Submitted by विको on 16 September, 2021 - 08:55
काहीच सुचत नाहीय. सगळीकडे फक्त अंधारच अंधार. कानावर फक्त पाण्याचा आवाज पडतोय. मनाला एक अनामिक हुरहूर लागून राहिलीय. तेवढ्यात दरवाजा उघडला जातो.
ठपाक ठपाक ठपाक ...
'काय चाललंय काय? मला सांगितलं होत आरामात राहता येत, किडा-मुंगीच भय नाही.'
क्लिक
"हे हे काय अगदी भाजतंय अंग"
"अरे आपण इथे तळघरात आहोत बाहेर थंडी आहे. काही महिन्यांनी बाहेर" मोठ्या पानानी सांगितलं.
"मागच्या जन्मी शेतात काय मस्त आयुष्य होत" मोठा म्हणाला.
"काळजी करू नको मी कालच आलोय, मागच्या जन्मी इथंच होतो" नव्याने सांगितलं
"हुश्श उजेड जरा कमी झाला."
"सांगितलं ना ही खूप काळजी घेते "
वर बघितलं तर दोन डोळे अगदी प्रेमाने बघत होते.
विषय:
शब्दखुणा:
Groups audience:
Group content visibility:
Use group defaults
शेअर करा
(No subject)
छान.
मस्त
मस्त
मस्तच, आवडली
मस्तच, आवडली