कथा

मनी.......एक अविस्मरणीय आठवण!-----३.

Submitted by टोकूरिका on 31 December, 2011 - 01:31

मनी माझा हक्काचा विरंगुळा : मी आणि मनी ही एव्हाना आमच्या चाळीतच नव्हे तर अख्ख्या कॉलनीत टवाळ जोडगोळी म्हणून प्रसिद्ध झालो होतो. मला आता जसा काय मनीला बकोटीला धरून दोन्ही हाताच्या घडीत बसवून, कॉलनीत हिंडायचा छंदच जडला होता!

गुलमोहर: 

वाद्ळ

Submitted by आरतीसाय on 30 December, 2011 - 06:46

मनातलं वादळ पायाने शमवण्यासाठी ती बाहेर पडली खरी. पण ती कुठे चालली आहे, कशासाठी चालत आहे तिचा तिलाच कळत नव्हत. वाट, मन सगळंच अंधारात हरवलं होत.
इतक्या सुंदर निसर्ग रम्य ठिकाणी येऊन ही तिला त्याचा आनंद घेता येत नव्हता. आपल्याच विचारांमध्ये हरवून ती कधी समुद्रावर पोचली तिला तिचही कळल नाही. त्याची आठवण मनाला सारखी स्पर्श करून जात होती. इथे तो आज असायला हवा होता.

गुलमोहर: 
शब्दखुणा: 

'मिसेस' ... वेदा अशोकन

Submitted by बेफ़िकीर on 30 December, 2011 - 04:55

आपल्या स्वरात कोणताही बदल जाणवणार नाही याची काळजी घेत मद्रासस्थित आपल्या आई वडिलांशी व अविवाहीत लहान बहिणीशी बोलून वेदाने फोन ठेवला. हनीमूनचा हा दुसरा दिवस होता आणि सकाळी सकाळी सात वाजताच तिने ऊटीहून घरी फोन केला होता. आईने केलेली चौकशी, लहान बहिणीने केलेली थट्टा हे सर्व आता बोचरे वाटू लागलेले होते. कनू अजून झोपलेलाच होता. तो किती वाजता उठेल याची वेदाला काहीही कल्पना नव्हती. खिडकीतून बाहेर दिसत असलेल्या खोल दरीशी स्वतःच्या मनाची तुलना करत आणि टीमेकरचा बेचव चहा पीत वेदा काही मिनिटे निश्चल बसून राहिली.

आयुष्याला मिळालेले हे वळण अतर्क्य होते.

गुलमोहर: 

सल!

Submitted by टोकूरिका on 27 December, 2011 - 23:12

'' गौरव ऊठ चल लवकर, फ्रेश हो पटकन. मी चहा टाकलाय ऑलरेडी... '' तयार होता होता अनु गौरवला ऊठवत होती.

'' हम्म.....'' गौरवची नेहमीची प्रतिक्रिया.

'' ए गौरव....ऐकतोयेस का तू? जागा आहेस की झोपलास पुन्हा? अरे क्लिनिकमध्ये जायचं नाही का आज?''

''हां....जागाय मी.......पाच मिंटं झोपू दे ना अनु! ''

'' अय गौर्‍या! उठ ना रे!..... श्शी!.....अजून किती हाका मारायला हव्यात मी तुला? आता ऊठतोस का??''

अनुने चिडून त्याच्या अंगावरची रजई ओढून बाजूला केली तसा गौरव ऊठून बसला.....अनु पुन्हा चहा गाळायला किचनकडे वळली.. …...

गुलमोहर: 

बेस्ट प्रपोझल

Submitted by बेफ़िकीर on 27 December, 2011 - 01:29

कुटुंबव्यवस्थेची व तिला मानण्याची अपार अपेक्षा असलेल्या या समाजात रिना तीन वर्षे भयानक पोळून निघाली होती आणि शेवटी एकदाचा तिला डिव्होर्स मिळाला होता. त्यानंतरची दोन वर्षे एकंदरच कुटुंबव्यवस्थेची खिल्ली उडवणे, मनातली उद्विग्नता शब्दबद्ध करणे, पुरुषांचा तिरस्कार करणे, एकटीने राहणे आणि केव्हातरी तरी कोणीतरी आपले असायला हवे असे वाटणे यात पसार झाली.

गुलमोहर: 

विवश

Submitted by बेफ़िकीर on 26 December, 2011 - 02:27

"मग तू पोलिसात का जात नाहीस?"

दयाच्या या उत्स्फुर्त प्रश्नातील भाबडेपणाची तीव्रता उत्तर द्यायला भाग पाडणारच हे संगीताला समजले. बेसीनमधील भांडी घासताना पाण्याचा नळ बंद करत तिने मागे वळून पाहिले आणि मालकीण असलेल्या दयाला वाईट वाटणार नाही अशा स्वरात म्हणाली.

"काय आस्लं तरी आपले मालकच्चेत न्हा? ही कपाळाची जखम जाईल यक दिवस इरून, पण मी चौकीवं गेल्यानं झालेली जखम मिटंल का? संसाराला झाल्याली?"

"म्हणून हा असा मार खायचा? काल पातेलं फेकून मारलं, उद्या सुरा खुपसेल तो पोटात"

गुलमोहर: 

त्रिवेणी

Submitted by आशूडी on 22 December, 2011 - 04:21

सूर्य मावळून थोडाच वेळ झाला होता. काळोख पडायला हळूहळू सुरुवात झाली होती.पावसाचे दिवस असल्याने सगळ्या खदखदणार्‍या भवतालावर एक घट्ट झाकण ठेवल्यासारखं वाटत होतं. वार्‍याची झुळूक नव्हती तरी उकडतही नव्हतं. बंगल्याच्या गेटवर चढलेला जुईचा वेल दमून झोपून गेला असला तरी त्याच्या मंद श्वासोच्छ्वासातून गोडसर अत्तर घमघमत होते. वैजू रोजच्यासारखीच गच्चीत आली
होती. दिवसभर झगमगत असलेला हा देखावा हळूहळू बंद होताना बघणं हा आता तिचा नेमच
झाला होता. युगानुयुगं अखंड चालू असलेल्या या नाटकाचे आपण फक्त प्रेक्षक. नाटक
चालूच राहील, कदाचित उद्या आपणच नसू!

गुलमोहर: 

अदृश्य यक्ष आणि हरलेली द्रौपदी.. - अंतिम

Submitted by मी मुक्ता.. on 21 December, 2011 - 10:22

अदृश्य यक्ष आणि हरलेली द्रौपदी.. - भाग २
http://www.maayboli.com/node/31368
-----------------------------------------------------------------------------------

गुलमोहर: 
शब्दखुणा: 

अदृश्य यक्ष आणि हरलेली द्रौपदी.. - भाग २

Submitted by मी मुक्ता.. on 20 December, 2011 - 23:35

http://www.maayboli.com/node/31346
अदृश्य यक्ष आणि हरलेली द्रौपदी.. - भाग १
------------------------------------------------------------------------------------

गुलमोहर: 
शब्दखुणा: 

अदृश्य यक्ष आणि हरलेली द्रौपदी.. - भाग १

Submitted by मी मुक्ता.. on 19 December, 2011 - 23:09

"आज गौरी भेटली.."
"काय म्हणाली?"
"अं.. काही नाही. जनरल.."
"तरी पण? इतक्या दिवसांनी भेटलात ना? तिला काही माहिती नसेलच. सांगितलस का मग?"
"हो.. सांगितलं ना."
"मग काय म्हटली?"
"काही नाही. तू ठिक आहेस ना, एवढंच विचारलं."
"बस्स?"
"हो.. Happy तुला सांगितलं ना, काही नाती नाही बदलत. ती माणसं आपलीच राहतात. तुमच्या आयुष्यात काय झालं काय नाही. तुम्ही काय निर्णय घेतले. ते बरोबर की चूक यावर जोखत राहत नाहीत तुम्हाला. ती तुमची असतात. आणि कायम तुमच्यावर तेवढंच प्रेम करत रहातात."
"हो का? तिला तुझ्या आयुष्याशी काही घेणं देणं नसेल म्हणूनही काही म्हटली नसेल ती."

गुलमोहर: 
शब्दखुणा: 

Pages

Subscribe to RSS - कथा