शशक पूर्ण करा - हुरहूर - भास्कराचार्य
काहीच सुचत नाहीय. सगळीकडे फक्त अंधारच अंधार. कानावर फक्त पाण्याचा आवाज पडतोय. मनाला एक अनामिक हुरहूर लागून राहिलीय. तेवढ्यात दरवाजा उघडला जातो..... अश्या परिस्थितीत तो दचकून उभा राहिला, तेवढ्यात जोरात त्याच्या मुस्काटीत मारून हॉटेलचा मालक खेकसला, "एः @#$&! तुमकू क्या इदर बैठनेकू लाया क्या? अंदर आर्डर लेने तेरा बाप जायेगा क्या?" ते कळायलाच त्याला पाच सेकंद लागले. आलेल्या झिणझिण्यांतून तो सावरला. डोळे वटारून बघत असलेल्या मालकाकडे भेदरून बघत कसाबसा भेलकांडत पळत गेला. डोळ्यांतून मुके अश्रू वाहत होते.