मायबोली गणेशोत्सव २०२१

माझ्या आठवणीतली मायबोली- सामो

Submitted by सामो on 11 September, 2021 - 01:09

स्तोत्रांचा शोध घेत असते वेळी माबोवरती अश्विनी यांच्या धाग्यावरती, स्तोत्रांचा खजिनाच सापडला. त्या काळात मी अन्य संस्थळावरती अधिक सक्रिय असल्याने, माबोवरती बरेच दिवस, काही सभासद झाले नाही. नंतर मग मात्र जालावरती 'सद्गुरु स्तोत्र' सापडलं, '

गुरू| गुणालया| परापराधिनाथ सुंदरा|देवादिकांहुनि वरीष्ठ तूचि साजीरा|गुणावतार तू धरोनिया या जगास तारीसी| सुरा मुनीश्वरा अलभ्य या गतीस दावीसी||१||

विषय: 

शशक पूर्ण करा - हुरहूर - भास्कराचार्य

Submitted by भास्कराचार्य on 10 September, 2021 - 17:13

काहीच सुचत नाहीय. सगळीकडे फक्त अंधारच अंधार. कानावर फक्त पाण्याचा आवाज पडतोय. मनाला एक अनामिक हुरहूर लागून राहिलीय. तेवढ्यात दरवाजा उघडला जातो..... अश्या परिस्थितीत तो दचकून उभा राहिला, तेवढ्यात जोरात त्याच्या मुस्काटीत मारून हॉटेलचा मालक खेकसला, "एः @#$&! तुमकू क्या इदर बैठनेकू लाया क्या? अंदर आर्डर लेने तेरा बाप जायेगा क्या?" ते कळायलाच त्याला पाच सेकंद लागले. आलेल्या झिणझिण्यांतून तो सावरला. डोळे वटारून बघत असलेल्या मालकाकडे भेदरून बघत कसाबसा भेलकांडत पळत गेला. डोळ्यांतून मुके अश्रू वाहत होते.

शशक पूर्ण करा - भान - भास्कराचार्य

Submitted by भास्कराचार्य on 10 September, 2021 - 15:55

काहीच सुचत नाहीय. सगळीकडे फक्त अंधारच अंधार. कानावर फक्त पाण्याचा आवाज पडतोय. मनाला एक अनामिक हुरहूर लागून राहिलीय. तेवढ्यात दरवाजा उघडला जातो..... आणि मी दचकतो. मान वर करून बघतोय तोवर मला काही कळायच्या आतच दिवा लागतो, आणि तीव्र प्रकाशाने माझे डोळे दिपून जातात. माझं थकलेलं डोकं आधीच गरगरलेलं असतं, ते आता काहीच काम देईनासं होतं. तेवढ्यात धाडकन् दरवाजा पुन्हा आपटून "ईईईईः! किती वेळा तुला सांगितलं झोपेत असलास तरी आतला दिवा लावत जा म्हणून??!

विनोदी लेखन उपक्रम - मायबोली २४ तास - सामो

Submitted by सामो on 10 September, 2021 - 15:53

नमस्कार, मायबोली २४ तास मध्ये आपले स्वागत आहे. आजच्या ठळक बातम्या अशा आहेत.

विषय: 

माझ्या आठवणीतली मायबोली- अमितव

Submitted by अमितव on 10 September, 2021 - 15:35

मला मायबोलीची पहिली ओळख २००३-०४ ला झाली असेल. तेव्हा कॉलेजमध्ये हॉस्टेलवर रहात होतो. लॅब मध्ये आणि रुमवर अनलिमिटेड इंटरनेट होतं, तेव्हा हितगुज मधील काही धागे वाचलेले. तेव्हा देशाबाहेरील लोकांचा सहभाग जास्त असावा म्हणून असेल, वाचता तर येतंय त्यावर प्रतिक्रिया द्यावी ही निकड वाटत नाही म्हणून असेल... का आठवत नाही पण आयडी काढलेला आठवत नाही.

विषय: 

शशक पूर्ण करा - रघुकुलतिलकनाम दासाअंतरी - स्वाती_आंबोळे

Submitted by स्वाती_आंबोळे on 10 September, 2021 - 14:10

काहीच सुचत नाहीय. सगळीकडे फक्त अंधारच अंधार. कानावर फक्त पाण्याचा आवाज पडतोय. मनाला एक अनामिक हुरहूर लागून राहिलीय. तेवढ्यात दरवाजा उघडला जातो. उजेडाची एक मंद तिरीप आत येते, तिनेसुद्धा माझे तीनही डोळे दिपतात. पुजारी अभिषेकपात्रात आणखी पाणी ओतून गेला. पुन्हा दार बंद! कशाला दिवसरात्र अभिषेक लागतो? शेवाळ धरेल मला अशाने! देवपणावर पुटं चढली आहेतच! कुठे त्या वाहत्या गंगेचा ध्रोंकार ऐकत हिमालयात रानावनात स्वच्छंद हिंडणारा मी आणि कुठे हा दुधातुपाने चिकट झालेला दगड! कधीतरी युगानुयुगांत एखादा या दगडात आणि दगडाबाहेरही देव पाहणारा भक्त भेटेल या आशेने बांधला गेलो आहे, नव्हे चिणला गेलो आहे इथे.

विषय: 

माझ्या आठवणींतली मायबोली - साधना

Submitted by साधना on 10 September, 2021 - 13:49

कधीतरी २००३-२००४ च्या दरम्यान नेट हे नवे अनोखे खेळणे हाती लागले होते तेव्हाच कधीतरी नेटवर मराठीही वाचायला मिळते हा शोध लागलेला. पण मायबोली माहित नव्हती. तेव्हा संदिप खरे खुप प्रसिद्ध होता (आताही असावा, ऊगीच त्याच्या चाहत्यांनी मला कोपच्यात घेऊन मारू नका). एकदा संदिप खरेची ‘सरीवर सर....’ नेटवर टाईप केली आणि हितगुज

विषय: 

माझ्या आठवणींतली मायबोली - स्वाती आंबोळे

Submitted by स्वाती_आंबोळे on 10 September, 2021 - 12:20

बाप रे! पंचवीस?! मायबोली पंचवीस वर्षांची झाली?!
(मनात : 'गद्धेपंचविशी आली की!' वगैरे सणासुदीला म्हणू नये! प्रेमानेसुद्धा!!)

विषय: 

शशक पूर्ण करा - '..तिचा शेवट' - मी अश्विनी

Submitted by मी अश्विनी on 10 September, 2021 - 11:36

'काहीच सुचत नाहीय. सगळीकडे फक्त अंधारच अंधार. कानावर फक्त पाण्याचा आवाज पडतोय. मनाला एक अनामिक हुरहूर लागून राहिलीय.' तेवढ्यात दरवाजा उघडला जातो..... आत येणार्‍या लोकांना पाहून थ्रोनवर बसलेली सर्सी दचकते.

विषय: 

शशक पूर्ण करा - काम-अंजली_१२

Submitted by अंजली_१२ on 10 September, 2021 - 10:55

काहीच सुचत नाहीय. सगळीकडे फक्त अंधारच अंधार. कानावर फक्त पाण्याचा आवाज पडतोय. मनाला एक अनामिक हुरहूर लागून राहिलीय. तेवढ्यात दरवाजा उघडला जातो.....

बाहेरच्या खोलीतली प्रकाशाची तिरीप डोळ्यावर येते.

आणि पाठोपाठ आईची जोरदार हाक "अगं कधीपासून ओरडतेय, पाण्याची बादली भरायला लावली आहे. उठ आणि आधी बंद कर नळ . दुसरी बादली लाव भरायला.

विषय: 

Pages

Subscribe to RSS - मायबोली गणेशोत्सव २०२१