मायबोली गणेशोत्सव २०२१

शशक पूर्ण करा ----- पैश्याचा पाऊस -------- सांताक्लॉज

Submitted by सांताक्लॉज on 20 September, 2021 - 18:04

काहीच सुचत नाहीय. सगळीकडे फक्त अंधारच अंधार. कानावर फक्त पाण्याचा आवाज पडतोय. मनाला एक अनामिक हुरहूर लागून राहिलीय. तेवढ्यात दरवाजा उघडला जातो.

मी सावधपणे आतमध्ये पाऊल टाकले. सगळीकडे अंधारच अंधार.
मी चाचपडत चाचपडत आणि मधले सगळे अडथळे चुकवत योग्य स्थानी जाऊन पोहोचतो.

आहा, ह्याचसाठी केला होता अट्टहास!!!! मनात खूप धाकधूक, इतकं सगळं करूनही माझा मुहूर्त चुकला तर नाही ना ?

अशी संधी खूप भाग्यवंतानाच लाभते. ग्रहमान जुळून यावे लागतात आणि साता जन्माचं पुण्य पणाला लावावा लागतं.

विषय: 

शशक पूर्ण करा २ - 'मुंबई-पुणे नॉनस्टॉप' - मी अश्विनी

Submitted by मी अश्विनी on 20 September, 2021 - 12:19

गाडीत एकटी, दूरचा प्रवास आणि हवी ती गाणी लावायचं स्वातंत्र्य. अजून काय हवं असं वाटत असतानाच समोर लक्ष गेलं आणि बिनाड्रायवरचे फिरणारे स्टिअरिंग बघून काळजाचा ठोका क्षणभर चुकला.
हुश्श! ह्या बिनाड्रायवरच्या ऑटोपायलट टॅक्सी ना! मला कधी सवय होणार ह्यांची देव जाणे!
पण भलतेच आवडले बुवा हे प्रकरण! एअरपोर्टवरून पुणे नॉनस्टॉप!
अ‍ॅपवर पुण्याचे डेस्टिनेशन टाका, मनासारखे गाणे लावा, टेंपरेचर बदला! अहाहा! - सो डॅम-कूल धिस थिंग ईज!
आरशातून ड्रायवरची वखवखलेली नजर झेलणे नको की मुद्दाम लावलेले 'होंठो से छुलो तुम' ऐकणे नको.

विषय: 

माझ्या आठवणीतली मायबोली - ऋन्मेऽऽष

Submitted by ऋन्मेऽऽष on 19 September, 2021 - 20:38

ऋन्मेऽऽष -
सदस्य झाल्यापासूनचा कालावधी - 7 वर्ष 2 months
खर्रंच..
काही गडबड झालीय का? हे २ वर्षे ७ महिने असे हवेय का?
कारण मलातरी धक्का बसला हे चेक केले तेव्हा. अजूनही मला स्वतःला ईथल्या जुन्याजाणत्या दिग्गज सभासदांमध्ये एखादे नवीन वासरू असल्यासारखेच वाटतेय Happy

विषय: 

माझ्या आठवणीतली मायबोली - मामी

Submitted by मामी on 19 September, 2021 - 11:05

सदस्य झाल्यापासूनचा कालावधी - 11 वर्ष 2 months
म्हणजे माझ्या सदस्यत्वाचा आणि मायबोलीचा कालावधी जवळजवळ सारखाच आहे. कारण ११ गुणिले २ म्हणजे २२ त्यात फक्त ३ मिळवले की आलेच की २५. त्यामुळे मी देखिल आठवणी लिहिण्यास लायक आहे असं मी मानते.

तर..........

विषय: 

शशक पूर्ण करा ... पार्ट २ - नानबा

Submitted by नानबा on 19 September, 2021 - 07:27

गाडीत एकटी, दूरचा प्रवास आणि हवी ती गाणी लावायचं स्वातंत्र्य. अजून काय हवं असं वाटत असतानाच समोर लक्ष गेलं आणि मिररमध्ये बॅकसीटवर कलंडलेल्या तरूणाचा पांढराफटक चेहरा दिसला.

प्रेमाकरता कायकाय करावं लागतं! मागच्याच गाडीतून वॅकी येत असेल. खरतर हे सगळं करायला त्याचा ठाम विरोध! पण मी अजिबात लक्ष देणार नाहिये!

कट!

आयुष्यात अशी संधी वारंवार येत नाही जेव्हा आपलं स्वप्न पूर्ण होण्याची शक्यता दिसते! मग अशा वेळेस मागेपुढे बघण्याइतकी मी पुळचट नाहिये! मागच्या वेळचा भरभक्कम अनुभव गाठीशी आहे आणि प्रायवेट गाडीही!

विषय: 

प्रकाशचित्रांचा झब्बू क्र. ९ - पाळीव दोस्त

Submitted by संयोजक on 19 September, 2021 - 07:20

मायबोली गणेशोत्सव २०२१ घेऊन येतोय आपला लाडका खेळ - प्रकाशचित्रांचा झब्बू आणि आजचा विषय आहे 'पाळीव दोस्त '.

माझ्या आठवणीतली मायबोली- जिज्ञासा

Submitted by जिज्ञासा on 19 September, 2021 - 00:40

माझा मायबोली सदस्यत्वाचा कालावधी एक अंकीच आहे पण तरीही या विषयावर आवर्जून लिहावेसे वाटले कारण या उपक्रमासाठी प्रॉम्प्ट म्हणून दिलेले प्रश्न! या प्रश्नांची उत्तरे शोधायला आवडतील असे वाटले त्यामुळे लिहीत आहे. मी माबोवर कशी आले ते आठवत नाही पण सदस्यत्व घेण्याची मुख्य कारणे म्हणजे बेफिकीर आणि नंदिनी यांच्या कथा किंवा कथा मालिका! इतक्या उत्तम लिखाणाला दाद देता यावी म्हणून मी सदस्य झाले. गेल्या आठ वर्षात माझ्या आयुष्यात मायबोलीचे एक स्वतःचे असे हक्काचे स्थान तयार झाले आहे.

विषय: 

खेळ: शब्दांचा झब्बू -३ : व्यक्ती विशेषण

Submitted by संयोजक on 18 September, 2021 - 21:34

गेल्या काही गणेशोत्सवांमधे लोकप्रिय झालेला : खेळ शब्दांचा !
आपण नेहमी वेगवेगळ्या प्रकारांचे झब्बू खेळत असतोच. कधी पत्त्यांचा , कधी गाण्यांचा तर कधी म्हणींचा. या वर्षीही आपण खेळणार आहोत शब्दांचा झब्बू. प्रकार सोप्पा आहे एकदम. दररोज एक विषय असेल. त्याला धरून आपण झब्बू खेळायचा आहे. या उपक्रमातून आपण खेळ तर खेळणार आहोतच त्याचबरोबर वापरात असलेले किंवा नसलेले असे मराठी शब्द वापरणार आहोत. काहींना सगळे शब्द माहिती असतील तर काहींना नवीन शब्द कळतील आणि त्यांचा आपल्या दैनंदिन जीवनात उपयोगही करता येईल.
काही नियम :
१) संयोजक दर दोन दिवसांनी एक विषय देतील.

विषय: 

माझ्या आठवणीतली मायबोली - श्यामली

Submitted by श्यामली on 18 September, 2021 - 16:06

माझ्या आठवणीतली मायबोली या विषयावर यंदा मायबोलीच्या गणेशोत्सवानिमित्त लेख लिहायचा आहे मायबोली २५ वर्षांची झाली , तुझा लेख वाचायला आवडेल असा अगदी सुरवातीला एका माबो मित्रानं मेसेज केला, म्ह्टल अरेच्चा २५ वर्ष झाली ?

पुन्हा एका दिवसानंतर दुस-या एका माबो मित्रानं स्टेट्सला मायबोली गणेशोत्सवाची लिंक पोस्ट केली होती , पुन्हा येऊन बघून गेले, लिहाव वटायला लागलं पण मुहुर्त मिळेना , थोडासा आळस आणि उगाच काहीबाही कारण, तर ते असो, नमन झालं घडाभर तेल पण झालं

माझ्या बकेट लिस्टचा प्रवास - माऊमैया

Submitted by माऊमैया on 18 September, 2021 - 13:46

मायबोली गणेशोत्सवानिमित्त जाहीर केलेले विविध उपक्रम पाहिले. 'बकेट लिस्ट' विभागात लिहायची इच्छा झाली, पण पाहिलं तर पूर्ण झालेल्या बकेट लिस्टचा अनुभव लिहायचा होता. माझ्या डोक्यात तर बकेट लिस्टमधल्या अपुऱ्या गोष्टी घोळत होत्या. मग मी नाद सोडून दिला. पण मागचे ५ दिवस सगळ्यांच्या बकेट लिस्टविषयी वाचत होते, तेव्हा पुन्हा विचारचक्र सुरु झालं आणि मग लक्षात आलं की, माझ्याही २-३ इच्छा मी पूर्ण करून घेतल्यात की! फक्त त्या बकेट लिस्टमधल्या इच्छा असतात, असं काही डोक्यात नव्हतं. असो, नमनाला घडाभर तेल पुरे आता.

विषय: 

Pages

Subscribe to RSS - मायबोली गणेशोत्सव २०२१