शशक पूर्ण करा ... पार्ट २ - नानबा

Submitted by नानबा on 19 September, 2021 - 07:27

गाडीत एकटी, दूरचा प्रवास आणि हवी ती गाणी लावायचं स्वातंत्र्य. अजून काय हवं असं वाटत असतानाच समोर लक्ष गेलं आणि मिररमध्ये बॅकसीटवर कलंडलेल्या तरूणाचा पांढराफटक चेहरा दिसला.

प्रेमाकरता कायकाय करावं लागतं! मागच्याच गाडीतून वॅकी येत असेल. खरतर हे सगळं करायला त्याचा ठाम विरोध! पण मी अजिबात लक्ष देणार नाहिये!

कट!

आयुष्यात अशी संधी वारंवार येत नाही जेव्हा आपलं स्वप्न पूर्ण होण्याची शक्यता दिसते! मग अशा वेळेस मागेपुढे बघण्याइतकी मी पुळचट नाहिये! मागच्या वेळचा भरभक्कम अनुभव गाठीशी आहे आणि प्रायवेट गाडीही!

ह्या सासुसासर्यांनी पण ना कसले कसले नवस बोलून ठेवलेत! हा पुतळा आता विकतच घेऊन टाकावा! ह्यावेळी चलो शिर्डी!
कट कट!!

विषय: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

तळटीपः मी अश्विनी ह्यांच्या शशकची (https://www.maayboli.com/node/80118) सुरुवात वाचून
"गाडीत एकटी, दूरचा प्रवास आणि हवी ती गाणी लावायचं स्वातंत्र्य. अजून काय हवं असं वाटत असतानाच समोर लक्ष गेलं आणि मिररमध्ये बॅकसीटवर कलंडलेल्या तरूणाचा पांढराफटक चेहरा दिसला." अशी दिलेली सुरुवात आहे असे वाटलेले, तेव्हा हा वरचा प्लॉट डोक्यात आला.
नंतर बाकीच्यांचे वाचून "समोर लक्ष गेले" पर्यंतच सुरुवातीत दिले आहे हे लक्षात आले. पण आता प्लॉट आलाच आहे डोक्यात तर मी अश्विनी ह्यांची माफी मागून लिहितेय: नवरा माझा नवसाचा पार्ट२