गणेशोत्सव

फोटोग्राफी स्पर्धा क्र. २ : पर्यावरण - सकारात्मक आणि नकारात्मक

Submitted by संयोजक on 8 August, 2009 - 00:14

कुठे थेंब थेंब पाणी वाचवण्यासाठी प्रयत्न चालू आहेत तर कुठे नळ उघडे ठेवून अक्षरशः हजारो लिटर पाणी फुकट चाललंय...
कुठे "टाकाऊतून टिकाऊ" तत्त्वावर कचर्‍यातून सौंदर्य शोधलं जातंय तर कुठे प्लॅस्टिकच्या पिशव्यांचा खच नैसर्गिक सौंदर्य नष्ट करतोय...
कुठे सौरउर्जा, पवनचक्क्यांसारखे अपारंपारिक उर्जा स्त्रोत अधिकाधिक कसे वापरता येतील ह्यावर प्रयत्न चाललेत तर कुठे अजूनही ओली लाकडे जाळून प्रदुषण वाढतंय ...
एकीकडे पर्यावरण संरक्षणासाठी चाललेली प्रयत्नांची पराकाष्ठा तर दुसरीकडे स्वार्थापायी किंवा अज्ञानामुळे चालू असलेली पर्यावरणाची अपरिमीत हानी...

मायबोली गणेशोत्सव २००९ स्पर्धा घोषणा

Submitted by संयोजक on 7 August, 2009 - 00:25

Ganeshotsav_spardha_ghoshana2.jpgमायबोली गणेशोत्सव : हमखास यशस्वी पाककृती!

लागणारे जिन्नस : भरपूर उत्साह, आवडीनुसार कल्पनाशक्ती, विनोदाचा मसाला, कोपरखळ्यांची फोडणी, दाद आणि प्रतिसादांची सजावट आणि रांधायला-वाढायला-चाखायला लेखण्या, कॅमेरे, झारे, कढया, चॉपस्टिक्स आणि रंगपेट्या सुध्दा!!!

लागणारा वेळ : अथपासून इतिपर्यंत.

क्रमवार पाककृती :
१. गणरायाचे स्मरण करून मायबोली गणेशोत्सवासाठी सज्ज व्हावे.

विषय: 

गणेशोत्सव २००९ पूर्वतयारी

Submitted by संयोजक on 22 July, 2009 - 22:31

मायबोलीकरानो
२००९ सालचा गणेशोत्सव जवळ आला आहे. तेव्हा यंदा कोण कोण संयोजन समितीत भाग घ्यायला तयार आहेत ते इथे लिहा अथवा sanyojak या ID ला संपर्क करून कळवा.

तसेच यंदा कुठल्या प्रकारच्या स्पर्धा किंवा कार्यक्रम करावेत या संबंधीच्या सुचनाही इथे लिहा.

आतापर्यंत खालील मायबोलीकरांनी संयोजक मंडळात काम करायची तयारी दाखवली आहे. आपले संयोजक मंडळात स्वागत आहे.

मुख्य संयोजक - panna
संयोजक मंडळ - champak, alpana, cinderella, bsk, RJ, adm
सल्लागार - runi

अजुन कोण कोण यंदा काम करायला तयार आहे ते ईथे कळवा.

विषय: 

Pages

Subscribe to RSS - गणेशोत्सव