Submitted by कविन on 11 September, 2021 - 12:06
काहीच सुचत नाहीय. सगळीकडे फक्त अंधारच अंधार. कानावर फक्त पाण्याचा आवाज पडतोय. मनाला एक अनामिक हुरहूर लागून राहिलीय. तेवढ्यात दरवाजा उघडला जातो काय आणि पाण्याचा लोंढा भस्सकन आत येतो काय!
'Man proposes, God disposes' गेल्याच आठवड्यात या वाक्यावरुन 'संयमीत' चर्चा झाली होती. 'देव काही करत नसतो, माणसाची Strong इच्छा हवी' मीही ऐकवलं होतं.
पाण्याचा लोंढा आता गळ्यापर्यंत आलाय. एकत्र जगण्याचा प्लॅन फेल तर फेल, 'एकत्र मरण पत्करु' म्हणत आम्ही वाट बघत बसलो. 'तो' समोर उभा ठाकला.
'तो'; मदतीचा सेतू बांधत समोर उभा. 'मरण्याचा प्लॅन? not happening' त्याच्या सावळ्या नजरेत हे स्पष्ट दिसलं. अटेस्टेड डॉक्युमेंटमधे आता 'Man proposes…' पण जमा झालं.
शब्दखुणा:
Groups audience:
Group content visibility:
Public - accessible to all site users
शेअर करा
कविन, अतिशय सुंदर लिहिलं आहेस
कविन, अतिशय सुंदर लिहिलं आहेस. ❤️
छान!
छान!
ही सिच्युएशन नेहमी अनुभवायला
ही सिच्युएशन नेहमी अनुभवायला मिळते. रिलेट झालं
समजले नाहि
समजले नाहि
नेहमीसारखी ऊत्तम जमलीय. आवडली
नेहमीसारखी ऊत्तम जमलीय. आवडली.
कळले नाही कृष्ण आहे का?
कळले नाही![Sad](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/sad.gif)
कृष्ण आहे का?
धन्यवाद माबोकर्स
धन्यवाद माबोकर्स
कृष्ण आहे का?>>> हो. कुणी कृष्ण म्हणा, कुणी विठ्ठल कुणी सावळ्या तर कुणी माणसाच्या रुपातला परमेश्वर
समजले नाहि>>> हरकत नाही. पुढल्यावेळी अजून अॅप्ट शब्दरचना करायचा प्रयत्न करेन. Man proposes God disposes या वाक्प्रचारावर काही बेतायचा प्रयत्न आहे हा.
छान लिहीले आहे.
छान लिहीले आहे.
कविन छान लिहीलेले आहे.
>>>>>>'तो'; मदतीचा सेतू बांधत समोर उभा. 'मरण्याचा प्लॅन? not happening' त्याच्या सावळ्या नजरेत हे स्पष्ट दिसलं. अटेस्टेड डॉक्युमेंटमधे आता 'Man proposes…' पण जमा झालं.
कविन छान लिहीलेले आहे.
>>>पुढल्यावेळी अजून अॅप्ट शब्दरचना करायचा प्रयत्न करेन.
तशी गरजच नाहीये. मस्त झालय हे शशक. अत्यंत सकारात्मक.
शंभरपेक्षा कमी शब्दांमधेही
शंभरपेक्षा कमी शब्दांमधेही जमली असती इतका स्ट्राँग कंटेंट नि परफेक्ट शब्दरचना आहे. आवडली !
ठीक.
ठीक.
छान जमली आहे !!
छान जमली आहे !!
अवांतर (उगाच खरंतर) शॉफी जमेल का यावर? तुला जमेलही कदाचित! मे बी इथे आर्मी/नेव्ही/एअरफोर्स इ. इम्याजिनून...![Happy](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/happy.gif)