आई मी विचार करतोय जन्म घेऊ कि नको याचा ,
विचार करतोय या दुनियात पाऊल ठेवू का नको याचा
बघ ना इथे किती शांत,
बघ ना इथे किती निवांत,
इथे ना कुणाची कटकट,ना कुणाची किटकिट
आणि बाहेर बघ....सगळ्यांची नुसती चिडचिड.
इथून बाहेर आलो ना कि,
माझ्या इवल्याश्या जीवाकडेही तुम्ही खूप काही मागणार,
"डॉक्टर-इंजिनिअर व्हायचं हा बाळा" असेही सांगणार,
आल्या आल्या मी तुमच्या इतक्या अपेक्षा कश्या झेलू?
छोटुसा मी.....तुमच्या मागण्या ऐकू कि खेळण्यांनी खेळू?
मी थोडासा मोठा झालो कि पाठीवर दप्तर येणार,
कारण डोनेशन देऊन तुम्ही शाळेत मला आडमिशन घेणार,
असे कसे काय? ह्याचे नवल करीतच तो वाड्याच्या दारापाशी आला. स्वत:जवळच्या चावीने त्याने दाराचे कुलूप उघडले. दार ढकलून तो आत जाऊ लागला. तर दार लोटलेच जाईना. जणू कोणीतरी त्यास आतील बाजूने ओढून धरले असावे. अर्चित दार ढकलण्याचा आटोकाट प्रयत्न करत होता पण त्यास यश येत नव्हते. आणि जवळपास दहा मिनिटांच्या अथक प्रयत्नानंतर ते दार एकदमच आतील बाजूस लोटले गेले. दार लोटतांना अर्चितने जोर लावल्यामुळे तो वाड्यात धडपडतच आत शिरला. "खो, खो" आतील कोंदट वातावरणामुळे अर्चितला खोकला आला. त्यातही शांत वातावरणात त्याच्या खोकल्याचा आवाज कितीतरी वेळ घुमत होता.
तेव्हा आम्ही इचलकरंजीमध्ये दि. डेक्कन को-ऑप स्पिनिंग मिल इथे रहात होतो. बाबा तेव्हा दि. डेक्कन स्पिनिंग मिल मध्ये नोकरीला होते. डेक्कन मिल चा उल्लेख तेव्हा इचलकरंजीमध्ये 'डेक्कन' असाच व्हायचा. म्हणजे, 'तू कुठे राहतेस?' असं विचारलं की, 'डेक्कनला' इतकंच उत्तर पुरे व्हायचा. डेक्कन हा सीटीबस चा स्टॉप होता. तमाम टांगेवाल्यांसाठी घोडातळ(वाहनतळ तसं घोडा तळ) होता. म्हणजे डेक्कनला लोकं घेऊन आलेला टांगेवाला तिथे घोडा सोडून, त्याला चारापाणी वगैरे करायचा. तर असं हे डेक्कन. तेव्हा माझे तीन मामा इचलकरंजीतच रहात होते. काकाही गावभागात रहायचा.
एके दिवशी सकाळीच एक एस.टी धुरळा उडवीत 'रांजुर्ले' गावाच्या पाटीजवळ येऊन थांबली. क्षणार्धात त्या बसमधून बूट घातलेली दोन पावले ऐटीत खाली उतरली. ती पावले होती अर्चित जाधव याची. थोड्याच वेळात तो त्याच्याकडे विस्फारलेल्या डोळ्यांनी बघणाऱ्या गावकऱ्यांकडे ढुंकूनही न बघता सरळ समोरच्या टी स्टॉलकडे गेला आणि तेथे जाऊन स्टॉलमालकाला विचारले, "घोटेवारांचा वाडा कोठे आहे"? ते ऐकताच स्टॉलमालक थोडा वेळ शून्यात हरवल्यासारखा अर्चितकडे पाहू लागला. लगेच स्वत:स सावरून तो म्हटला, "गावात नवीन दिसतायेसा." अर्चितने मानेनेच होकार दिला.
तो आला, नेहमी प्रमाणेच धाड धाड करून शूज रॅकमध्ये ठेवले आणि घरात आला.
धडामकन सोफ्यावर पडला, त्याच्या गाडीच्या आवाजानं मी बाहेर आले, पण नेहमीसारखी नव्हे. माझ्याकडे पाहताच त्याचा भडका उडाला, तो उडणारच होता हे मला माहीत होतं.
"आशु, अजून सकाळचाच ड्रेस अंगावर ? "
" हो ! काय वाईट आहे त्यात ? "
" तुला माहीताय मला आवडत नाही "
" नसू दे आवडत, मी काही बाउंड्रीवर फिल्डिंग करत नसते की डाइव्ह मारून चेंडू अडवताना कपडे खराब होतील "
" तू रैनासारखी फिल्डिंग कर, किंवा द्रवीडसारखी बॅटींग कर पण जरा टापटीप राहायला काही प्रॉब्लेम आहे का तुला ? "
मी इतर लोकांबरोबर तहसील कोर्टाच्या आवारात कडूनिंबाच्या झाडाखाली पुकार्याची वाट पाहत बसलो होतो. बर्याच वेळाने चपरश्याने दरवाज्याच्या जवळ येउन आमच्या नावांचा पुकारा केला. आम्ही सर्वजन आंतमध्ये गेलो.
तहसिलदार साहेब समोर खुर्चीत टेबलाजवळ बसले होते. त्यांच्या बाजूला एक बाबू बसला होता. त्याच्या समोर टेबलवर टाईपिंग मशिन ठेवली होती.
आम्ही सर्वजन आंत एका रांगेमध्ये उभे राहिलो. तहसिलदार साहेबांनी आम्हा सर्वांना निरखून पाहिले
‘तूझे नांव कायरे ?‘ माझ्याकडे डोळे रोखून विचारले.
‘रामराव.’
‘पुर्ण नांव सांग.’
रामराव कोंडुजी जुमळे.’
‘काय करतो?’
‘शिकत आहे’
NOTE (ही कथा पुर्णपणे काल्पनिक असुन यातील घटना, स्थल, प्रकाशचित्रे आणि व्यक्ती यांचा संबंध कोणत्याही मृत अथवा जिवित व्यक्तीशी नाही. याची कृपया वाचकांनी नोंद घ्यावी. धन्यवाद!)
असंभव :--(एक चित्तथरारक प्रेमकथा)::=>>भाग=>1पासून पुढे़...
.
.
.
.भाग=>2
ग्रहण-१
ग्रहण-२ग्रहण-३
मला आता घरच्यांपासून काहीही लपवायचं नव्हत.
नाश्त्याला बसलेले असताना.. मी सर्व हकीकत सांगून टाकली
उर्मिलाचा चेहरा. भयाने पांढरा फाटक पडलेला .. आई पण हादरलेली.. बाबांच्या कपाळावर आठ्या पडलेल्या..
मग कोणीच काही बोललं नाही.
भयानक भाग १
भयानक भाग २
भयानक भाग ३
--------------------------------------------------------------------------
त्यांनी समोर उभ्या असलेल्या विश्वासकडे पहिले. त्यांच्या चेहऱ्यावर अचानक हास्य आले. एका आशावादी नजरेने त्यांनी विश्वासकडे बघितले. ते विश्वासकडे पाहून आनंदाने ओरडले,
विश्वाsssssssss तू आलास..........
...आणि पलंगावरून उठून विश्वासकडे झेपावले.
ते विश्वासजवळ आले, विश्वासला कडकडून मिठी मारली.