समाज

एकोणिसाव्या शतकातील महाराष्ट्रातील समाज सुधारक: 3. दादोबा पांडुरंग (1814 ते 1882)

Submitted by अवल on 15 July, 2024 - 00:01

(या सर्व सुधारकांचं कार्य प्रचंड मोठं आहे, खूप कष्ट घेऊन सविस्तर संशोधनपर लेख लिहावा इतकं यांचं कार्य! आजचे आपले जीवन जसे आहे, त्यात या सुधारकांचा मोठा वाटा आहे.

एकोणिसाव्या शतकातील महाराष्ट्रातील समाज सुधारक: 1. जगन्नाथ शंकरशेठ (1803-1865)

Submitted by अवल on 11 July, 2024 - 04:46

(परवा एका चित्रपटाबद्दल एके ठिकाणी वाचलं, तिथे डॉ. भाऊ दाजी लाड यांचा उल्लेख वाचला. अन मग वाटलं की या एकोणिसाव्या शतकातील महाराष्ट्रातील सुधारकांवर कितीतरी पुस्तकं, लेख लिहिले गेले आहेत. अगदी विकिपिडिया, विश्वकोश इथेही यांची माहिती लिहिलेली आहे. पण तरीही यातली बरीच लोकं हळूहळू काळाच्या पडद्या आड हरवून जात आहेत. अगदी काही कारणांनिमित्त कोणी ती मुद्दाहून जाऊन वाचतीलही. अन भरपूर तपशील, विश्लेषण सापडेल. पण सहजी समोर आलं तर अनेकांना त्यांची नव्याने ओळख होईल. या दृष्टिकोनातून एका व्हॉट्सअप गृपवर काही सुधारकांची माहिती लिहिलेली. नंतर ती ब्लॉगवरही डकवली.

शब्दखुणा: 

संभाजी भिडेचे नवीन वादग्रस्त विधान

Submitted by Sharadg on 30 June, 2024 - 22:51

पुण्यात काल पालखी सोहळ्यात संभाजी भिडेने आपल्याला मिळालेले स्वातंत्र्य हे दळभद्री होते अशी गरळ ओकली आहे. या माणसाला अशी वादग्रस्त विधाने करून काय मिळते त्यालाच ठावूक.
अभिव्यक्ती स्वातंत्र्य आहे म्हणून काहीही बोलणे हा गैरवापर आहे

विषय: 
शब्दखुणा: 

अधिवेशनात मायबोलीकरांची भेट

Submitted by समीर on 24 June, 2024 - 09:38

या शुक्रवारपासून सॅन होजे येथे बृहन्महाराष्ट्र मंडळ अधिवेशन सुरु होत आहे. बे एरियातून तर बरेच मायबोलीकर उपस्थीत असतिल. बाकी अजून कोणी मायबोलीकर येणार आहात का? आपण जेवणाची एखादी वेळ ठरवून गटग करू शकतो.

विषय: 

साडेतीनशे पानी झाकोळ (पुस्तक परिचय : शगी बेन, लेखक : डग्लस स्टुअर्ट)

Submitted by ललिता-प्रीति on 13 June, 2024 - 10:20

१९९० च्या दशकाची सुरुवात. स्कॉटलंडची राजधानी ग्लासगो. १५-१६ वर्षांचा एक मुलगा, शगी, कॉट-बेसिसवर एकटाच राहतोय. एका सुपरमार्केटच्या स्नॅक्स काऊंटरवर जेमतेम नोकरी करतोय. त्याच्या अवतीभोवती स्थानिक गरीब नाहीतर स्थलांतरित माणसं. अभावग्रस्त जीवन. शगीला हेअरड्रेसर व्हायचंय. पण आधी रोज येणार्‍या दिवसाला एकट्याने तोंड द्यायचंय.
रोज येणार्‍या दिवसाला काहीही करून तोंड देणे हे त्याच्या पाचवीला पुजलेलं आहे. कसं? कोण आहे हा शगी?
त्याची गोष्ट सांगण्यासाठी कादंबरी आपल्याला ११ वर्षं मागे नेते.

नागरिकांच्या सकारात्मक सुचना - Citizens' Think Tank

Submitted by मामी on 9 June, 2024 - 00:53

ही एक कल्पना डोक्यात आली ती इथे लिहीत आहे. काहीशी विस्कळीत लिहिली गेली आहे असं वाटतंय. सुचनांचं स्वागत आहे.

********************************************************************************************

विषय: 

घरचा आहेर

Submitted by प्रकाश घाटपांडे on 29 May, 2024 - 05:36

"स्वत:चे ठेवायचं झाकून अन दुसर्‍याच बघायचं वाकून"ही म्हण आपल्याला माहित आहे. यात आपल्या त्रुटी/चुका/विसंगती झाकून ठेवायच्या व दुसर्‍याच्या चुका/ त्रुटी/विसंगती याबद्दलच फक्त बोलायच असाही एक अर्थ अभिप्रेत आहे.

निबंध

Submitted by संप्रति१ on 24 May, 2024 - 09:24

महोदय,
तुमच्या निबंधलेखन स्पर्धेची जाहिरात वाचनात आली. त्यामध्ये भाग घेण्याची इच्छा निर्माण झाली. म्हणून 'रस्ते अपघात' या विषयावरील एक निबंध सोबत पाठवत आहे. तो तुम्ही स्पर्धेसाठी विचारात घ्यावा, ही विनंती.

विषय: 

टाळता येणारी दुर्घटना - घाटकोपर होर्डिंग कोसळण्याची घटना

Submitted by उदय on 16 May, 2024 - 03:06

घाटकोपर येथे होर्डिंग पडण्याच्या दुर्घटनेत १७ लोकांचा मृत्यू झाला अशी बातमी वाचली. Sad एखादा अपघात होणे समजतो पण या प्रकाराला अपघात म्हणायचे का टोकाचा संघटित हलगर्जीपणा ?
https://saamtv.esakal.com/mumbai-pune/ghatkopar-hoarding-collapse-case-1...

विषय: 

वर्क फ्रॉम होम: हुलकावणी देणारा वाळवंटातील गारवा!

Submitted by निमिष_सोनार on 14 May, 2024 - 08:41

कोविड महामारीपासून, घरून कामाला खूप महत्त्व प्राप्त झाले आहे. ती काळाची गरज होती. पण आता परिस्थिती नसताना त्याच गोष्टीला चिकटून राहण्यात काय शहाणपण आहे? काही प्रमाणात प्रवासातील अडथळे आणि प्रवासाचा वेळ दूर होतो, कर्मचाऱ्यांची ऊर्जा वाचते. पण तुमचा प्रवासाचा त्रास वाचला म्हणून ऑफिसमधून काम करण्याचे इतर मौल्यवान फायद्यांचा त्याग करणे योग्य आहे का?

Pages

Subscribe to RSS - समाज