कथा

एक पत्रकथा- डिस्क्लेमर व माहिती

Submitted by बागेश्री on 30 November, 2011 - 00:09

नमस्कार प्रिय मित्र-मैत्रिणिंनो,
"एक पत्रकथा"
जसा वेळ मिळेल तसे टाईप करत असल्याने "क्रमशः" प्रकार टाळता आलेला नाही.
मुळात- भाग- १,२,३,___ टाकल्याने, ह्या कथेची एकसंधता बिघडू शकते, पत्रात कोण कोणास काय लिहितेय हे महत्त्वाचं आहे, त्यातील संदर्भ कथा समजण्यासाठी आवश्यक आहेत.

म्हणूनच मी नवे लिहिलेले भाग मुळ कथेच्याच धाग्यावर अपडेट करायच ठरवत आहे, आणि नवा भाग टाकला की ह्या माहिती घाग्यावर नवा भाग टाकल्याची सुचना देईन...

मंडळी, हे पटेल ना? Happy

गुलमोहर: 

एक पत्रकथा..

Submitted by बागेश्री on 29 November, 2011 - 02:59

१३ जून १९९१

आदरणीय (की प्रिय?)__,

संबोधन काहीही वापरले तरी पुढे नाव काय लिहू? कारण, "अस्तित्व" हे एखाद्या माणसाचं नाव असतं ह्यावर अजूनही विश्वास बसत नाही.

असो.

हे पत्र सदर तारखेला लिहीलं असलं तरी, ते तुमच्या पर्यंत कधी पोहोचेल किंबहुना पोहोचेल का, असा प्रश्न आहे, आणि समजा पोहोचलेच तर एक प्रसिद्ध लेखक, हे पत्र वाचून किमान पोचपावती तरी देतील का, हा त्याहून मोठा प्रश्न आहे.

गुलमोहर: 
शब्दखुणा: 

'असंभव..!!' :--(एक चित्तथरारक प्रेमकथा)::=>भाग-4

Submitted by अन्नू on 27 November, 2011 - 10:40

NOTE ::(ही कथा पुर्णपणे काल्पनिक असुन यातील घटना, स्थल, प्रकाशचित्रे आणि व्यक्ती यांचा संबंध कोणत्याही मृत अथवा जिवित व्यक्तीशी नाही. याची कृपया वाचकांनी नोंद घ्यावी. धन्यवाद!)

Suspense-Thriller.jpg

असंभव :--(एक चित्तथरारक प्रेमकथा)::=>>भाग=>3 पासून पुढे़...
.
.
.
.भाग=>4

गुलमोहर: 

गोष्ट एका टिव्हीची

Submitted by -शाम on 25 November, 2011 - 21:50

ठवडाभर आधीच गावात थडकलेल्या बातमीने वातावरण चांगलच तापलेलं होतं. बायाबापे, पोरंसोरं, म्हतारीकोतारी.....सगळा गावच नानासोनाराच्या घरासमोर जमला होता. घरात नाना आणि परिवाराची लगबग चालू होती. दारात दाराबाहेरून दिसू शकेल असं एक टेबल ठेवलेलं होतं. गर्दीची उत्सूकता शिगेला पोहचली होती.

"बंड्याssss जरा इकडं ये बगू"

कोपरीचा खिसा चाळतचाळत नानासोनारानं अंगणातल्या गर्दीतून बंडयाला हाक मारली.

बंड्या म्हणजे गावातलं अत्यंत आज्ञाधारक पात्र. गावातल्या कोणीही, कधीही आणि कोणतही काम बंड्याला नि:संकोच सांगावं आणि त्याने ते पार पाडांवं.

गुलमोहर: 

बीना

Submitted by बेफ़िकीर on 23 November, 2011 - 06:03

"का? तू आणि अर्चना जा की? मला जमणार नाही म्हणून म्हणतोय"

जयने टायची नॉट व्यवस्थित करताना आरश्यातून मागे पलंगावर बसून कंटाळलेल्या चेहर्‍याने रिमोट ऑपरेट करणार्‍या बीनाकडे पाहिले.

"तुला जमणार नाही तर मी जायचं याला काय अर्थ आहे? मी नाही जाणार."

"अगं तो माझा खूप जुना आणि जवळचा मित्र आहे. त्याला वाईट वाटेल. फ्री पासेस आहेत. गाजलेला चित्रकार आहे. आवर्जून बोलावलंय. मी पुढच्या प्रदर्शनाला जाईन. पण आजच्या दिवस तू जाऊन ये की? नाहीतरी घरी बसून काय करणार आहेस?"

गुलमोहर: 

तो, ती आणि मैत्री...अंतीम

Submitted by प्रज्ञासा on 23 November, 2011 - 03:28

विचारांच्या गुरफट्यात अजय असताना ती आली.
" काही विशेष दिसतंय आज.. " अमू हसत हसत म्हणाली.
" काय - काय विशेष .. काहीच नाही.. तुला का असं वाटतंय..?"
" दोन तीन गोष्टी आहेत.. एक तर आज तू ह्या गाडीतल्या बाप्पाला फूल ठेवलंयस.. मला वाटतं पहिल्यांदाच देवाला खूष करायचा प्रयत्न आहे तुझा.."
" देवाला नाही ..देवीला खूष करायचंय.."
"म्हणजे..???" अमू बावरून बघायला लागली अजयकडे.
" म्हणजे वाघाचे पंजे.. काही नाही.. दुसरी गोष्ट काय वाटली तुला विशेष..?"
" तुझा पर्फ्यूम.. छान आहे.."
" अगं तूला त्रास नको म्हणून आपलं.."
" मला? मला काय त्रास..?"

गुलमोहर: 

तो, ती आणि मैत्री...भाग५

Submitted by प्रज्ञासा on 21 November, 2011 - 22:32

अजयने दार लावलं आणि कितीतरी वेळ तसाच बसून राहिला सोफ्यावर.. विचारांचं वादळ उठलं होतं डोक्यात त्याच्या..
" ती का आवडते आपल्याला इतकी.. आणि का नाही व्यक्त करता आलं आजपर्यंत.. का ती म्हणते तशी...फक्त मैत्रीच आहे.. कसली मैत्री म्हणा.. आपण का नाही सांगू शकलो तिला नताशा आणि अभि बद्दल आपल्याला माहित असताना सुद्धा..? आणि आज - आज असं का वागली ती? कधी कुणा पुरुषाशी हस्तांदोलन पण करायला बिचकते.. आणि आज.. इतक्या जवळ.. इतक्या जवळ कशी काय आली..

इतकी दु:खात आहे ती..कशाचं दु:ख करतिये पण.. ती म्हणते की तिचं प्रेम नाही अभिजीतवर.. ह्या मुलींचं ना काही कळत नाही बुवा..

गुलमोहर: 

तो, ती आणि मैत्री...भाग४

Submitted by प्रज्ञासा on 21 November, 2011 - 22:32

अजयने चावीने दार उघडलं आणि अमु सोफ्यावर बसुन टेबलावरच्या पुस्तकांवर तुटून पडली.. तीला हेही भान नव्हतं की घरी कोणी नाहीये.. अजय कॉफी आणि मॅगी बनवून घेऊन आला तर.. अमु चक्क सोफ्यावर बसल्या बसल्याच झोपून गेली होती.. हातात वपुर्झा..अजयला हसूच आलं..आणि मग विचारांचं चक्र.. अमूच्याच बाबतीत असं का... एक तर लहानपणीच आई वारलेली..बाबा परदेशी असतात.. काका - काकूंकडे लहानाची मोठी झालेली..आणि लग्न ठरलं तेही मोडलं..बिचारी... देव खरंच असतो का? आपला तर विश्वासच नाहीये..पण अमू देववेडी आहे अगदी... मग देव असं का करतो....

झोपलेली कित्ती निरागस दिसतिये..आणि कित्ती सुंदर ....

गुलमोहर: 

Pages

Subscribe to RSS - कथा