जेव्हा कधी मॉलेस्टेशन (मग ते लहान मुलींशी केलेले लैंगिक गैरवर्तन असो वा महीलांशी) यावर मी फोरमवर मत मांडते तेव्हा काही पुरुषांची रिॲक्शन अशी का होते - की असं काही नसतं किंवा इतकी वाईट परिस्थिती नाही. (हे असे मत मांडलेल्या आयडी ला मी आता काही कमेंटच देत नाही. फडतूस) किंवा काही दीडशहाणे पुरुषांचा कैवार घेउ लागतात व म्हणतात अशा किती केसेस मुलांच्याबाबतीत होतात पण दडपल्या जातात.
अरे पण मुलांच्या केसेस दडपल्या जातात हा वेगळा मुद्दा नाही का? आत्ता मुलींवरच्या अन्यायाचे चालले आहे त्यात हा पॉइन्ट मांडुन तू काय कढी पातळ करायचा प्रयत्न करतोयस का? मुलांवर होउच नये पण मुलींवर होउ नये त्याबद्दल बोल ना.
हा अनुभव फोरमवर तर आलाच पण काही अंशी (एकदाच) ऑफिसात आला. - आई-वडिलांचा खून केल्यानंतर, विस्कॉनसिनची एक टीनेजर मुलगी पळवुन घेउन जाउन, तिला घरात आपल्या खाटेखाली या नराधामाने काहीतरी २०-२२ दिवस कोंडुन ठेवलेले होते. तिच्याशी लैंगिक दुर्व्यवहार केला की नाही ते अजुन गुलदस्त्यातच होते (ते बातमीत आले नव्हते) पण तिला धाक दपटशा दाखवुन कॉटखाली मुसक्या बांधून ठेवले होते व या शहाण्याकडे त्या काळात पाहुणे येत जात होते.
हे वाचल्यानंतर माझी उस्फूर्त प्रतिक्रिया ही झाली की - विस्कॉनसिनमध्ये फाशीची शिक्षा नाही (ऐकीव माहीती, गुगल केलेली नाहीये.) हे चूकीचे आहे. अशा नराधमांना फाशी दिली पाहीजे.
ताबडतोब माझ्या एका पुरुष सहकाऱ्याची प्रतिक्रिया - एकाचे म्हणणे पडले - फाशीची शिक्षा नाही हे योग्यच आहे. त्याचे पूर्वीपासून तेच मत होते त्याचे एक जाउ द्या, पण अजुन एक लगेच म्हणाला - माझे काही नातेवाईक प्रिझन गार्ड आहेत. आणि हे लैंगिक दुर्व्यवहार करणारे लोक तुरुंगातील, फूड चेनवरती लोएस्ट रंगवर असतात.
मी बीट्वीन द लाइन्स हे वाचले की - कल्जी करु नये. त्यांना त्यांच्या अपराधाची पुरेशी शिक्षा मिळते.
माझा हा जेन्युइन आणि कुतूहलजन्य प्रश्न आहे की - पुरुष गुन्हेगार असला की पुरुषांचा थोडासा सॉफ्ट कॉर्नर म्हणा/ बेनिफिट ऑफ डाउट म्हणा, त्या गुन्हेगाराला मिळतो का? यामध्ये जज करण्यापेक्षा, मानवी वर्तणुक (ह्युमन बिहेव्हिअर) या दृष्टिकोनातून हा प्रश्न उपस्थित केलेला आहे.
आणि जर तशी प्रतिक्षिप्त क्रिया असेल तर ५०-५० % स्त्री - पुरुष न्यायाधीश असणे अनिवार्य असायला नको का? याव्यतिरीक्त ५०-५०% स्त्री-पुरुष ज्युरी असणे देखील आवश्यक आहेच की.
ट्रान्स लोकांबद्दल मला काही म्हणायचे नाही, त्यांचे देखील प्रतिनिधीत्व असावे/नसावे..... माझे काहीही मत नाही.
______________________________
यात गैर काही आहे असे माझे म्हणणे नाही मी फक्त कुतूहल म्हणुन हा प्रश्न उपस्थित करत आहे. जसे मॉलेस्टेड लहान मुलीचे आयुष्य कसे ढवळून निघते/ किती दूरगामी परिणाम होतात हे पुरुषांना कळू शकत नाही तशा काही बाबी स्त्रियांना कळू शकत नसतील. इट इज व्हेरी मच पॉसिबल.
हां तीसरा अनुभव बलात्कार कसा गर्हणिय आहे, वगैरे विषय चालू असताना. एका काकांनी मुद्दा मांडलेला की बलात्कार झाला आहे हे व्हिक्टिमला सिद्ध करावे लागते. बलात्कार केलेला नाही हे आरोपीला सिद्ध करावे लागत नाही. त्याला म्हणे कारण आहे - खोटा आळ घेतला जाइल व अन्याय होइल.
आता विषय काय पण आला की नाही आरोपीकडे सॉफ्ट कॉर्नर.
हे तीनही काय योगायोग आहेत काय?
___________________________
आपण आपली आयडेंटिटी/ बायसेस थोडेही उचलुन उतरवु शकत नाही. कपड्यांपेक्षा अपले हे बायसेस (मी स्त्री आहे, मी पुरुष आहे, मी अमुक आहे, मी तमकी आहे) अपल्याला चिकटुन बसलेले असतात. कोणी कितीही दवंडी पिटो, नगारे वाजवो पण प्रत्येकाचा आपापला चष्मा असतो. न्यायाधीश कसे निस्पृह न्याय करत असावेत कोण जाणे
बायसेस असू शकतात.किंवा नकळत
बायसेस असू शकतात.किंवा नकळत एका पुरुषावर झालेला आरोप 'हा स्वतःवर/समस्त जमातीवर झालेला आरोप, मला वकील बनून माझी बाजू मांडलीच पाहिजे' अश्या आवेशातून विरुद्ध मुद्दे निघतात.
लैंगिक शोषण हा खूप गंभीर मुद्दा आहे.यातून गेलेला किंवा गेलेलीच यातना समजू शकतो.त्यातून येणारी भीती,शक्यतो सगळीकडे लो की राहण्याचा प्रयत्न करणे, किंवा आपल्याकडून काही माहिती दिली जाईल या भीतीने कमी बोलणे,गर्दीत जायला घाबरणे असे बरेच अतिशय वेगळे परिणाम एकेकाच्या मूळ व्यक्तित्वानुसार होतात.आरोप करायला घाबरणं, आरोप सिद्ध होणार नाही, लोकांची साथ मिळणार नाही त्यामुळे गप्प बसणं,अगदी आरोप केला तरी समोरून अग्रेशन आल्यास माझा गैरसमज झाला असेल म्हणून नमतं घेणं असे बरेच अगदी संबंधित न वाटणारी वागणूक होते.
त्यातून कपडे, मेकप यावरून जज करणं होतं. निर्भया केस अतिशय गंभीर वळणावर(मुलगी हॉस्पिटलमध्ये अत्यवस्थ) असताना बातम्या बघत असलेला एक मुलगा म्हणाला होता, 'बघा ती सोशल वर्कर बलात्कारावर बोलतेय आणि तिने स्वतःच लिपस्टिक लावलीय.' दुसरा एक 'ये लडकिया झगडा करती है इसलीये उनके साथ ऐसा होता है'म्हणाला होता.
कोणाचे काय परसेप्शन आहेत यापेक्षा योग्य वेळी योग्य व्यक्तीकडे आवाज उठवून मदत मिळणं महत्वाचं.
बाप रे काय ही मानसिकता.
बाप रे काय ही मानसिकता. लिप्स्टीक, झगडा वगैरे. भयंकर आहे हे. छान प्रतिसाद दिलेला आहेस तू.
<<<आत्ता मुलींवरच्या
<<<आत्ता मुलींवरच्या अन्यायाचे चालले आहे त्यात हा पॉइन्ट मांडुन .......... पण मुलींवर होउ नये त्याबद्दल बोल ना.>>>
संत सोहि रा यांनी म्हंटले आहे -
विवेकाची ठरेल ओल, ऐसे बोलावे बोल
आपुल्या मते उगीच चिखल कालवू नको रे"
हे बर्याच जणांना माहित नसते, मग मुख्य विषयावरून लिप्सटिक नि इतर काय काय मुलींचे चुकते, का नाही, याची चर्चा होते नि मुख्य विषय रहातो बाजूला.
१) <<<< पण अजुन एक लगेच
१) <<<< पण अजुन एक लगेच म्हणाला - माझे काही नातेवाईक प्रिझन गार्ड आहेत. आणि हे लैंगिक दुर्व्यवहार करणारे लोक तुरुंगातील, फूड चेनवरती लोएस्ट रंगवर असतात.
मी बीट्वीन द लाइन्स हे वाचले की - कल्जी करु नये. त्यांना त्यांच्या अपराधाची पुरेशी शिक्षा मिळते. >>>>
तुमच्या कटिंग स्लॅक धाग्यावरील मतांनुसार तो बेनिफिट ऑफ डाऊट येथे का दिला नाही?
Maybe (Or maybe not) he was just volunteering the information he had and was not trying to comment on what should be the punishment.
मी त्या व्यक्तीची बाजू घेत नाही. केवळ तुम्ही जे लिहिले आहे त्यावरून मत मांडत आहे.
२) जर हे गुन्हेगार तुरुंगातील सर्वात खालच्या पातळी वर असतील तर यातून हे सिद्ध होत नाही का कि बहुतेक पुरुष गुन्हेगार सुद्द्धा अश्या लैंगिक गुन्ह्यांना खूपच वाईट किंवा असमर्थनीय समजतात. आणि जर गुन्हेगार असे समजत असतील तर इतर विचारी माणसे सुद्धा त्यातील वेदना समजू शकत नसतील का? मग कोणता बायस?
३) <<<हां तीसरा अनुभव बलात्कार कसा गर्हणिय आहे, वगैरे विषय चालू असताना. एका काकांनी मुद्दा मांडलेला की बलात्कार झाला आहे हे व्हिक्टिमला सिद्ध करावे लागते. बलात्कार केलेला नाही हे आरोपीला सिद्ध करावे लागत नाही. त्याला म्हणे कारण आहे - खोटा आळ घेतला जाइल व अन्याय होइल.
आता विषय काय पण आला की नाही आरोपीकडे सॉफ्ट कॉर्नर.>>>
हे सर्वच गुन्हांसाठी लागू नाही का? पुन्हा एकदा त्या व्यक्तीच्या उद्देशाबद्दल पुनर्विचार करावा हि विनंती.
आणि स्त्रियांवर होणाऱ्या गुन्ह्यांमध्ये सिद्ध करण्यासाठी लागणाऱ्या साक्षी पुराव्यामध्ये कायद्याने शिथिलता आणता येते. यासंबंधी Google वर शोधल्यावर हे सापडले.
https://directorate.marathi.gov.in/central/1961-28.pdf
यातील पृष्ठ क्र ४ वरील कलम ८ क - विविक्षित खटल्यातील शाबितीचा भार
बायस किंवा पूर्वग्रह
बायस किंवा पूर्वग्रह
आपण सगळेच अशा पूर्वग्रहाचे शिकार असतो. मग तो लैंगिक गुन्हा असो किंवा बलात्कार.
स्त्री न्यायाधीश सुद्धा यातून सुटलेले नाहीत. उदा न्या पुष्पा गनेडीवाला
Ganediwala came in for criticism for a slew of judgments that ruled that there has to be 'skin-to-skin contact with sexual intent' in order for the act to be considered as an offence of sexual assault under the POCSO Act and that “holding hands of a minor girl and opening of zip of his pants” does not fall under the definition of “sexual assault” under the Act.
कमी कपडे घातलेल्या मुलीवर झालेल्या बलात्काराबद्दल अनेक स्त्रिया सुद्धा असे कपडे घातले म्हणूनच हिच्यावर बलात्कार झाला असे म्हणताना आढळतात.असा पूर्वग्रह स्त्री वकील किंवा न्यायाधीश सुद्धा बाळगताना आढळतात.
एखादी मुलगी मद्य घेत असेल किंवा सिगरेट पीत असेल तर ती "सहज उपलब्ध" असेल हा पूर्वग्रह कित्येक पुरुष बाळगताना दिसतात.
निदान ९५% मुली तरी वयाच्या पंचविशीपर्यंत केंव्हा तरी पुरुषांच्या लघळ स्पर्शाला बळी पडतात. ( कदाचित हा आकडा ९९.% असू शकेल).
डॉक्टर म्हणून मी पहिली बलात्काराची पीडित मुलगी माझ्या कडे आली होती. तेंव्हा तिच्या बरोबर असेलल्या मेट्रन आणि इतर स्त्रियांची वागणूक मला वेगळी जाणवली. ते पाहताना एक अत्यंत वेगळा विचार माझ्या मनात आला. तो म्हणजे आपल्यावर पण बलात्कार होऊ शकतो अशा तर्हेची भीती माझ्या मनाला कधीच शिवलेली नव्हती
याउलट असे काही आपल्याबाबत होऊ शकते या विचारापासून कोणतीही स्त्री मुक्त नसते. यामुळे स्त्रियांचा अशा दुर्दैवी मुली कडे पाहण्याचा दृष्टीकोन जास्त सहानुभूतीचा होता असे मला जाणवले.
बऱ्याच वेळेस स्त्रिया कमी कपडे घालणाऱ्या मुलींवर टीका करतात तेंव्हा त्या मनाचे समाधान करत असतात कि मी काही असे कपडे घालत नाही तेंव्हा माझ्यावर असा प्रसंग येणार नाही. परंतु जेंव्हा एखाद्या नखशिखांत कपडे घालणाऱ्या मुलीवर असा प्रसंग येतो तेंव्हा त्या मुळापासून हादरलेल्या दिसतात.
बलात्कार हा गुन्हा सिद्ध करणे कठीण आहे परंतु खोटा आरोप एखाद्या पुरुषावर झाला तर तो आरोप खोटा आहे हे सिद्ध करणे अत्यंत कठीण आहे असे कायदा म्हणतो. कायदा बऱ्यापैकी स्त्रियांच्या बाजूने आहे यात शंका नाही परंतु निदान ८०% बलात्काराचे गुन्हे नोंदवलेच जात नाहीत आणि नोंदवलेल्या २० % पैकी फार तर २५% गुन्ह्यात आरोपीला शिक्षा होते. यात सुद्धा
या उलट बलात्काराच्या खोट्या केस मध्ये अडकण्याची शक्यता हजारात एखाद्याच पुरुषाची असते. हि वस्तुस्थिती मान्य केल्यामुळेच कायदा स्त्रियांच्या बाजूने आहे.
राहिली गोष्ट मुली विरुद्ध मुले. मुलीवर झालेल्या लैंगिक अतिप्रसंगाकडे समाजाची पाहण्याची दृष्टी मुलावर झालेल्या अनैसर्गिक अतिप्रसंगापेक्षा कितीतरी हीन आहे. त्यातून स्त्री यातून स्वतःला दोषी समजते णिसमाज सुद्धा स्त्रीलाच दोषी मानतो. याउलट मुलावर झालेल्या अतिप्रसन्गबाबत समाज मुलाला दोषी मानतच नाही. यामुळे या दोन गोष्टीत तुलना होऊच शकत नाही.
असो
हा विषय खूप मोठा आहे
सध्या इतके च.
>>>>>तुमच्या कटिंग स्लॅक
@माबोवाचक,
>>>>>तुमच्या कटिंग स्लॅक धाग्यावरील मतांनुसार तो बेनिफिट ऑफ डाऊट येथे का दिला नाही?
धागा परत वाचावा. मी हा बेनेफिट ऑफ डाऊट दिलेला आहे. पुरुषांना चटकन कळणार्या काही गोष्टी स्त्रियांनाही कळू शकत नसतील कदाचित हा मुद्दा मांडलेला आहे.
>>>>> जर गुन्हेगार असे समजत असतील तर इतर विचारी माणसे सुद्धा त्यातील वेदना समजू शकत नसतील का?
खरच असा विचार मी करु शकले नव्हते. मला हा विचार नवा वाटला व पटला.
>>>>>हे सर्वच गुन्हांसाठी लागू नाही का? पुन्हा एकदा त्या व्यक्तीच्या उद्देशाबद्दल पुनर्विचार करावा हि विनंती.
खरे आहे . पण याच व्यक्तीला मी अनेकदा आवेशपूर्ण आणि हिंसेचे समर्थन करताना पाहीलेले असल्याने, अचानक बलात्कार्यासंबंधात आलेला कळवळा मला योग्य वाटला नाही.
>>>>>“holding hands of a
>>>>>“holding hands of a minor girl and opening of zip of his pants” does not fall under the definition of “sexual assault” under the Act.
बाप रे!!!
>>>>बलात्काराबद्दल अनेक स्त्रिया सुद्धा असे कपडे घातले म्हणूनच हिच्यावर बलात्कार झाला असे म्हणताना आढळतात.
होय पुरुषांकडे बोट दाखवताना, अन्य स्त्रियाही तशीच कॄती/विचार करतात का ते तपासायचे राहीले.
>>>>तेंव्हा तिच्या बरोबर असेलल्या मेट्रन आणि इतर स्त्रियांची वागणूक मला वेगळी जाणवली. ते पाहताना एक अत्यंत वेगळा विचार माझ्या मनात आला. तो म्हणजे आपल्यावर पण बलात्कार होऊ शकतो अशा तर्हेची भीती माझ्या मनाला कधीच शिवलेली नव्हती
हा मुद्दा मला नीटसा कळला नाही डॉक्टर.
>>>>>या उलट बलात्काराच्या खोट्या केस मध्ये अडकण्याची शक्यता हजारात एखाद्याच पुरुषाची असते. हि वस्तुस्थिती मान्य केल्यामुळेच कायदा स्त्रियांच्या बाजूने आहे.
अर्थात एखाद्याच म्हणजे अजस्त्र आहे. कारण एका निरपराध्याला शिक्षा होणे ही प्रचंड चिंतेची आणि दुर्दैवी गोष्ट आहे. याबाबतीत झिरो हाच आकडा हवा. हे मलाही मान्य आहे.
>>>>>याउलट मुलावर झालेल्या अतिप्रसन्गबाबत समाज मुलाला दोषी मानतच नाही.
असे विधान धाडसाचे ठरेल असे वाटते. अर्थात माझ्याकडे विदा (डेटा) नाही.
>>>>विवेकाची ठरेल ओल, ऐसे
>>>>विवेकाची ठरेल ओल, ऐसे बोलावे बोल
आपुल्या मते उगीच चिखल कालवू नको रे"
होय!! खरे आहे.
निदान ९५% मुली तरी वयाच्या
निदान ९५% मुली तरी वयाच्या पंचविशीपर्यंत केंव्हा तरी पुरुषांच्या लघळ स्पर्शाला बळी पडतात............ सहमत!
त्यात नात्यातील अथवा शेजारपाजारचे ओळखीचे लोक जास्त करून असतात.
आपल्यावर पण बलात्कार होऊ शकतो अशा तर्हेची भीती माझ्या मनाला कधीच शिवलेली नव्हती......
बरोबर आहे.याउलट बऱ्याच स्त्रियांना अशी भीती असते.
बऱ्याच स्त्रियांना अशी भीती
बऱ्याच स्त्रियांना अशी भीती असते.
जवळ जवळ १००% मुली / स्त्रिया कुठे तरी हि भीती मनात बाळगून असतात असा अनुभव आहे.
याचमुळे रात्री अपरात्री एकटे फिरण्याची हिम्मत त्यांना होत नाही.
तो म्हणजे आपल्यावर पण
तो म्हणजे आपल्यावर पण बलात्कार होऊ शकतो अशा तर्हेची भीती माझ्या मनाला कधीच शिवलेली नव्हती.
मी "पुरुष" असल्यामुळे रात्री एक दीड वाजता सुद्धा मरिन ड्राइव्ह वरून एकटे जाताना मला भीती वाटत नसे. कारण खिशात असलेले थोडे फार पैसे जातील हि सोडून कोणतीच भीती मला नसे. लष्करात असल्यामुळे पोलिसांची भीती नव्हतीच.
अशी स्थिती कोणत्याही स्त्रीची (मग ती लष्करात असो कि पोलिसांत) नसते.
धन्यवाद डॉक्टर. कळला मुद्दा.
धन्यवाद डॉक्टर. कळला मुद्दा.
मॉलेस्टेशन बाबत मुळातच
मॉलेस्टेशन बाबत मुळातच कुठल्याही प्रकारचा बायस योग्य नाही. पिडीत व्यक्तीचे लिंग, लैंगिक कल, वंश, धर्म, व्यवसाय, वय, कुठल्या प्रकारचे कपडे घातलेले, स्थळ/काळ, मद्यपान वगैरे करणे इत्यादी कुठलेच बायसेस नसावेत. यातील पहिली पायरी म्हणजे पूर्वग्रहाच्या नजरेने बघितले जावू शकते हे मान्य करुन , पिडीत व्यक्तीच्या बाबतीत यंत्रणा प्रत्येक टप्प्यावर चौकटी, पूर्वग्रह मधे न अडकता सक्षमपणे काम कसे करेल हे पहाणे फार गरजेचे. त्यासाठी योग्य प्रशिक्षण होणे आणि ते ठराविक काळाने पुन्हा अपडेट होणे (मराठी शब्द?) आवश्यक. असेच प्रशिक्षण सामान्य नागरीकांनाही मिळायला हवे जेणे करुन ते सजग नागरीकाची भूमिका चांगल्या प्रकारे निभावू शकतील.
>>मुलीवर झालेल्या लैंगिक अतिप्रसंगाकडे समाजाची पाहण्याची दृष्टी मुलावर झालेल्या अनैसर्गिक अतिप्रसंगापेक्षा कितीतरी हीन आहे. त्यातून स्त्री यातून स्वतःला दोषी समजते णिसमाज सुद्धा स्त्रीलाच दोषी मानतो. याउलट मुलावर झालेल्या अतिप्रसन्गबाबत समाज मुलाला दोषी मानतच नाही. यामुळे या दोन गोष्टीत तुलना होऊच शकत नाही.>> मुलाच्या बाबतीत असे काही घडते तेव्हा तो मुलगाही स्वतःला दोषीच मानतो, त्या शिवाय असे काही घडले यावर विश्वास कोण ठेवणार हे देखील असतेच कारण पुन्हा पूर्वग्रह.
>>काही दीडशहाणे पुरुषांचा कैवार घेउ लागतात व म्हणतात अशा किती केसेस मुलांच्याबाबतीत होतात पण दडपल्या जातात.>> सामो, दिडशहाणे का म्हणायचे? कदाचित ती व्यक्ती स्वतःच्या पूर्वायुष्यातील अनुभवातून हे बोलत असेल.
>>>>>अपडेट होणे
>>>>>अपडेट होणे
संपादित करणे
>>>>>सामो, दिडशहाणे का म्हणायचे? कदाचित ती व्यक्ती स्वतःच्या पूर्वायुष्यातील अनुभवातून हे बोलत असेल.
बाप रे!! हा मुद्दा देखिल पूर्ण दॄष्टीआड गेलेला. अगदी पटण्यासारखा.
स्वाती प्रतिसाद नेहमीप्रमाणेच खूप छान आहे. माहीतीपूर्ण, अभ्यासू आहे.
Child sexual abuse. Esp of
Child sexual abuse. Esp of boys is rampant throughout the catholic establishment. Church has paid massive compensation to abused boys.
होय त्यांच्या 'चर्च
होय त्यांच्या 'चर्च प्रमुखांनी किंवा चर्चशी संबंधित व्यक्तींनी' स्वतःची पॉवर आणि लहान मुलामुलींची अगतिकता यातून केलेले शोषण - महाभयानक आहे ते. आणि हेच लोक इतरांचे कन्फेशन्स ऐकणार? - पराकोटीचा विरोधाभास म्हणावा.
सामो,
सामो,
ohio state wrestling scandal चेच बघ. १६२ पीडित तरुण! ते देखील अशा खेळात निष्णात की जिथे शारीरिक आणि मानसिक क्षमतेचा कस लागतो. आपला मित्र/भाऊ/मुलगा पीडित आहे अशी शंका त्या तरुणांच्या नात्यातील स्त्रीयांच्या मनात चुकून तरी आली असेल का? की त्याच्याकडे आपला रक्षणकर्ता म्हणून भार सोपवणे झाले असेल?
>>>>>>ohio state wrestling
>>>>>>ohio state wrestling scandal
वाचते
>>>>>१६२ पीडित तरुण! ते देखील अशा खेळात निष्णात की जिथे शारीरिक आणि मानसिक क्षमतेचा कस लागतो.
आई ग्ग!!!
काही पुरुषांची रिॲक्शन अशी का
काही पुरुषांची रिॲक्शन अशी का होते - की असं काही नसतं किंवा इतकी वाईट परिस्थिती नाही.>>
काही बायकांना, विशेषत: ज्या खूप सुरक्षित वातावरणात वाढल्या आहेत सुद्धा वाटतं की हे प्रकार ‘आपल्या सारख्यांच्या’ घरात होऊच शकत नाही.