कथा

आंदोलन

Submitted by जयनीत on 14 September, 2011 - 10:45

ब्रिटीश सरकार विरुद्ध अधून मधून एखादी आंदोलनाची लाट उसळून जायची , मग काही दिवसांनी सगळं पूर्वपदावर येत होतं . कालपर्यंत अगदी उत्साहात असलेले कार्यकर्ते निराश होत होते . एकदा आंदोलनाचं लोण ओसरलं की मग पुन्हा आपल्या आयुष्याची जुळवाजुळव करत होते .
निराशा झटकून परत उत्साहानी जमवा जमव करणारे विरळेच , तसे लोकं संख्येनी फार कमी होते .
त्यातलाच माझा मित्र होता विश्वास . लहानपणा पासूनचा शेजारी , वर्गमित्र , बालमित्र .

गुलमोहर: 

शाळा सुटली, पेपर ....

Submitted by छोटी on 9 September, 2011 - 04:02

आज काल वर्तमानपत्र उघडलं ना कि पेपर फुटीच्या बातम्या येत असतात ना.... कि बस्स.कालच अशी एक बातमी वाचली आणि मन काहीस माझ्या माहेरी नासिक ला CIDCO मध्ये गेलं.कर्मवीर भाऊसाहेब हिरे विद्यालय आठवलं(माझ शिक्षण तिथे झालं आहे ना...). १० वी ला असताना जेव्हा आमचा अभ्यासक्रम पुर्ण शिकवून झाला(अस मला आमच्या शिक्षकांनी सांगितल्यावरच कळाल होत.) त्यानंतर आमचे सरावाचे पेपर असायचे आणि ते पण रोज, अभ्यास करायला वेळच मिळायचा नाही(आयुष्यात तो मला कधीच मिळाला नाही... वेळ हो) आणि लगेच दुसर्या दिवशी पेपर असायचा.
मन कंटाळून गेलं होत.अभ्यास करायला उत्साह राहिला नव्हता.

गुलमोहर: 
शब्दखुणा: 

द्वंद्व

Submitted by मी गणराज on 6 September, 2011 - 13:45

मुंबईच्या सी.एस.टी.स्टेशनवरील माणसांची नेहमीचीच तुफान धावती गर्दीँ , अनाउंसमेँट्स. या अशा गर्दीत प्लँटफाँर्म नंबर 12 च्या बाकड्यावर बसलेला प्रकाश.बाजुस एक छोटीशी बँग. त्याला झालेल्या घटनेवर अजुनही विश्वास बसत नव्हता, त्या धक्क्यातुन तो अजुनही सावरला नव्हता. आयुष्यही सालं कधी कधी विचित्र वळणावर नेवून सोडतं,आँफीसमध्ये प्रकाशला त्याच्या आय.ए.एस.च्या मुलाखत निवडीबद्दल मित्र पेढे भरवत असतानाच त्याला सानेकाका गेल्याचा तो फोन आला, क्षणभर त्याला काही कळालचं नाही, त्याच्या सार्या संवेदनाच बधीर झाल्या होत्या,तो डोक्यावर हात ठेवून तिथेच खुर्चीवर बसला.

गुलमोहर: 

ऒंगळवाणे गांव

Submitted by rkjumle on 4 September, 2011 - 10:18

असं म्हणतात की, दुरुन डोंगर साजरं दिसते. मी जेव्हा माझ्या गांवाजवळील बरडावर जावून माझे गांव पाहत होतो, तेव्हा ते चिमुकलं गांव खरोखर सुंदर दिसत होतं. पण जेव्हा गांवात पाय ठेवत होतो, तेव्हा त्याचा चेहरा वेगळाच दिसायचा. ते म्हणजे ओंगळवाणे रुप!
गांवातलं ते ओंगळवाणे दृष्य पाहून मला किळस येत असे.

गुलमोहर: 

राजाराम सीताराम.....भाग ६ - मसुरी नाइट

Submitted by रणजित चितळे on 1 September, 2011 - 02:15

'आसरा'- अर्थहीन....... तुझ्याविना!! (अंतिम भाग)

Submitted by बागेश्री on 31 August, 2011 - 14:49

- कथेचा पहिला भाग इथे आहे.

- कथेचा दुसरा भाग इथे आहे.
------------------------------------------------------------------

...भरपुर मालमत्ता घेऊन राजीव घरातून परागंदा झाले... ह्या धक्क्यानेच दादांनी हाय खाल्ली!

त्यांना शोधण्याचे दादांनी सारे प्रयत्न केले, गाव अन् गाव धुंडाळलं..
प्रत्येक वेळेस निराशाजनक खबर ऐकताच ते खचत गेले..... खचतच गेले... दुरावले पार!

"माझ्या हट्टापायी माझ्या मुलाचा संसार मोडला" असा शोक करत-करतच दादांनी जग सोडलं!

गुलमोहर: 

माझं गांव

Submitted by rkjumle on 31 August, 2011 - 02:33

माझं गांव चौधरा… अगदी लहानसं खेडं… शंभरएक घराचं…
या गांवाचे नांव चौधरा कसे पडले हे सांगणे तसे कठिन आहे. कारण तसा काही इतीहास ऎकीवात नाही. पण असं अनुमान करता येईल की जेव्हा हे गांव वसलं असावं, त्यावेळी केवळ चार घरं असतील. त्यामुळे चार घराचं गांव म्हणजे चौघरा असे सुरुवातीला या गांवला लोकं म्हणत असावेत असे वाटते. पुढे ‘घ’ चा ‘ध’ होवून चौधरा झाले असावे असे मानायला काही हरकत नाही. पण ऎवढं खरं की या गांवाच्या नांवासारखे दुसरे नांव महाराष्ट्रात तरी कुठेही दिसत नाही. इतर गांवाचे नांव मात्र बर्‍याच ठिकानी दिसतील.

गुलमोहर: 

दंश

Submitted by मनस्वी राजन on 28 August, 2011 - 13:13

उतरणीवरुन सुर्य गेल्यानंतर रात्रीने सगळ्यांच्या जगाचा ताबा घेतला पण उद्या होणारी सकाळ नक्की काय घेउन येईल ह्याचा मागमूस कोणालाही नव्हता.

गुलमोहर: 

'आसरा'- अर्थहीन....... तुझ्याविना!! (भाग- २)

Submitted by बागेश्री on 28 August, 2011 - 08:19

- कथेचा पहिला भाग इथे आहे..
- कथेचा अंतिम भाग इथे आहे...

-------------------------------------------------------------------------------

.....भराभर पाऊलं उचलत ती निघाली... छातीशी पदर घट्ट आवळून... जणू सांडल्या असत्या भावना रस्ताभर.. हातातले पत्र अजूनच चुरगाळत!!

पापणीतले पाणी परतवत...रस्ता कापत ती देवळाच्या आवाराशी येऊन थांबली!
तिथे पोहोचताच, संथ नदीवरून आलेल्या हवेच्या झोताने जरासं हलकं वाटल्यासारखं झालं तिला..

देवळाच्या अगदी पायरीशीच बसली ती!

गुलमोहर: 
शब्दखुणा: 

Pages

Subscribe to RSS - कथा