समाज

शामभट्ट (एक नामांकित जोशी) आणि त्याचा शिष्य बटो यांचा वृत्तांत

Submitted by प्रकाश घाटपांडे on 16 August, 2023 - 07:54

शामभट्ट (एक नामांकित जोशी) आणि त्याचा शिष्य बटो यांचा वृत्तांत

भारतीय स्वातंत्र्यादिनाच्या शुभेच्छा !

Submitted by ढंपस टंपू on 15 August, 2023 - 04:37

त्र्याहत्तराव्या भारतीय स्वातंत्र्यदिनाच्या सर्व नागरिकांना हार्दिक शुभेच्छा !
( विवाहीत पुरूष, बालके व बंदी सोडून).

विषय: 

कदाचित!

Submitted by झुलेलाल on 14 August, 2023 - 22:39

... भारत भिका सावकार नावाच्या कुणीतरी परवा कधीतरी आत्महत्या केली.
दारूच्या नशेतच त्यानं स्वत:ला संपवलं, असं त्या बातमीत म्हटलं होतं. काय कारण असेल त्याच्या आत्महत्येमागचं?
कर्जबाजारीपणा?... बेकारी?... कौटुंबिक कलह?... की नुसती व्यसनाधीनता?...
... भारत भिका सावकार हा त्या दिवशी आत्महत्या करणारा एकटा नव्हता.
त्याच्या आधीच्या आठवड्यात, विदर्भात एका दिवशी, जवळपास दर तासाला एक आत्महत्या झाली होती...
तरीही, एकाच वर्तमानपत्राच्या डाव्या पानावर, एका न दिसणा-या कोपर्‍यात, भारत भिका सावकारच्या आत्महत्येची बातमी छापून आली होती...

विषय: 

भूमिपुत्र वगैरे…

Submitted by झुलेलाल on 14 August, 2023 - 11:30

मडगावच्या एका रेस्टॉरंटमध्ये काम करणारा एक मुलगा. पंधरासोळा वर्षांचा असावा. चार वर्षांपूर्वी गावाकडून आलेला. इथे नोकरीला लागला तेव्हा फक्त टेबल पुसायचं काम करायचा. त्यातही मालकाकडून बोलणी खावी लागायची.
आता एका हातात राईस प्लेट आणि दुसऱ्या हातात दोन कपबशा पकडून सर्व्हिस देतो.
एक्स्पर्ट झालाय.
वर, कमालीचा हसतमुख !
माझ्या टेबलवर आला तेव्हा त्याच्याशी दोन शब्द बोलल्याशिवाय राहाववलं नाही!
तो मूळचा बिहारचा. मधुबनी का काहीतरी जिल्ह्यातलं एक गाव. तिथे आईवडील, भावंड... मडगावला बाराव्या वर्षी आला. कोंकणी भाषेचा गंध नाही. हिंदीवर जमतंय इथे. बरं चाललंय म्हणाला.

विषय: 

सारे भारतीय माझे बांधव आहेत !..

Submitted by झुलेलाल on 13 August, 2023 - 22:41

गावाकडच्या मित्राचा फोन वाजला. सकाळी वर्तमानपत्रं वगैरे वाचत असताना हमखास त्याचा फोन येतो, तेव्हा मी तो टाळत नाही. कारण त्या प्रत्येक वेळी त्याच्या बोलण्यातील एक संवेदनशील जाणीव आपल्याला विचार करायला लावते. आजही, मी फोन उचलून हॅलो म्हणालो, आणि फारशी प्रस्तावना न करता त्याने थेट विचारलं, “आजच्या तू नोंद घेतलेल्या सर्वात महत्वाच्या बातम्या कोणत्या?”... क्षणभर मी विचार करू लागलो. पत्रकाराच्या जगात, प्रत्येक बातमीच महत्वाची असते. कोणती बातमी लोकांपर्यंत पोहोचवायची किंवा कोणती बातमी उशिरा पोहोचली तरी चालेल याचेही काही आडाखे असतात.

जगण्याचे सोने व्हावे…

Submitted by झुलेलाल on 13 August, 2023 - 08:11

जगणे आणि जिवंत असणे यातला फरक जेव्हा कळतो तेव्हा जगणे अधिक आनंदी होते. हा फरक सूक्ष्म असतो, पण अनेकदा तो समोर आला तरी जाणवत नाही. बऱ्याचदा तो सहजपणे समोर येऊनही, पकडून ठेवायचं सुचत नाही. मग आपलं जगणं म्हणजे केवळ जिवंत असण्यापुरतंच उरतं. जगण्याचा साक्षात्कार व्हावा, केवळ जिवंतपणाच्या सपक जाणिवेतून बाहेर पडून जगण्याचा जिवंत अनुभव घ्यायचा असेल, तर त्याचा जाणीवपूर्वक शोधही घ्यावा लागतो. अनेकदा, अचानक हा अनुभव समोर येतो, आणि ज्याच्या शोधात आपण चाचपडत होतो असे वाटते, तो शोध संपतो.

सेवाधर्मी!

Submitted by झुलेलाल on 12 August, 2023 - 04:20

सह्याद्रीच्या एका उंच कड्याच्या पायथ्याशी वसलेलं कोकणातलं एक टुमदार गाव... हा कडा असा उभा, सरळसोट उभा, की त्याच्या पायाशी उभे राहिल्यावर आपल्याला या निसर्गचक्रातील आपल्या क्षुद्रपणाची आपोआप जाणीव व्हावी, मनावर साचलेली अहंपणाची सारी जळमटे साफ झाल्याचा साक्षात्कार व्हावा...
तर, त्या गावात त्या दिवशी हा अनुभव घेऊन मी तिथल्या शाळेत पोहोचलो. निमित्त खासच होतं.

सॉरी काका, यु आर नॉट वेलकम !

Submitted by छन्दिफन्दि on 3 August, 2023 - 23:44

सॉरी काका, यु आर नॉट वेलकम!
संध्याकाळी सहा साडेसहाची वेळ. ती आणि निशा खाली गप्पा मारत उभ्या होत्या. समोरून शेजारच्या बिल्डिंग मधले काका आले. त्यांनी हटकले, "अग, तुला हवं होत ना ते पुस्तक आणलंय. चल येतेस का ? घेऊन जा."
"पुस्तक ???" तेवढ्यात तिला आठवलं की तिला शाळेच्या गॅदरिन्ग मध्ये एक नाट्य उतारा करायचा होता आणि तिने मागच्या आठवड्यात काकूंच्या कानावर घातलेलं की तुमच्या लायब्ररीत मिळालं तर बघाल का म्हणून.
"निशा, चल पट्कन आणूयात ."
"नाही ग मला चिक्कार होम वर्क आहे , मी जाते घरी तू आण जाऊन."

शब्दखुणा: 

Pages

Subscribe to RSS - समाज