Submitted by अंजली_१२ on 10 September, 2021 - 10:24
काहीच सुचत नाहीय. सगळीकडे फक्त अंधारच अंधार. कानावर फक्त पाण्याचा आवाज पडतोय. मनाला एक अनामिक हुरहूर लागून राहिलीय. तेवढ्यात दरवाजा उघडला जातो.....
मनाचा हिय्या करून आत पाऊल टाकले तरिही काही कोणाचा मागमूस नाही.
चिडीचूप शांतता.
माझ्याच श्वासांचे आवाज मला ऐकू येत होते.
एकेक पाऊल जपून टाकत होते ना जाणो काही पायाखाली येईल. अचानक एका बेसावध क्षणी लाईट लागले आणि पडद्याच्या मागून मित्रमैत्रिणींचे टोळके बाहेर आले "हॅप्पी बर्थडे टू यू " करत ! केवढं जोरात धडधडलं यार!
काहीच सुचत नाहीय. सगळीकडे फक्त अंधारच अंधार. कानावर फक्त पाण्याचा आवाज पडतोय. मनाला एक अनामिक हुरहूर लागून राहिलीय. तेवढ्यात दरवाजा उघडला जातो....
चिनी अधिकारी प्रवेशतो- "अजुनी वेळ गेलेली नाही. अणूबॉम्बचे रहस्य सांग. आम्ही तुझी मुक्तता करु. अन्यथा या नीरव शांततेत काही वेळातच, प्रत्येक ठिबकणार्या थेंबाचा आवाज तुला घणाघाती वाटत जाईल. तुला वेड लागेल वेड. अरे वेड्या एकदा तसे झाले की कुठली मातृभूमी आणि कुठले देशप्रेम! "
"चालता हो. प्राण गेला तरी मी ते रहस्य तुमच्या हाती पडू देणार नाही. जय हिंद!"
वय वर्षं २४, २००६ साली आयुष्यात पहिल्यांदाच मी देशाबाहेर पडलो. भारताबाहेरचा पहिला जॉब सौदी अरेबिया. हातात एका कंपनीचे ऑफर लेटर घेऊन मी सौदीला पोचलो. माझ्या अगदी लांबच्या ओळखीतले सुद्धा कोणी सौदीला नव्हते. त्या एवढ्या मोठ्या देशात मी एकाही व्यक्तीला ओळखत नव्हतो. कंपनीने पहिला एक महिना हॉटेलवर रहायची सोय केली होती. ते सुरुवातीचे काही दिवस फक्त कामावर जाणे आणि घरी येऊन टिव्ही बघत बसणे एवढेच करायचो. तिव्हीवर पण सगळे ईंग्रजी कार्यक्रम. ऑफिस मधे दिवसभर ईंग्रजी, अरबी भाषा रुमवर आल्यावर ईंग्रजी चित्रपट. दिवसेंदिवस मराठी कानावर पडायचे नाही.
गेल्या काही गणेशोत्सवांमधे लोकप्रिय झालेला : खेळ शब्दांचा !
आपण नेहमी वेगवेगळ्या प्रकारांचे झब्बू खेळत असतोच. कधी पत्त्यांचा , कधी गाण्यांचा तर कधी म्हणींचा. या वर्षीही आपण खेळणार आहोत शब्दांचा झब्बू. प्रकार सोप्पा आहे एकदम. दररोज एक विषय असेल. त्याला धरून आपण झब्बू खेळायचा आहे. या उपक्रमातून आपण खेळ तर खेळणार आहोतच त्याचबरोबर वापरात असलेले किंवा नसलेले असे मराठी शब्द वापरणार आहोत. काहींना सगळे शब्द माहिती असतील तर काहींना नवीन शब्द कळतील आणि त्यांचा आपल्या दैनंदिन जीवनात उपयोगही करता येईल.
काही नियम :
१) संयोजक दर दोन दिवसांनी एक विषय देतील.
प्रसन्न वातावरणात गणेशाचे आगमन झालेले आहे. मायबोली गणपतीची प्रतिष्ठापना झाली आहे. जगभरातील विविध ठिकाणच्या प्नमाणवेळेनुसार घरोघरी सगळ्यांचे बाप्पा स्थानापन्न झालेले असतीलच. मागील बरेच दिवस अपार मेहनत घेऊन तुम्ही गणेश मूर्ती निवड, एखादा देखावा, उत्तम सजावट केली असेल. आकर्षक मूर्ती, सजावट, देखावा यांचे दर्शन सर्व मायबोलीकर घरबसल्या घेऊ शकतील.
चला तर मंडळी घ्या पटापट हातात कॅमेरा आणि पाठवा तुमची उत्कृष्ट छायाचित्रे. बोला गणपती बाप्पा मोरया.....
गणेशोत्सव आला की मायबोलीवर सर्वात जास्त उत्सुकता असते ती पाककृती स्पर्धेची!
दरवर्षी संयोजक मायबोलीकरांसमोर आव्हान ठेवतात आणि सगळी कल्पनाशक्ती आणि कौशल्य पणाला लावून अनेक मायबोलीकर उत्साहाने सहभागी होऊन भरभरुन प्रतिसाद देतात.
अनेक शंका-कुशंका, नवनवीन पाककृती, पदार्थांचे रंगीत सजवलेले फोटो आणि शेवटी मतदानाद्वारे स्पर्धेचा निकाल!
पाककृती स्पर्धेचे नियम ठरवण्यापासून ते विजेता घोषित होईपर्यंत सगळ्यांसाठीच ती एक मोहीम झालेली असते.
आणि का नाही होणार..? मायबोली वरचा गणेशोत्सव हा प्रत्येकाला आपल्याच घरचे कार्य आहे इतका आपलासा वाटतो