ह्या आधीचे ९ भाग येथे वाचायला मिळतील
ह्या आधीचे..........
……………. उस किकर को दाये छोडके आना। पहले तीन लुंगा। बाकीची मुले छू झाली व मला मनातल्या मनात गुदगुल्या व्हायला लागल्या. बऱ्याच वेळाला त्या झाडाला शिवून झाल्यावर कॅप्टन गिलने, ज्यांनी ज्यांनी आतून स्वेटर घातले होते त्यांना काढायला लावून त्याची होळी पेटवली. किती जणांच्या आस्था त्या होळीत पेटल्या गेल्या असतील आम्हालाच ठाऊक. त्या दिवसा पासून पुढे कधी कोणी गणवेशात स्वतःहून फेरबदल करण्याच्या भानगडीत पडले नाही………….
माझं गांव चौधरा... अगदी लहानसं खेडं... पन्नास-साठ घरांची वस्ती...माझं पहिली ते चौथी पर्यंतचे प्राथमिक शिक्षण गांवापासून एक-दिड कोस दूर असलेल्या निळोणा या गांवाला झाले.
त्यांतरचे पाचवी ते बी.कॉम. पर्यंतचे कॉलेजचे शिक्षण गांवापासून तीनक कोस दूर असलेल्या यवतमाळ या शहरात झाले.
त्यावेळी दुकान, ऑफीस, सिनेमा इत्यादी ठिकानी टेलिफोन वर लोकं बोलत असल्याचे मी त्या शहरात पाहत होतो.
खेड्यामध्ये टेलिफोन नसल्यामुळे लोकांना त्याचे कुतूहल वाटत असे. म्हणून मी लोकांना त्याची नक्कल करुन दाखवायचं ठरविलं.
रोजचीच ड्युटी,
एकच कंपनीत, एकाच मशीनवर अन् एकाच पार्टवर, एकाच प्रकारचं ऑपरेशन करायचं, त्यासाठी मशीनमधे ठरलेला एकच प्रोग्राम, अन् तो रन होण्यासाठी ठरलेली दाबायची, हिरवी, पिवळी, लाल.
शेवटी वेळही ठरलेला,
पार्टवरच्या ऑपरेशनचा, तसचं कंपनीतल्या ड्युटीचाही.
कंपनीनं आधीच ठरवुन दिलेला टार्गेटचा आकडाच तेवढा महत्वाचा.
तेव्हा -
एकाच प्रकारचं उत्पादन काढायचं आणि जास्तीत जास्त उत्पादन काढायचं एवढाच काय तो उद्देश!
मशीनचा अन् माणसाचाही.
खुप दिवस झाले मी विचार करत होते ''ते'' लिखाण वाचायचा. पण वेळही मिळत नव्हता अन खरं तर वेळ असेल तरी मी ''ते'' वाचायचा कंटाळा करायचे. कारण नावावरून तरी मला ते एखाद्या गावंढळ शेतकर्याचं चित्रण किंवा एखाद्या दत्तक घेतलेल्या पोरट्याचं वर्णन असेल असं वाटायचं. अन काहीतरी चमचमीत मसालेदार वाचायच्या हव्यासापायी मी तिकडे दुर्लक्ष करायचे. पण आज मी ठरवूनच टाकलं की काही झालं तरी हे वाचायचंच. मनात विचार आला की एकदा बघूयातरी काय लिहिलंय ते, अन नाहीच आवडलं तर कुणी का आपल्यावर बळजबरी थोडीच करणारे??? त्यामुळे एक दिवस मी ते ''वानू'' नावाचं साहित्य वाचलं. अन काय सांगू हो?
"जयला आणून सोड तू आज. मी परस्पर पोचतो."
"अरे, वाटेत तर घर आहे माझं. जाता जाता थांब ना."
"नाही." फिलीपच्या तुसडेपणाला लारा वैतागलीच पण जय उत्साहात होता. त्याच्या चेहर्यावरचा आनंद पाहून तिने तोंडातून बाहेर पडू पाहणारे शब्द गिळले.
"ठीक आहे. तू दोन वाजता दरवाज्यापाशी उभा राहा. जयला खूप आनंद झालाय तुझ्याबरोबर सामना पाहायला मिळणार म्हणून. मजा करा."
"नक्कीच."
"आणि परत आणून तू सोडशील ना?"
"छे, असलं काही नाही जमणार. मी बसने जाणार. उलटसुलट होईल."
रात्रीचे अकरा वाजले होते. रिमोटनेच टि.व्ही.बंद केला आणि बिछान्यावर आडवी झाले. डोळ्यात खूप झोप होती. पण का कुणास ठावूक आज जास्तच हूर हूर वाटत होती. जे घरटे आम्ही दोघांनी मिळून बनविले होते आज आकाश ने माझ्या हवाली केले होते. त्याचे नाव हि कधी घ्यायचे नाही असे किती तरी वेळा ठरविले होते. पण स्त्रिया किती हळव्या असतात ते आज प्रकर्ष्याने जाणवू लागले. मीच तर त्याला घरातून हाकलून दिले होते. आणि कधीच येवू नको म्हणून सांगितले होते. पण त्याने मी असताना दुसरी कोणी प्रियसी... म्हणजे काय?
तशी ती रात्र काही खास वगैरे नव्हतीच रामजी हॉस्पिटल आणि मेडिकल कॉलेज असलेल्या त्या इमारतीत तरी नक्कीच नाही. तेच रोजचेच थकलेले, कण्हणारे पेशंट, जनरल वॉर्डची जी दशा सर्वसामान्य हॉस्पिटलमध्ये दिसते तशीच.
नेहमीच्या प्रघाताप्रमाणे निवासी डॉक्टर राणेंसोबत चार इंटर्न्स , शिकाऊ डॉक्टर्स आजच्या रात्री उपस्थित होते.
काम तसं काहीही नव्हतंच, निवासी डॉक्टर राणे नुकतेच त्यांचा राउंड संपवून परत गेले होते. नुसतंच पेशंटकडे नजर टाकणं, मध्येच एखाद्या पेशंटच्या पायथ्याशी असणार्या त्याच्या कंडिशन आणि ट्रीटमेंटचा चार्ट नजरेखालून घालणं असंच नेहमीच्या सरावलेल्या यांत्रिक पद्धतीनं आपला राउंड संपवून ते गेले होते.
चक्रावळ बद्दल मी काही सांगण्यासारखे राहीलेलं नाही ते आधीच विशल्याने सांगून टाकलेय त्यामुळे थेट कथाच पोष्ट करतोय, अर्थात आणखीही काही सांगण्यासारखं आहे ते प्रतिसादात केंव्हातरी....
****************
चक्रावळ
बंदिस्त पिंज-यात वाघ दुखा:त दिवस कंठीत होता .
किती काळ झाला आपल्याला इथे येऊन ?
आलो तेव्हा पानगळीचे दिवस होते . त्यानंतर दोनदा पाऊस येऊन गेला , आता तर पुन्हा पावसाचे दिवस येण्याची लक्षणं दिसताहेत .
बाप रे ! बराच काळ झाल की आपल्याला .
किती सुंदर दिसायचं आपलं रान पावसाच्या दिवसात , हिरवगार !