मायबोली गणेशोत्सव २०२१

शशक पूर्ण करा - निचरा - प्राचीन

Submitted by प्राचीन on 18 September, 2021 - 13:15

शशक - निचरा
काहीच सुचत नाहीय. सगळीकडे फक्त अंधारच अंधार. कानावर फक्त पाण्याचा आवाज पडतोय. मनाला एक अनामिक हुरहूर लागून राहिलीय. तेवढ्यात दरवाजा उघडला जातो.>>>
कोण ते? नवीन सूनबाई वाटतं .. सुंदर गोड चेहरा आहे..
कुकरशिवाय भात, पाट्यावर चटणी वाटणं, इडली, डोसे, इडिअप्पम्, सांभारे.. सगळं साग्रसंगीत लागतंय इथे.. विजार - लुंगीचा तंगड्या पसरून आराम /योग..
कामाचा ताण .. सततची बंधनं, वैचारिक मागासलेपण यांनी हिची घुसमट..
त्यातच सारखंच तुंबणारं ते खरकटं पाणी ; अस्वस्थतेचं शेवाळे मात्र हिच्या मनावर साचतंय..

हस्तकला स्पर्धा- मोठा गट - भेटकार्ड बनवणे -2 - धनुडी

Submitted by धनुडी on 18 September, 2021 - 09:32

1)अजून एक भेट कार्ड दिलं तर चालेल का माहिती नाही, पण देते एन्ट्री
DSC00454.JPG

2)

DSC00584.JPG

3)
IMG_20150928_234309595.jpg

विषय: 

माझ्या आठवणीतली मायबोली- ललिता-प्रीति

Submitted by ललिता-प्रीति on 18 September, 2021 - 08:34

घरच्या संभाषणाव्यतिरिक्त मराठीशी बाकी काहीही संबंध नसलेला माझा नवरा माझ्याआधी मायबोलीवर आला, ही एक मोठी आश्चर्याची गोष्ट! २००७ साल असेल ते. इथे तो जो काही थोडे दिवस बागडला असेल, तेवढ्या काळात त्याला पुण्यातलं एक ओळखीचं जोडपं (!) इथे भेटलं. त्यानंतरच त्याने अशी अशी एक वेबसाइट आहे, वगैरे वर्णन करून मला सांगितलं. (ते जोडपं कोण होतं, हे आता त्याला आठवत नाही. त्याचा माबो आयडीही तो कधीच विसरलाय. Lol )

विषय: 

प्रकाशचित्रांचा झब्बू क्र. ८ - उंचावरून काढलेली छायाचित्रे

Submitted by संयोजक on 18 September, 2021 - 06:21

मायबोली गणेशोत्सव २०२१ घेऊन येतोय आपला लाडका खेळ - प्रकाशचित्रांचा झब्बू आणि आजचा विषय आहे 'उंचावरून काढलेली छायाचित्रे '.

शशक पूर्ण करा २ - चकवा - कविन

Submitted by कविन on 18 September, 2021 - 03:50

गाडीत एकटी, दूरचा प्रवास आणि हवी ती गाणी लावायचं स्वातंत्र्य. अजून काय हवं असं वाटत असतानाच समोर लक्ष गेलं आणि…रिफ्लेक्स ॲक्षनने कच्चकन ब्रेक दाबला जाऊन कचकचीत शिवी बाहेर पडली

मगाशी इथूनच पुढे गेले ना मी? go slow चा बोर्ड आणि 'क्षणभर विसावा' हॉटेल दाखवणारी पाटी मगाशी पण दिसली होती.

चकवा असावा? की अल्कोहोल लेव्हल जास्त झाल्याने डिरेक्षनचा सेन्स गंडलाय? पण अल्कोहोलला हात लावूनही दहा दिवस होतील आता.

शशक पूर्ण करा २ - 'लिफ्ट प्लीज' - मी अश्विनी

Submitted by मी अश्विनी on 17 September, 2021 - 23:21

गाडीत एकटी, दूरचा प्रवास आणि हवी ती गाणी लावायचं स्वातंत्र्य. अजून काय हवं असं वाटत असतानाच समोर लक्ष गेलं आणि मिररमध्ये बॅकसीटवर कलंडलेल्या तरूणाचा पांढराफटक चेहरा दिसला.
सो गलेबल दीज यंग बॉईज आर!
मसल्स बनवा, दाढी कोरा. गॉगल लावा, टॅटू काढा - सच अ वेस्ट!
लो-वेस्ट जीन्स किंवा डीप-नेक टॉप बस्स!..... 'डॅडीकी कमाई सन्नीने ऊडाई' लिहिलेली स्कॉर्पिओ किंवा सुटाबुटातल्या कॉर्पोरेटवाल्याची स्कोडा थांबणारच - सो प्रेडिक्टेबल!
आणि कशासाठी? माझ्याशी घटकाभर फ्लर्ट करण्यासाठी - लोल!

विषय: 

माझ्या आठवणीतली मायबोली- rmd

Submitted by rmd on 17 September, 2021 - 17:44

माझ्या आठवणीतली मायबोली हा एकदम जिव्हाळ्याचा विषय आहे माझ्यासाठी. हा उपक्रम दिल्याबद्दल संयोजकांचे मनापासून आभार.

२१ वर्षांच्या आठवणी त्यानिमित्ताने पुन्हा वरती आल्या आणि मायबोली हा आयुष्यातला एक अविभाज्य घटक आहे हे नव्याने जाणवलं. २१ वर्षांपूर्वी गणेशोत्सवाच्या सुमारासच मी सभासद झाले. मला अजूनही आठवतंय की हरतालिकेचा दिवस होता आणि मी रात्री बर्‍याच उशीरापर्यंत ऑनलाईन होते आणि हितगुजवर टाइमपास करत होते त्यावेळी हवाहवाईने 'हरताळका जागवते आहेस की काय?' अशीच सुरूवात केली होती बोलायला.

विषय: 

माझ्या बकेट लिस्टचा प्रवास - सोनू.

Submitted by सोनू. on 17 September, 2021 - 16:14

शिक्षण झाल्यानंतर मी जी नोकरीत चिकटले ती अक्षरशः चिकटूनच राहीले. लहानपणी व्हॉलीबॉल आणि मल्लखांबाचा सराव आणि स्पर्धा, गिर्यारोहण शिबीरे यांमधून कसाबसा अभ्यास सांभाळणारी मी, घाण्याच्या बैलासारखी नुसतं काम नी काम करत होते. सकाळी लवकर ऑफिसला जाऊन रात्री उशीरा परत यायचं, आठवड्याची राहिलेली झोप शनिवारी पूर्ण करायची आणि रविवारी घरातली कामं आवरायची, बस इतकच चाललं होतं. आणि मग एक दिवस चण्डिगढच्या ऑफिसला नेमणूक झाली. दुपारी २ ते रात्री ११ च फक्त काम असल्याने रोज झोप पूर्ण होत होती आणि शनिवार जागेपणात जात होता. ऑफीसने दिलेल्या गेस्टहाऊस मधे राहत असल्याने घरची कामं करायचा राविवारही मोकळाच.

शशक पूर्ण करा १ - चावी - ललिता-प्रीति

Submitted by ललिता-प्रीति on 17 September, 2021 - 10:58

काहीच सुचत नाहीय. सगळीकडे फक्त अंधारच अंधार. कानावर फक्त पाण्याचा आवाज पडतोय. मनाला एक अनामिक हुरहूर लागून राहिलीय. तेवढ्यात दरवाजा उघडला जातो.....

त्याचवेळी वरचा दिवा लागतो. दारावरची ‘सुकेत गोहिल’ पाटी; आम्ही ‘सुकट’ गोहिल म्हणतो. आंघोळीला जायच्या तयारीत दिसतोय... खांद्यावर टॉवेल, गीझरचं पिरपिर पाणी बादलीत पडतंय...

“अं-कल, टू-वन-झिरो-सेव्हन-ची-चा-वी...?”

उद्याच्या विचारानं पोटात खड्डा पडतोय. असंच होतं का सगळ्यांना? मूव्हीजमध्ये तर किती कॅज्युअली दाखवतात!

विषय: 

शशक पूर्ण करा २ - काटा - ललिता-प्रीति

Submitted by ललिता-प्रीति on 17 September, 2021 - 10:49

गाडीत एकटी, दूरचा प्रवास आणि हवी ती गाणी लावायचं स्वातंत्र्य. आणखी काय हवं वाटत असतानाच समोर लक्ष गेलं आणि तिला ते दृष्य दिसलं...

क्षणार्धात तिनं ॲक्सिलरेटरवरचा पाय काढला. ब्रेक मारत गाडी जरा डावीकडे घेतली. गिअर बदलला. उजवा पाय ब्रेकवर टेकवलेलाच ठेवला. पायांना हलकासा कंप सुटला होता. हात किंचित घामेजायला लागले होते. तिनं आधी खिडकीची काच अर्धी उघडली. उदित नारायणला गप्प केलं. त्या दृष्याकडे पुन्हा नजर टाकत घड्याळ बघितलं. उगीच!

फोन करायचा? कुणाला? त्यानं काय होणार? शी! आधी कसं नाही कळलं आपल्याला?

विषय: 

Pages

Subscribe to RSS - मायबोली गणेशोत्सव २०२१