Submitted by प्राचीन on 18 September, 2021 - 13:15
शशक - निचरा
काहीच सुचत नाहीय. सगळीकडे फक्त अंधारच अंधार. कानावर फक्त पाण्याचा आवाज पडतोय. मनाला एक अनामिक हुरहूर लागून राहिलीय. तेवढ्यात दरवाजा उघडला जातो.>>>
कोण ते? नवीन सूनबाई वाटतं .. सुंदर गोड चेहरा आहे..
कुकरशिवाय भात, पाट्यावर चटणी वाटणं, इडली, डोसे, इडिअप्पम्, सांभारे.. सगळं साग्रसंगीत लागतंय इथे.. विजार - लुंगीचा तंगड्या पसरून आराम /योग..
कामाचा ताण .. सततची बंधनं, वैचारिक मागासलेपण यांनी हिची घुसमट..
त्यातच सारखंच तुंबणारं ते खरकटं पाणी ; अस्वस्थतेचं शेवाळे मात्र हिच्या मनावर साचतंय..
आज अयप्पाची पूजा आहे . बाहेरून चहाचा पुकारा होतोय. ही तुंबलेल्या पाण्याने हताश..बापरे..
अगं.. इत्त चेय्यरुत.. तरीच हुरहूर जाणवत होती. गेली ही घर सोडून ..मी इथेच. . द ग्रेट इंडियन किचन..
Groups audience:
Group content visibility:
Use group defaults
शेअर करा
छान लिहिलीय. चित्रपटाचा
छान लिहिलीय. चित्रपटाचा सारांश १०० शब्दांत.
सासूचे मनोगत.. मस्त.
सासूचे मनोगत.. मस्त.
सासूचं मनोगत आहे हे कळायला
सासूचं मनोगत आहे हे कळायला अंमळ वेळ लागला. बहुधा या शशकमधली सासू निवर्तलेली आहे.
जमलीय कथा.