मी निळोणा या गांवाच्या शाळेतून चवथा वर्ग पास झाल्यावर पुढील शिक्षण कसं होईल याची आई-बाबा, दादांना चिंता लागली होती. कारण निळोण्याला पाचवीनंतरच्या पुढील शिक्षणाची व्यवस्था नव्हती.
एकदा उन्हाळ्यात, यवतमाळच्या बाजारात बकुबाई-आत्यासोबत बाबाची भेट झाली. ती यवतमाळ जवळ असलेल्या उमरसरा या गांवला राहत होती. उमरसर्याला बकुबाई व सखुबाई अशा दोघ्या बहिणी राहत होत्या. त्या माझ्या बाबाच्या चुलत नात्यात या बहिणी लागत होत्या.
तिच्याकडे बाबाने आमच्या दोघा बहिण-भावाच्या शिक्षणाची गोष्ट काढली.
‘माझ्याकडे ठेव नं मामा.’ सुभद्राबाई हीने सुचवीले.
नाव काय रे तुझं?
कमच्या.
कमच्या! हे कुठलं रे नाव? कुठला रे तू? कोणत्या गावाचा? लोक विचारयचे.
कमच्या चुपच राहायचा.
अरे काय विचारतोय? इथे कसा काय आलास तू? बापाचं नाव काय? आडनाव काय?
माहीत नाही. कमच्या म्हणायचा.
अरे रे! च, च... लोकं म्हणायचे. अनाथ दिसतंय पोर.
वणवण फिरतंय पोर, काडी सारखा लुकडा दिसतोय ना म्हणून कमच्या म्हणत असावेत ह्याला. लोकं स्वत:च निष्कर्ष काढायचे.
काम मिळायचे. राहायला खायला ही मिळायचे, पण ते सगळ्यांपासुन दूर.
कमच्याला जेव्हा पासून कळायला लागले होते तेव्हा पासून जात ही गोष्टं फार मोठी आणि महत्वपूर्ण आहे हे समजत होते, पण आपली जात कोणती आहे हेच त्याला माहीत नव्हते.
मला खात्री आहे : मागील भाग
आता पुढे........................................
"राणे, वेड तुम्हालाच नाही तर ते लागायची पाळी माझ्यावर सुद्धा आलीय! शिशुपाल आणि सुकुमार ही एकाच व्यक्तीची दोन रुपे आहेत म्हणावे तर शिशुपालला भेटलेली , ओळखणारी माणसे आहेत. तुम्ही दिलेल्या माहितीप्रमाणे आश्लेषादेखील त्याला ओळखतेय. सुकुमारच्या असिस्टंटनेही त्याला ओळखलेय. आणि महत्त्वाचे म्हणजे तुम्हाला त्याचे प्रेतही तिथेच सापडलेय. काय गोंधळ आहे देवच जाणे? माझे शास्त्रही अपुरे पडतेय इथे राणे."
एकेमेकांशी असलेले नातं,प्रेम,ऋणानुबंध यांचा थोडक्यात अर्थ म्हणजे दोन किंवा त्याहून जास्त व्यक्तींची असणारी एकमेकांबद्दल समज,गरज, आस्था आणि अपूर्णता. इतक्या सहज ह्या वस्तुस्थितीची व्याख्या करण तसं खूप अवघड आहे.
" सरकार, दया करा आनी माझ्या लेकराला वाईच दवापानी करा. चार दिस झालं पन आजुन तोंडात आन न्हाई की पानी निसताच येकटक आढ्याकडं बगत पडलेला असतुय बगा " पुन्हा एकदा समोर बसलेल्या भिवा रामोश्याने आळवणी केली.
" आज जर थोरलं सरकार असतं तर जरुर त्येंनी दवा दिली असती" भिवाच्या या पुढच्या वाक्यानं माझा संताप उडाला. कारणही तसंच आहे अर्थात.
---------------मुंबईवर 'पोटापासून' प्रेम करणार्यांतला मी एक! हो, पोटापासूनच! कारण आतापर्यंत मी ज्या ज्या गोष्टींवर मनापासून प्रेम केलं, त्या त्या ठराविक अंतराने माझ्यापासून दुरावत गेल्या... त्यामुळे मुंबईवर मी 'पोटापासूनच' प्रेम केलं! त्याच कारणासाठी मी इथे पाय ठेवला. 'तिने'ही तो पाय पुरेल एवढी उभं राहण्यापुरती जागा दिली अन् माझा मुंबईतल्या आयुष्याचा प्रवास सुरू झाला.
ही कथा वाचायच्या आधी जर तुम्ही http://www.maayboli.com/node/27497 (अशीही प्रित ! ) वाचली असेल तर तुमचा कमी गोंधळ होईल.
****************
" ही स्मिताली कोण रे ? " संशयाने ओतप्रात भरलेल्या आवाजात सौ. ने विचारलं.
आता हा प्रश्न येण्याच्या मागे जे काही रामायण घडून गेलं ते थोडं तरी सांगावं लागेलंच.
रात्रीचे १०:३० वाजले होते. वार शुक्रवार होता. नुकताच पाऊस संपला होता. नवरात्र सुरु होऊन आजचा तिसरा दिवस आणि माझी थर्ड शिफ्ट. दोन दिवस दांडीया खेळण्याच्या बहाण्याने जरा कुठे आखमिचौली झाली होती. ती पटेल अस वाटल होत......
लग्नाचा वाढदिवस होऊन तीन दिवस झाले होते.
तरीही अजूनही फोन वरचे मेसेजेस आणि फेसबुक वरच्या कॉम्प्लीमेंटस आणि त्याची उत्तरे ह्यातून पूर्णपणे सुटका अजूनही व्हायची होती.
तेच, तेच मेसेजेस अन तीच, तीच उत्तरं! एकच साच्यातून काढल्यासारखी.
कधी कधी कंटाळा येतो ह्या सगळ्याचा. असो कितीही कन्टाळवाणं आणि औपचारिक असलं तरीही आपण ही करतोच की अगदी असंच, वाईट दिसू नये म्हणून हेच मेसेजेस कट, कॉपी, पेस्ट करून पाठवतोच की असल्या ओकेजन्सला
लोकं ही तेच करतात.
औपचारिकच सगळं ह्यात कोण किती मनापासून करतं हे मात्रं शोधत बसायचं नाही.
"माय गॉड, याची अवस्था तर एखादे भुत बघीतल्यासारखी झालेय."
त्याचा अवतार अगदी बघवत नव्हता. केस अस्ताव्यस्त झालेले. डोळे लाल भडक. त्यात कसलीतरी अनामिक भीती भरलेली...! त्याने चोरट्या नजरेने आधी इकडे तिकडे आणि मग हळुच राणेंकडे बघीतले. मग थरथरत्या आवाजात म्हणाला.
"अहं हळु बोला, त्याला सगळं ऐकु जातं. त्याच्यापासून काहीच लपत नाही. तो...तो परत आलाय!"
मला खात्री आहे : मागील भाग
आता पुढे
*************************************************************************************************************************