इकोनॉमिक्स शिकताना आम्हाला एक सूत्र अगदी सुरुवातीस लक्षात ठेवावे लागलेले; WANTS ARE UNLIMITED, MEANS ARE SCARCE . त्या फुलपाखरी दिवसांत अर्थातच ह्याचा प्रत्यय आला असला तरी, जाणीव व्हायला बराच काळ जावा लागला. एकीतून दुसरी इच्छा जन्म घेते, तिच्या पूर्ततेचे समाधान किती काळ मनास सुखवते, ते याच प्रतीक्षा यादी वर ठरत असावं बहुतेक!
त्यामुळे माझ्या बकेट लिस्ट चा प्रवास लिहायला बसलेय खरी; परंतु निवड करताना जरा गडबड उडेलशी वाटतंय. आणि हे, आत्मस्तुतीची छ्टा न येऊ देता लिहिणं अवघड आहे.
मायबोली गणेशोत्सव २०२१ घेऊन येतोय आपला लाडका खेळ - प्रकाशचित्रांचा झब्बू आणि आजचा विषय आहे 'कष्टकरी/मेहनत/कामात मग्न'
कष्टकरी/मेहनत/कामात मग्न
आत्तापर्यंत इथे वाचलेले बकेट लिस्ट म्हणजे सोन्याची घडीव बकेट्स म्हणता येतील त्यापुढे आमचं म्हणजे आपलं पत्र्याच टिनपाट म्हणाव लागेल पण थोरामोठ्यांनी आधीच म्हणून ठेवलय,
राजहंसाचे चालणे । जगी जालिया शहाणे ।
म्हणोनी काय कवणे । चालोची नये ।।
त्या वचनाला प्रमाण मानून आमचही बकेटचं ठिगळ जोडावच म्हणते. जाता जाता 'कुठल्या लेखांनी तुम्ही मायबोलीकरांना गांजलत' प्रश्नाच्या उत्तरातही भर पडेल.
पंचवीस वर्ष… माझ्या मायबोलीला… !!
खूप खूप आनंद होतोय आणि मनापासून अभिमान वाटतोय मायबोलीकर असल्याचा !!
मी मायबोलीकर आहे गेल्या २० वर्षापासून…. विश्वासच बसत नाहीये !! केवढा काळ लोटलाय…किती बदल झालेत माझ्यात आणि मायबोलीत… अर्थात सगळेच बदल अतिशय सुखावह आहेत.
कुवेतला असताना मला मायबोलीचा शोध लागला. म्हणजे जेव्हा तुम्ही तुमच्या देशाला, तुमच्या जीवाभावाच्या माणसांना, तुमच्या संस्कृतीला, मराठी साहित्याला खूप miss करत असता…. अगदी तेव्हाच तुम्हाला मायबोलीची कुशी मिळते…. ह्यापेक्षा आणखी आनंद तो काय असणार…. खूप आधार दिला तेव्हा मायबोलीनं.
हिमालयाच्या पर्वतशिखरांवर सोनेरी धुकं चमकत होतं. कैलास आणि गुर्लमांधात्याची शिखरं मावळतीकडे झुकणार्या उन्हात न्हाऊन निघाली होती. मात्र अश्या उन्हात शांत आरामाऐवजी भगवान शंकराच्या घरी मात्र लगबगीचं वातावरण होतं. श्रीगणेश लवकरच त्यांच्या वार्षिक वारीला निघणार होते ना! सामानाची बांधाबांध किती 'झाली' म्हटलं, तरी शेवटपर्यंत काही ना काहीतरी असतंच. देवी पार्वती आपल्या बाळाला नेहमीप्रमाणे सूचना देत होती. "मोदक जास्त खाऊ नकोस हो!" "पावसात जास्त भिजू नकोस!" "मूषकाची काळजी घे." वगैरे. भगवान शंकरही कौतुकाने आपल्या मुलाच्या सोहळ्याची तयारी बघत होते.
काहीच सुचत नाहीय. सगळीकडे फक्त अंधारच अंधार. कानावर फक्त पाण्याचा आवाज पडतोय. मनाला एक अनामिक हुरहूर लागून राहिलीय. तेवढ्यात दरवाजा उघडला जातो.....
त्याला आठवतच नव्हतं तो इथे कसा आला. अंधाऱ्या, थंड जागी आल्याचं त्याला जाणवलं आवाजाने झोप उडाली तेव्हा. त्याने आजूबाजूला पाहिलं. त्याला बाटली दिसली. त्याने रिकामीच बाटली तोंडाला लावून पहिली. आपल्याला भूक लागलीय की तहान, त्याला कळेना. बाहेरच्या आवाजाने त्याचा थरकाप उडाला. तोंडातून आवाज निघेना.
दरवाजा उघडल्यावर हळूहळू आवाज आणि उजेड येऊ लागला. क्षणांत दोन हात त्याच्याकडे आले.
'माझ्या आठवणीतली मायबोली' हा लेखन उपक्रमाचा बाफ पाहिला तेव्हा सर्वप्रथम जाऊन माझा सदस्यत्वाचा कालावधी बघितला. तब्बल १६ वर्षे! इतकी वर्षं इथे काढली हे जाणवलंच नाही. २००५ साली सेंट लुईसला आल्यावर जेव्हा १२ महिने २४ तास इंटरनेट हाती लागलं, तेव्हा कधीतरी मराठी वाचायला मिळतंय का म्हणून शोधलं तर मराठी ब्लॉगविश्व सापडलं. तेव्हा ब्लॉगिंग हे माध्यम नवीन होतं आणि मराठीतलं ब्लॉगिंगतर फारच नवीन होतं. मराठी ब्लॉग वाचताना कधीतरी 'मायबोली'चा शोध लागला. तेव्हा गुलमोहोरातल्या कथा / लेख वगैरे नियमित वाचायला लागलो.
आदित्यने पूर्वी कधीतरी मायबोलीचं सदस्यत्व घेतलं होतं असं मला वाटतंय, पण नक्की आठवत नाही.
त्यामुळे मोठ्या गटात असला तरी शीर्षकात त्याचं नावच दिलं आहे.
दुसर्या फोटोतली मूर्ती मॉडेलिंग क्ले वापरून आदित्यने घडवली होती आणि उंदीरमामा गौरीने. रंगकाम दोघांनी मिळून केलं होतं.
'पिस्त्याच्या सालांचा' गणपती मायबोलीच्या गणेशोत्सवासाठीच केला होता.
पूर्वतयारीचा वेळ: १5 मिनिटे
प्रत्यक्षात लागणारा वेळ: 15 मिनिटे
लागणारे जिन्नस:
साहित्य - २ कप बारीक चिरलेली केलची पाने
दीड कप बारीक चिरलेला कोबी
चिरलेली कोथिंबीर
थालीपीठ भाजणी १ कप
१/२ कप बेसन पीठ
१ चमचा प्रत्येकी धने, जिरे पूड
२ चमचे तिखट, १ चमचा हळद, मीठ चवीनुसार,
१ चमचा गूळ पावडर (आवडत असल्यास)
तेल