महिलांचा फिटनेस व कँसरबद्दल संवादासाठी स्मिताची सायकल यात्रा

Submitted by मार्गी on 10 January, 2024 - 11:05

नमस्कार. माझी मैत्रीण स्मिता अशी सायकल राईड करणार आहे-

महिलांचा फिटनेस व कँसरबद्दल संवादासाठी सायकल यात्रा

स्मिता मंडपमाळवीचे गोवा ते मुंबई सोलो सायकलिंग

मोहीमेची उद्दिष्टे

सामान्यत: प्रबोधनासाठी बैठका, चर्चा, ब्रॉशर्स व परिसंवाद अशा माध्यमांचा वापर केला जातो. पण इतरही पर्याय असतात. जेव्हा आपण सायकलिंगसारख्या अगदी वेगळ्या माध्यमाचा वापर करतो, तेव्हा आपण अनेक लोकांसोबत संवाद साधू शकतो व एखादी गोष्ट त्यांच्यासोबत शेअर करू शकतो. हे लक्षात घेऊन मी, स्मिता मंडपमाळवी गोवा ते मुंबई एकटीने सायकल यात्रा करणार आहे. हो, तुम्ही बरोबर वाचलं. ही ८ दिवसांची सोलो सायकल मोहीम असेल व मी एकूण सुमारे ६०० किलोमीटर सायकल चालवेन. ह्या मोहीमेत पुढील उद्दिष्टे आहेत.

1. लोकांसोबत महिलांचा फिटनेस व कँसर ह्या विषयावर संवाद करणे
2. अशा मोहीमा करता येतात ही प्रेरणा युवकांना व महिलांना देणे
3. गोवा ते मुंबई मार्गावरील रुग्णालये, प्राथमिक आरोग्य केंद्र, उपकेंद्र इ. ठिकाणी काम करणा-या आरोग्य कर्मचा-यांसोबत संवाद करणे.
4. महिला व मुलींसोबत महिलांच्या आरोग्यासंदर्भातील विशिष्ट मुद्द्यांवर चर्चा करणे.

सायकलिंग का?

सायकल हे लोकांसोबत जोडणारे अतिशय नावीन्यपूर्ण सामाजिक माध्यम आहे. आपल्यापैकी सगळ्यांनी कधी ना कधी सायकल चालवली आहे. असा सायकलिस्ट दिसला की लोक बोलायला उत्सुक होतात. आणि इतकं अंतर सायकल मोहीम करणारी एकटी मुलगी ही गोष्ट आपल्या देशात अजूनही कमी प्रमाणात दिसते. तसेच सायकलिंगमध्ये फिटनेस व आरोग्याचा मॅसेज हा आपोआप दिला जातो.

मार्ग आणि वेळापत्रक

मी हा सायकल प्रवास ८ दिवसांमध्ये करेन. तो गोव्यावरून २२ जानेवारीला सुरू होईल आणि साधारण २९ जानेवारीला मुंबईत पूर्ण होईल. मी दररोज साधारण ८०- ८५ किलोमीटर सायकल चालवेन आणि वाटेतील लोकांसोबत संवाद साधेन. मी स्वयंसेवी संस्था, रुग्णालये, आरोग्य केंद्रे इ. ना ठिकाणी भेट देईन. मुक्कामाचे टप्पे साधारण गोवा (पोंडा), सावंतवाडी, खारेपाटण, रत्नागिरी, चिपळूण, महाड, पाली, खारघर व मुंबई असे असतील.

आजवरच्या सायकल अचिव्हमेंटस

ह्यापूर्वी २०१९ मध्ये मी पुणे ते दिल्ली- १५०० किलोमीटर सायकल प्रवास १५ दिवसांमध्ये केला होता व त्याचे उद्दिष्ट "परिवर्तनासाठी पेडलिंग" असं होतं. २०२० मध्ये मी पुणे- नाशिक, ठाणे व पालघर जिल्ह्यांच्या आदिवासी भागामध्ये ६०० किलोमीटर सायकलिंग केली होती व त्याचं सूत्र “I can, you can” होतं.

ह्या रूटवर मी‌ विविध संस्थांना भेटी देणार आहे व विविध पद्धतीने लोकांशी संवाद करणार आहे. ह्या मार्गावर आपल्या माहितीमधील संस्था असतील तर कळवू शकता.

अधिक माहितीसाठी संपर्क करू शकता. धन्यवाद.

- स्मिता मंडपमाळवी: 9284419532

व्यवसायाने मुंबईतील बी. वाय. एल. नायर चॅरीटेबल रुग्णालयात सामाजिक विकास अधिकारी (वैद्यकीय) आणि मनाने सायकलिस्ट.

विषय: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

खूप प्रेरणादायी. स्मिता मंडपमाळवी यांना खूप शुभेच्छा. आणि इथे हे कळविल्याबद्दल मार्गी, आपले आभार.

खूप प्रेरणादायी. स्मिता मंडपमाळवी यांना खूप शुभेच्छा. आणि इथे हे कळविल्याबद्दल मार्गी, आपले आभार.>>>>>>+१

महिला आणि पुरुष असा भेदभाव करणारे फक्त प्रसिद्धी साठी काम करत असतात .
फिटनेस लिंग विरहित च असतो ,लिंगविरहित फक्त फिटनेस ह्या साठी काम करत असतील तर अभिनंदन तरी केले असते.
लिंग वर आधारित कोणत्याच कामाला रिस्पॉन्स ध्याबा असे वाटत नाही.

आरोग्याच्या समस्या, आरोग्यविषयक जाणिवा , आरोग्याला स्वत:कडून व कुटुंबाकडून दिलं जाणारं महत्त्व यांत जेंडरप्रमाणे फरक पडतो हो सर्वज्ञ आजोबा.

भोंदू, मुखवटे चढवलेली लोक स्वार्थी असतात,अजेंडा चालवत असतात,हेतू साफ नसतो.
समाज भेद भाव विरहित हवा असेल तर ही भोंदू,मुखवटे चढवलेली लोक टाळा.
माझा हा प्रतिसाद धागा किंवा धागा लेखिका ह्यांना उध्येशून नाही

माझी मत स्पष्ट असतात आणि पारदर्शक पण असतात

हो. ती मतं आहेत, मतांसाठी मा़ंडा, त्रिकालाबाधित सत्य सांगितल्याच्या थाटात मांडू नका.
तुमची मतं तुम्ही पाहिलेल्या गोष्टी, त्यांचं तुम्हांला झालेलं आकलन यावरून बनतात. त्यात तुमचे पूर्वग्रह , विचारांची पद्धत यांचाही प्रभाव पडतो.

नमस्कार. स्मिताची गोवा मुंबई राईड मस्त सुरू आहे. पहिल्या दिवशी पोंडा ते सावंतवाडी 91 किमी, दुसऱ्या दिवशी सावंतवाडी ते राजापूर 114 किमी व आज राजापूर ते रत्नागिरी 65 किमी अंतर तिचं पूर्ण झालं. वाटेतले चढ, समुद्राजवळची ह्युमिडिटी, अनोळखी रस्ते असूनही ती जिद्दीने राईड करते आहे. वाटेत नर्सिंग महाविद्यालय, शाळा, सामाजिक संस्था अशा अनेक ठिकाणी तिचे कार्यक्रम होत आहेत. तिला ह्या रूटवर मदत करणाऱ्या सर्वांना धन्यवाद.

खूप प्रेरणादायी. स्मिता मंडपमाळवी यांना खूप शुभेच्छा. आणि इथे हे कळविल्याबद्दल मार्गी, आपले आभार.>>>>>>+१

नमस्कार. स्मिताची गोवा ते मुंबई सोलो सायकल मोहीम यशस्वी झाली. तिने 7 दिवसांमध्ये 600 किमी अंतर सायकल चालवली. वाटेतल्या शाळा, महाविद्यालये, हॉस्पिटल्स अशा विविध ठिकाणी तिचे कार्यक्रम झाले. चढाचे रस्ते व ह्युमिडिटी असूनही तिने जिद्दीने हे अंतर पार केलं. तिला ह्या प्रवासात अनेकांनी मदत केली. त्या सर्वांना मनःपूर्वक धन्यवाद.