याआधीचा भाग इथं वाचा.
प्रकरण पाच
"रचना तू काय सांगितलंस जॉनला ?"
" मला खरंच आठवत नाही आता पण राहुलचा उल्लेख वगळून सर्व सांगितलं "
" वेडी आहेस. सांगून टाकायला हवं होतसं. तू एकदा तरी हा विचार केलास कि, ओल्ड कॅसल भागातून तो रात्रीच्या वेळी कसा परत आला असेल ? शोधाशोध केली तेव्हां तुला तो सापडला नाही. मग त्या वेळी तो काय करीत असेल ? कुठे होता वगैरे "
" नंदिनी हे प्रश्न मलाही पडतात. पण त्याच्याकडे लक्षच द्यायचं नाही हे एकदा ठरवल्यावर पुन्हा कशाला विचारायचं ना ? "
याआधीचा भाग इथं वाचा.
प्रकरण चार
संध्याकाळपर्यंत मी शांत झालेले होते. राहुलबद्दलही नाराजी असली तरी ती कामाच्या ठिकाणी काढायची नाही या दृष्टीने दिवसभर जाणीवपूर्वक प्रयत्न केले होते. त्याच्या चेह-यावर अपेक्षेप्रमाणेच कसलेही भाव नव्हते आणि माझ्या मनात चाललेलं त्याला सगळं कळणार असल्याने एक प्रकारे ते बरंच झालं असं वाटत होतं . जॉनला जाताना टाटा केला आणि बर वाटलं. स्वारी खुषीत दिसत होती. नम्रताने त्याला पटवलेलं दिसत होतं. पटवायचं काय म्हणायला, खिसा जड झाला होताच कि. मी सरळ काम सोडून नम्रताकडे जाऊन बसले.
अंगावरची शाल आणि स्वेटर दोन्ही एका झटक्यात काढून फरशीवर फेकून देऊन रचनाने निलयकडे पाहिले.
"मला समजत नाही की तू इतक्या पावसाळी थंडीत अशी कशी बसू शकशील? पुरुषासारखा पुरुष असून मला ते सहन होत नाही आहे.. शाल घे ती अंगावर"
क्षणभर रचनाच्या डोळ्यात आलेली काहीशी संतापाची तिडीक त्या बजबजलेल्या अंधारातील सूक्ष्म प्रकाशाची तिरीप देणार्या बल्बच्या सहाय्याने निलयला दिसली आणि त्याच्या मनात त्या तिडिकीची कारणमीमांसा करण्याची वैचारिक प्रक्रिया सुरू व्हायच्या आत ती तिडीक नष्ट होऊन त्या जागी एक दगडी निर्जीवता व पोकळीशी साधर्म्य साधणारी देहबोली रचनाने स्वीकारल्याचेही त्याला समजले.
याआधीचा भाग इथं वाचा.
प्रकरण तीन
२०११
नवं वर्ष सुरू होतानाच उठायला उशीर झाला. डोकं प्रचंड जड वाटत होतं. काहीच करावंसं वाटेना म्हणून सरळ नेटवर बसले. माझं आवडतं मराठी संकेतस्थळ उघडलं तर तिथंही शुकशुकाटच. बहुतेक कालचा हॅंगओव्हर असेल किंवा पार्ट्या, आऊटिंग असणार. मग अगदी निवांतपणे आण्हिकं उरकताना दोन तास गेले. भूकेची जाणीव झाली म्हणून ब्रेकफास्टसाठी फ्रीज उघडला तर काहीच नव्हतं.
एक्स्पायरी डेट
मनोगत
आज ही दीर्घकथा आपल्यासमोर ठेवताना मला आनंद होत आहे. लहानपणी आजीकडून ऐकलेल्या गूढरम्य कथांमधली एक गोष्ट त्यावेळी खूपच अद्भुत वगैरे वाटली तरी पुढे कालौघात मी साफ विसरून गेले. एखाद दुसरी ओळ लक्षात राहिली असेल. त्या गोष्टीमधली मध्यवर्ती कल्पनाही अंधुकच आठवतेय. त्यावरून एक नवंच कथानक मनात उभं राहीलं. त्या मूळ कथेचा या कथेशी संबंध नाही. मात्र, या कथेची एक प्रकारे तीच प्रेरणा असल्याने त्याबद्दल मी माझ्या गोष्टीवेल्हाळ आजीचे आभारच मानायला हवेत ! तिच्या त्या ऋणामधून उतराई होण्याचा हा एक छोटासा प्रयत्न.
आज सून बाई ला लवकर ऑफिसला जायचं होत त्या,उले वासंती बाई ची सकाळीच चांगलीच गडबड उडाली होती.
मुलगा आणि सुनेचा डबा तयार झाला. अन अचानक डोळ्यचा चष्मा गडबडीत काढून ओट्यावर ठेवताना चुकून चष्मा फुटला.,,,,,
तसाच त्याच्या काळजाचा होकच चुकला, पण सकाळी सकाळी उगाच ल्काला त्रास नको म्हणून त्या काही बोलली नाही \नाश्त्याचा
टेबल वर अंधुक अंधुक दिसत असताना देखील दोघांना नाश्ता दिला. अन दोघेही नाश्ता खाण्यात दंग असणार्या आपल्या लेकाला जरा आजार्वी स्वरातच म्हणाल्या, सुंदर सकाळी अचानक काम करताना माझा चास्म फुटला बाबा गडबडीत ओट्यावर ठेवताना खालीच पडला
http://balsanskar.com/marathi/lekh/out/images/1277234421_Sambhaji_raje_b...
औरंगजेबाला २७ वर्षे उत्तर हिंदुस्थानापासून दूर ठेवणारे संभाजीराजे
संभाजीराजांनी जी अलौकिक कामे त्यांच्या अल्पायुष्यात केली, त्याचा दूरगामी परिणाम संपूर्ण हिंदुस्थानावर झाला. त्यामुळे त्यांच्याविषयी प्रत्येक हिंदु बांधवाने कृतज्ञ राहिले पाहिजे. त्यांनी औरंगजेबाच्या आठ लाख सैन्याला न डगमगता तोंड दिले आणि कित्येक मोगल सरदारांना लढाईत पराभूत करून त्यांना पळता भूई थोडी केली. त्यामुळे औरंगजेब दीर्घकाळ महाराष्ट्रात लढत राहिला आणि संपूर्ण उत्तर हिंदुस्थान त्याच्या दडपणापासून मुक्त राहिला.
ये... छोटु एक कटींग दे रे.. !!
का? रे.... तुष्या आज ऑफ़िसावरुन लवकर....
आणि इथे कट्ट्यावर आम्हाल कसं काय दर्शन दिलत..
शि-याने कट्ट्यावर बसत विचारलं...
नाही रे हाल्फ़ डे घेतला मुड नव्हता आज....
का रे काय झालं?
कुछ नहीं यार...वही रोज रोज की टॆन्शन्स
मग दुसरा जॉब शोध ना....
अरे काय सल्ला देतोयस?????......
होस्टेलच्या आमच्या रूमवर अभय आला तेव्हा प्रथम तर मी त्याला ओळखलाच नाही ... त्याचा डावा डोळा काळानिळा पडला होता , उजवा गाल लाल झाला होता . केस विस्कटलेले , उजव्या बाजूचा शर्ट मळलेला .....
-- " काय रे ..? हे काय...??" मी त्याला काळजीने विचारलं तर तो सांगायला तयारच होईना .... त्याच्या निळसर डोळ्यातून पाणी आल्यासारखं वाटलं मला....
-- " अरे काय झालं ते तर सांगशील..... " दिप्या , माझा रुमपार्टनर त्याला म्हणाला . मी दिप्याला डोळ्यांनीच शांत राहा असं खुणावलं आणि अभयला पाणी प्यायला दिलं.
राजसि॑ग नावाचा एक अत्यंत जुलमी राजा होता. त्याच्या छळाला व अत्याचाराला कंटाळून त्याची प्रजा आपआपली गावे सोडून, दुसऱ्या राज्यात जाऊ लागली. त्याचा प्रधान चतूर व प्रामाणिक होता, पण राजाला काही सांगू जाणं, म्हणजे स्वत:चं मरण स्वत:च ओढवून घेण्यासारखं होतं. त्यामुळे राजाला ताळ्यावर कसं आणावं, हा त्याच्यापुढे प्रश्न पडला.
एकदा तो प्रधान शिकारीसाठी रानात बराच दूरवर गेला असता त्याला एका झाडाखाली जप करीत बसलेला साधू दिसला. प्रधानाने घोडयावरुन उतरुन व त्या साधूजवळ जाऊन त्याला नमस्कार केला असता साधूनं त्याला विचारलं, 'कोन तुम्ही ?'
प्रधान म्हणाला, 'मी या राज्याचा मुख्य प्रधान आहे.'