शशक पूर्ण करा - टोची गुहा - चौबेजी

Submitted by चौबेजी on 11 September, 2021 - 07:53

काहीच सुचत नाहीय. सगळीकडे फक्त अंधारच अंधार. कानावर फक्त पाण्याचा आवाज पडतोय. मनाला एक अनामिक हुरहूर लागून राहिलीय. तेवढ्यात दरवाजा उघडला जातो....
मला बाहेर खेचलं जातं. केवढा उजेड! हळूहळू डोळे सरावतात. "हे खरं जग. आधी जिथे होतास ती गुहा," मला सांगण्यात येतं. लख्ख प्रकाश. जमिनीवर माझी सावली. पाण्यात माझं प्रतिबिंब. अविश्वसनीय! अंधाऱ्या गुहेत समोर नाचणाऱ्या सावल्याच आम्हाला खऱ्या वाटायच्या. इतरांना सांगायला मी गुहेत परततो. पण अंधाराचा सराव गेला. मी धडपडतो. इतरांना वाटतं मी बाहेर गेल्यामुळे आंधळा झालो. ते बाहेर यायला तयार नाहीत. माझ्या आग्रहाला ते आधी हसतात, मग वैतागतात. मला मारतात. मला कळून चुकतं, बाहेर न पडलेल्यांना गुहा टोचत नाही.
******

अधिक संदर्भासाठी - https://en.wikipedia.org/wiki/Allegory_of_the_cave

Group content visibility: 
Use group defaults

छान. Happy

अस्मिताने एकदा - https://www.youtube.com/watch?v=xLgaoorsi9U&list=PLo4u5b2-l-fDF45J_cc9DY...
फ्रॅक्टल्स्बद्दल काहीतरी माहीती दिलेली जी इतकी अनवट आणि मस्त वाटलेली. तदुपरांत, तुम्ही ही भन्नाट संकल्पना इथे मांडलीत. नक्की वाचेन.

आवडली.
दिलेल्या प्रत्येक क्लू चा वापर केलाच पाहिजे हे बंधन अर्थातच नाही, पण ते आपणच उगाच आपल्यावर घालून घेतो. तुम्ही पडणाऱ्या पाण्याचं काही केलं नाही आणि हे जाणवलं. Happy

Chhan!

खूप आवडली.
बेस्ट शशक धस फार...>> +१