रचलेल्या पवित्र आरत्यांमधे आपल्या कवित्वाची-गायकीची मनमानी भर....'
लता मंगेशकर यांचा निषेध करावा काय? गायकीची भर त्यांनी घातलीच आहे.

लिंबुटींबुजी, वेदपठण सर्व भारतभर शतकानुशतकें मौखिक परंपरेने एक कमालीची शिस्त पाळून व अत्यंत परिश्रमाने जपलं गेलं ,याचा मलाही सार्थ अभिमान आहे. फक्त, "सामान्याना" दूर ठेवलं, यातून ध्वनित होणार्‍या अन्वयाबद्दलचं माझं मत मांडलं. << तुमचा आक्षेप या विसरण्यातूनच तर आला नाही ना? >> माझा आक्षेप नव्हताच, विनंति होती. असो, पण तो इथला विषय नाही, हे मलाही तीव्रतेने जाणवतंय.

>>> लता मंगेशकर यांचा निषेध करावा काय? गायकीची भर त्यांनी घातलीच आहे.
तुम्हाला करावासा वाटत असेल तर बहुधा हृदयनाथ मन्गेशकरान्चा करावा लागेल, कारण सन्गित त्यान्नी दिलय Proud पण वरील दीडशहाण्यान्सारखे शब्द मात्र बदलले/भर घातली नाही. मी निषेध करणार नाही. कारण कोणत्याही धार्मिक कार्यक्रमात लताबाईच्या पट्टित/चालित आरती म्हणणे सक्तिचे राहूदेच, साईड ऑप्शनला देखिल नसते! तिथे आपली पारम्पारिक चालीतील आरतीच म्हणली जाते.
पण तिथे मधे मधे कडमडल्याप्रमाणे वरील घुसडवलेले शब्द मात्र तडमडत अस्तात, त्यान्चा निषेध. Proud

मला तर मूळ काय तेच माहिती नाही. ते कुणी साधार सांगत पण नाहिये..

पण बहुधा ऐकू येणार्‍या चालीत बदल करण्याचा उद्योग मंगेशकरांनी केलाय हे मात्र नक्की. पोस्टरकर्त्यांचे म्हणणे तुम्हास मान्य आहे, मग त्याच 'चालीवर' मंगेशकरांचा निषेध करावा का? असे विचारले.

रच्यकने, लताबाईंच्या चालीत आरती म्हणणे हे माबो वर टाईप करण्या सारखे (येरा गबाळ्याचे) काम नव्हे. म्हणून ती सक्तीची वा ऑप्शनल नाही. आरत्यांना मंत्रवत म्हणून उगा काहीतरी धर्मरक्षण करण्याचा आव आणणार्‍या य पोस्टरकर्त्याची कीव येते इतकेच. मूळ सौंदर्यात त्या चालीने भरच घातली गेली आहे.

भाऊ, सहमत! पण हेच बघाना, ज्या गोष्टीचा अभिमान बाळगावासा वाटतोय, त्याच मौखिक परम्परेतुन परिश्रमाने जपले गेलेल्या वेदपठणाबद्दल सद्यस्थितीत दु:ख करावेसे, कीव करावीशी वाटते की अरे कशाला अन कुणाकरता हे जपल गेलय? साध्या आरतीतील मजकुराची शिस्त जिथे पाळा म्हणले तर लोकं व्यक्तिस्वातन्त्र्याचे/मतस्वातन्त्र्याचे फणे काढून येतात, त्यान्ना कुणाला काय गरज तरी आहे का वेद वगैरे पठनाची? त्यातिल अर्थाची? मग झक्की म्हणतात तेच बरोबर वाटते. येत्या पाचपन्चवीस वर्षात मूळ रुपातील आरती वगैरे राहुदेच बाजुला, वेदपठण देखिल जर्मनी वा अमेरिकेतुन आयात करावे लागेल Proud विघ्नहर्त्याऽऽ बघतांव ना?

<< विघ्नहर्त्याऽऽ बघतांव ना? >> "बघताव ना, काय ? अरे मलाच पँट-शर्ट चढवायला निघालेत, तिथं माझ्या आरत्यांचं काय घेऊन बसलांय !! " Wink

फक्त तेवढ्या सन्ख्येने जपजाप्य मात्र व्हावे लागते बर का!

तोडफोड आरत्यादेखील आता मोठ्या संख्येने जपल्या गेल्या असतीलच की.. म्हणजे त्यानाही मंत्रसामर्थ्य आले असेलच! Happy

>>>> "लिम्बीचा नि माझा, वनात संचार" अस्ल काही म्हणतात का?>>><<<<
>>>>मुले शिकवतील तसे म्हणतील. फक्त मुले 'लिंबीचा नि माझा संसार' असे म्हणायला लागली तर तुमचे काय होईल हा प्रश्न आहे. <<<<
बेफिकीरजी, तुम्हीपण हातोहात शब्दान्ची फिरवाफिरवी अदलाबदल करता तर! Proud चालायचेच, गझलान्चा सवईचा परिणाम असावा. Wink
पण "अस्ल काही (तरी)" म्हणणे, अन "असे(च) काही" म्हणणे यातिल फरक जाणून घ्याल का? प्लिजच?

अर्रर्रर्रर्रर्र, अस झाल होय...., ओके ओके, एकडाव माफी असावि... "तुमच्या उदाहरणातली ती मुले" अस वाचुयात Happy

अर्रर्रर्रर्रर्र, अस झाल होय...., ओके ओके, एकडाव माफी असावि... "तुमच्या उदाहरणातली ती मुले" अस वाचुयात Happy

>>>

ओक्के, संपादन करत आहे. Happy

लिंबूटिंबू ,हा आक्षेप माझ्या मनातसुद्धा अनेक वर्षापूर्वी आला होता.पारंपारीक आरती जेव्हा म्हणत असतो तेव्हा ती एका चालीतच असायला हवी तरच आरती म्हणतानाची तन्मयता लाभते.जर पारंपारीक शब्दात मधेच कोणी नवे शब्द घातले तर वारंवार तन्मयता खंडीत होते .आरती ही सामुहीक प्रार्थना आहे तेव्हा ती मुळात जशी व ज्या चालीत आहे तशीच ती म्हंटली गेली तर अधीकाधीक जनसमुहाची तन्मयता एकाचवेळी
साधल्याने आरतीचे अपेक्षीत उद्देश साधले जातात .वैयक्तीक पुजा व आरती दरम्यान ही शिस्त पाळली गेली तर सामुहीक पुजा ,आरतीत हे बदल संभवणार नाहीत हे निश्चीत.
खरतर वैदीक धर्म व्यक्तीपूजा व मूर्तीपूजा मानत नाही पण वैदीक धर्माचरण लोकाना जस जस जाचक वाटू लागल तस धर्माचरण लोप पाउ लागल व कळस म्हणजे नीरीश्वरवाद फोफावू लागला .जोपर्यंत व्यक्तीला सामाजीक उन्नतीच भान असत,कळकळ असते ,समाजावर ,नीसर्गावर प्रेम असत तोवर त्या व्यक्तीचा नीरीश्वरवाद समाजाला घातक नसतो पण अशा नीरीश्वरवादाचच फक्त समाजात अनुकरण झाल तर ते योग्य नाही.म्हणूनच सांकेतीक ईश्वराच्या मूर्ती पुजण्याची प्रथा सुरू झाली.मानसीक शक्तीच केंद्रीकरण मूर्तीपुजेने निश्चीत साध्य होत ज्यायोगे मन नीकोप होत होत शारीरीक स्वास्थ्य पण वाढत .शरीर व मनाने सुघट व्यक्तीच उत्तम समाज घडवू शकतात .मनोभावे पूजा अर्चा करणारा आयुष्यातील अनेक वादळ सोसून अनेकाना ती सोसायला मदत करू शकतो .जसा वैदीक धर्म ,ख्रिस्ती धर्म व मुस्लीम धर्म खरा आहे तशीच मूर्तीपूजापण खरी आहे.तीवैदीकपंचसाधनधर्म ,यज्ञ ,दान,तप,कर्म,स्वाध्याय
यातील तपाचरणातील ईश्वरप्रणीधान व स्वाध्याय या विषयाशी नीगडीत आहे.
अनेक संतानी या मूर्ती पुजल्या आहेत ,समाजात ,सार्वजनीक ठिकाणी यांची स्थापना केली आहे,त्यांच्या सेवेचे दंडक घातले आहेत ,त्याने अपेक्षीत उद्देश्य साध्य झाले आहेत ,पुढेही होतील याच श्रद्धेने आपल्याला पुढे जायच आहे .यात कुठेही वैयक्तीक आगाउपणा असू नये म्हणूनच प्रत्येक सिद्ध स्तोत्रात'' अशिष्याय न देयम ''हा प्रघात आहे .
एखादा सोकॉल्ड बुद्धीमान अहंकाराने हे शास्त्र विफल आहे असे म्हणेलही पण खरेच ज्याना मानसीक व शारीरीक बळ ज्यायोगे प्राप्त झाल त्या स्रोताच ज्ञान असेल तर तो विचलीत होण अशक्य .आणी असा अवीचलीत व्यक्तीच हा, ही परंपरा पुढे नेण्याला योग्य बाकीचे अशिष्य ,शास्त्रांची आपल्या बुद्धीच्या जोरावर खिल्ली उडवणारे.[बुद्धीदात्याला विसरून]
सिद्धमंत्र ,सिद्ध आरत्या यांचा प्रभाव मधे मधे असिद्ध लोकानी शब्द जोडल्याने कमी होतो हे ही अगदी खर.

आरती चारचौघाना म्हणता यावी आणि गेय (गाता येण्यासारखी) असावी असं मला वाटतं.
चाली पारंपारीक असाव्यात. पण परंपरा म्हणजे मी आज 'बिडी जलायले' च्या चालीवर आरती म्हणू लागलो, की पुढच्या दोन पिढ्यानंतर तीच परंपरा होऊन बसेल. तेव्हा चाली बद्दल फारसं सांगता येणार नाही. मी बर्‍याच आरत्या वेगवेगळ्या चालीवर ऐकल्यात. (उदा. येई हो विठ्ठले..)

मुळात आरती कोणती होती आणि नंतर काय काय जोडलं गेलं हे तरी कुणाला नीट माहीत आहे.
(स्मरणेमात्रे ...ला माझा विरोध आहे .. चालीत बसत नाही म्हणून). पण बर्‍याच गुरूजींकडून 'स्मरणेमात्रे..' ऐकलेलं आहे.

वाचतोय. अगदी भक्तीभावाने वाचतोय. Happy

------------------------------------------------
मी एवढेच म्हणेन की, आम्ही भोळीभाबडी माणसं. दररोज सायं-सकाळी नित्यनेमाने केवळ "हरिनाम" घ्यायचे या उद्देशाने देवाचे नामस्मरण करण्याचा प्रकार म्हणून भजन किंवा आरत्या म्हणत असतो. आरत्यांचे अर्थ आणि त्यांची कायदेशीर किंवा साहित्यिक बाजू पहायची आम्हांस गरज वाटत नाही.

आमचा देव भावाला भुकेला आहे. बिच्चारा तो देवही ''ज्ञानपीठ अथवा साहित्य अकादमी" विजेता साहित्यिक नव्हता. त्याला वृत्त काय बोडक्याचं कळणार? Happy

आमचा ब्रह्मदेव सृष्टीचा निर्माता असला तरी त्याच्याकडे कोणत्याच विद्यापिठाची स्थापत्यशास्त्राची पदवी नाहीये.

विष्णू सर्वांचे पालन पोषण करतो, पण त्याच्याकडेही मॅनेजमेंट कोर्सची पदवी घेतलेली नाहीये.

शंकरजी संहारक देव असले तरी लष्करशास्त्राचे ट्रेनींग करून सर्टिफिकेट मिळविलेले नाहीये.

आता हे देवच जर अशिक्शित असेल तर त्यांचे भक्तही तसेच असणार, हे उघड आहे.

त्यामुळे आम्हा भक्तासाठी केवळ भक्तीभावच महत्वाचा आहे असे मला वाटते. Happy

तरीही लिम्बुटिम्बुजींशी बर्‍याच अंशी सहमत.

आरत्या संतानी लिहिलेल्या आहेत. पण त्याना चाली कुणी लावल्या? त्या भक्तानीच लावल्या असणार. बहुतांश लोक पुस्तके वाचून आरती पाठ नसतील करत... लोकांच्याबरोबर म्हणताना त्या पाठ होतात. त्याच चाली लोकानाही माहीत होतात. पण मूळ संतानीही तीच चाल लावली होती हे कोण कसे सिद्ध करणार?

फक्त तेवढ्या सन्ख्येने जपजाप्य मात्र व्हावे लागते बर का!

तोडफोड आरत्यादेखील आता मोठ्या संख्येने जपल्या गेल्या असतीलच की.. म्हणजे त्यानाही मंत्रसामर्थ्य आले असेलच!

>>>>>>>>>>>>>>>>>>>>

अगदी अगदी. उलट तोडफोड आरती म्हणणारे संख्येने जास्त असल्यास त्यातच जास्त मंत्रसामर्थ्य येणार आणि खरी , मूळ आरती म्हणणारे फारसे नसल्याने त्यात सामर्थ्य नसणार. Biggrin

Pages