पाककृती स्पर्धेसाठी काही युक्त्या
उपवास म्हणजे खरे तर देवाचा सहवास किंवा रोजच्या वैश्विक मोहापासून स्वतःला बाजूला करण्याचा दिवस. दररोज च्या आयुष्यामध्ये मोहाचा सर्वात मोठा वाटा असतो अन्नाचा . त्या मोहावर एक दिवसासाठी का होईना ताबा मिळवला तर आपली मानसिक ताकत/ चिकाटी निश्चित वाढते. सध्याचे बहुचर्चित इंटरमिटन्ट फास्टिंग हा ह्याचा मानसिक चिकाटीला चालना देणारा प्रकार झाला. पण आपल्या पूर्वजांनी अश्या उपवासांचे महत्व फार पूर्वीच हेरून त्याला रोजच्या दैनंदिन आयुष्यात समरस करून घेतले. शिवाय त्याला धार्मिक महत्व देऊन लोकांना ते उपवास पाळण्यासाठी प्रेरित केले.