गावापासून थोड्याच अंतरावर डोंगरांची रांग होती. काही खडकाळ भाग सोडला तर बहुतेक भाग जंगलाने व्यापला होता.गावातले लोक सहसा घनदाट जंगलाच्या बाजूला जात नसत. जंगलाच्या ठराविक भागातच वावर असे. घनदाट भागात जायचं झाले तर चार दोन जण बरोबर असल्याशिवाय कोणी धाडस करीत नसे.
आणि आज अश्याच घनदाट भागातून ते चौघेजण चालले होते. त्यात सदाचा चुलता दिनकरराव, वडील श्यामराव, चुलती सरूबाई आणि सदा, दिनकररावांनी सदाला घट्ट धरले होते. भेदरलेल्या अवस्थेत सदा बिचकत बिचकत चालला होता. एखाद्या पक्ष्याचा ओरडण्याचा आवाज जरी आला तरी सदा घाबरून ओरडायचा व हाताला हिसका मारून पळायचा प्रयत्न करायचा. परंतु दिनकारावांनी त्याला घट्ट धरल्यामुळे त्याला पळता येत नसायचे.
मुलाची अवस्था पाहून श्यामरावांचा धीरच सुटला होता. मुलगा चांगला शहरात शिकत होता गावात आला नि इतर पोरांच्या नादानं नको ती पैंज लावली, नि होत्याचं नव्हतं झालं देवा भैरुबा माझ्या पोराला लवकर या दृष्टचक्रातून बाहेर काढ तुझ्या नावाने शे पाचशे माणसं जेवायला घालीन. असं मनातल्या मनात पुटपुटत ते चालले होते.
दरीमधून वाहणारा तो लहान ओढा त्यांनी पार केला नि मोठ्या दरडीजवळ ते आले. दरडीलालागुनच ते थोडे पुढे गेले तेव्हा त्यांना ते दिसलं
जाळ्याझुडपांनी वेढलेले होते तरी आत जायला 'एकावेळी एका माणसाला' असा रस्ता होता त्या गुहेच्या तोंडातून त्यांनी आत प्रवेश केला थोडावेळ त्यांना काहीच दिसलं नाही सगळा अंधार होता शिवाय ते उन्हातून आले होते . थोड्या वेळाने त्यांची नजर सरावली व त्यांना थोडे थोडे दिसू लागले.
साधारण दहा बाय पंधराची ती गुहा होती. चांगली दोन पुरुष उंची असल्यामुळे गुदमरल्यासारखे होत नव्हते उलट आतमध्ये चांगला गारवा होता.
गुहेच्या अगदी शेवट कडेला तो बसला होता. उघडाबंब पाठीवर मोकळे सोडलेले करडे केस, कपाळावर शेंदराचा मळवट, कानात मोठाल्या बाळ्या, तारवटलेले डोळे तोंडाने कसलेतरी मंत्र पुटपुटत समोरच्या कुंडात काहीतरी फेकत होता. हातातले कसले तरी धान्य कुंडात फेकताच आग तेवढ्यापुरती भडकायची व साऱ्या गुहेत उग्र वास पसरायचा.
तो होता मांत्रिक राघव, गुहा सोडून कधीच बाहेर पडत नसे. फक्त अमावाश्येच्या रात्री स्मशानात जायचा आणि अगदीच एखादी केस हाताबाहेरची गेली असेल तर गावात जायचा. आजूबाजूच्या दहा वीस गावात त्याचा दबदबा होता. सगळे त्याला घाबरून असत.
मांत्रिकाच्या शेजारी उभ्या असलेल्या सेवकाचे लक्ष या चौघांकडे गेले तो त्यांच्याकडे आला नि हळू आवाजात म्हणाला
महाराज सध्या कामात आहे तिकडे बाजूला बसा दहा पंधरा मिनिटात बोलावतो एवढे सांगून तो पुन्हा मांत्रिकाकडे जाऊन उभा राहिला .
हे चौघेही कोपऱ्यात जाऊन बसले. सदाची चुळबुळ चालूच होती, तो तेथून बाहेर पाडण्यासाठी धडपडत होता नि दिनकरराव व सरूबाई या दोघांनीही त्याला घट्ट धरून ठेवले होते. श्यामरावांची मनातल्या मनात देवाची प्रार्थना चालूच होती.
मांत्रिकाचे अनुस्थ्हान संपले त्याचे लक्ष कोपऱ्यात बसलेल्या चौघांकडे गेले.त्याने सेवकाकडे पहिले. सेवक लगबगीने त्यांच्याकडे गेला नि चला म्हणून त्यांना खुणावले .
सदाला त्यांनी मांत्रीकापुढे बसवला, दिनकररावांनी थोडक्यात सारी हकीकत सांगितली
मांत्रिकाने सदावर आपले भेदक डोळे रोखले. सदा जास्तच चुळबुळ करू लागला. त्याला धरण्यासाठी या दोघांनाही सारी ताकत पणाला लावावी लागली .
मांत्रिकाने कुंडातली राख घेतली व सदाच्या मस्तकावर लावली. घाबरून सदा जोरात ओरडू लागला.
मांत्रिक आता कसलासा मंत्र पुटपुटत होता आणि झोळीतला अंगारा सदावर फेकत होता. सदाचे ओरडणे चालूच होते.
मंत्र पुटपुटने झाल्यावर तो सदाच्या वडिलांना व चुलत्याला म्हणाला -
लय ताकतवान भुताने डाव साधलाय बराच मोठा बंदोबस्त करावा लागणार हाय आणि खर्च बी मोठा हाय.
महाराज कितीबी खर्च होऊद्या पर आमच पोर बर हुईल ना? शामराव म्हणाले
ह्या राघवाने आतापर्यंत लय भूतांना वठणीवर आणलंय ह्या पोराला चारच दिसात मोकळा करतो.
लय उपकार होतील महाराज तुम्ही सांगान ते आणून देतो दिनकरराव म्हणाले.
तुम्ही काय बी आणू नका आणि तुमाला त्या वस्तू मिळणार पण नाय तुम्ही फक्त पाच हजार रुपये दुपारपर्यंत आणून द्या. हा धोंड्या अशा वस्तू आणीन
यांना घरी घालवून लगेच पैसे घेऊन येतो पर पोराला आता काहीतरी गुण द्या महाराज पोराने खानं पिणं टाकलंय ----दिनकरराव काकुळतीने म्हणाले
तो दोन तीन दिवस असाच वागण पर काय बी काळजी करू नका म्या हाय.
असे म्हणून मांत्रिकाने पुन्हा एकदा त्याच्या कपाळावर अंगारा लावला नि यांना या म्हणाला.
चौघांनीही मांत्रिकाला नमस्कार केला नि ते गुहेबाहेर पडले.
क्षमस्व , क्रमश; लिहायला
क्षमस्व , क्रमश; लिहायला पुन्हा विसरलो .
हा पण भाग मस्त....
हा पण भाग मस्त....
धन्यवाद, सचिन
धन्यवाद, सचिन