शशक पूर्ण करा

शशक पूर्ण करा - टोमॅटो - विको

Submitted by विको on 16 September, 2021 - 08:55

काहीच सुचत नाहीय. सगळीकडे फक्त अंधारच अंधार. कानावर फक्त पाण्याचा आवाज पडतोय. मनाला एक अनामिक हुरहूर लागून राहिलीय. तेवढ्यात दरवाजा उघडला जातो.
ठपाक ठपाक ठपाक ...
'काय चाललंय काय? मला सांगितलं होत आरामात राहता येत, किडा-मुंगीच भय नाही.'
क्लिक
"हे हे काय अगदी भाजतंय अंग"
"अरे आपण इथे तळघरात आहोत बाहेर थंडी आहे. काही महिन्यांनी बाहेर" मोठ्या पानानी सांगितलं.
"मागच्या जन्मी शेतात काय मस्त आयुष्य होत" मोठा म्हणाला.
"काळजी करू नको मी कालच आलोय, मागच्या जन्मी इथंच होतो" नव्याने सांगितलं
"हुश्श उजेड जरा कमी झाला."

शशक पूर्ण करा - तू हैं तो I will be alright - रीया

Submitted by रीया on 11 September, 2021 - 15:33

काहीच सुचत नाहीय. सगळीकडे फक्त अंधारच अंधार. कानावर फक्त पाण्याचा आवाज पडतोय. मनाला एक अनामिक हुरहूर लागून राहिलीय. तेवढ्यात दरवाजा उघडला जातो..समोर ती दिसते.
मी भावनातिरेकाने तिच्या कुशीत शिरते. तिला विचारते - 'कुठे असतेस गं आई, मला गरज असते तेंव्हा कुठे जातेस? मला खरंच वाटलं या अंधारात एकटीच चाचपडणार मी'....
ती किंचित हसते, डोक्यावर हात ठेवून म्हणते "देहाचा दरवाजा उघडलास तेंव्हा सगुणातली मी दिसले, मनाचा उघडशील तेंव्हा समजेल की मी तुझ्या अंतरातच आहे, मग कसला अंधार आणि कशाचं एकटेपण?"

विषय: 

शशक पूर्ण करा - सोबत - हजारो ख्वाईशे ऐसी

Submitted by हजारो ख्वाईशे ऐसी on 11 September, 2021 - 08:50

काहीच सुचत नाहीय. सगळीकडे फक्त अंधारच अंधार.
कानावर फक्त पाण्याचा आवाज पडतोय. मनाला एक अनामिक हुरहूर लागून राहिलीय. तेवढ्यात दरवाजा उघडला जातो.....
तिला अंधार आवडत नाही.
ती गुहेत आत जाते. सर्वानी शंभरदा बजावून सांगितलेलं असूनही. ती टपोऱ्या डोळ्यांची. देखणी. चंचल. मनस्वी.
आत चाहूल लागते तसे तिचे कान टवकारतात.
आणि लखकन त्याचे डोळे चमकतात. त्याची तीक्ष्ण, भेदक नजर. मी राजा आहे इथला असं सांगणारी.
तो सरसावून दबा धरून बसतो. तिच्या उष्ण रक्ताचा घोट घेण्यासाठी झेपावतो.
आणि ती? ती गर्रकन फिरून पुन्हा बाहेर पडते. जिवाच्या आकांताने पळत सुटते अंधारात.

शशक पूर्ण करा - हुरहूर - भास्कराचार्य

Submitted by भास्कराचार्य on 10 September, 2021 - 17:13

काहीच सुचत नाहीय. सगळीकडे फक्त अंधारच अंधार. कानावर फक्त पाण्याचा आवाज पडतोय. मनाला एक अनामिक हुरहूर लागून राहिलीय. तेवढ्यात दरवाजा उघडला जातो..... अश्या परिस्थितीत तो दचकून उभा राहिला, तेवढ्यात जोरात त्याच्या मुस्काटीत मारून हॉटेलचा मालक खेकसला, "एः @#$&! तुमकू क्या इदर बैठनेकू लाया क्या? अंदर आर्डर लेने तेरा बाप जायेगा क्या?" ते कळायलाच त्याला पाच सेकंद लागले. आलेल्या झिणझिण्यांतून तो सावरला. डोळे वटारून बघत असलेल्या मालकाकडे भेदरून बघत कसाबसा भेलकांडत पळत गेला. डोळ्यांतून मुके अश्रू वाहत होते.

शशक पूर्ण करा - भान - भास्कराचार्य

Submitted by भास्कराचार्य on 10 September, 2021 - 15:55

काहीच सुचत नाहीय. सगळीकडे फक्त अंधारच अंधार. कानावर फक्त पाण्याचा आवाज पडतोय. मनाला एक अनामिक हुरहूर लागून राहिलीय. तेवढ्यात दरवाजा उघडला जातो..... आणि मी दचकतो. मान वर करून बघतोय तोवर मला काही कळायच्या आतच दिवा लागतो, आणि तीव्र प्रकाशाने माझे डोळे दिपून जातात. माझं थकलेलं डोकं आधीच गरगरलेलं असतं, ते आता काहीच काम देईनासं होतं. तेवढ्यात धाडकन् दरवाजा पुन्हा आपटून "ईईईईः! किती वेळा तुला सांगितलं झोपेत असलास तरी आतला दिवा लावत जा म्हणून??!

शशक पूर्ण करा-बुंदीचा लाडू-अस्मिता

Submitted by अस्मिता. on 10 September, 2021 - 09:41

काहीच सुचत नाहीय. सगळीकडे फक्त अंधारच अंधार. कानावर फक्त पाण्याचा आवाज पडतोय. मनाला एक अनामिक हुरहूर लागून राहिलीय. तेवढ्यात दरवाजा उघडला जातो....

       आई म्हणाली होती बरं की या खोलीत झोपू नको पण ही वाड्याच्या एका बाजूला , सज्जात लावलेला जुईचा वेल, कसं शांत शांत वाटत होतं पण ........

    किंकाळी......

Subscribe to RSS - शशक पूर्ण करा