Submitted by संयोजक on 22 July, 2009 - 22:31
मायबोलीकरानो
२००९ सालचा गणेशोत्सव जवळ आला आहे. तेव्हा यंदा कोण कोण संयोजन समितीत भाग घ्यायला तयार आहेत ते इथे लिहा अथवा sanyojak या ID ला संपर्क करून कळवा.
तसेच यंदा कुठल्या प्रकारच्या स्पर्धा किंवा कार्यक्रम करावेत या संबंधीच्या सुचनाही इथे लिहा.
आतापर्यंत खालील मायबोलीकरांनी संयोजक मंडळात काम करायची तयारी दाखवली आहे. आपले संयोजक मंडळात स्वागत आहे.
मुख्य संयोजक - panna
संयोजक मंडळ - champak, alpana, cinderella, bsk, RJ, adm
सल्लागार - runi
अजुन कोण कोण यंदा काम करायला तयार आहे ते ईथे कळवा.
विषय:
Groups audience:
शेअर करा
आयला !! यंदा
आयला !!
यंदा शिट्टीचं राज्य आलं की संयोजक मंडळात..
पन्ना आणि संयोजक मंडळ तुम्हाला शुभेच्छा.. पूर्ण वेळ जमेल की नाही माहित नाही पण काहीही मदत लागली तर कळवा...
पांशा.
मागच्या वर्षीच्या अनुभवावरून तुम्हाला हवे असतील तर (फुकटचे) सल्ले द्यायला ही आम्ही तयार आहोत.. नाही का रूनी..?
पांशा ऑफ.
अरे वा..
अरे वा.. झाली तयारी सुरु. कामे काय असणार आहेत? मदत करायला आवडेल जमेल तसे.
हो हो
हो हो सल्ले काय ते तर न मागताही देवुच
खर तर एक लेख लिहायला हवा मागच्या वर्षीच्या मंडळाने केलेल्या काही चुका परत होवु नयेत म्हणुन.
तसा लेख
तसा लेख बहुधा 'काम चालू रस्ता बंद' विभागात असेल कोठेतरी
मदत लागली तर मागा गं बायांनो (आणि बापड्या :p)
नक्की
नक्की नक्की मिलिंदा..
ओके, माझी
ओके, माझी पण मदत लागली तर कळवा. काम करायची तयारी आहेच, नुसते आश्वासन नाही.
--------------
नंदिनी
--------------
मी पण तयार
मी पण तयार आहे....
~~~~~~~~
ज्यांना रात्री केलेल्या कृत्याचा सकाळी उठल्यावर
पश्चाताप होतो, अशा लोकांनी सरळ दुपारीच उठाव...
मलाही मदत
मलाही मदत करायची आहे.
पडेल ते ( अर्थात जमेल ते ) काम करायची तयारी आहे!
www.bhagyashree.co.cc/
माझी
माझी सुद्धा काम करायची इच्छा आहे.
अडम आणि
अडम आणि रुनी, मदतीचा हात पुढे केल्याबद्दल मनापासून धन्यवाद!!
तुमचा मागच्या वर्षीचा ताज्या ताज्या अनुभवाचा लाभ आम्ही नक्की उठवू.
आणि हो, फुकटचे सल्ले वेलकम!
मिलिंदा, मनु, नंदीनी मदत तर लागेलच, तेव्हा नक्की सांगू. अगदी हक्काने.
मंडळी,
मंडळी, गणेशोत्सवात कुठले कुठले कार्यक्रम ठेवावेत, कशा प्रकारच्या स्पर्धा असाव्यात ह्याबाबत काही आयडीयाज् असतील तर इकडे लिहा.
तसेच अजुन कुठल्याही प्रकारच्या सूचना असतील तरी लिहा.
माझीही
माझीही तयारी आहे या वर्षी मदत करण्याची.....
मी काही
मी काही सुचवू स्पर्धांविषयी?
१. खूप सदस्य अॅक्टीव्ह असतात सध्या वेगवेगळ्या बाफंवर. त्यांचा सहभाग वाढेल अश्या स्पर्धा- जसं की, विषय द्या, त्यावर लिहायचं. निबंध स्पर्धेसारखं. पण विषय मायबोलीनिगडीत असेल तर बरं. (जसं- माझा मायबोलीवरचा पहिला मित्र, माझं माबोवरचं पहिलं गटग, माझं माबोवरचं पहिलं वर्ष) असं काहीही. याने जास्त सहभाग वाढेल.
२. 'स्पिन द यार्न' हा तर गणेशोत्सवातला हिट आयटेम! परंतु गेल्या वर्षी तो चालला नाही, कारण खूप गुंतागुंत झाली होती त्यात. शिवाय बहुतांश लोकांना तो कसा खेळायचा याची कल्पना नाही. हे सोपं करून सांगता आलं, तर एसटीवाय सारखी दुसरी धमाल नाही!
(हा खेळ घेणार असाल, तर मी मदत करू शकेन.)
३. तसंच- कविता एसटीवाय. किंवा दर दोन दिवसांनी एक विषय द्यायचा, त्यावर पद्य प्रकार मागवायचा.
४. त्याच धरतीवर -विषय द्यायचा आणि त्यावर हास्यकविता मागवायच्या.
किंवा विडंबन कविता- माबोवरचीच एखादी कविता (त्या कवीची परवानगी घेऊन) द्यायची आणि त्यावर विडंबन कविता करायला सांगायची.
५. पाककला स्पर्धा. याला तूफान प्रतिसाद मिळतो. काही वर्षापूर्वी तीन पदार्थ दिले होते, त्यात अजून एकच पदार्थ अॅड करून त्या चारच पदार्थांपासून पाककृती करायची होती- कल्पनाशक्ती, वविध्य याला जास्त महत्त्व होते- असे काहीतरी करता येईल.
किंवा गेल्या वर्षी वन डीश मील, किंवा हेल्दी ब्रेकफास्ट या अंतर्गत रेसिपी मागवल्या होत्या- तसे काही करता येईल.
किंवा एक स्पर्धा ठेवता येईल- तुमच्याकडे a, b, c, d इतके सामान आहे. ६ पाहुणे आलेत. अर्धा तास आहे. यातून त्यांचा पाहुणचार कसा कराल? वेळेनिशी सांगा.. असे काहीतरी.. टाईम मॅनेजमेन्ट बाफवर आलेले प्रतिसाद बघता हे असं काहीतरी हिट होऊ शकेल
६. छायाचित्र रीलेटेड स्पर्धा- यांनाही चांगला प्रतिसाद मिळतो. तुम्ही छायाचित्र दिलेय त्यावरून 'कोण कोणास काय म्हणाले', 'मनात नक्की काय असेल' अश्या टाईपचे लिखाण मागवायचे. किंवा विषय द्या, त्यावर छायाचित्र मागवा.
७. नैवेद्य स्पर्धा- फोटो मागवायचे गणपतीच्या नैवेद्याचे. (आमच्या ऑफिसमधे मोदक स्पर्धा होती गेल्या वर्षी- दणदणीत प्रतिसाद मिळाला)
८. रांगोळी स्पर्धा- रांगोळीसाठी विषय देऊ शकाल. त्याशिवाय संगणकीय कमाल दाखवूनही लोक चित्र सबमिट करू शकतील. त्याच धरतीवर मेंदी स्पर्धा- ही हाताने काढलेली, किंवा संगणकावर काढलेली देखील चालू शकेल- तुम्ही ठरवाल तसे.
यातल्या काही स्पर्धांसाठी स्पर्धकांना आधी थोडा वेळ द्यावा लागेल- जसे की विषयानुसार छायाचित्र स्पर्धा.. त्याप्रमाणे अॅक्च्युअल गणेशोत्सवाच्या आधी घोषणा करावी लागेल. - तुम्हाला त्यानुसार वेळेची आखणी करावी लागेल.
तसंच खूप स्पर्धा झाल्या, तर कुठेच धड प्रतिसाद मिळत नाही. तोही बॅलन्स बघावा लागेल.
बरेच लिहिले. यातले कितपत उपयोगी ठरेल, कल्पना नाही. थोडा उपयोग झाला, तरी गणपती पावला. शुभेच्छा. गणपती बाप्पा मोरया!
गणपती
गणपती बाप्पा मोरया!!
संयोजक मंडळाला भरघोस शुभेच्छा!!
फक्त एकच सुचवू इच्छिते : स्पर्धेचा विजेता मतदानाने निडायचा असेल तर स्पर्धकाचे नाव्/आयडी गुप्त ठेवता आला तर पाहा. बरेचदा प्रवेशिकेच्या कन्टेन्टपेक्षा आयडीला मत दिलं जातं. ही युक्ती गझल कार्यशाळेच्या संयोजकांनी केली जी अतिशय यशस्वी ठरली होती.
माझी पण
माझी पण तयार आहे मदती साठी..:) आणि केवळ आश्वासन नाही तर खरोखर
*************************
हा देह तुझा पण देहातिल तू कोण
हा देह तुझा पण देहाविण तू कोण
इथे
इथे सर्वांकडेच प्रतिभा आहे असे नाही. तेंव्हा स्वानुभवावर आधारीत काही लेखन ठेवलत तर जास्त लेखन येऊ शकेल.
"I have measured my life with coffee spoons"
- T.S.Eliot
कुठे होतो
कुठे होतो गणेशोत्सव नक्की म्हणजे कुणाकडे?
इथेच होतो.
इथेच होतो. वर 'मायबोली विशेष' अशी लिन्क दिसते ती क्लिक करा. मग 'गणेशोत्सव' लिन्क दिसेल त्यावर क्लिक करा.
पूनम, खूपच
पूनम, खूपच चांगल्या कल्पना मांडल्या आहेस!! नक्कीच उपयोगी ठरतील.
धन्स
------------------------------------------
प्यार की कसम है, न देख ऐसे प्यार से
सार्वजनिक
सार्वजनिक गणेशोत्सवात रोज संध्याकाळी काहीतरी मनोरंजनाचे कार्यक्रम असतात - नाटक, गाणं, सिनेमा, भाषण, कथाकथन असे. रोज एक-दोन नामवंत, प्रतिभाशाली मायबोलीकरांना असे काही सादर करण्याची विनंती करता येईल - गाण्याच्या मैफिलीचं, आल्बमचं रसग्रहण, चित्रपटांचं रसग्रहण, कथा, प्रवासवर्णनपर लेख , एखादी मुलाखत असे दहा वेगवेगळे कार्यक्रम ठेवता येतील.
पूनम आणि
पूनम आणि शोनू , दोघींना अनुमोदन .:)
पुनम
पुनम चांगल्या सुचना.अजुन काही नविन सुचना?...
छायाचित्र
छायाचित्र स्पर्धेसाठी हा विषय कसा वाटतोय?
" आम्ही मायबोलीकर" : एका मायबोलीकरा(/करणी)च्या नजरेतून दुसरा/दुसरी/दुसरे मायबोलीकर
म्हणजे मुख्य उद्देश व्यक्तीचित्र पण छायाचित्रकार आणि ज्यांचं छायाचित्र आहे ते सगळे मायबोलीकर असावेत.
अजय,
अजय, "ज्यांचं चित्र आहे त्यांच्या संमतीने" टाकावे लागेल.
कल्पना छान आहे.
पूनम तुझ्या सूचना इथेही अॅड कर - गणेशोत्सव व्यवस्थापन
ते लेखन तसे जुने आहे. त्यामुळे दरवर्षीच्या संयोजक मंडळांनी उत्सव संपल्यावर त्यात भर घालावी/संपादन करावे अशी अपेक्षा आहे.
अजय, मस्त
अजय, मस्त आहे विषय. मायबोलीकरांना आवडेल असा आहे. हा विषय चित्रकला अथवा व्यंगचित्रकलेसाठी कसा वाटेल ? तिथे न भेटलेल्या मायबोलीकरांच्या सुद्धा प्रतिमा चितारायला अधिक वाव आहे. अर्थात हे माझे मत
पूनम, शोनु छान कल्पना.
माझी तयारी
माझी तयारी आहे काम करायची....... काही काम असेल तर सांगा.....
संयोजक मंडळाला शुभेच्छा
एसटीवाय ला
एसटीवाय ला पर्याय नाही.
----------------------
हलके घ्या, जड घ्या
दिवे घ्या, अंधार घ्या
घ्या, घेऊ नका
तुमचा प्रश्न आहे!
ह्या
ह्या वर्षीच्या गणेशोत्सव संयोजक समितीला शुभेच्छा !
स्पर्धा विषयक काही कल्पना:
१) डोके चालवा स्पर्धा /परस्पर संबंध ओळखा : मायबोलीवर सध्या ह्या प्रकाराला प्रचंड प्रतिसाद येतो आहे. आहे त्या पद्धतीने पण ११ दिवस ही स्पर्धा घेवु शकतो.
दररोज ३ परस्पर संबंध असलेली तिन चित्रे द्यायची आणि या तीन चित्रांतुन अभिप्रेत असणारी व्यक्ती/ घटना इ. ओळ्खायचे. संयोजकांनी निकाल ११ दिवसानंतरच जाहीर करायचा. तो पर्यंत पाहिजे तितकी उत्तरे येवु देत. जर एक दिवसानंतर पण योग्य उत्तर आढळले नाही तर क्लु म्हणुन एखादे चित्र द्यायला हरकत नाही.
२) कविता/चारोळी सवाल जवाब : संयोजक मंडळ दररोज एक सवाल करणारी कविता टाकतील. मायबोलीकरांनी त्याला उत्तर म्हणुन एक कविता लिहायची. उत्तर हे सवाल आहे त्याच छंदात असु शकते नाही तर कोणत्याही प्रकारात (चारोळी, मुक्तछंद, काहिच्या काही, गझल इ.) असु शकतो.
परिक्षण गण एका उत्तराला विजेते म्हणुन घोषित करतील.
(प्रश्न करणारी कविता मायबोली कर लिहु शकतील किंवा एखाद्या कवीची असु शकते. उदा. 'आम्ही कोण म्हणुनी काय पुसता ...)
३) ही कल्पना कितपत राबवता येईल माहीती नाही पण डोक्यात आले म्हणुन लिहतोय.
प्रत्येकाने max. ३ किंवा ५ पर्यंत मायबोली ला अधिक आकर्षक किंवा कार्यक्षम करा येतील अशा प्रकारच्या सुचना (wish list) सादर करायच्या आहेत. सुचना ह्या अंमलात आणण्या जोग्या असायला पाहिजेत. (नाहीतर जिथे वादावादी चालु आहे त्या बीबी मधुन धुर आला पाहिजे असल्या सुचना काही कामाच्या नाहीत.) मा. अॅडमिन आणि त्यांचे सहकारी विजेता घोषित करतील.
४) पाककृती स्पर्धा ही नेहमीच असते. पाककृती बद्दल काही टिप्स देणार्या सुचना स्पर्धकांनी पाठवायच्या. (max. ३ किंवा ५ पर्यंत ) ह्या टीप्स ह्या वीज, वेळ, सामान ,श्रम यांची बचत करणारा असावा. परीक्षक अर्थात विजेता स्पर्धक निवडतील.
वर शोनु यांनी सुचवलेली कल्पना पण चांगली आहे.
बा़की STY (गद्य/पद्य), छायाचित्रांवर आधारीत स्पर्धा आहेतच, त्या नेहमीच मायबोलीकरांना आवडत आलेल्या आहेत.
गणपती बाप्पा मोरया !
मस्त रे
मस्त रे एमजी! मला सगळ्याच कल्पना आवडल्या.

सद्य परिस्थितीचा आढावा घेऊन यशस्वी होतील अश्या स्पर्धा सुचवल्या आहेस.
परिक्षकांऐवजी काही ठिकाणी वोटिन्गही चालेल.
मायबोली
मायबोली गणेशोत्सव म्हटला की स्पर्धा, एसटीवाय, आरत्यांचा बीबी (आणि अर्थातच मायबोलीकरांचा उत्साह) या गोष्टी आता अगदी सरावाच्या झाल्या आहेत. बर्याच स्पर्धा मनोरंजक असतात हे कबूल; पण स्पर्धा, प्रतिभेचा आविष्कार/'विविधगुणदर्शन' आणि पाठोपाठ होणारे कौतुक/वाहव्वा या सर्वांखेरीज इतर काही उपक्रम राबवता येतील का असा किडा डोक्यात वळवळला (सध्या 'एंटरटेनमेंट के लिये कुछ भी करेगा' वगैरे कारेक्रमांमुळे एंटरटेनमेणीचा सुकाळु पातला आहे; त्यामुळेच की काय हल्ली अधूनमधून 'एंटरटेनमेंट के अलावा भी कुछ करेगा' वगैरेशी उबळ माझ्या नॉनफिक्शनप्रिय मनात उफाळून येत असते. :फिदी:).
मध्यंतरी लालबागेच्या राजाचे गेल्या साठ-सत्तर वर्षांमधल्या मूर्त्यांचे फोटो फिरत-फिरत ईमेलावर पाहायला मिळाले. कालसंगत प्रभाव/स्थित्यंतरे दाखवणार्या लालबागेच्या राजाच्या पोशाखासारख्या गोष्टी निरखल्या की मुंबईतल्या या ख्यातनाम गणेशोत्सव मंडळाचा आणि त्या-त्या काळातल्या वातावरणाचा परस्परसंबंध उलगडून दाखवणारा दृक्-इतिहास उमगू लागतो. तो प्रकार मोठा रोचक वाटला होता. त्या धर्तीवर आपण मायबोलीकर आपापल्या गावांतल्या महत्त्वाच्या/ऐतिहासिकमूल्य किंवा पर्यटनमूल्य असलेल्या गणपतीमंदिरांची माहिती, प्रताधिकारमुक्त छायाचित्रे 'विकी तत्त्वावर' (* स्पष्टीकरणाकरता इंग्लिश दुवा) गोळा करू शकतो. किंवा आपापल्या गावांतल्या महत्त्वाच्या सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांची (उदा.: लालबागेच्या राजाची उपरिनिर्दिष्ट लिंक) माहिती, जुनी छायाचित्रे विकी पद्धतीने गोळा करू शकतो. या सर्व माहितीची प्रताधिकारमुक्त (कॉपीराइट-मुक्त) संकलन असलेलं एखादं विकी संस्थळ हे या उपक्रमाचं फलित असू शकेल. असं विकी संस्थळ आपापल्या परिसरातल्या गणेशोत्सवाचं दस्तऐवजीकरण करायला, गणेशोत्सवाची स्थानिक पातळीवरील पर्यटनविषयक माहिती एकत्र करायच्या दृष्टीने मोलाचं ठरेल.
अर्थात ही कल्पना उदाहरणादाखल मांडली. मूळ हेतू असा की संख्येनं बर्याच असलेल्या मायबोलीकरांनी आता गणेशोत्सव (आणि तत्सम प्रासंगिक उरसांमधून) करमणुकीच्या कार्यक्रमांबरोबरीने महाराष्ट्राचं/मराठपणाचं संचित ज्ञान/माहिती गोळा करणारे, आपल्या सर्वांना उपयोगी ठरू शकतील असे (मुख्य म्हणजे निव्वळ नेटकनेक्शनाच्या व सामान्यज्ञानाच्या जोरावर करता येतील असे
) विकीतत्त्वावरील उपक्रमही राबवावेत.
-------------------------------------------
हे पाहिलंत का? : मराठी विकिपीडिया - मुक्त विश्वकोश
Pages