नमस्कार मायबोलीकरहो,
मायबोली गणेशोत्सवाचे हे यंदाचं २० वे वर्ष. जगाच्या कानाकोपऱ्यात पसरलेले मायबोलीकर ज्यांना इच्छा असूनही गणपतीत घरी जाता येत नाही अश्या सर्वांसाठी अगदी आपला घरचा उत्सव. उत्सव ऑनलाइन असला तरी यात आरत्या होत्या, पंचपक्वान्नांचा नैवेद्य होता, आरास सजलेली, विविध उपक्रम होते, पानाफुलांच्या रांगोळ्या सजल्या, स्पर्धा झाल्या. उत्सवात मायबोलीचं वातावरण पण एकदम उत्साहपूर्ण असते आणि म्हणूनच नेहमी उत्सव दणक्यात होतो.
खिडकीबाहेरचं जग!
ती आपले पाणीदार डोळे किलकिले करुन खिडकीबाहेरच जग बघण्याचा केविलवाणा प्रयत्न करत होती.
शाळा-ऑफिसात जाणार्यांची गडबड,रस्त्यावरची वर्दळ, फेरीवाले हे सारं तिला एकदातरी जगता यावं. असं वाटे; पण बाहेरच्या दुनियेत मात्र तीच अस्तित्व नव्हतं..
ती आजही नेहमीप्रमाणे किरणची वाट बघत होती. खरं तिला किरणच्या सहवासात स्वतःचा जीव नकोसा होई.
किरणचं तिला नको असताना उगाच जवळ घेणं, बोलतं करायचा प्रयत्न करणं.हे सारं तिला अजिबात आवडत नसे.तरी ती सहन करी.फक्त झोक्यावर बसण्यासाठी.
खूप दिवसांनी आणि अनेक अडथळे पार करत पूर्ण केलेले श्री गजाननाचे चित्र (कॉफी पेंटींग)


---
वक्रतुण्ड महाकाय सूर्यकोटि समप्रभ।
निर्विघ्नं कुरु मे देव सर्वकार्येषु सर्वदा॥
नमस्कार मायबोलीकर,
हे मायबोली गणेशोत्सवाचे विसावे वर्ष. या वर्षीच्या गणेशोत्सवात पाककृती स्पर्धा, लहान मुलांसाठी कार्यक्रम, झब्बू हे मायबोलीकरांचे आवडते कार्यक्रम तर आहेतच. शिवाय सर्व मायबोलीकरांना आवडतील, लहान थोरांना भाग घेता येईल असे काही नवीन उपक्रमही यावर्षी असतील.
या सर्व उपक्रमांबद्दलची माहिती संयोजक मंडळ लवकरच इथे जाहीर करेल.
आमच्या पुण्यातल्या घरी गणपती बसत नाहीत. त्यामुळे मी माबोवरच्या ऑनलाईन गणेशोत्सवाची अगदी घरी गणपती बाप्पा येणार ह्या भावनेने वाट पाहत होते. येणार येणार म्हणत असतानाच तो दिवस आला! माबो प्रशासनाने संयोजक मंडळात काम करण्याची इच्छा असणाऱ्यांची नावे मागवली होती आणि सहभागी व्हा असे आवाहन केले होते. अधाशासारखं मी त्या बाफवर पहिला प्रतिसाद देत माझं नाव नोंदवून घ्या अशी विनंती केली. आपली मंडळात निवड होईल की नाही ह्याबद्दल मी साशंक होते ह्याबाबतीत पुढे काय करायचे ते न समजून फक्त वाट पाहणे हातात असल्यामुळे विसरून गेले.
'रंगरसिया' रंगीबेरंगी शू पॉलिशः फक्त रंग नव्हे मूड देखिल.

१. शुभ्रक्रांती
“शुभ्रक्रांतीच्या रूपाने कृष्णवर्णियांच्या जिवनात नवीन सूर्य उगवलाय. मला आठवतोय तो दिवस जेव्हा गोऱ्यांनी आपल्यावर वांशिक हल्ला केला होता. पण यावेळी आपण संघटीत होतो. एकूणएक गोऱ्याला चिरडून टाकलं आपण, नामोनिशान मिटवून टाकलं त्यांचं या भूमीवरून. जॉनसारखे अनुयायी मिळाले म्हणून हे शक्य झालं.”
“शुभ्रक्रांती जिंदाबाद, जॉन स्मिथ जिंदाबाद” अशा घोषणांनी आसमंत निनादून गेला.
(आपल्याकडे घराजवळ पब नसतात. जिथे जोरजोरात वाजवल्या जाणाऱ्या संगीताच्या तालावर बिनधास्त नाचता येते. जिथे आवाज एका बंद हॉल मध्ये असल्याने आजूबाजूच्या लोकांना त्याचा त्रास होऊ शकत नाही.
अशी ठिकाणे आम्ही असंस्कृत मानतो. म्हणून अशा ठिकाणी जाणे आम्हास असभ्यपणाचे वाटते.
पण तीच गाणी भर रस्त्यावर चौकात जोरजोरात वाजवून अंगविक्षेप करत नाच करायला मात्र आम्हाला आवडते.
कारण ती आमची थोर संस्कृती आहे. आणि आम्ही सुसंस्कृत आहोत.
म्हणून, इतरांना त्याचा जर त्रास होत असेल तर ते नक्कीच असंस्कृत व धर्मविरोधी असतील. कारण...)
भारत माझा देश आहे |
सारे भारतीय मला बांधील आहेत |