डग्लस स्टुअर्ट

साडेतीनशे पानी झाकोळ (पुस्तक परिचय : शगी बेन, लेखक : डग्लस स्टुअर्ट)

Submitted by ललिता-प्रीति on 13 June, 2024 - 10:20

१९९० च्या दशकाची सुरुवात. स्कॉटलंडची राजधानी ग्लासगो. १५-१६ वर्षांचा एक मुलगा, शगी, कॉट-बेसिसवर एकटाच राहतोय. एका सुपरमार्केटच्या स्नॅक्स काऊंटरवर जेमतेम नोकरी करतोय. त्याच्या अवतीभोवती स्थानिक गरीब नाहीतर स्थलांतरित माणसं. अभावग्रस्त जीवन. शगीला हेअरड्रेसर व्हायचंय. पण आधी रोज येणार्‍या दिवसाला एकट्याने तोंड द्यायचंय.
रोज येणार्‍या दिवसाला काहीही करून तोंड देणे हे त्याच्या पाचवीला पुजलेलं आहे. कसं? कोण आहे हा शगी?
त्याची गोष्ट सांगण्यासाठी कादंबरी आपल्याला ११ वर्षं मागे नेते.

Subscribe to RSS - डग्लस स्टुअर्ट