अजयने दार लावलं आणि कितीतरी वेळ तसाच बसून राहिला सोफ्यावर.. विचारांचं वादळ उठलं होतं डोक्यात त्याच्या..
" ती का आवडते आपल्याला इतकी.. आणि का नाही व्यक्त करता आलं आजपर्यंत.. का ती म्हणते तशी...फक्त मैत्रीच आहे.. कसली मैत्री म्हणा.. आपण का नाही सांगू शकलो तिला नताशा आणि अभि बद्दल आपल्याला माहित असताना सुद्धा..? आणि आज - आज असं का वागली ती? कधी कुणा पुरुषाशी हस्तांदोलन पण करायला बिचकते.. आणि आज.. इतक्या जवळ.. इतक्या जवळ कशी काय आली..
इतकी दु:खात आहे ती..कशाचं दु:ख करतिये पण.. ती म्हणते की तिचं प्रेम नाही अभिजीतवर.. ह्या मुलींचं ना काही कळत नाही बुवा..
आणि तो मूर्ख अभिजीत - असा का वागला तो..
मी विचारु का तीला... माझ्याशी लग्न करशील का असं... नको .. आधी सांगावं तिला आपल्याला ती आवडते असं...? कशी करु सुरुवात.. आणि तिला नाही आवडलं तर..? आणि आवडलं तरी .. काय करू.. डोक्याला मुंग्या यायची वेळ आलीये.. "
आई कधी आली घरी..? मीच दार उघडलं का? आठवतच नाहीये..
" अजय काय रे.. कसला विचार करत बसलायस.. आणि घरातले लाईट का नाही लावलेयस्.?" आईचा नाराजीचा सूर. एक तर बाहेरून आलं की स्वतःहून पाणी देणारा आपला मुलगा आज आपल्या येण्याची दखलपण घेत नाहिये म्हटल्यावर कोणत्याही आईला काहीतरी बिनसलंय हे कळायला वेळ लागत नाही.
" कोण आलं होतं रे.. कॉफी बनवलेलीस का?"
" आई अम्रुता आली होती... सहजच.. "
" ओह.. अच्छा .. काय म्हणत होती.." आई अजयचा चेहरा वाचायच्या प्रयत्नात.
" काही विशेष नाही गं.. मी जरा खरेदिला घेउन गेलेलो तिला.. म्रुदुलाचं लग्न आहे ना पुढच्या आठवड्यात.. थोडी खरेदी केली सहजच.. मग आली होती .. कॉफी प्यायला"
" भांडला बिंडला नाहीयेस ना तिच्याशी? तुझा चेहेरा का इतका सिरीयस दिसतोय.."
" छे गं काही नाही. मला जेवायला नकोय आज.. दमलोय थोडासा.. टिव्हि बघतो आणि झोपतो मी."
" अजय, don't mind, अम्रुता चांगली मुलगी आहे. मला चालेल सून म्हणून.... विचार कर.. बोलू का बाबांशी..?"
" आई प्लिज.. असं काही नाहिये.. वी आर फ्रेंडस् "
" अरे काय आहे ते तुझ्या चेहेर्यावर लिहिलय.. आई आहे मी तुझी.. पण ठीकय... तसं काही नसेल तरी चालेल.. असेल तर उत्तम.. "
" ह्म्म" अजय म्हणाला.
" दोनच शक्यता आहेत अजय ज्यामुळे तुझा आज मूड खराब आहे.. एक तर तीने नकार दिलाय, किंवा तू अजून विचारलं नाहियेस्, पण दुसरा कहितरी प्रॉब्लेम आहे.. मला नको सांगूस हवं तर, पण तिला विचारायचा विचार करत असशिल तर वेळ नको दवडूस.. ऑल द बेस्ट.." आई किचनमधे निघून गेली.
आईशप्पथ्...आता आईला पण कळतंय म्हणजे.. तीला समजलं असेल का..? का उगीचच न समजल्याचा आव आणतिये.. की आणखी काही.. छे छे .. उद्या काय तो सोक्षमोक्ष लावला पाहिजे. अजय मनात विचार करत होता. टिव्हि लावून बसला होता पण मनाचा ताबा अमूच्या विचारांनी घेतला होता.
टिव्हिवर 'चुपके से' नावाचा एक प्रेमपट लागला होता.. अजय पहात बसला.. आई आ वासून बघतच बसली... अजय आणि हिंदी चित्रपट पहातोय...
शनिवारी सकाळी अजयने अमूच्या घरीच मोर्चा वळवला.. तिला सगळं सांगायचंच ह्या इराद्याने..
अमूनेच दार उघडलं.. चेहेर्याला कसलासा फेसपॅक लावलेला..
" भूत भूत.." अजय ओरडला आणि जिन्याकडे पळाला..
" अजय मस्करी करू नकोस आत ये गपचूप."
" आत येतो, पण गपचूप का येऊ गं.. कोणी नाहिये का घरी...?" अजय मिश्किलपणे म्हणाला.
" गप्प बस. पुन्हा मस्करी ..काकू आहे. बैस. कॉफी करते".
" मला नकोय. काल ओव्हरडोस झालाय मला कॉफीचा. लवकर तयार हो.. भटकंती करू या जरा."
" काकी गं अजय आलाय..."
" काय म्हणतोस अजय.. कसा आहेस..बर्याच दिवसांनी दिसतोयस.. आई भेटते मला अधून मधून देवळात वगेरे.."
" हो काकू ऑफीसच्या कामांमुळे वेळच नाही होत यायला."
" काकू.. मी - आम्ही जरा जाऊन आलं तर चालेल का बाहेर.." त्याने चाचरत विचारलं..
" अरे हो, काल अमू म्हणाली.. काय खरेदीबिरेदी करणार आहात.. जाऊन या.. तितकाच अमूलापण चेंज आमच्या.. संध्याकाळच्या आत या हं पण"
" अमू तयार होऊन खाली ये.. मी गाडी काढतोय... चला काकू अच्छा.. जातो मी"
" अरे 'येतो' म्हणावं रे.."
काय टाईमपास करावा गाडीत.. ही कधी येणार.. असा विचार करत त्याने मोबाईल बघितला.. मेसेजेस वाचायला लागला.
जख्म जब मेरे सिने के भर जायेंगे,
आंसू भी मोती बनकर बिखर जायेंगे,
ये ना पूछो के किस्-किस ने धोखा दिया, वर्ना..
कुछ अपनोंके चेहरे उतर जायेंगे..
अमूचा मेसेज.. काय सेंटी मेसेजेस पाठवते कधी कधी..
क्रमश:
मस्त!!!
मस्त!!!
जख्म जब मेरे सिने के भर
जख्म जब मेरे सिने के भर जायेंगे,
आंसू भी मोती बनकर बिखर जायेंगे,
ये ना पूछो के किस्-किस ने धोखा दिया, वर्ना..
कुछ अपनोंके चेहरे उतर जायेंगे..>>>>>>> क्या बात है..सुपर्ब फ्लो ऑफ रायटिंग.!
पुलेशु.
मस्त!!! मस्त!!! .मस्त!!!...
मस्त!!! मस्त!!! .मस्त!!!... पुलेशु.
खुप प्रवाही लिहितेस.... छान
खुप प्रवाही लिहितेस....
छान आहे
पण किती कमी टाकतेस ग जरा जास्त टाक की
एवढसे वाचुन पोपट होतो .. अरे इतकेच असे होते
मस्त
मस्त
वाचतोय .. छोट्या छोट्या
वाचतोय ..
छोट्या छोट्या प्रसंगांमधून कथा सुंदर पुढे सरकते आहे !
सगळेच भाग वाचले
सगळेच भाग वाचले बाईसाहेब.
किती छान लिहितेस ग! पण या छोट्या छोट्या भागांनी आपलं पोट नाही भरायच. मला उपाशी का मारणार आहेस? चल लवकर मोठे मोठे भाग टाक पाहू!
वा....वा....
वा....वा....
मला अधिच्या भागान्चि लिन्क
मला अधिच्या भागान्चि लिन्क कुठे मिळेल?
सामी.. १.
सामी..
१. http://www.maayboli.com/node/30615
२. http://www.maayboli.com/node/30664
३. http://www.maayboli.com/node/30673
४. http://www.maayboli.com/node/30695