मुंबईवर एकानंतर एक हल्ले होत आहेत आणि हे आपल्या मुंबईवरच नाही तर या देशावरच एक नक्कीच मोठ्ठ संकट आहे, या घटनेबद्दल माझ्या मनात या देशाचा नागरिक म्हणून एक चीड, संताप व्यक्त होतोय त्यातुन जे वाटलं ते मी आपल्यासमोर मांडत आहे, त्यात दरवेळी बहुतेक अनेक आपल्यासारखे सामान्य,चाकरमनी, व्यापारी लोकच हकनाक, बेमौत मरताना दिसतात, अशा घटनेत आपला जीव जाणं म्हणजे खुप अमानुषपणे मारलं जाणं, आपल्या डोळ्यांसमोर स्व:ताच्या शरीराच्या चिंधड्या उडत, तेही आपली काहीही एक चुक नसताना !
काय अर्थ आहे हया उपचाराचा? गोळया, औषधं ह्यानी ह्यांचीच चव रेंगाळते नुसती तोंडात! वरुन इंजेक्शन चा त्रास, पथ्य पथ्य म्हणून कही मनासारखं खायलाही बन्दी. कुठे बाहेर येणं जाणं ही बंद.
मग हे सगळं कशासाठी?
जगण्यासाठी? ह्याला काय जगणं म्हणायचं?
बायको भाग्यवानच म्हणायची लवकरच सुटली ह्या सगळ्या जाचातून.
त्यांना आज खुप जुने जुने मित्र आठवत होते अगदी लहान पणीचे शाळा कॉलेज मधले. त्यांच्या पैकी कित्त्येक खुप आधीच गेले होते अगदी साठ पासस्ठ वर्षा पूर्वीच.
आपण अजुन पर्यन्त आहोत.
त्यांच्या पेक्षा किती तरी जास्त जगलो.
जास्त जगलो म्हणजे नक्की काय केलं?
फक्त जास्त काळ!
वेगळं काही नाही?
(निवेदन: कथेतील पात्रं आणि घटना पूर्णपणे काल्पनिक आहेत. जर कोणाला कोणत्याही घटनेशी अथवा व्यक्तीशी साम्य आढळल्यास तो निव्वळ योगायोग समजावा.)
जेव्हा सुमीने गुवाहाटीच्या बस स्थानकावरून शिवसागर साठी बस घेतली तेंव्हा पहाटेचा गार वारा सुटला होता. जवळ जवळ वीस-एक वर्षांनी ती शिवसागरला परत जात होती. शिवसागर हे आसाम मधील एक छोटंसं शहर. तिथेच आर जे व्ही ची एक शाळा आणि आता विस्तारित ज्युनिअर कॉलेजही होते.
वीस वर्षांपूर्वी तिने याच शाळेपासून तिच्या यशस्वी कारकिर्दीला सुरूवात केली होती.
भर दुपारचे साडेबारा झालेले. विद्या खरेदी करून दमलेली. उन्हाळ्याचे दिवस. खरंतर कधी एकदा घरी जाते असं तिला झालं होतं, पण आज बायजाक्काकडे जायचं ठरलं होतं. त्यामुळे घरी जायला संध्याकाळ होणार हे नक्की होतं. मंडई-लक्ष्मी रोड-तुळशीबाग करून हातातल्या खरेदीच्या पिशव्या गाडीवर टाकत तिने नारायणपेठेच्या गल्लीकडे गाडी वळवली.
बहिणीच्या लग्नाचे कारण सांगून तिने मंगळसूत्र बनवून घेतले होते, विकण्याचा बहाणा करून चार ठिकाणून खरे असल्याची खात्री करून घेतली होती. सोने अस्सल होते. तिने नवीन साडी चोळी घेतली होती, आणि दूर वरच्या एका तिर्थस्थाना बद्दल सगळी माहिती मिळवली होती, आणि एक चांगला ग्राहकही हेरून ठेवला होता.
तिचे घर आता दूर राहिले होते, आई, बाप, बहीणी, भावांशी संबंध तुटून फार वर्षे होऊन गेली होती. जुन्या मैत्रिणींची आता लग्नं होऊन त्या आता आपापल्या संसारात रमल्या होत्या.
आशू बसस्टॉपवर उतरली आणि तिने घड्याळात बघितलं. दुपारचे साडेतीन वाजले होते. अजून डीडी ऑफिसमधे पोचले नसतील. बाकीचे रिपोर्टर पण तासाभरात येतीलच, मगच कँटीनमधे चहा घेऊ, असा विचार करत ती ऑफिसच्या बिल्डिंगकडे निघाली. तवर तिला "आपल्याला नुसता चहाच नको, तर भूक पण लागलेली आहे" असा संदेश तिच्या मेंदूने दिला. इच्छा नसताना पण तिने रस्त्यावरचं एक सँडविच विकत घेतलं आणि ऑफिसमधे तिच्या डेस्कवर जाऊन बसली.
"आज लवकर?" सुर्याने आल्या आल्या विचारलं..
हा माणूस पगार स्पोर्ट रिपोर्टरचा घेतो आणि काम गुरख्याचं करतो.. आल्या आल्या आशूच्या मनातला हा रोजचाच विचार.
नारायण! नारायण!! नारदमुनी प्रवेश करते झाले.
या मुनीश्रेष्ठ या! काय हालहवाल आहे पृथ्वीतला वरचा? ब्रम्हदेव म्हणाले.
अहो आश्चर्यम्! खलु आश्चर्यम्!! नारदमुनी म्हणाले!
विराजमान व्हा, अन जरा विस्ताराने सांगा मुनीवर! कसले आश्चर्य? ब्रम्हदेव म्हणाले.
फार थोडया काळात खूपच बदल घडला आहे पृथ्वी वर देव. नारद मुनी म्हणाले.
कसला? ब्रम्हदेवांनी विचारले.
काही काळा पूर्वी तेथे सर्वत्र राजेशाही होती ह्यावर विश्वासच बसत नाही देव, आता तिथे सगळीकडे लोकशाहीचा बोलबाला आहे. नारद मुनी म्हणाले.
असं! मग? ब्रम्हदेव म्हणाले.
एक माणूस एकदा एका अरण्यात फिरता फिरता वाट चुकला. भटकत भटकत तो अरण्याच्या खूप आत पोहचला. अरण्याचा हा भाग एकदम निर्जन होता. तिथे एका परी अन एका भूताचे राज्य होते. दोघेही आपापल्या राज्याच्या वेशीवर बसून शिळोप्याच्या गप्पा करीत होते.
बराच काळ लोटला तरी अजुनही ते त्याच जागी अडकलेले, काळाची अर्थात त्यांना पर्वा नव्हती पण ज्या साठी ते आतुरले होते ती गोष्ट.....? कधी सुटका होणार? कधी ? अनेक प्रश्न त्या अंधारात उमटले. उत्तरादाखल एकच वाक्य. `लवकरच, सुरुवात तर झालेलीच आहे माध्यम मिळण्याचाच अवकाश'........................
*********