आणि जो तो त्याला विचारू लागला काय झाले. त्याची अवस्था खरोखर वाईट होती. त्याला खूप धाप लागली होती छाती जोरजोरात वरखाली होत होती. त्याला बोलताच येत नव्हते. तेवढ्यात तेथे निरंजन आला.
निरंजन त्यांचाच मित्रांपैकी एक, वयाने त्यांच्यापेक्ष्या थोडा मोठा तरीपण चांगला मित्र, तो तेथे आल्या आल्या त्याने सर्वांना बाजूला केले. नि म्हणाला - सगळे बाजूला व्हा त्याला मोकळी हवा घेउद्या. राम तू जा पहिले पाणी घेऊन ये रामाकडे पाहून निरंजन म्हणाला.
शिवाला बाजूला घेतले व विचारले काय झाले ----शिवानं सांगायला सुरुवात केली.
व्यास क्रिएशन्स् आयोजित पितांबरी पंचरस आंतरराष्ट्रीय online निबंधलेखन व काव्यलेखन स्पर्धेत परीक्षकांनी निवडलेल्या सर्वोत्तम निबंधामध्ये माझ्या निबंधाची निवड करण्यात आली आहे.
सर्वोत्तम निबंध व कविता व्यास क्रिएशन्स् च्या www.facebook.com/joinvyascreations या फेसबुकवर जनादेशासाठी (Public openion poll) प्रसिद्ध करण्यात आले आहे. सर्वाधिक likes व share मिळवणाऱ्या निबंधास व कवितेस 'महाविजेता' म्हणून गौरविण्यात येणार आहे. अंतिम निकाल मराठी भाषा दिनी अर्थात २७ फेब्रुवारीला जाहीर करण्यात येईल.
आज वाढदिवस!!
ओवाळणं झालं. कपाळावर नाम ओढण्यात आला. चार आक्षता पडल्या डोक्यावर. तांदळाच दाणंच खरंऽ, पण म्हातारी म्हणती, 'आक्षता' म्हणावं.. बरंऽ, 'आक्षताऽ!' तर, आज तबकामधनं निरांजनं ओवाळली गेली. घटकाभर सुपारी आन आंगठी हाती आली. मागनं गरम-गरम शिरा आन सुगंधी दूध!
म्हातारी सारखी म्हणत आसती हल्ली. खरचाय तिचं. 'आपले दिवस पालटले!' पुर्वी खडीसाखर आसायची आसली तर. आज आंगठी लागलीय हाताला. खायला शिरा आन ओवाळायला निरांजनं. प्रसन-प्रसऽन वाटून गेलं.
खिशातून रुमाल काढून त्याने चेहरा पुसला. घड्याळ पहिले बारा वीस, त्याला धक्का बसला होता. कारण त्याला वाटले होते कि, एक तास पूर्ण व्हायला फार फार तर पाच-सात मिनिटे राहिली असतील. परंतु तास पूर्ण व्हायला अजून चाळीस मिनिटे बाकी होती. आणि त्याचेच दडपण यायला लागले होते. वेळ सरता सरत नव्हता. मनात येणाऱ्या विचारांना थोपवण्यासाठी त्याने डोके झटकले नि पुन्हा सिगारेट पेटवली. जरा शांत झाला. उगाच घाबरलो आपण घाबरण्यासारखे काहीच घडले नव्हते.
वेळ रात्री बारा सव्वा बाराची, नदीकाठचा परिसर, डोळ्यात कुणी बोट घातले तरी कळणार नाही असा दाट अंधार,अमावाश्येचीच रात्र ती. सगळीकडे काळोखाचेच साम्राज्य,दूर गावाच्या बाजूला ग्राम पंचायतीचे दोन तीन दिवे क्षीणपणे लुकलुकताना दिसत होते.परंतु इथे स्मशानात त्यांचा काहीही उपयोग नव्हता. इथे त्याला फक्त अंधार नि अस्वस्थ करणारी शांतता यांचीच सोबत होती. .
बरं झालं आत्ताच रिक्षा रिझर्वला लागली ते. नायतर आतमध्ये पॅसेंजर बसलेले असतांना रिक्शा रिझर्वला लागली म्हणजे पॅसेंजर नको ते उगाच बोलतात. इतर ठिकाणी टाईमपास करत तासभर थांबतील पण रिक्षा रिझर्वला आली की पेटोलकॉक रिझर्वकरेपर्यंत देखील थांबायची त्यांची तयारी नसते. आता रात्रीचे दहा वाजत आले आहेत. पटकन जवळचा कांतीशेटचा पेट्रोलपंप बंद व्हायच्या आता पेट्रोल भरून घेतलं पाहीजे. नाहीतर उगाच लांब हायवेला जावून पेट्रोल भरावे लागेल. अन टाइमाची खोटी होइल ते अलग. रात्री अकराची लोकल सापडली पाहीजे. त्यात बरेच पॅसेंजर मिळतात लांब लांब जाणारे.
"आई निघते ग ! आणि हो आज मी शेखरसोबत खरेदीला जाणार आहे.... उशीर होईल..रात्रीचं जेवण बाहेरच करु " मीनल.
"अग! मीने ऐक तर...येतांना बाबांच औषध घेऊन ये....तसं आहे दोन दिवसांच ...वेळेवर धावपळ नको आठवणीने घेऊन ये." आई.
"हो ग येते आता...".म्हणत मीनल घाईत निघाली.
आज ती खूप आनंदात होती. ऑफिसला हाफ डे टाकला होता. ठरल्याप्रमाणे लंचब्रेकमधे शेखर घ्यायला येणार आणि साखरपुड्याची खरेदी करायची या विचारात मग्न ती ऑफिसमधे पोहचली.
कामात वेळ कसा गेला कळलंच नाही. मीनलने फाईल्स कपाटात टाकत शेखरला मीसकॉल दिला.
आज बाहेर जायच म्हणून डबा घेतला नव्हता...तोच रमा आणि मंजिरीने तिला आवाज दिला.
माणसाच्या आयुष्यात घर बांधणे आणि लग्न करणे या दोन गोष्टींना खूपच महत्व असते. नुकताच वडिलांनी घर बांधायला काढले होते. आणि थोडासा कारभार माझ्या हाती दिला होता त्यामुळे मी जरा जास्तच भाव खात होतो. घराचे बांधकाम हळूहळू वर जात होते पुरुषभर उंचीवर बांधकाम गेल्यावर गवंडी माझ्याकडे आला नि म्हणाला भाऊ, आता पहाड बांधायला पाहिजे, आणि कारागिराला उभं राहण्यासाठी मोठी फळी पाहिजे.
"आज्जे, आज्जे वो sss !" समोर रस्त्यापलिकडे रहाणार्या अरविंदाने हाळी घातली. "कुटं हाइसा?"
"इकडे, मागल्या पडवीत ये रे", काकू पारडीला बांधता बांधता म्हणाल्या.
"आंबेहळद हाये का? आईन मागितलीया" एरव्ही पारडीशी लडिवाळ करणारा अरविंद दुरूनच बोलला.
"काय करून घेतलन आईने?" काकू शिंकाळ्यातला बटवा काढता काढता म्हणाल्या.
"बाबान मारलंय" खाली मान घालून हळू आवाजात अरविंद म्हणाला.
"काय?" काकू थबकून म्हणाल्या "बरं. तू जा खळ्यात. मी देते आईला नेऊन हं?" शहाण्या मुलासारखी लांबलचक "हो" ची मान वळवत दुडक्या चालीने अरविंद निघाला.
"अगं...त्या कोपऱ्यातल्या लादीची रेष अजुन काळीच दिसत आहे. कशी साफ करतेस तू?"