कथा

अंधेर नगरी चौपट राजा

Submitted by जयनीत on 2 October, 2011 - 03:37

अंधेर नगरीत एका महान योगीराजांचे आगमन झाले .

चौपट राजाने त्यांचे अगत्याने स्वागत केले .

योगीराजांना भूत , वर्तमान , भविष्य त्रिकालात सर्वकाही बघू शकण्याची सिद्धी प्राप्त होती .

राजाने त्यांना सन्मानपूर्वक दरबारात विराजित करून आपले भविष्य विचारले .

योगीराज क्षणात समाधिस्थ झाले .

जागृत होऊन त्यांनी राजाच्या कानात सांगितले " हे राजा लवकरच तुझा सर्वनाश अटळ आहे , प्रजा तुझ्या कुशासनाला कंटाळली आहे . तुझ्या दरबारातसुद्धा षडयंत्र शिजत आहे , अनेक लोक तुझे सिंहासन उलथून पाडण्याची स्वप्ने बघत आहेत ."

राजा हादरला .

यथोचित बिदागी घेऊन योगीराज मार्गस्थ झाले .

गुलमोहर: 
शब्दखुणा: 

बायकोची माया

Submitted by rkjumle on 1 October, 2011 - 10:52

, ‘माह्या नवर्‍याने काही केले नाहीजी... त्यांना नेऊ नकाजी...’ अशी ती बाई आर्त स्वरात त्या पोलिसाच्या समोर आडवी होत विनवणी करीत होती.
तो पोलिस नामदेवला इतवारच्या भर बाजारातून एखाद्या बैलाला वेसन धरुन जसा शेतकरी ओढून नेतो तसा तो घाणेरड्या शिव्या देत त्याची बखोटी पकडून ओढत नेत होता. त्या बाईची केविलवाणी स्थिती पाहून आम्ही सर्वच गर्भगळीत झालो होतो.
त्या बाईबद्दल मला फार कळवळा होता. कारण मी निळोण्याच्या शाळेत शिकत असतांना आम्हा चौधर्‍याच्या मुलांना मोठ्या आपूलकीने प्यायला पाणी द्यायची. कधी कधी तिच्या घराच्या आंगणात आम्ही दुपारच्या सुट्टीत भाकरी खात होतो.

गुलमोहर: 

ग्रहण-३

Submitted by मुरारी on 30 September, 2011 - 11:27

ग्रहण-१
ग्रहण-२

आता कोण आलं असेलं? रंगा आला असेल गड्याला घेऊन.! मनात विचार आला.

उठुन दार उघडलं आणी पुर्ण शरिराचा थरकाप उडाला...

जणू काही वेगळ्याच मितीत पोचलो होतो

गुलमोहर: 

भयानक : भाग ३

Submitted by यःकश्चित on 30 September, 2011 - 06:05

पहिल्या भाग वाचा.
दुसऱ्या भाग वाचा.

----------------------------------------------------------------------------------------

"पण हे कसं शक्य आहे ? "

गोंधळलेल्या चेहऱ्याने विश्वासने मोहनरावांना विचारले. मोहनरावसुद्धा गोंधळले होते. त्यांना हे काय घडत आहे याचा काहीच बोध होत नव्हता. त्यांना हे कळत नव्हते की मुळातच ज्या माणसाचा दामले घराण्याशी काडीमात्र संबंध नाही तो माणूस दामले घराण्याचा वारसदार कसा काय असू शकेल ? विश्वासलाही हाच प्रश्न पडला होता.

गुलमोहर: 

अंतिम युद्ध

Submitted by चिंतातुरपंत धडपडे on 27 September, 2011 - 03:28

अचानक कोणत्यातरी धक्यामुळे नम्रताला जाग आली.जाग आली म्हणजे तिला तसा वाटले पण डोळे उघडायला तयारच नव्हते. मोठ्या कष्टाने तिने डोळे उघडले . तिला वाटले आपण आताच तर झोपलो होतो इतक्या लवकर सकाळ कशी झाली . तिने डोळे चोळत इकडे तिकडे बघितले . तिला एकदम थंड स्पर्श जाणवला . तिने बघितले तर ती एका फारशी वर झोपली होती . तिला थोडे आश्चर्य वाटले . झोपताना तर ती तिच्या रूम मध्ये पलंगावर झोपली होती . त्या खोलीचा काहीच पत्ता नव्हता . ती ज्या जमिनीवर झोपली होती ती जमीन जुन्या काळ्या दगडांची होती . ते दगड एकमेकांत बसवले होते . जमिनीतील दगड वापरून अगदी गुळगुळीत झाले होते .

गुलमोहर: 

बाबाची सही

Submitted by rkjumle on 27 September, 2011 - 02:49

मी चवथी पास झाल्यावर नंतरच्या शिक्षणासाठी शहरात आलो.
त्यावेळी आम्ही ऊमरसर्‍याला राहत होतो. हे गांव यवतमाळपासून एका मैलावर म्हणजे एक छोटंस खेडच होतं. दोन्ही गावांच्या मध्ये एक नाला होता. त्याच्या कडेला उंच-खोल अशी जमीन पसरलेली होती. अंधार पडला की येथून जायला भिती वाटायची. माझी व बाईची शाळा या गांवापासून एक-दिड कोस दूर असेल.
सुरुवातीला आम्ही दोघं बहिण-भाऊ माझ्या आत्याची मुलगी सुभद्राबाईकडे, त्यानंतर लहान आत्याकडे व तेथून मोठ्या आत्याच्या एका छोट्याश्या खोलीत राहायला गेलो.
त्यानंतर बाबाने बांधून दिलेल्या एका लहानश्या झोपडीत राहिलो.

गुलमोहर: 

शेवटी तोच का?

Submitted by रुनाली on 21 September, 2011 - 04:16

untitled.jpg

तुझ्यामुळे झालं हे सगळं, जर तू मला समजून घेतलं असतंस तर कदाचित असं झालं नसतं. पण आता मी तुझं का ऐकू? तेव्हा जेव्हा माझी वेळ होती तेव्हा तू कुठे होतास? अग पण...
आणि शांतीने फोन ठेवला. तेव्हापासून जी विचारांना सुरूवात झाली ती कधी संपलीच नाही. एकटीच विचार करत बसले होते, एकटक पाहत, कुठे पाहत होते ते मला हि ठावुक नव्हतं. शून्यातून जग पहावं तशीच शून्यात पहात होते. लोकांचे शब्द तर माझ्या कानावर पडत होते पण माझ्या डोक्यातले विचार लोकांपर्यंत पोहचत नव्हते. आणि कधी स्वत:त हरवले कळलंच नाही.

गुलमोहर: 

ग्रहण-२

Submitted by मुरारी on 20 September, 2011 - 07:55

ग्रहण-१

किचनमध्ये भांडी पडल्याचा आवाज आला. आता तर पाय लटपटायला लागले होते. आत कोणीतरी होतं, नक्कीच.

"कोण आहे आत?" मी घाबरुन बरळलो. हसल्यासारखा आवाज आला. आत जाऊ नको कि नाही? असहाय झालो होतो. बाजुला उभी केलेली एक मोडकी छत्री हातात घेतली, बुडत्याला काडीचा आधार. एक एक पाऊल टाकत आत शिरलो. किचनमध्ये भांडी पडलेली होती, बाहेर विजांचा नंगानाच सुरु होता
आणि..........

गुलमोहर: 
शब्दखुणा: 

ग्रहण - भाग १

Submitted by मुरारी on 15 September, 2011 - 09:55

सायबानू मीच त्यो .... अंतिम

आता पुढे ..........

****************************************************************************

माणसाचं आयुष्य मोठं अनाकलनीय आहे. प्रत्येक पुढचा क्षण हा अनपेक्षित असतो. काही काही लोकांच आयुष्य तीस-चाळीस वर्ष तसच्या तसं जातं, काही बदल नाही..साचलेल्या डबक्याप्रमाणे.! पण काहींच आयुष्य..... असो

गुलमोहर: 
शब्दखुणा: 

भयानक : भाग २

Submitted by यःकश्चित on 14 September, 2011 - 14:01

मागील भाग वाचा

मागील भागात.....
------------------------------------------------------------------------

विश्वास जेऊरकर हा एक लेखक होता. त्याने लिहिलेल्या 'भयानक' या रहस्यकथेतील घटना मोहनरावांच्या चुलत आजोबांच्या आयुष्याशी साधर्म्य दाखवत होता. मोहनराव विश्वासकडे येण्याच्या आदल्या संध्याकाळी घडलेली घटना आणि कथा आणि वास्तवांतील हे साधर्म्य विश्वासला पुनःपुन्हा गोंधळात टाकत होते. त्याच विचारात विश्वास भरकटला होता....

------------------------------------------------------------------------

गुलमोहर: 

Pages

Subscribe to RSS - कथा