चक दे पंजाबी : एक अवलोकन
मला नेहमीच पंजाबी लोकांचा जगण्याकडे पाहण्याचा दृष्टीकोन आवडतो. कधीच नशिबावर . हवाला ठेवून न जगणारे, भिक न मागता, कष्टावर अतोनात विश्वास ठेवणारे, धर्मातील सेवेसारख्या व्रताचा आयुष्याच्या प्रत्येक पायरीवर अंगीकार करणारे आणि कोणत्याही कसोटीच्या क्षणी मनासारख्या न होणाऱ्या गोष्टीला ‘ओ! कोई गल नहीं’ असं म्हणत काळजीचीच विकेट घेणारे; खाण्यापिण्यात, आदरतिथ्यात आणि वागण्यात कमालीचा मोकळेपणा राखणारे आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे अल्पसंख्यांक (अगदी २-३%)असूनही कधीही कुठल्या आरक्षणाची मागणी न करता स्वतःच स्थान नोकरी,व्यवसाय ते देशाचं संरक्षण करण्यापर्यंतच्या क्षेत्रात निर्माण करणारे असे ते पंजाबी!