काहीच सुचत नाहीय. सगळीकडे फक्त अंधारच अंधार. कानावर फक्त पाण्याचा आवाज पडतोय. मनाला एक अनामिक हुरहूर लागून राहिलीय. तेवढ्यात दरवाजा उघडला जातो.
"माय! दोन ओंजळ पाणी दे , माय. गळा लई सुकलाय." बाहेर सुरकुतलेला चेहरा आणि थकलेला आवाज होता.
"दादा...आत या. पाणी देते. दोन घास खाऊन घ्या."
"नको माय . मी हितंच बरा. पाय चिखलान भरल्यात. द्या, थोडं. भूक बी लागलीया. हितं आडवा होतो थोडा रातचा. तुमीबी निवांत पडा."
सकाळी पायऱ्यांशी कोण नव्हते.
शहरातून तार आली. "जागेचा निकाल आपल्या बाजूने. देऊळ हलवावे लागणार नाही."
आणि देवळात ही गर्दी झाली.
’काहीच सुचत नाहीय. सगळीकडे फक्त अंधारच अंधार. कानावर फक्त पाण्याचा आवाज पडतोय. मनाला एक अनामिक हुरहूर लागून राहिलीय. तेवढ्यात दरवाजा उघडला जातो आणि समुद्राची विव्हळ गाज अजून स्पष्ट साद घालते. सहन होत नाही. आता निघावंच लागेल.’
अश्विनच्या डायरीतल्या या शेवटच्या नोंदीवरून पोलिस संपूर्ण समुद्रकिनारे पिंजून काढताहेत.
मायबोली गणेशोत्सव २०२१ घेऊन येतोय आपला लाडका खेळ - प्रकाशचित्रांचा झब्बू आणि आजचा विषय आहे 'घरातील आवडती जागा'.
शशक - गर्दी
काहीच सुचत नाहीय. सगळीकडे फक्त अंधारच अंधार. कानावर फक्त पाण्याचा आवाज पडतोय. मनाला एक अनामिक हुरहूर लागून राहिलीय. तेवढ्यात दरवाजा उघडला जातो >>>
' अंगावर जखमांचे लेणे असल्याने आम्ही प्रयत्नपूर्वक डोळे उघडतो..
गिलच्यांनी केलेलं कोंडाळं बाजूला सारून कुणीतरी आलंय..
अगम्य भाषेत बोलणं सुरू आहे.. अर्थबोध व्हावा, इतक्याशा उत्सुकतेनेदेखील मेंदू शिणतोय...
परंतु त्यायोगे असंबद्ध काहीतरी आठवतंय, 'कुंजपुरा, बुंदेले, दिल्लीविजय, गोलाची रचना,
काहीच सुचत नाहीय. सगळीकडे फक्त अंधारच अंधार. कानावर फक्त पाण्याचा आवाज पडतोय. मनाला एक अनामिक हुरहूर लागून राहिलीय. तेवढ्यात दरवाजा उघडला जातो.
वेदना! असह्य वेदना! ह्या अंधारातही आधी किती सुरक्षित वाटत होतं... कोण हे मला बाहेर ढकलतय?
काय माहित बाहेर ऐकू येणारे हे आवाज कुणाचे! गार झोत येतोय! मला नकोय हे जग! मला नाही जायचय बाहेर!
१ २ ३ PUSH
ही घुसमट आता सहन होत नाहीये.. असह्य होऊन मी टाहो फोडला, आकांत मांडला तर ह्यांचे चेहरे किती आनंदी! एकच ओळखीचा वाटणारा स्पर्श.... तिच्याही डोळ्यातून पाणी येतय, पण थकलेला चेहरा किती आनंदी!
काहीच सुचत नाहीय. सगळीकडे फक्त अंधारच अंधार. कानावर फक्त पाण्याचा आवाज पडतोय. मनाला एक अनामिक हुरहूर लागून राहिलीय. तेवढ्यात दरवाजा उघडला जातो.
गधडे! झोपून काय राहिलीस - तो यायची वेळ झालीये ना आता ? तिचा आवाज!
भराभरा तोंडावर मारलेले पाण्याचे हाबके , बदललेले कपडे ...
लाईट लाव ना ... अजून पेंगतेच आहेस वाटतं!
झांजा घे जा कपाटातल्या... मन्या तू घंटा घे. अरेच्च्या ताट आणि वस्त्र इथेच तर ठेवलेलं..
धांदल नुसती! हे घेतलं का, ते काढून ठेवलं का...
(घोषणेत उदाहरणादाखल दिलेल्या नमुन्यापेक्षा स्वरुप थोडे वेगळे आहे पण दहा बातम्या आहेत, चिंता नसावी. गरज भासेल तसे प्रतिसादांत संदर्भांची संत्री सोलण्याचे अवश्य करावे ही विनंती!)
________________________
निवेदक कवी कुमार आरशात बघून आपला टाय सारखा करत होता. आज फार फार महत्त्वाची बातमी प्रसारित होणार असल्याची त्याला कल्पना होती. त्याबाबत चॅनेलने खूपच गोपनीयता बाळगली होती. आपल्या कॉल टाईमच्या सुमारास तो सेटवर पोहोचला तर तिथे त्याला तीन व्यक्ती दिग्दर्शकाशी हुज्जत घालताना दिसल्या.
लोक फलज्योतिषाकडे धाव का घेतात?
काहीच सुचत नाहीय. सगळीकडे फक्त अंधारच अंधार. कानावर फक्त पाण्याचा आवाज पडतोय. मनाला एक अनामिक हुरहूर लागून राहिलीय. तेवढ्यात दरवाजा उघडला जातो.
फोन घेऊन आई येतेय. फोनवर दुसऱ्या बाजूला बाबा असणार हे नक्की. मी त्या दोघांना अजून कस टाळू त्या पेचात. फुलपाखरं पोटात उसेन बोल्टच्या वेगाने दौडतायेत, हात पाय थरथरतायेत.पण आई ठाण मांडून बसल्याने पर्यायही नाहीये.
हज़ारो ख्वाहिशें ऐसी की हर ख्वाईश पे दम निकले...
कित्ती तरी गोष्टी आहेत बकेट लिस्ट मध्ये.... काही पूर्ण झाल्या, काही अजून अपूर्ण आहेत. अनेक गोष्टी अपूर्ण आहेत कारण अजून त्याची वेळ आलेली नाहीये.