मला दोन प्रसंग सांगायचे आहेत. दोन्ही घटनांमध्ये माझी विचार करण्याची पद्धत बरोबर होती की चूक? मला आपले मत जाणून घ्यायला आवडेल. असे प्रसंग आपल्याला आठवले तर ते ऐकायला आवडतील. मला आपली उलट-सुलट मते ऐकायची आहेत. विशेषतः स्त्रिया या दोन्ही प्रसंगांकडे कोणत्या दृष्टीने पहातात, पुरुष कोणत्या दॄष्टीने पहातात. माझी टिकेस सामोरे जाण्याची तयारी आहे. कारण मला शक्यता अशी वाटते की माझे थिंकिंग विशेषतः दुसर्या घटनेकडे पाहाण्याचे 'ट्विस्टेड' आहे. पण आपण आपल्या अनुभवांचे प्रॉडक्ट असतो. त्याला मी अपवाद नाही.
-------------------------------------------------
मी कॉलेजमध्ये असताना माझे लग्न ठरले. साखरपुडा झाला. नवरा जेव्हा जेव्हा जहाजावरुन, घरी परत येई, तेव्हा तो सहा सहा महीने घरी असे. आम्ही एकमेकांबरोबर फिरत असू, गप्पा मारणे, सिनेमे पहाणे वगैरे कोर्टिंग पिरीअड व्यवस्थित चाललेला होता. पण हा काळ आमच्याकरता गोड-गुलाबी असण्यापेक्षा, खूपसा एकमेकांच्या एजेस (दातेरी, टोकदार कडा) अनुभवण्याचाही होता. मी कदाचित रुक्ष होते, नवखी होते, मला कोर्टशिपची नैसर्गिक जाण नव्हती ना अनुभव होता. नवराही अतिआग्रही, प्रत्येक लहानसहान गोष्टीत मते मांडणारा व त्याच्या मताप्रमाणे सारे व्हावे अशी अपेक्षा ठेवणारा होता. माझा पिंड कथा कादंबर्यांवरती पोसलेला. तर त्याने मराठी कथा कादंबर्या औषधालाही वाचलेल्या नव्हत्या. त्यात एकमेकांच्या अवास्तव अपेक्षा. उदाहरणार्थ - मला वाटे त्याने फुले आणावीत, कविता म्हणाव्यात. तर तो मला परदेशी चॉकलेटस, टेडी बेअर, मेक अप आणून देत असे. मी कधीही मेक अप करत नसे तर तो विचारे तू कधी लिप्स्टीक लावत नाहीस का गं? अर्रे ममव कोणती मुलगी लिप्स्टिक लावून बसते? त्या काळी आमच्या मैत्रिणीत तर वदंता होती - पंजाबी स्त्रियांना विवाहोपरान्त, सिंदूर म्हणजे कुंकवाबरोबर लिप्स्टीक लावणे कंपल्सरी असते वगैरे. म्हणजे हे आमच्या खिजगणतीतही नव्हते की त्या स्त्रिया आकर्षक राहण्याचा प्रयत्न करत असतील. नवर्याच्या सर्व गप्पा करीअरविषयी असत तर मला गडकर्यांच्या कविता त्याला माहीत असाव्यात अशी अपेक्षा असे. तो होता कॉन्वेन्टचा तर मी पक्की पुण्यातल्या हुजूरपागेत तयार झालेले प्रॉडक्ट. तर असा हा तडजोडीचा कठीण काळ.
त्यावेळी हॉस्टेल मध्ये माझी एका मुलीशी ओळख तर होतीच पण काही काळाकरता मी तिच्यावरती विश्वास टाकलेला होता. मी तिला आमच्या सर्व तडजोडी सांगत असे व ती मला सहानुभूती दाखवत असे. घरी हे सर्व ऐकून घेतले जातच नसे. एकदा साखरपुडा झाला म्हणजे काळ्या पाषाणावरची रेघ होती. नो वन वॉज एन्टरटेनिंग माय कॉन्ट्ररी फीलींग्ज. तेव्हा मैत्रीण हाच पेंट अप इमोशन्सना रीलीझ करण्याचा मार्ग होता. एकदा मला 'आ बैल मुझे मार' हुक्की आली व मी, नवरा व ती मैत्रीण आम्ही टॅक्सीने व्हीटीच्या कामत रेस्टॉरंटमध्ये जायचे ठरविले. मैत्रिणीने काळा , पाश्चात्य पेहेराव केलेला होता, डिनर वेअर शक्यतो काळा असतो हे मला माहीत नव्हते. तिचा मेक अप परफेक्ट होता, मोजकेच पण डेलिकेट दागिने अंगावर होते. याउलट काहीही ड्रेस सेन्स नसलेल्या (अजुनही नाही & आय अॅम नॉट प्राऊड ऑफ इट) मी काहीतरी भारतिय पेहेराव केलेला होता. १००% ती मैत्रीण त्या ऑकेजनकरता सुंदर दिसत होती.
मुख्य गोष्ट ही झाली की संपूर्ण संध्याकाळ ती तिच्या करीअरबद्दलच्या अॅस्पिरेशन्स विषयी बोलत राहीली. एकदा मला उद्देश्यून तिने 'सम पीपल लिव्ह इन आयव्हरी टॉवर' वगैरे शब्द वापरले. मला हळूहळू खूप न्युनगंड आला. मला असे वाटू लागले की नवरा तिच्याकडे जास्त लक्ष पुरवतो आहे. मला से जाणवले की शी वेपनाइझ्ड ऑल इन्फर्मेशन आय कन्फायडेड इन हर. शी पुट मी डाउन. तिने माझा विश्वासघात केला. मला कमी लेखले. तिने माझ्या होणार्या, नवर्याला इम्प्रेस करण्याचा आटोकाट आणि कदाचित यशस्वी प्रयत्न केला. पुढे म्हणजे त्या दिवसानंतर तिची-माझी मैत्री तुटली. पण मी धडा शिकले.
धडा हा शिकायला हवा होता की आपल्या प्रायव्हेट बाबी परक्याला सांगायच्या नाहीत. पण मी धडा हा शिकले की कोणत्याही मैत्रिणीवरती विश्वास टाकायचा नाही. नवर्याबरोबर, तिला घेउन बाहेर फिरायला जायचे नाही. आपली दोघांची प्रायव्हेट स्पेस शेअर करायची नाही. असो.
-----------------------------------
पुढे टेक्सासला माझी खूप आवडती फिलिपिनो मैत्रिण एलन, नवरा कॉकेशिअन. एलन अजुनही माझी मैत्रिण आहे. आम्ही दोघी धनु-सूर्य जातक. माझ्या आयुष्यातल्या लाडक्या मैत्रिणी धनु-सूर्य राहीलेल्या आहेत हां व एक मिथुन तर काय सांगत होते धनु व्यक्तींना - भेटवस्तू देणे आवडते किंबहुना सर्वच अग्नी राशींना (मेष, सिंह आणि धनु) गिफ्टस देणे, सरप्राईझ गिफ्टस देणे आवडते. कपट नसते. थोडा नाईव्ह आणि उदार स्वभाव असतो. स्ट्रेट्फॉर्वर्ड असतो. छक्केपंजे स्वभावात नसतात. हां तर अशी एलनची व माझी मैत्री होती. एकदा मला एअरपोर्ट्वरती जायचे होते. मी टॅक्सीने जाऊ शकले असते पण एलनचा नवरा त्या बाजूने जाणार होता त्यामुळे, तिने मला सुचविले की तो लिफ्ट देईल. त्याने मला लिफ्ट दिली. कमीतकमी पाऊण तासाचा रस्ता होता. टेक्सासचे कंट्री म्युझिक प्रसिद्ध आहेच. त्याला संगीताची आवडही होती व जाणही आणि त्याने एक मस्त महागडी बुमबॉक्स टाईप म्युझिक सिस्टिम त्याच्या कारमध्ये बसवुन घेतलेली होती. ज्याचा बेस एकदम भारी होता. व रस्ताभर इतकं मस्त कंट्री म्युझिक वाजत होतं. एकदम अनवट, कंफर्टेबल प्रवास झाला. सांगायची गोष्ट ही की एलन आली नव्हती. तिला काहीतरी काम होतं. नंतर मला असे वाटले की तिने इतका विश्वास कसा टाकला?
नवर्याला जर फ्लर्ट करावेसे वाटले असते मी जर नवर्याबरोबर फ्लर्ट केले असते तर असा विचार तिच्या मनात कसा काय आला नाही? की आपणच इतके अनअॅट्रॅक्टिव्ह आहोत की स्त्रिया डोळे झाकून आपल्या बॉयफ्रेन्डला, नवर्याला माझ्याबरोबर एकटे जाऊ येऊ देतात? तेव्हाही मी सुटलेलीच होते. ना जिम ना खाण्यावरती कंट्रोल. एकटी रहात असल्यामुळे तर मनमानीच. तेव्हा मला परत मनात न्यूनगंड दाटून अला. की आपण; मी तीशीत होते, 'हार्मलेस' वाटतो. आपण कुरुप आहोत.
आ बैल मुझे मार
Submitted by सामो on 19 December, 2023 - 08:38
Groups audience:
Group content visibility:
Public - accessible to all site users
शेअर करा
सामो, विचार कॉमन आहेत.बरेचदा
सामो, विचार कॉमन आहेत.बरेचदा असे कॉम्प्लेक्स येत असतानाच रिलेशनशीप्स मध्ये.यात पहिल्या प्रसंगात मैत्रिणीने केलं तो नीचपणा होता.दुसरीच्या डोक्यात फार काही असेल असं वाटत नाही.किंवा कधीकधी रेशीयल भागही असेल.म्हणजे 'माझा नवरा परदेशातील, एशियन वंशाच्या स्त्री बद्दल असे विचार ठेवणार नाही.' असं.एक कोकेशीयन किंवा अमेरिकन रेस ची मैत्रीण असती तर तिने इतक्या बिनदिक्कत पाठवलेही नसते.
होय टेक्सासलाच, कॉकेशिअन
होय, कॉकेशिअन मैत्रिणीने नसते पाठवले. टेक्सासलाच, कॉकेशिअन मैत्रिणी बरोबर मी जेवायला गेले होते. तिचा नवराही होता. नंतर मी सजेस्ट केले की एक फोटो घेउ यात का तीघांचा? तिने नाकारले. इट वॉज ऑड.
अशी घटना काही अंशी माझ्या
अशी घटना काही अंशी माझ्या बाबतीत घडली आहे.
माझ्या बायकोने तिच्या एका कलिगला आमच्यासोबत २ दिवस फ़िरायला गेलो होतो तेव्हा सोबत आणली होती. ती माझी बायको जवळपास नसली की फ़्लर्ट करायची. आम्ही तिघे असताना माझ्या बायकोला ती काकुबाई बोलुन चिडवायची. एकदा तिला माझ्यासमोर बोलली कि उगिच नवर्याबद्दल काहिबाही बोलतेस, मी असते तर त्याचा शब्दपण खाली पडू दिला नसता.
त्यानंतर माझ्या बायकोने तिच्याशी खाजगी माहिती शेअर करणे सोडून दिले (असा अंदाज आहे).
पहिल्या प्रसंगात मैत्रिणीला
पहिल्या प्रसंगात मैत्रिणीला घेऊन जायचं प्रयोजन काही कळलं नाही. म्हणजे डिनरला आणखीन एक दोन मित्र जॉइन होत असतील तर ठीक पण दोघांत तिसरा कशाला?
दुसर्या प्रसंगात बायकांनी नवर्यावर किंवा वाईस वर्सा एकमेकांवर विश्वास ठेवायचा नसतोच का? लगेच कुणी फ्लर्टींगवर कसं येईल?
@म्हात्रे - आपला अनुभव
@म्हात्रे - आपला अनुभव सांगीतल्याबद्दल धन्यवाद. 'काकूबाई' वगैरे टोचणे विशेषतः नवर्यापुढे हे माझ्या मते चूकीचे आहे. खाजगीत मैत्रिणीला काकूबाई म्हणु शकता.
>>>>>माझ्यासमोर बोलली कि उगिच नवर्याबद्दल काहिबाही बोलतेस, मी असते तर त्याचा शब्दपण खाली पडू दिला नसता.
याला म्हणतात 'हिटिंग बिलो बेल्ट.' नात्याची पार वाट लावणे.
@सायो - होय म्हणुनच 'ट्विस्टेड' थिंकिंग म्हटलेले आहे सायो. विश्वास तर असूच शकतो. किंबहुना तसा विचार करता येणे हेच संतुलितपणाचे लक्षण आहे असे म्हणेन.
कॅटिनेस या इंग्रजी शब्दाला
कॅटिनेस या इंग्रजी शब्दाला सुयोग्य मराठी शब्द सुचवावा. कपट?
सामो..छान, प्रांजळ अनुभवकथन.
सामो..छान, प्रांजळ अनुभवकथन.
मलाही पहिल्या सारखा अनुभव आला आहे. माझी अगदी घट्ट मैत्रीण, रूममेट होती. पण माझे आधी लग्न ठरले, तर ती स्वतः माझ्यापेक्षा कशी सुपिरियर आहे हे सतत दाखवून देण्याचा प्रयत्न करायची.
मला इनफिरियर वाटत राहायचे.
लग्नानंतरही बरेच महिने..माझ्या मनातून ते फिलिंग गेले नव्हते.
दुसऱ्या प्रसंगात मात्र तुम्ही उगीच जास्ती विचार करता आहात असे वाटले. तिने एव्हढा विचार केला नसेल. आणि आधीपासून तुम्हाला ओळखत असल्याने, ही 'त्यातली' नाही एव्हढे तरी कळले असेलच ना!
पहिल्या अनुभवातील मैत्रिण
पहिल्या अनुभवातील मैत्रिण विअर्ड आहे. दुसर्या किश्शात - बायकोने नवर्याच्या मित्राला किंवा नवर्याने बायकोच्या मैत्रिणीला कोठे कारने सोडणे, आणि कन्विनियन्स असेल तर कोणी ते ऑफर करणे यात काहीच ऑड नाही.
पहिल्या प्रसंगातली सामो
पहिल्या प्रसंगातली सामो दुसऱ्या प्रसंगात एलन बनून आली तुमच्यासमोर. मैत्रिणीवर गाढ विश्वास असलेली.
पण जो विश्वास सामो ने सार्थ ठरवला दुसऱ्या प्रसंगात तो पहिल्या प्रसंगातल्या तुमच्या मैत्रिणीला जमला नाही.
अस खूप वेळा होत ना आपलं की
अस खूप वेळा होत ना आपलं की वेगवेगल्या प्रसंगात आपण वेगवेगळ्या character प्ले करतो आणि previous character अजून तिसराच व्यक्ती असतो तस. कस एक्साक्टली सांगू कळेना......:)
क्यून्की सास भी कभी बहू थी अशा type थोडं
आंबटगोड, फारेन्ड, बिल्वा
आंबटगोड, फारेन्ड, बिल्वा धन्यवाद.
आंबटगोड असे बर्याच जणांच्या/जणींच्या बाबतीत होत असावे. कारण माझे अजुन २ अनुभव आहेत पैकी एक नवर्याच्या मित्राबद्दलचा आहे. तेव्हा ...
फारेन्ड - होय करेक्ट. दुसरी म्हणजे लिफ्ट देण्याची कृती सहज घडून जाते की आपल्या हातून.
@बिल्वा होय आपण वेगवेगळ्या प्रसंगात वेगवेगळे वागतो खरे पण आपला बार आपण ठरवतो. एका विशिष्ठ पातळीपेक्षा आपला बार ना खाली जातो ना जाऊ शकतो. अर्थात ती मैत्रिण तेव्हा माझ्यासारखीच लहान (तरुण, अप्रगल्भ) असणार पण वृत्तीचाही फरक पडतो.
दिवसा ढवळ्या पाउन तासाच्या
दिवसा ढवळ्या पाउन तासाच्या प्रवासासाठी रोजच्या मैत्रीणी वर विश्वास टाकता येत नसेल तर कठिण आहे...
पहिल्या अनुभवातील मैत्रीण
पहिल्या अनुभवातील मैत्रीण नक्कीच विश्वास घातकी आहे.![Happy](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/happy.gif)
दुसरा अनुभव, मला तरी नॉर्मल वाटला. मला वाटते की या सुरुवातीस आलेल्या अनुभवामुळे तुम्ही ताक सुद्धा फुंकून पिता आहात. किव्वा आपण ही आपल्या पाहिल्या मैत्रिणी सारखे वागत नाही ना हे सारखे तपासून पहात आहात. Which is really sweet of you. But let go. आणि थोडी फार healthy flirting is good for everyone
तुम्ही एवढ्या प्रांजळ पणे
तुम्ही एवढ्या प्रांजळ पणे आयुष्यातील प्रसंग इथे मांडले आणि स्वतःच्याच विचारपद्धतीच आकलन केलत, ह्या वरून तुमचं मन किती निर्मळ आहे हे दिसत, ह्या वर टिका टिप्पणी करण योग्य होणार नाही.
प्रत्येक प्रसंगातून आपण काही तरी शिकतो आणि त्यानुसार पुढच्या प्रसंगात आपण वागतो.
पहिल्या प्रसंगातील व्यक्तींबरोबर तुमचं नात तिथंच संपलं असावं पण दुसऱ्या प्रसंगातील व्यक्ती तुमचे कायम मित्र राहतील अस वाटत.
प्रथम तुझ्या प्रांजळपणाचे ,
प्रथम तुझ्या प्रांजळपणाचे , प्रामाणिकपणाचे खूप कौतुक.... !
पहिल्या प्रसंगातली तुझी नटवी मैत्रीण डोळ्यासमोर आली. पहिली गोष्ट मला खटकली ती ही की, वाच्छाळ, जीभेला हाड नसलेल्या मैत्रिणीला सोबत घेऊन जायला नको होतं.. पण हे ही खरं की, त्या वयात, त्या वेळी आपल्याला तेवढं सुचत नाही किंवा आपलं मन स्वच्छ असतं .. काही बाबतीत आपला व्यवहारी तर्कटपणा कमी पडतो.. हे नक्की..!
माझ्यामते लग्न ठरताना किंवा लग्न ठरल्यावर ते नातं एका नाजूक वळणावर पोहचतं .. जिथे एकमेकांच्या स्वभावाची चांगली ओळख व्हावी .. एकमेकांचा सहवास लाभावा.. एकमेकांच्या डोळ्यात पाहत दोघांनी एकमेकांशी छान गप्पा मारत एकमेकांना समजून घ्यावं.. ( जास्तच रोमॅण्टीक होतेयं का..?) तिथे मित्र-मैत्रिणी सारख्या कुणाही तिसऱ्या व्यक्तीला सामिल करायला नकोच..( कबाब में हड्डी कायको..??)
मात्र समजा, एखाद्याने मनमोकळेपणाने, मनात कुठलाही किंतु न बाळगता सामिल केलं तर निदान त्या व्यक्तीने संवादात मोकळेपणा न आणता दुसऱ्या व्यक्तीला कमीपणा येईल असं बोलणं म्हणजे निव्वळ नीचपणाचा कळस..! तेरी जगह पे मै रहती ना तो उधरच झापती नै क्या उसको..?? ( ह. घे.. सामो.)
मला तर वाचूनच संताप आला. हसता - बोलता तिचेच दात तिच्याच घश्यात घालायचा प्रयत्न मी नक्की केला असता.. असलं वागणं मी बिल्कुल खपवून घेतलं नसतं... आपल्याला आपल्या मैत्रिणीने ज्या विश्वासाने सोबत घेतलयं त्याची जाण तिने ठेवायला नको का..?? स्वतःचीच टिमकी वाजवायची गरजच काय..?? प्रसंग कोणता.. आणि हिचं आपलं भलतंच सुरु ..!
विश्वासघात से बुरा दुसरा कोई पाप नही इस दुनियामें...!
तिची पारख तुला त्या प्रसंगानंतर झाली आणि तू तिच्याशी मैत्री तोडली हे उत्तम केलंस. जो हुआ सो हुआ..अभी रात गयी बात गयी..!
अजून एक म्हणजे, पती-पत्नी असो किंवा प्रियकर - प्रेयसी हि नाती एवढ्या नाजूक भावनेने वेढलेली असतात ना की, मनात कधीतरी असुरक्षिता निर्माण करतातच.. नैसर्गिक आणि स्वाभाविक आहे ते..!
दुसऱ्या प्रसंगात तुझ्या मैत्रिणीला तुझी चांगलीच पारख आहे आणि विश्वास आहे हे कळून येतं.. तिचा तिच्या नवऱ्यावरही तेवढाच विश्वास आहे हे जाणवतं.. कदाचित तिच्या मनाला तसा विचारसुद्धा शिवला नसेल..आणि दुसरं म्हणजे तुझ्या मनात न्यूनगंड येण्याच काही कारण असायला नको कारण काही माणसं खरंच खूप प्रांजळ आणि स्वच्छ मनाची असतात.. भरोसा ठेवण्यालायक असतात... प्रत्येक स्त्री- पुरुष काही फ्लर्ट करण्याच्या उद्देशाने एकमेकांकडे पाहत नसतात.
सामो, पहिल्या प्रसंगात
सामो, पहिल्या प्रसंगात मैत्रिणीची आणि तुझी (तू नेलंस तिला) चुक आहे म्हणेन मी. नवरा बिचारा नवं माणुस आहे स्वताहुन बोलतंय तर बोलावंच लागणार म्हणुन तिला महत्व देत असेल. होणार्या बायकोची बेस्ट फ्रेण्ड फार महत्वाची असते.
दुसर्या प्रसंगात मी त्या मैत्रिणीच्या जागी असते तरी हेच केलं असतं. मुळात मला पजेसिव माणसांची मेंटॅलिटी समजत नाही. तुमचाच नवरा आहे बरं चांगला अडल्ट आहे . तुम्ही बोट धरुन फिरलात म्हणुन (त्याला करायच्याच असतील) तर तो चुका करणार नाही आणि बोट सोडलंत म्हणुन सगळीकडे चान्स मारत फिरेल असं थोडीच आहे.
मी माझ्या नवर्याला अगदी मिस युनिवर्स सोबत सुद्धा एकटं कुठेही सोडु शकते कारण माझा त्याच्यावर विश्वास आहे. आमच्या घरी पार्टी असते तेंव्हा आमच्या एका मैत्रिणीला तो घरी रात्री सोडायला जातो. मी काही त्याच्यासोबत लगेच त्याच्या मागे मागे जात नाही. यात ती सुंदर असो नसो काही फरक पडायचं कारण नाही. हे सेम असंच्या असं त्याच्याकडुनही आहे. कदाचित त्या मैत्रिणीचं आणि तिच्या नवर्याचं नातं तितकंच हेल्दी असेल.
दुसऱ्या प्रसंगात तुझ्या
दुसऱ्या प्रसंगात तुझ्या मैत्रिणीला तुझी चांगलीच पारख आहे आणि विश्वास आहे हे कळून येतं.. तिचा तिच्या नवऱ्यावरही तेवढाच विश्वास आहे हे जाणवतं.. कदाचित तिच्या मनाला तसा विचारसुद्धा शिवला नसेल..आणि दुसरं म्हणजे तुझ्या मनात न्यूनगंड येण्याच काही कारण असायला नको कारण काही माणसं खरंच खूप प्रांजळ आणि स्वच्छ मनाची असतात.. भरोसा ठेवण्यालायक असतात... प्रत्येक स्त्री- पुरुष काही फ्लर्ट करण्याच्या उद्देशाने एकमेकांकडे पाहत नसतात.>>>
अगदी पटलं..
माझ्या डोक्यात पण अस काही नसतं आल... आणि समोरच्या डोक्यात असा काही विचार येईल हेही नसतं डोक्यात आलं. लिफ्ट च. देतोय ना त्यात काय येवढं?
पहिल्या घटनेतील मुलगी कावेबाज किंवा चलाख असावी.
पण तुम्ही मैत्रिणीला घेऊन का जायचं? किंवा म्हात्रे यांच्या केस मध्ये बायकोने दोन दिवस मै.ल का न्यायचं ?हे मला कळलं नाही...
आणि लग्न झालं नसेल तर तुम्ही अशा वेळी होणाऱ्या नवऱ्याची परीक्षा ही करू शकता ना.. तो कितपत विश्वासार्ह आहे वगैरे..
चमेली की शादी ची आठवण झाली...
@अदिती धन्यवाद
@अदिती धन्यवाद
हाहाहा.
@मनमोहन - होय या अनुभवांती सर्वांना एकाच तागडीत तोलत फिरतेय मी.
>>>>थोडी फार healthy flirting is good for everyone Happy
@मन्या - होय एलन चांगली मैत्रिण आहे माझी. अजुनही मैत्री टिकून आहे.
@रुपाली - सविस्तर प्रतिसादाबद्दल आभार.
>>>>>>>अजून एक म्हणजे, पती-पत्नी असो किंवा प्रियकर - प्रेयसी हि नाती एवढ्या नाजूक भावनेने वेढलेली असतात ना की, मनात कधीतरी असुरक्षिता निर्माण करतातच.. नैसर्गिक आणि स्वाभाविक आहे ते..!
खरे आहे तसेच आपला स्वतःचा स्वभावही बर्याच अंशी कारणीभूत असतो.
@रीया
>>>>> कारण माझा त्याच्यावर विश्वास आहे.
हे आवडले.
>>>>>>सामो, पहिल्या प्रसंगात मैत्रिणीची आणि तुझी (तू नेलंस तिला) चुक आहे म्हणेन मी.
पण मी अजुनही हा प्रकार करते गं. माझ्या शेजारी सरबजीत रहाते तिला आम्ही कॉस्ट्को ला नेतो. क्वचित इन्डिअन ग्रोसरी शॉपिंग ला नेतो. मला असं सरसकट चूक वाटत नाही. किंबहुना मोअर द मेरीअर. पण त्या मैत्रिणीला जाण हवी याची.
@छंदीफंदी
>>>>>>आणि लग्न झालं नसेल तर तुम्ही अशा वेळी होणाऱ्या नवऱ्याची परीक्षा ही करू शकता ना.. तो कितपत विश्वासार्ह आहे वगैरे..
अगदी अगदी. अशा हेतूपुरस्सर केलेल्या फ्लर्टिंगची माझी ही कथा वाच. लाईट आहे.- अंध डेट आणि गंध भेट (https://www.maayboli.com/node/82020)
कॅटीनेस या इंग्रजी
कॅटीनेस या इंग्रजी शब्दापेक्षा - आ बैल मुझे मार हे हिंदी शीर्षक ठीक वाटले. म्हणुन दिलेले आहे.
मला तर अशा खुप मुली
मला तर अशा खुप मुली मैत्रीणीच्या नावाखाली भेटल्या. अजुन पण माणसं नाही ओळखता येत. आधी वाईट वाटायचं पण आता जास्त काय काहीच शेअरींग करत नाही.
पण मी अजुनही हा प्रकार करते
पण मी अजुनही हा प्रकार करते गं. माझ्या शेजारी सरबजीत रहाते तिला आम्ही कॉस्ट्को ला नेतो. क्वचित इन्डिअन ग्रोसरी शॉपिंग ला नेतो. मला असं सरसकट चूक वाटत नाही. किंबहुना मोअर द मेरीअर.
>>>>>
अग अत्ताच नाही. तेंव्हा नविन लग्न ठरत होतं तेंव्हा म्हणते आहे मी.
You are putting temptations
You are putting temptations in the path of your husband. Which is a bit passive aggressive. May be now it is a script of your relationship. However Miya Bibi raazi toh hum kya kare.
>>>>>You are putting
>>>>>You are putting temptations in the path of your husband. Which is a bit passive-aggressive.
मेबी मेबी!! हा सायकोअॅनलिसिस, अमूर्त मनाच्या पातळीवरती खरा असेलही. पण नकळत म्हणजे कॉन्शस माईंडला नकळत घडला होता.
बाय द वे सामो..
फ्लर्टिंगची माझी ही कथा वाच.
फ्लर्टिंगची माझी ही कथा वाच. लाईट आहे.- अंध डेट आणि गंध भेट>>> वाचलिये.
कॅटीनेस या इंग्रजी शब्दापेक्षा - आ बैल मुझे मार हे हिंदी शीर्षक ठीक वाटले. म्हणुन दिलेले आहे.>>>> हे शीर्षक पहिल्या घटनेला बरोबर असेल तरी दुसरीला नाही वाटत...
किंबहुना मोअर द मेरीअर.>>>>> Not always..
![Proud](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/proud.gif)
सामो मला एका गोष्टीचं नेहेमी
सामो मला एका गोष्टीचं नेहेमी कौतुक वाटतं आलंय, ज्या रीतीने तुम्ही वैयक्तिक घटना इतक्या प्रांजळपणे मांडता... वैयक्तिक असूनही त्याच्यात कुठलाही मी पणा नसतो तर सरळ साधेपणा, पारदर्शीपणा असतो... ते खूप छान वाटत.
पहिल्या प्रसंगातली मैत्रीण:
पहिल्या प्रसंगातली मैत्रीण: तुमच्याच पुरवलेल्या माहितीचा फायदा घेऊन तुम्हाला बाजूला करत होती बहुधा. किंवा काही लोकांना काहीही करण नसताना अटेंशन seeking चा आजार असतो त्यातली केस.
दुसरी मैत्रीण: तिचा तुमच्यावर आणि नवऱ्यावर असलेला विश्वास कोणत्याही संशयापेक्षा मोठा असणार. स्वतःला नका कमी समजू हो.
धागा वाचल्यापासून माझ्या बाबतीतला एक किस्सा लिहावासा वाटतोय.
तर, माझी एक छान मैत्रीण- कलिग. म्हणजे आम्ही तास तास बोलायचो. आमच्या vibes जुळायच्या. म्हणजे अनेक समान विषयात रस असल्याने असेल पण खूप छान मैत्री होती. तिने लव्ह मॅरेज केलेलं. नंतर माझं arranged लग्न लागलं. तर एकदा असा प्रसंग आला की माझ्या बायकोला घेऊन मला तिला भेटावं लागलं. माझं नुकताच लग्न झालेलं. माझी इच्छा होती की ह्यांच्यात सुद्धा छान मैत्री व्हावी. पण हाय रे कर्मा. झालं नेमकं उलट.
आम्ही बऱ्याच दिवसांनी भेटलेलो तर गप्पा खूप रंगल्या. बायकोला पण involve करायचा खूप प्रयत्न केला, पण बायकोला third wheel feeling यायला लागली. नंतर बराच काळ अगदी अजूनही बायकोला वाटतं की ती मैत्रीण आणि माझ्यात काहीतरी असू शकतं किंवा होतं.
मग मी त्रयस्थपणे याचा विचार केला, तर तसं बायकोला वाटणं साहजिक वाटू लागलं.
माझ्यासाठी माझं लग्नाचं नातं जास्त महत्वाचं असल्याने मैत्रीला नारळ दिला. अर्थात सगळं समजावून. तिनेही समजून घेतलं. बायकोचं प्रेम इतकं की त्यापुढे सगळं सोडायला मी तयार. पण कुठंतरी तिने प्रगल्भ भूमिका घ्यायला हवी होती अशी माझी अपेक्षा होती, भविष्यात तरी घ्यावी अशी इच्छा आहे.
अजिंक्यराव किस्सा छान.
अजिंक्यराव किस्सा छान.
@छन्दीफन्दी - धन्यवाद.
मैत्री काय किंवा नवरा -
मैत्री काय किंवा नवरा - बायकोचं नात काय, विश्वास असणं एकमेकांवर हे महत्वाचं.
अजिंक्यराव वाईट वाटलं तुमचा किस्सा वाचून.
मी त्या बाबतीत खूप भागयवान समजतो स्वतःला.
मी माझ्या मैत्रिणींना नुस्त भेटत नाही तर कधी तरी कामानिमित्त त्या शहरात गेलो तर त्यांच्या कडे राहिलो देखील आहे.
माझ्या बायकोचा मित्र परिवार तसा मोठा नाहीये पण तिच्या कलिग/मित्रांच्या घरी आम्ही गेलोय, राहिलो आहोत. जो विश्वास आमच्यात आहे तसाच तो आमच्या मित्र मैत्रिणीचा त्यांच्या नवरा - बायको वर आहे, त्यामुळे खूप दीर्घ काळ आमच्यातली मैत्री (फॅमिली रिलेशन च म्हणावं लागेल) टिकून आहे.
पहिल्या किस्यात मैत्रीण चक्क
पहिल्या किस्यात मैत्रीण चक्क पत्ता कट करण्याचा प्रयत्न करतेय काय वाटलं. खूपच चुकीची वागली ती.
दुसऱ्या किस्यात स्वतःला कुठेतरी कमी समजणे चुकीचे वाटले ( overthinking का)
त्यात विश्वासाचा भाग अधिक. असे फॅमिली relation आणि मित्र मैत्रिणी मिळणे ही भाग्याची गोष्ट.
ते धनु सूर्य जातक लिहिलेलं कळालं नाही पण छक्के पंजे माहीत नसणे, समोरचयाने केलेले लवकर न कळणे, naive म्हणता येईल असा स्वभाव असलेल्या लोकांना आजकाल जरा त्रासदायक होते. बरेच लोकं गैरफायदा घेतात. कुठेतरी relate झालं.
Pages