Submitted by चहाबाज on 16 September, 2021 - 07:48
काहीच सुचत नाहीय. सगळीकडे फक्त अंधारच अंधार. कानावर फक्त पाण्याचा आवाज पडतोय. मनाला एक अनामिक हुरहूर लागून राहिलीय. तेवढ्यात दरवाजा उघडला जातो.
"माय! दोन ओंजळ पाणी दे , माय. गळा लई सुकलाय." बाहेर सुरकुतलेला चेहरा आणि थकलेला आवाज होता.
"दादा...आत या. पाणी देते. दोन घास खाऊन घ्या."
"नको माय . मी हितंच बरा. पाय चिखलान भरल्यात. द्या, थोडं. भूक बी लागलीया. हितं आडवा होतो थोडा रातचा. तुमीबी निवांत पडा."
सकाळी पायऱ्यांशी कोण नव्हते.
शहरातून तार आली. "जागेचा निकाल आपल्या बाजूने. देऊळ हलवावे लागणार नाही."
आणि देवळात ही गर्दी झाली.
कोणीतरी माऊलीच्या पायांना चिखल फासला होता व हातांवर होत्या दोन भाकऱ्या.
विषय:
शब्दखुणा:
Groups audience:
Group content visibility:
Public - accessible to all site users
शेअर करा
छान...
छान...
छान शशक!
छान शशक!
छान
छान
सुंदर
सुंदर
छान
छान
छान आहे
छान आहे