मायबोली गणेशोत्सव २०२१ घेऊन येतोय आपला लाडका खेळ - प्रकाशचित्रांचा झब्बू आणि आजचा विषय आहे 'घरातील आवडती जागा'.
घरातील आवडती जागा
तुम्हाला तुमच्याकडे असलेली जी प्रकाशचित्रं पूर्णपणे प्रताधिकार मुक्त करावयाची असतील, ती यात झब्बू म्हणून देणं अपेक्षित आहे.
१. ही स्पर्धा नसून खेळ आहे.
२. झब्बू म्हणून एका वेळेस एकच प्रकाशचित्र टाकावे.
३. प्रकाशचित्र हे प्रताधिकारमुक्त असावे व संयोजकांनी दिलेल्या विषयाशी सुसंगत असावे. प्रकाशचित्र कोलाज स्वरूपातले नसावे.
४. एक आयडी एका दिवसात कितीही वेळा झब्बू देऊ शकतो, मात्र सलग दोन झब्बू देऊ शकणार नाही.
५. सर्व प्रकाशचित्रे मायबोलीच्या 'प्रकाशचित्रविषयक धोरणा'चे पालन करणारी असावीत.
६. झब्बूंचा खेळ मायबोलीकरांचे स्वतःचे प्रकाशचित्रसंग्रह सादर करण्यासाठी तयार केला आहे. तेव्हा कृपया तुमच्या जवळची (मग ती तुम्ही अथवा तुमच्या कुटुंबीयांनी काढलेली) प्रकाशचित्रे सादर करा. आंतरजालावरून घेतलेली प्रताधिकारमुक्त चित्रे झब्बूमध्ये देऊ नयेत.
७.मायबोलीवरील प्रकाशचित्रांचे धोरण इथे पाहा -
Afoot and light-hearted I
.
हा माझ्या वाटेला आलेला सुंदर बाहू पसरुन कवेत घेणारा 'सताड मोकळा रस्ता' आणि माझ्या वाटणीचा आकाशाचा तुकडा. आमची बाल्कनी. माझी माझ्या घरातील सर्वाSSSSS आवडती जागा. प्रे- शि-अ-स. कारण सोफ्यावर लोळत मी इथे ढगांचे रंग आणि आकार मनमुराद निरखू शकते. वारा खात वेळ घालवु शकते. समथिंग दॅट रिप्रेझेन्टस माय वॉन्डरलस्ट!
https://www.maayboli.com/node/72679
वाॅव,,मस्तच सामो.
वाॅव,,मस्तच सामो.
छान view सामो.
छान view सामो.
फोटो दिसत नाहीये. पण जागेचं
फोटो दिसत नाहीये. पण जागेचं वर्णन छान .
थँक्स धनुडी. आता दिसेल बहुतेक
थँक्स धनुडी. आता दिसेल बहुतेक.
सर्वांचे आभार.
आधीच्या घरी आम्ही पाच वर्षे
आधीच्या घरी आम्ही पाच वर्षे होते तिथली हि आवडती जागा.

नवीनच होते तेव्हा या पायर्यांवर बसून येणारे जाणारे बघत बसायचे.. हळूहळू आजुबाजूच्यांबरोबर ओळखी होत गेल्या..मग मोडकंतोडकं तमिळ आणी खाणाखुणा भाषेत इथेच गप्पा रंगायच्या..
स्वीट!!! खूप क्युट.
आमच्या घरात माझ्या अनेक
आमच्या घरात माझ्या अनेक आवडत्या जागा आहेत.
खरं तर वेगवेगळ्या गोष्टींसाठी वेगवेगळे कोपरे (Nooks n Corners) करायला मला आवडतं.
आमच्या घराच्या दिवाणखान्याला आमच्या विकासकाने एक छान वळणदार बाल्कनी दिली आहे. पण अर्धीच..
तिच्यापुढे Sunken Flowebed आहे. आणि उरलेल्या अर्ध्या भागात संपूर्णपणे फ्लाॅवरबेड.
झाडांना पाणि घातलं तर ते बाहेर जाण्यासाठी ड्रेनेजचीही सोय आहे.
त्यामुळे आणि झाडांची अतिशय आवड असल्यामुळे झाडं लावण क्रमप्राप्तच होतं.
आणि ही झाड बघत बसायला, चहा प्यायला, पुस्तक वाचायला एक छोटासा लाकडी बेंच आणणंही मस्टच होतं. पाहिजे असल्यास हवेसाठी डोईवर पंखा, झाडांची झिरमिळती सावली आणि झाडांचा थंडावा..
और क्या चाहिये..??
अहाहा थंडगार वाटले पाहूनच.
अहाहा थंडगार वाटले पाहूनच. फार फार सुंदर.
दिसला गं बाई दिसला ,सामो फोटो
दिसला गं बाई दिसला ,सामो फोटो छान.
वा निरू काय मस्त बाल्कनी आहे! झाडंही छान वाढली आहेत.
मृ माहिराचा आवडता जिना छान. मस्त रमलीये.
वा , निरू , काय मस्त बाल्कनी
वा , , काय मस्त बाल्कनी आहे , एकदम हिरवागार कोपरा आहे !!!
सामो, मृ, मस्त फोटो.
सामो, मृ, मस्त फोटो.
निरु किती सुंदर लिहिलंय, तुमच्या बाल्कनी च्या तर प्रेमातच आहे मी ..एखाद्या बंगल्याचा व्हरांडा च वाटतो मला तुमची बाल्कनी.
(No subject)
माझ्या घराचं मुख्य प्रवेशद्वार आणि परसदारातलं 'हर्ब गार्डन'.
)
(हे कौतुकाने दाखवल्यावर माझ्या भावाने 'मग तुम्ही घरात खिडकीतून येजा करता का?' असं विचारलं होतं.
वाह मस्त आहेत एकेक फोटो.
वाह मस्त आहेत एकेक फोटो. विषयही छान आहे.
निरू, तुमची बाल्कनी मस्तच आहे
निरू, तुमची बाल्कनी मस्तच आहे.
बाकीचे फोटो पण आवडले. सामो, तुमचा व्ह्यू बघून माझ्या ऑफिसस्पेसची आठवण झाली!
ओव्याची पाने ओळखता आली मला.
ओव्याची पाने ओळखता आली मला. उजव्या रांगेतील पुढुन दुसरा. सुंदर सजवले आहे.
हो, आणि सर्वात वरच्या पायरीवर
हो, आणि सर्वात वरच्या पायरीवर माझ्या चहाच्या कपाशेजारी छोट्या निळ्या पिंजर्यात दिसतो आहे तो माझा कॉकटील चिकू.

म्हणजे हे साहेब :
Awwww smarty-pants!!!
Awwww smarty-pants!!!
सुंदर आहे.
वा वा! घराचे प्रवेश द्वार
वा वा! घराचे प्रवेश द्वार फारच मस्त! चिकू चहाचा कप घेऊन बसलाय असे वाटतेय
छान विषय आणि छान छान फोटो!
छान विषय आणि छान छान फोटो!
सामो, मृ, मस्त फोटो.
सामो, मृ, मस्त फोटो.
निरु किती सुंदर लिहिलंय, तुमच्या बाल्कनी च्या तर प्रेमातच आहे मी .......अगदी अगदी झाले.
मृणाली , क्युटिचा फोटो गोड
मृणाली , क्युटिचा फोटो गोड
निरु, अशी बाल्कनी मला हविये
स्वाती, छान फोटो.
<<निरु, अशी बाल्कनी मला हविये
<<निरु, अशी बाल्कनी मला हविये>>
अरेच्च्या... प्रचिंच्या झब्बूच्या धाग्यावर "बकेट लिस्ट"..??
पण मिळेल नक्की..
निरु, स्वाती मस्त हिरवेगार
निरु, स्वाती मस्त हिरवेगार फोटो!
आमच्या घराच्या साईडयार्डात बसून समोरची झाडं बघत, छान पक्षांचे आवाज ऐकत, वार्याच्या झुळके बरोबर फुलांचा सुगंध घेत गप्पा मारायची, वाचन करण्याची हि माझी आवडती जागा

मायबोली संदर्भात ईथली आठवण म्हणजे या साईड यार्डात एकदा मायबोली बेकरीचा भोंडला देखील झाला होता, मज्जा आली होती
मीपु, भारी!
मीपु, भारी!
माझी आवडती जागा ही पॅटिओ...
माझी आवडती जागा ही पॅटिओ... तासनतास मी इथे घालवू शकते, गाणी ऐकत, गाणी म्हणत, पाऊस बघत, नुसतं काही न करता, चहा पिण्याची जागा ही आणि हिच.
सुंदर!
सुंदर!
वाह!!! मीपु आणि अंजली, खूप
वाह!!! मीपु आणि अंजली, खूप सुंदर.
एकूण आपल्याला घराबाहेरच्या
एकूण आपल्याला घराबाहेरच्या जागा आवडत्या आहेत.
एकूण आपल्याला घराबाहेरच्या
एकूण आपल्याला घराबाहेरच्या जागा आवडत्या आहेत.>>>>>>> +११११
Pages