काहीच सुचत नाहीय. सगळीकडे फक्त अंधारच अंधार. कानावर फक्त पाण्याचा आवाज पडतोय. मनाला एक अनामिक हुरहूर
लागून राहिलीय. तेवढ्यात दरवाजा उघडला जातो....
"आकाश मला माफ कर लका.. त्यात माझी कायबी चूक नव्हती, तात्यांनी सांगितलेलं म्हणून मी ते केलं..माझीबी बहिण होती रे ती.. लय पश्चाताप झालता बगं. तूला लय शोधला पण तू नाय सापडलास लका. आयच्यान खरं सांगतोय, तरीबी तूला खोटं वाटत असल तर एकडाव मारून टाक मला पन ह्ये हाल नको करु...
मामा, खरं सांगतोस? माझंच चुकलं..मी उगाचच तुझ्यासोबत सूडभावनेने वागलो.. .माफ कर..
धाड्ड्ड्ड्डड्ड्ड्ड्ड......
मायबोली गणेशोत्सव २०२१ घेऊन येतोय आपला लाडका खेळ - प्रकाशचित्रांचा झब्बू आणि आजचा विषय आहे अलंकार/दागिने.
अलंकार/दागिने
प्रथमेश्वर तू श्रीगणनायक
गुणाधिशा तुज नमो नम:
विद्यावारिधि वरदविनायक
बुद्धिनाथ तुज नमो नम:
योगाधिप तू सिद्धीविनायक
अखूरथा तुज नमो नम:
नादप्रतिष्ठित विघ्नविनाशक
अवनीशा तुज नमो नम:
भुवनपति तू देवेन्द्राशिक
अलंपता तुज नमो नम:
मृत्युंजय तू भवभय तारक
मुक्तिदायी तुज नमो नम:
_______________________
संदर्भासाठी:
हि गणपतीची नावे आहेत. त्यांचे अर्थही खाली लिहीत आहे.
काहीच सुचत नाहीय. सगळीकडे फक्त अंधारच अंधार. कानावर फक्त पाण्याचा आवाज पडतोय. मनाला एक अनामिक हुरहूर लागून राहिलीय. तेवढ्यात दरवाजा उघडला जातो >>>
च्च ! दरवाजा कुठला उघडायला. जमिनीखाली दोनतीन इंच असेन मी फारतर. पाण्याचा आवाजसुद्धा बर्फ वितळण्याचा आहे. १२-१५ इंच तरी असेल बर्फ .
किती काळ झाला मी इथे गाडलेलो आहे! मी तर वर्षे मोजणे सुद्धा सोडून दिले आहे . ऑक्टोबरचा शेवटचा आठवडा होता एवढेच आठवते आहे . लख्ख उन्हाचा दिवस होता . ओक ,मेपल, अॅस्पन , स्वीटगम. वॉलनट आणि अॅश सगळ्यांची रंगी बेरंगी पानं आसपास विखुरली होती. मी माझ्या भावंडाबरोबर बागडत होतो...
विश्वनाट्य सूत्रधार
काहीच सुचत नाहीय. सगळीकडे फक्त अंधारच अंधार. कानावर फक्त पाण्याचा आवाज पडतोय. मनाला एक अनामिक हुरहूर लागून राहिलीय. तेवढ्यात दरवाजा उघडला जातो....
आला.. युगानुयुगे ठरलेला तो मुक्तीचा क्षण आला. या क्षणाच्या प्रतिक्षेने पंचमहाभूतं आनंदली आहेत. पाणी दुथडी भरून खळखळतं आहे. वारा सुसाट धावतो आहे. अंधाऱ्या रात्री या विश्वपटावर एक विशाल नाट्य घडतं आहे.
कारागृह अचानक लख्ख प्रकाशानं उजळलं पहा. पहारेकरी गाढ झोपले आहेत.
ते आवाज ऐकलेत? बेड्या निखळून पडल्या आहेत.
काहीच सुचत नाहीय. सगळीकडे फक्त अंधारच अंधार. कानावर फक्त पाण्याचा आवाज पडतोय. मनाला एक अनामिक हुरहूर लागून राहिलीय. तेवढ्यात दरवाजा उघडला जातो.....
काहीच सुचत नाहीय. सगळीकडे फक्त अंधारच अंधार. कानावर फक्त पाण्याचा आवाज पडतोय. मनाला एक अनामिक हुरहूर लागून राहिलीय. तेवढ्यात दरवाजा उघडला जातो>>
पाण्याचा आवाज नाहीये. सलाइन ड्रिप आहे - अद्वैत लाइफ सपोर्टवर आहे कालपासून.
धापा टाकत ऋषभ आत येतो. ऋषभ माझ्या मित्राचा मुलगा , माझ्या मुलाचा ब्रदर फ्रॉम अदर मदर .
"अंकल , आय कॉल्ड द कॉप्स ऑन आजी! मी आणि अॅडी .. अद्वैत मोशन सेंसर अलार्म टेस्टिंग करत होतो घरी" . हरणं आली की डिटेक्ट करुन हॉर्न वाजेल आणि हरणं पळून जातील अशी आयडिया होती. टेस्ट म्हणून घरात बरेच कॅमेरे सेटप केले होते. "आजी डिड इट अंकल."
मायबोली गणेशोत्सव २०२१ घेऊन येतोय आपला लाडका खेळ - प्रकाशचित्रांचा झब्बू आणि आजचा विषय आहे वाहन/गाडी.
९८ काहीच सुचत नाहीय. सगळीकडे फक्त अंधारच अंधार. कानावर फक्त पाण्याचा आवाज पडतोय. मनाला एक अनामिक हुरहूर लागून राहिलीय. तेवढ्यात दरवाजा उघडला जातो
९९ काहीच सुचत नाहीय. सगळीकडे फक्त अंधारच अंधार. कानावर फक्त पाण्याचा आवाज पडतोय. मनाला एक अनामिक हुरहूर लागून राहिलीय. तेवढ्यात दरवाजा उघडला जातो
१०० काहीच सुचत नाहीय. सगळीकडे फक्त अंधारच अंधार. कानावर फक्त पाण्याचा आवाज पडतोय. मनाला एक अनामिक हुरहूर लागून राहिलीय. तेवढ्यात दरवाजा उघडला जातो
गेल्या काही गणेशोत्सवांमधे लोकप्रिय झालेला : खेळ शब्दांचा !
आपण नेहमी वेगवेगळ्या प्रकारांचे झब्बू खेळत असतोच. कधी पत्त्यांचा , कधी गाण्यांचा तर कधी म्हणींचा. या वर्षीही आपण खेळणार आहोत शब्दांचा झब्बू. प्रकार सोप्पा आहे एकदम. दररोज एक विषय असेल. त्याला धरून आपण झब्बू खेळायचा आहे. या उपक्रमातून आपण खेळ तर खेळणार आहोतच त्याचबरोबर वापरात असलेले किंवा नसलेले असे मराठी शब्द वापरणार आहोत. काहींना सगळे शब्द माहिती असतील तर काहींना नवीन शब्द कळतील आणि त्यांचा आपल्या दैनंदिन जीवनात उपयोगही करता येईल.
काही नियम :
१) संयोजक दर दोन दिवसांनी एक विषय देतील.