मला नेहमीच पंजाबी लोकांचा जगण्याकडे पाहण्याचा दृष्टीकोन आवडतो. कधीच नशिबावर . हवाला ठेवून न जगणारे, भिक न मागता, कष्टावर अतोनात विश्वास ठेवणारे, धर्मातील सेवेसारख्या व्रताचा आयुष्याच्या प्रत्येक पायरीवर अंगीकार करणारे आणि कोणत्याही कसोटीच्या क्षणी मनासारख्या न होणाऱ्या गोष्टीला ‘ओ! कोई गल नहीं’ असं म्हणत काळजीचीच विकेट घेणारे; खाण्यापिण्यात, आदरतिथ्यात आणि वागण्यात कमालीचा मोकळेपणा राखणारे आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे अल्पसंख्यांक (अगदी २-३%)असूनही कधीही कुठल्या आरक्षणाची मागणी न करता स्वतःच स्थान नोकरी,व्यवसाय ते देशाचं संरक्षण करण्यापर्यंतच्या क्षेत्रात निर्माण करणारे असे ते पंजाबी!
त्यांच्यातल्या संत-बंता सारख्या पात्राने देशाचं मनोरंजन केलं तरी यांच्या ‘भावना’ कधीच दुखावत नाहीत. याउलट दुसऱ्या एखाद्या धर्म/जात/पंथाच्या पात्राचा असा वापर केल्यास काय गहजब देशात (पक्षी: अभिव्यक्ती माध्यमात) उडेल, हे सर्वश्रुत आहेच!
धर्माबाबतीत बोलायचं झालं तर, स्वसंक्षणासाठी ५ ‘क’ने सुरु होणाऱ्या गोष्टी (१ केस,२ कन्घा-कंगवा,३कृपण-कट्यारीसारखे शस्त्र,४ कच्छा-अंतर्वस्त्र,५ कडे ) जवळ बाळगणे सोडल्यास इतर कोणत्याच अवडंबराची (उदा.दुध ओतणे,नारळ फोडणे,उदबत्ती,अभिषेक,उपवास आदि.) गरज नाही.
असा सुटसुटीत धर्म आणि वर ‘सेवे’सारख्या पवित्र गोष्टीचा धर्म पाळण्यासाठीचा आग्रह! देवांची गर्दी नाही. एक काय तो ‘गुरु ग्रंथसाहिब’! त्यातच १० गुरूंच्या चांगल्या वागण्याच्या शिकवणुकीचा ओविसंग्रह, बर त्यात इतकी ‘सहिष्णुता’ की आपल्या नामदेवांसहित इतरही काही संतांची वचने भाषा,प्रांत वगैरेंच्या सीमा पार करून त्यात जाऊन बसली आहेत. एका अर्थाने आपल्या मराठीत ज्ञानोबांनी म्हटल्याप्रमाणे ‘शीख’ धर्म वैश्विकतेच्या जवळ जातो.
माणसांबाबतीत बोलायचं झालं तर मला नेहमीच पंजाबी माणसाच्या चेहऱ्यावर एक प्रकारचा तृप्त,समाधानी भाव दिसतो, त्यांची जणू काही आयुष्याबद्दल कधीच काही तक्रार नसते, ‘जीवन त्यांना कळले हो’चा त्यांचा हा भाव मला नेहमीच जगण्याचा आदर्श वस्तुपाठच वाटतो. त्यांची वागण्याची-बोलण्याची आपुलकीची भावना मला नेहमीच प्रतिज्ञेच्या दुसऱ्या ओळीची यथार्तता आणखीनच पटवते. मात्र हाच चेहरा लवकर रागावतो, कारण काहीही असो, का माहित; तसा सहनशक्तीत हाच पंजाबी माणूस लवकर हरतो.
देशप्रेम तर इतर लोकांपेक्षा जरा जास्तच रक्तात भिनले असल्याने नागरी सेवा असो की,पोलीस सेवा, UPSC किंवा आर्मी ऑफिसर, घरटी एक माणूस या न त्या मार्गाने देशसेवेत असतोच असतो. कदाचित पाकिस्तानसारख्या कट्टर शत्रुत्व असणाऱ्या देशासोबत सीमा share करावी लागत असल्याने ही भावना जन्मतःच मनात पोसली जाते.
आपण नेहमीच पंजाबी माणूस म्हणजे डोक्यावर शिरस्त्राणासारखे पागोटे, चेहऱ्यावरचा कपाळ व इतर काही भाग सोडला तर भरगच्च,न मावणारी अशी भरगोस दाढी, आकडेबाज मिशी आणि लांब सुरवर-पायजमा, हातात कडे असा वेश सर्वसाधारण दिसतो. मात्र मला छोटा असताना प्रश्न पडायचा,की जर हा वेश त्यांना compulsory असेल तर मग युवराज सिंग, कैलाश खेर आणि असे अनेक सिंग आडनाव असणारे पंजाबी सफाचट,गुळगुळीत चेहऱ्याचे कसे? एका पंजाबी- अमृतसरच्या मित्रांलाच हा प्रश्न विचारल्यावर त्याने यामागचे रहस्य सांगितले.
मुळात या जुन्या रूढी परंपरा! मग एखादं जुन्या मतांचं घर आपल्या मुलाला सरदार करायचं की नाही ते लहानपणी ठरवतात, कारण लहानपणी ठरवलं तर कुठे तेव्हापासून केसाला अजिबात कात्री लावायची नाही,ते दर आठवड्याला गुरुद्वारेत सेवा करायला जायची इथपर्यंत अनेक प्रथा त्याला आयुष्यभर पाळायच्या असतात. मग काही आधुनिक,पुरोगामी घरातून या प्रथेला फाटा दिला जातो, मग दिसतात ते आधुनिक, सफाचट गालांचे, आधुनिक हेयरस्टाईल असणारे पंजाबी तरुण!
हे म्हणजे मराठी- ब्राह्मण कुटुंबातील सोवळे पाळणाऱ्या,मुंज करून,जानवं घालून, संध्या करणाऱ्या किंवा न करणाऱ्या कुटुंबासारखं!
मुळात त्यांच्या या आयुष्याकडे इतक्या सकारात्मकतेने पाहणाऱ्या आनंदी मानसिकतेचं कारण ते राहत असणाऱ्या पंचनद्यांचा संपन्न प्रांत, हेच असावं. त्याशिवाय धर्मातला, एक दिवस का होईना, गुरुद्वारेत जाऊन काही ना काही सेवा करण्याचा त्यांचा दंडक आपोआपच त्यांच्यातला अहंकाराला,पैसा ,प्रतिष्ठा वगैरेच्या आढत्येला समूळ नष्ट करतो. जगण्याचं किती सोपं तंत्र शिकवतो हा धर्म!
याबाबतीत मी नाही, तर माझ्या आईने एक प्रसंग दिल्लीत अनुभवलाय. दिल्लीतल्या एका गुरुद्वारेत जात असताना पादत्राणे ठेवण्याच्या जागेवर काही वेळापूर्वीच आपल्या मर्सिडीजमधून आलेला एक श्रद्धाळू शीख लोकांचे पादत्राण भक्तिभावाने, चेहऱ्यावर कोणत्याही प्रकारचे त्रासिक,तूच्छतेचे भाव न आणता, समोरच्या कप्प्यात ठेवत होता. हे ऐकून माझा त्या धर्माविषयीचा आदर आणखीनच वाढला.
अशा या भारतातल्या विविधरंगी धर्माच्या भारतीय मांदियाळीत आपलं स्वतंत्र अस्तित्व असूनही त्याच्या वेगळेपणाची कुणालाच जाणीव न करून देणारा, ८४च्या दंग्यात अनन्वित अत्याचार होऊनही, ‘खलिस्तान’चा अपवाद वगळता सामान्य शीख ‘पाजी'(मराठीतला नव्हे बरं का!) नेहमीच आपल्या सार्वजनिक वर्तणुकीने एक आदर्श ‘सरदारजी’ म्हणून वावरला आहे.
भारतभर, (अगदी कन्याकुमारीपर्यंत) आपल्या पराठ्याची,छोले भटूऱ्याची अन ‘धाबा’ संस्कृतीची छाप गल्ली-बायपास-हायवे ते ५ स्टार हॉटेलपर्यंत सोडणाऱ्या या ‘प्राजी’ची नेहमीच एक आठवण मनात तरळत होती.
या लेखाद्वारे ती मी मांडली. कदाचित प्रत्येकाच्या मनात त्यांच्याविषयी असणाऱ्या भावना याच असतील!
एकदम दिलखुलास माणसे असतात ही.
एकदम दिलखुलास माणसे असतात ही. चार वर्षे रुरकी मध्ये असताना यांच्या दोस्ती आणि दिलखुलास पणाचा मी आणि कुटुंबाने अनुभव घेतलाय
समाजासाठी काही तरी देणे, किमान सेवा करणे हे मी अनेक लंगर आणि सुवर्ण मंदिरात अनुभवले आहे.
आणि ही फुकट अन्नसेवा ही अगदी
आणि ही फुकट अन्नसेवा ही अगदी फुलोकी घाटी, बद्रीनाथ, केदारनाथ अशा दुर्गम ठिकाणी सुद्धा बारा महिने चोवीस तास सुरू असते.
आणि ही फुकट अन्नसेवा ही अगदी
आणि ही फुकट अन्नसेवा ही अगदी फुलोकी घाटी, बद्रीनाथ, केदारनाथ अशा दुर्गम ठिकाणी सुद्धा बारा महिने चोवीस तास सुरू असते.
आणि ही फुकट अन्नसेवा ही अगदी
आणि ही फुकट अन्नसेवा ही अगदी फुलोकी घाटी, बद्रीनाथ, केदारनाथ अशा दुर्गम ठिकाणी सुद्धा बारा महिने चोवीस तास सुरू असते.
आणि ही फुकट अन्नसेवा ही अगदी
आणि ही फुकट अन्नसेवा ही अगदी फुलोकी घाटी, बद्रीनाथ, केदारनाथ अशा दुर्गम ठिकाणी सुद्धा बारा महिने चोवीस तास सुरू असते.
आणि ही फुकट अन्नसेवा ही अगदी
आणि ही फुकट अन्नसेवा ही अगदी फुलोकी घाटी, बद्रीनाथ, केदारनाथ अशा दुर्गम ठिकाणी सुद्धा बारा महिने चोवीस तास सुरू असते.
आणि ही फुकट अन्नसेवा ही अगदी
आणि ही फुकट अन्नसेवा ही अगदी फुलोकी घाटी, बद्रीनाथ, केदारनाथ अशा दुर्गम ठिकाणी सुद्धा बारा महिने चोवीस तास सुरू असते.
आणि ही फुकट अन्नसेवा ही अगदी
आणि ही फुकट अन्नसेवा ही अगदी फुलोकी घाटी, बद्रीनाथ, केदारनाथ अशा दुर्गम ठिकाणी सुद्धा बारा महिने चोवीस तास सुरू असते.
आणि ही फुकट अन्नसेवा ही अगदी
आणि ही फुकट अन्नसेवा ही अगदी फुलोकी घाटी, बद्रीनाथ, केदारनाथ अशा दुर्गम ठिकाणी सुद्धा बारा महिने चोवीस तास सुरू असते.
एकदम दिलखुलास माणसे असतात ही.
एकदम दिलखुलास माणसे असतात ही. चार वर्षे रुरकी मध्ये असताना यांच्या दोस्ती आणि दिलखुलास पणाचा मी आणि कुटुंबाने अनुभव घेतलाय
समाजासाठी काही तरी देणे, किमान सेवा करणे हे मी अनेक लंगर आणि सुवर्ण मंदिरात अनुभवले आहे.
माफी असावी नेट गंडल्यामुळे
माफी असावी नेट गंडल्यामुळे एको आलाय. समजून घ्या.
तेच म्हटलं, शरदजी एका पायावर
तेच म्हटलं, शरदजी एका पायावर भांगडा का करू राह्यलेत
तुम्ही पंजाबी बद्दल सुरूवात
तुम्ही पंजाबी लोकांबद्दल बद्दल सुरूवात करून शीख लोकांबद्दल लिहीलं आहे!
तुम्ही लिहिलेले चांगले गूण असतात, पण दिखाव्याचा एक मोठा दुर्गुण असतो पंजाब्यांमध्ये. मोठी गाडी, मोठी लग्नं, मोठ्या मोठ्या बाता वगैरे. हा प्रकार इतका वाढतो कधीकधी की सगळे गूण मागे जातात आणि फक्त हेच दिसत राहतं!
तुम्ही पंजाबी लोकांबद्दल
तुम्ही पंजाबी लोकांबद्दल बद्दल सुरूवात करून शीख लोकांबद्दल लिहीलं आहे! >> +१ शीख हा वेगळा धर्म आहे.
कुटुंबामध्ये मोठा मुलगा शीख
कुटुंबामध्ये मोठा मुलगा शीख आणि बाकीचे पंजाबी असेही असते बरेचदा.
हा प्रकार इतका वाढतो कधीकधी
हा प्रकार इतका वाढतो कधीकधी की सगळे गूण मागे जातात आणि फक्त हेच दिसत राहतं! Submitted by शरी on 15 May, 2024 - 05:07 >>>>>> स हं म त
बरोबर. हा दुर्गुण आहेच. यात
बरोबर. हा दुर्गुण आहेच. यात पंजाबी + उत्तर भारतीय बहुतांश वेळा मोडतात, @शरी.
मला हा लेख लिहिल्यानंतर (हा जुना २०१५ चा लेख आहे, जेव्हा मी महाराष्ट्राबाहेर राहिलो नव्हतो) उत्तर भारतात, दिल्लीत राहण्याचा योग आला, काही शीख मित्र भेटले(२०१९) तेव्हा पंजाबी व शीख यामधील फरक समजला.
पंजाबी हे भौगोलिक नामाभिधान तर शीख हे धार्मिक नामाभिधान आहे, हे 2019 नंतर समजले.