स्तोत्रांचा शोध घेत असते वेळी माबोवरती अश्विनी यांच्या धाग्यावरती, स्तोत्रांचा खजिनाच सापडला. त्या काळात मी अन्य संस्थळावरती अधिक सक्रिय असल्याने, माबोवरती बरेच दिवस, काही सभासद झाले नाही. नंतर मग मात्र जालावरती 'सद्गुरु स्तोत्र' सापडलं, '
गुरू| गुणालया| परापराधिनाथ सुंदरा|देवादिकांहुनि वरीष्ठ तूचि साजीरा|गुणावतार तू धरोनिया या जगास तारीसी| सुरा मुनीश्वरा अलभ्य या गतीस दावीसी||१||
ते स्तोत्रं इतकं प्रिय आहे की तेव्हा पूर्वसंचित असा आय डी घेउन ते स्तोत्र मी अश्विनीच्या धाग्यावरती पोस्ट केलं. तदुपरान्त इतक्या आरती त्या धाग्यात टाकल्या की लोकं गांजले व अनुक्रमणिकेत फक्त 'विविध आरत्या' असा उल्लेख केला. अचानक बरेच धागे अथवा पोस्टी लिहीण्याची, अतिरेक करण्याची सवय तेव्हाही होती, आताही आहे. स्वभावाला औषध नसते.
नंतर एक 'शुचि ' नावाचा आय डी काढुन ज्योतिषविषयक एका पुस्तकाची ओळख करुन देणारा धागा काढला. पुढे तो आय डी / ईमेल काही कारणाने गंडल्यावरती आता 'सामो'.
--------------------------------------------------------
तुम्ही मायबोलीवर यायला लागल्यापासून तुम्हाला काय बदल जाणवले
त्या म्हणजे सभासद नसल्याच्या काळातही माबोवरी लोकांबद्दल कुतूहल असेच. विशेषत: चर्चा, विनोद, खुसखुशीत कोपरखळ्या वाचनात आल्याने. ही एक कम्युनिटी आहे, हे एक कुटुंब, परिवार आहे हे कळले होते. कित्येक सभासद इतके विनोदी लिहीत की हहपुवा होत असे. 'मराठी लोकांचे हिंदी' या धाग्याने अक्षरक्ष: पोट दुखेपर्यंत हसवले. 'चीजा आणि त्यांचे अर्थ' या धाग्यावर सुरेख गाणी सापडली. चैतन्य दीक्षित यांच्या 'काकडा' लेखाने इतकं निर्मळ आणि छान फीलिंग दिलं. त्या काळात, दाद यांच्या 'गानभुली' धाग्यांनी दिल गार्डन गार्डन केला. 'निरभ्र' - लिंगनिरपेक्ष ओळख-मैत्री परिसंवाद विशेषांक' हा विशेषांक तर इतका आवडुन गेला. समॄद्ध करुन गेला, आनंद देउन गेला. पुढे 'विजय तेंडुलकर' विशेषांक वाचनात आला. भारावुन गेले.
----------------------------------------------------------
-इथली कुठली सोय तुम्हाला एकदम आवडली,
आंजावरती मुक्त बागडल्याने संस्थळावरील सोयी फारशा नवीन नाहीत त्यामुळे एक अशी सोय सांगता येणार नाही. मराठीशी नाळ जोडली जाणे - ही बाबच इतकी मोठी आहे. मला सामावुन घेतल्याबद्दल, माबो परिवाराची मी ऋणी आहे.
------------------------------------------------------------
कुठली सोय तुम्हाला कित्येक दिवस माहितच नव्हती,
वाह्ते पान हा एक नवीन प्रकार येथेच आढळला. स्लँग्स ने मला अक्षरक्ष: जेरीस आणले. अजुनही टिपापा म्हणजे काय व तत्सम शब्दांचे फुल फॉर्म्स माहीत नाहीत.
-----------------------------------------------------------------
गेल्या २५ वर्षात मायबोलींनं तुम्हाला काय दिलं,
माबोने मला एक ऊबदार, सकारात्मक, नॉनजजमेंटल, प्रोत्साहनात्मक वातावरण दिले. नॉनजजमेंटल स्वीकार - ही फार मोठी गिफ्ट आहे माझ्याकरता. काही मैत्रिणी मिळाल्या.
------------------------------------------------------------------
तुम्ही मायबोलीला काय दिलं ,
विशेष काही नाही. काही फुटकळ लेख टाकलेले आहेत.
-------------------------------------------------------------------------
तुमचं कुठलं लेखन गाजलं,
काही लेखांना प्रतिसाद मिळाला तर काहींच्या भाळी अनुल्लेख आला. पण ज्यांनी कोणी कवितांचे धागे एन्जॉय केले, त्यातून त्यांना जो आनंद मिळाला, त्यामुळे मला खूप बरे वाटले. कविता माझा श्वास आहे. 'समानशील व्यसनेषु...' असे जे वाचक कवितांच्या धाग्यावरती सापडले त्यांनी, त्यांच्या निव्वळ प्रतिसादांतून मला उल्हास दिला.
--------------------------------------------------------------------------
कुठल्या लेखांनी तुम्ही मायबोलीकरांना गांजलं
असे माझे लेख, माझ्या तरी लक्षात आलेले नाहीत. असणारच परंतु माहीत नाहीत. एक ड्यु आय डीने बंडल कोतबो काढुन गांजले होते खरे
पण एकच.
छान लिहिले आहे
छान लिहिले आहे
कुठला आयडी ? कुठला आयडी?
कुठला आयडी ? कुठला आयडी?
छान लिहिलंय.
अमितव
अमितव

अमितव आणि मॄ धन्यवाद.
छान लिहिलंय.
छान लिहिलंय.
छान लिहिले आहे.
छान लिहिले आहे.
अजुनही टिपापा म्हणजे काय व
अजुनही टिपापा म्हणजे काय व तत्सम शब्दांचे फुल फॉर्म्स माहीत नाहीत. >> तुझा सदरा दे बरं जरा....
माबोने मला एक ऊबदार,
@ सामो
<<<<माबोने मला एक ऊबदार, सकारात्मक, नॉनजजमेंटल, प्रोत्साहनात्मक वातावरण दिले. >>>>
तुमची सकारात्मकता कौतुकास्पद आहे....खरं तर ऋषीतुल्य म्हणणार होतो पण उठसूट शाप देणारे ऋषी सकारात्मकता हरवलेले वाटतात.
काही आयडी जजमेंटल होत कहर करत असतानाही सकारात्मक कसं रहावं मला उमगलं नाही...
वैचारिक मतभेद अगदी खालच्या पातळीवर जाऊन जेव्हा व्यक्त केले जातात अशावेळी ते अवैचारिक होतात...अशा परिस्थितीत सकारत्मकता कशी जपावी? लोकं इथं शाब्दिक हातापायी करताना पाहिलेत. एकमेकाला भोसकण्यापर्यंत गेलेत. प्रसंगी कोर्टकचेरी करण्या इतपत प्रकरण पेटले असे ऐकिवात आहे...
अशा परिस्थितीत डोक्यावर बर्फ ठेवून इथला वावर खरतर अश्यक्य कोटीतला वाटतो.
अशा कृती मायबोलीच्या उदीष्टांना हरताळ फासणा-याच ...
तरीही जे लेखक, वाचक समतोल साधून सकारात्मकता जपतात त्यांचा आदर्श माझ्यासाठी एक धडा आहे.
छान लिहिलं आहे सामो.
छान लिहिलं आहे सामो.
छान छान. आवडलच
छान छान. आवडलच
छान लिहिले आहेस.
छान लिहिले आहेस.
सर्वांचे आभार.
सर्वांचे आभार.
छान लिहिले आहे,
छान लिहिले आहे,
एक ड्यु आय डीने बंडल कोतबो काढुन गांजले होते खरे Sad Lol पण एकच. >>>> गणेशोत्सव झाला की यावर एक हिंट द्या. लोकं शोधतील. तेवढेच मनोरंजन
हा हा मेरा शक - अॅमेझॉनवरून
हा हा #कोलितनं२
लोल मै चूप रहुंगी
लोल मै चूप रहुंगी
मला कुणी R.A.W. मध्ये भरती