दिवस मावळला, नि एक एक जण ती छोटी टेकडी चढून वर माथ्यावर यायला लागला. दिवसभराची कामं आटोपून सायंकाळच्या वेळेत मस्त गप्पा मारायच्या, हास्यविनोदात तास दीड तास घालवायचा असा ह्या मित्रमंडळींचा रोजचाच नियम. त्या नियमाला अनुसरूनच त्या छोट्या टेकडावर एक एक जण जमत होता.
गावापासून थोड्याच अंतरावर डोंगरांची रांग होती. काही खडकाळ भाग सोडला तर बहुतेक भाग जंगलाने व्यापला होता.गावातले लोक सहसा घनदाट जंगलाच्या बाजूला जात नसत. जंगलाच्या ठराविक भागातच वावर असे. घनदाट भागात जायचं झाले तर चार दोन जण बरोबर असल्याशिवाय कोणी धाडस करीत नसे.
नदीकिनारी माझे आहे गाव |
भैरवनाथ आमचा तो देव ||
खंडोबा डोंगराच्या माथ्यावरी |
महादेव आहे नदीच्या किनारी ||
गावाच्या मध्ये विठ्ठल सुंदर |
करंजाई, विरोबा शिवेवर ||
भोवताली शेताचा शिवार |
रानामंदी पिकं डौलदार ||
मुळा नदी गावाला वरदान |
तिच्यामुळे गाव पिकविते सोनं ||
असे प्रेम माया आपुलकी |
नाही तिथे सुडाची भाऊकी||
असे माझे गाव सुंदर |
त्याचा मला अभिमान थोर||
मला नेहमी अभिमान वाटणाऱ्या माझ्या मुलखेड गावाविषयी सुचलेली कविता
वेळ रात्री बारा सव्वा बाराची, नदीकाठचा परिसर, डोळ्यात कुणी बोट घातले तरी कळणार नाही असा दाट अंधार,अमावाश्येचीच रात्र ती. सगळीकडे काळोखाचेच साम्राज्य,दूर गावाच्या बाजूला ग्राम पंचायतीचे दोन तीन दिवे क्षीणपणे लुकलुकताना दिसत होते.परंतु इथे स्मशानात त्यांचा काहीही उपयोग नव्हता. इथे त्याला फक्त अंधार नि अस्वस्थ करणारी शांतता यांचीच सोबत होती. .