पंचवीस वर्ष… माझ्या मायबोलीला… !!
खूप खूप आनंद होतोय आणि मनापासून अभिमान वाटतोय मायबोलीकर असल्याचा !!
मी मायबोलीकर आहे गेल्या २० वर्षापासून…. विश्वासच बसत नाहीये !! केवढा काळ लोटलाय…किती बदल झालेत माझ्यात आणि मायबोलीत… अर्थात सगळेच बदल अतिशय सुखावह आहेत.
कुवेतला असताना मला मायबोलीचा शोध लागला. म्हणजे जेव्हा तुम्ही तुमच्या देशाला, तुमच्या जीवाभावाच्या माणसांना, तुमच्या संस्कृतीला, मराठी साहित्याला खूप miss करत असता…. अगदी तेव्हाच तुम्हाला मायबोलीची कुशी मिळते…. ह्यापेक्षा आणखी आनंद तो काय असणार…. खूप आधार दिला तेव्हा मायबोलीनं.
मायबोली हा माझ्या आयुष्यातला खूप मोठा Turning Point आहे. मायबोलीवर खूप काही शिकायला, अनुभवायला मिळालं. साहित्यिक समृद्धी मिळाली. खूप जीवाभावाचे मित्रमैत्रिणी मिळाले. प्रत्येकाचे नाव इथे लिहिणे शक्य नाही पण प्रत्येकाची एक स्वतंत्र शैली होती, एक वेगळी आपुलकी होती.
मायबोलीच्या अनेक उपक्रमांमधून मायबोलीने फार कौतुक केलंय आपल्या लाडक्या मायबोलीकरांचं.
आता हेच बघा. निवडक मायबोलीकरांच्या काही ओळी घेऊन तयार केलेले मायबोलीचे बुकमार्क्स !! ह्यात वर्णी लागली ह्याचं केवढं अप्रूप वाटलं होतं तेव्हा अर्थात अजूनही आहेच !!
https://www.maayboli.com/node/34053?page=1
मायबोलीच्या शिर्षक गीतात सहभागी व्हायला मिळालं ते सुद्धा आयुष्यातले आनंद क्षण होते.
मायबोलीने आजवर फक्त दिलंच दिलंय. त्याबदल्यात कशाचीच अपेक्षा केली नाही.
मला मायबोलीबद्दल जे काय वाटतं ते माझ्या आणि मायबोलीच्या ह्या हितगुजातून कळेलंच तुम्हाला !! ह्यासाठी मायबोलीच्या दशकपूर्तीच्या दिवाळी अंकात घेतलेल्या स्पर्धेत मला प्रथम क्रमांकाचं बक्षिस मिळालं होतं !! हा आनंद तर अवर्णनीय होता.
https://www.maayboli.com/hitguj/messages/118369/marathi_audio_maayboli.html
आज मी जे काही लिहितेय ते फक्त आणि फक्त मायबोलीमुळेच !! तो काळ एका वेगळ्याच धुंदीचा होता. भरपूर वाचायचं आणि मनसोक्त लिहायचं… भरभरुन दाद मिळायचीच. मार्गदर्शनही मिळायचं…चुकलं तर समजावून सांगितल्या जायचं. वैभव जोशी आणि प्रसाद शिरगावकर ह्यांनी घेतलेल्या गझल कार्यशाळेतून कितीतरी गझलकार तयार झालेत. भरपूर साहित्यप्रकार हाताळायला मिळाले…. !!
मायबोलीच्या कुठल्याच गटग ला जाता आलं नाही… वर्षाविहारही कायम हुकला त्याची मात्र फारच खंत वाटते. नाही म्हणायला एकदा पुण्यात वैभव, मिल्या, पूनम, दिपांजली, सुप्रिया, समीर, सारंग…एकदा वैशाली मधे भेटलो होतो…त्यालाही खूप वर्ष झालीत. श्यामली मात्र कायमच भेटते. एका वर्षी वविचे टी शर्ट्स घेताना दक्षिणा भेटली. माझ्या अल्बम प्रकाशनाला सुद्धा अनेक मायबोलीकर आवर्जून आले होते त्यात दिनेश प्रामुख्याने आठवतात. वैभव च्या शंभराव्या कार्यक्रमात स्वाती आंबोळे, प्रसाद शिरगावकर, अल्पना, उमेश कोठीकर ह्यांची भेट झाली. प्राजूच्या अल्बम प्रकाशनाला प्राजू भेटली. अमेरिकेत संदिप चित्रे, आशिष महाबळ, अनिलभाई भेटले.
खरं तर न भेटताही खूप घट्ट बंध जुळले मायबोलीकरांशी. हीच खासियत आहे मायबोलीची.
आमची नागपुर गँगसुद्धा इथेच भेटली. प्रसन्न शेंबेकर, तुषार जोशी, सोनाली तेलंग, अफलातून, क्रांति साडेकर, मनिषा साधू, सुमती वानखेडे…. सगळे खूप जवळचे झाले आहेत.
मायबोलीच्या कुशीतूनच माझ्या गीतकार म्हणून पहिल्या स्वतंत्र अल्बमचा “सारे तुझ्यात आहे”चा जन्म झालाय. माझा तो प्रवास, प्रकाशन… सगळं सगळं इथे मायबोलीवर फार कौतुकाने प्रकाशित झालं आणि त्यानंतर जो प्रवास सुरु झाला तो आजतागायत सुरु आहे. अजूनही ते सगळं आठवलं की डोळ्यात पाणीच येतं. तुम्ही माझा तो प्रवास इथे वाचू शकता.
https://www.maayboli.com/node/1578?page=2
आता इतर सोशल साईट्समुळे आणि असंख्य व्यापांमुळे मायबोलीवर येणं खूप कमी झालंय हे मात्र खरंय. पण मायबोली हेच पहिलं प्रेम आहे हे सुद्धा तितकंच खरंय !!
मला माझ्या मायबोलीच्या ऋणात आयुष्यभर रहायला आवडेल !!
मायबोलीला आभाळभर शुभेच्छा !!
जयवी -जयश्री अंबासकर
छान लिहिलंय.
छान लिहिलंय.
खूपच हृद्य मनापासून लिहिलंय.
खूपच हृद्य मनापासून लिहिलंय. आवडले लिखाण.
खूपच हृद्य मनापासून लिहिलंय.
खूपच हृद्य मनापासून लिहिलंय. आवडले लिखाण.>>>+१
छान
छान
खूपच हृद्य मनापासून लिहिलंय.
खूपच हृद्य मनापासून लिहिलंय. आवडले लिखाण.>>>+१११
खूप छान मनोगत.
खूप छान मनोगत.
छान लिहीले आहे.
छान लिहीले आहे.
>>>>>>मायबोलीला आभाळभर शुभेच्छा !!
ही ओळ कविलाच सुचू जाणे.
आवडलं.
आवडलं.
खूप मनापासून लिहिलस, आवडलं ग
खूप मनापासून लिहिलस, आवडलं ग
छान लिहीले आहे.
छान लिहीले आहे.
हृद्य मनोगत. खूप छान वाटले
हृद्य मनोगत. खूप छान वाटले वाचून.
पहिल्याच आणि शेवटच्या
पहिल्याच आणि शेवटच्या वाक्यातूनच मायबोलीचा ऋणानुबंध समजला. खुप कमी परंतु छान लिहिले आहे.
मस्त.
मस्त.
छान लिहीले आहे! आवडले.
छान लिहीले आहे! आवडले.
फक्त ते कोणत्याच गटगला जाता आले नाही वाला पॅरा उपासाबद्दल लिहीतात तसा वाटला - "आज पूर्ण उपास. फक्त सकाळी दोन केळी व खिचडी खाल्ली. दुपारी चक्कर आल्यासारखे वाटले म्हणून दोन लाडू खाल्ले...."
कोणतेही माबोकर भेटले की ते गटगच की 
छान लिहीले आहे. श्रवण विभाग
छान लिहीले आहे. श्रवण विभाग असतो हे माहिती नव्हते. मजा वाटली आवाज ऐकून.
छान मनोगत..
छान मनोगत..
किती छान लिहिले आहेस गं..
किती छान लिहिले आहेस गं..
कधीकाळी कुवेत बीबी वर पडिक होतो, धमाल करत होतो ते आठवलं.. :हा हा:
मनापासून धन्यवाद
मनापासून धन्यवाद
फारएन्ड.... खरंच की !!
माधुरी.... हो गं कुवेत बीबीवर मस्त धम्माल करायचो आपण
छान लिहिले आहे. जुन्या
छान लिहिले आहे. जुन्या मायबोलीकराच्या आठवणी वाटल्या