शशक पूर्ण करा - शिकारी - निरु

Submitted by अ'निरु'द्ध on 11 September, 2021 - 13:50

शशक पूर्ण करा - शिकारी - निरु

"काहीच सुचत नाहीय. सगळीकडे फक्त अंधारच अंधार. कानावर फक्त पाण्याचा आवाज पडतोय. मनाला एक अनामिक हुरहूर लागून राहिलीय. तेवढ्यात दरवाजा उघडला जातो....."

असं जाळं पसरुन ते पांच चतुर, धूर्त शिकारी बाजूच्या खोलीत मजेत बसून राहिले.

त्यांनी पसरलेल्या जाळ्यात सावजं एकामागोमाग एक सापडणार याची त्यांना खात्रीच होती.

ते ही खरं तर एका जाळ्यावरच होते.

त्यांचं कामच होतं दर हंगामात नवी नवी जाळी विणून कधी नवी जुनी सावजं फासायची.

आणि कळून सवरूनही सावजं अडकायचीच.

कधी नकळत, कधी स्वेच्छेने..

आणि अडकल्यावरही सावजं मजेत पडून रहायची..
वाट पहात.. पुन्हा पुन्हा..
की त्यांना कोण पाहतंय की नाही.

मी ही अडकलोच की.

धूर्त शिकारी मायबोली संयोजक..

निरु..

Group content visibility: 
Public - accessible to all site users

मस्त

छान Lol

सर्व प्रतिसादकांचे आभार..
शब्द-जाल असंही एक शिर्षक आज सकाळी डोक्यात आलं. पण मग खूप Obvious होईल असं वाटून बदललं नाही.
आणि ना "शब्दांचं जाळं पसरुन शिकारी....... " असा लेखात बदल केला.