रामचरितमानस- बालिका कांड
त्या दिवशी नेहमीप्रमाणे तू फेबू उघडलस आणि कुणाकुणाचे फ्रेंड रिक्वेस्ट आलेत ते बघितलंस. एका रिक्वेस्टवर तुझी नजर खिळली. रामचरित मानस शर्मा. हँडसम बॉय, आय टी इंजिनिअर. सिंगल. वोव! हॉबिज बघितलेस. बॉलिवूड, शेरो शायरी, टी वी आर्टीस्ट, म्युझिक लवर, गिटार प्लेअर, त्याने लिहिले होते. एक शेर ही लिहिला होता, “मंजिल मिल ही जायेगी भटकते ही सही, गुमराह तो वो है जो घर से निकलते ही नहीं.” सुभानल्ला, तू मनात म्हणालीस. तू त्याची फ्रेंड रिक्वेस्ट स्वीकारलीस. जरा वेळाने त्याचा मेसेज आला, थँक्यू. थँक्यू कशाला? तू विचारलं, मला तू मित्र म्हणून स्वीकारलं ना, त्यासाठी, त्याने उत्तर दिले.