कथा
एलियन्स ------लघुकथा------जयनीत दीक्षित
स्पेस क्राफ्ट ३०९ ९८६० २३१ कॉलिंग ब्रेकिंग न्यूज! ब्रेकिंग न्यूज!!
आपल्या आकाशगंगे पासून सात लाख प्रकाशवर्ष दूर एका अज्ञात आकाशगंगे मध्ये एक ता-याचा शोध लागला आहे ज्याच्या मंडळातील एका ग्रहा वर जीव सृष्टी चा शोध लागला आहे.
ह्या ग्रहा वर अनेक जीवजन्तूं सोबत एका दोन हात आणि दोन पाय असलेल्या एक प्रजातीचा वावर आहे. हे एलियन्स विवीध वर्णात विभागलेले असून ह्यांच्यात देश, संस्कृती, भाषा, वर्ग असे अजूनही पोट भेद आढळून आले आहेत. ह्या भेदांच्या अजून अनेक नवीन शब्दांच्या व्याख्या सोबत पाठवत आहोत.
सावधान मायबोलीकरांनो (रिलोडेड)
ती गेली तेव्हा...
--------------"दिवसभर तिचा चेहरा माझ्या डोळ्यांसमोर राहतो!!!" हे मी दररोज मनापासून ऑफिसला जाण्याचं कारण होतं. सकाळपासून संध्याकाळपर्यंत; कामाची सुरूवात करण्याआधी, काम करतांना, मध्येच कंटाळा आला की, लंचला जातांना, लंचहून आल्यानंतर, पुन्हा एकदा कंटाळा आल्यानंतर, दुपारची कॉफी घेतांना आणि संध्याकाळी ती ऑफिसमधून निघतांना या प्रत्येकवेळी मी तिला पहायचो. माझ्याकडे पाहतांना तिच्या चेहर्यावर असलेले भाव मैत्रीचे की प्रेमाचे असतील याबद्दल मला कुतुहल वाटायचं खरं, पण माझ्या मनात असा काही विचार आला की माझी तिच्याकडे अगदी सहज, नजरेला नजर देऊन पाहण्याची हिम्मतच व्हायची नाही.
तो -भाग १
तो नेहमी रात्रीच लिहायला बसायचा. लिहीताना अडलंच कुठे तर मग पहात बसायचा खिडकीतून समोरच्या लॅंपपोस्टाकडे. मग त्या लॅंपपोस्टाचा पिवळा आणि त्याच्या टेबललॅंपमधल्या सीएफेलचा पांढरा मिळून एक फिकट पिवळा जो रंग त्याच्या टेबलवर खेळत असे त्यावर तो परत एकदा लिहू लागे विनासायास.
शाळा
शाळा सुटल्याची घंटा वाजली. पेंगुळल्या डोळ्यांनी अमरने दप्तर काखोटीला मारलं. भराभर चालत तो निघाला. शाळेच्या आवारातून तो बाहेर पडणार तेवढ्यात मोगरेबाईंनी त्याला गाठलं. कपाळावरची झुलपं उडवत तो नुसताच त्याच्यांकडे बघत राहिला.
"मंगलताई येतील आज. त्यांना तुझ्याशी बोलायचं आहे."
"कशाला? मला टपरीवर जायचं आहे. पक्याला कबूल केलय मी." तो वैतागलाच.
"अरे, कुणी भलं करायला गेलं तर तुझं आपलं माझंच खरं असं आहे."
"बरं थांबतो." निर्विकार स्वरात तो म्हणाला.
"शाळा बंद झाली आहे. बाहेर राहशील का उभा? पाहिजे तर मी पण थांबते तुझ्याबरोबर ताई येईपर्यंत."
"थांबतो मी. तुम्ही गेलात तरी चालेल."
'मैफिल एका रात्रीची'
तिची माझी पहिली भेट माझ्या मित्राच्या घरी झाली.मी नुकतेच कॉलेज सुरु केले होते. ती तिच्या बहिणी बरोबर आलेली. गोरी गोरी गोबरे गाल छानसा ड्रेस अंगावर.डोळे इतके बोलके कि, जणू सतत हसून काहीतरी सांगत आहेत.तेंव्हा वाटले हीच ती सोनपरी ! जिचा आपण शोध घेत आहोत. पण सगळे मनातल्या मनात, कोणास सांगणार कि हि आवडली आहे. आणि जिथे घर न दार, शिक्षण नातेवाईकांचे मेहरबानीने चाललेले. आई पुण्यात कष्ट काढती आहे, म्हणजे जबाबदारी हि की शिकून घराला हातभार लावण्याची गरज प्रथम पूर्ण करणे जरुरीचे.
बंटीचे आईबाबा
रूपक कथा - २
"मला गोष्ट सांग ना.."
स्त्रीहट्टावर वरकडी करणारा प्रेयसीहट्ट झाल्यावर प्रियकरापुढे दुसरा मार्ग उरला नाही. हातातली कवितांची वही बाजूला ठेवून तो गोष्ट सांगू लागला.
आजोबांची काठी
मला आठवतंय तेव्हापासून माझ्या आजोबांकडे एक सुंदर काठी होती. त्यांना ती कोणीतरी मोठ्या व्यक्तीने भेट दिली होती. नक्षीदार मुठीची, सुबक बाकदार आकाराची, किंमती लाकडाची आणि एकदम ऐटदार! आजोबा आणि त्यांची काठी ह्यांचे अगदी जुळ्याचे नाते होते. जिथे जिथे आजोबा जातील तिथे तिथे ती काठी त्यांच्याबरोबर प्रवास करत असे. मला आणि इतर सर्व भावंडांना त्या काठीचे विलक्षण आकर्षण होते. पण आजोबा तिला जीवापाड जपत. आम्ही खोडसाळ पोरांनी त्यांच्या काठीला हात लावलेला त्यांना बिलकुल खपत नसे.
Pages
