मायबोलीवरील विपुल साहित्य निर्मितीमधील विज्ञानकथा, गूढकथा, रहस्यकथा, हेरकथा, कूटकथा, साहसकथा, युद्धकथा, नवलकथा, गुन्हेकथा, भयकथा, भूतकथा, अदभुतकथा या genre मधील कथांच्या लिंक्स इथे एकत्रित करूयात. प्रतिसादात जे धागे सुचवले जातील त्यातील निवडक इथे एकत्र साठवून ठेवण्यात येतील.
कृपया धाग्याचे नाव, धागा काढणार्या आयडीचे नाव आणि धाग्याची लिंक अशा फॉरमॅटमधे माहिती द्या.. क्रमशः असलेल्या कथांच्या पहिल्या भागाच्या लिंक्स द्या.
**************************************************************************************************************
निळ्या अनंतिकेचं स्वप्नं मला आणि क्रोकेटूला एकदमच पडलं असं क्रोकेटूचं म्हणणं होतं.
*************************************************
अथांग गहिर्या, जांभळ्या पाण्याच्या तळाशी असलेले गुलाबी प्रवाळ दूर दूर जाऊ लागले. चुबुक चुबुक आवाज करत संथपणे वर वर वाटचाल होत राहिली. लवलवत्या, थंडगार वार्याच्या शीळेतून ऊबदार, प्रकाशमान गुहेकडे प्रवास घडतोय अशी जाणीव होत होती. आता जरा प्रयत्न केला की पाण्यापलीकडला निळा पूर्णचंद्र माझ्यापाशी येणार असं वाटत असतानाच मला ते स्वप्न पडलं. निळ्या अनंतिकेचं स्वप्नं......
गुंजानं डोक्यावरचं ओझं दाराबाहेरच उतरवलं आणि शेजारच्या नळावर ठेवलेल्या बादलीतलं पाणी घेऊन तोंडावर हबके मारले. उरलेलं पाणी पायावर घालून ती जरा त्यातल्या त्यात ताजीतवानी झाली. उसनं अवसान आणायलाच हवं. नेहमीप्रमाणेच नशिबाला बोल लावत हातातली पिशवी घेऊन तिनं झोपडीचं दार उघडलं. उघडलं म्हणजे तसं ते उघडंच होतं. तिनं फक्त पायानं ढकललं. दार फाटदिशी उघडलं ... उघडेल नाहीतर काय? त्याचा जीव तो केवढा! दाराचा जीव? आपल्याच विचाराची तिला गंमत वाटली आणि क्षणभराकरता तिच्या रापलेल्या चेहर्यावर एक क्षीण हसू येऊन गेलं.
एका निबिड जंगलातून तो धावत सुटला होता. समोरचं काही दिसत नाहीये, कुठे जातोय कळत नाहीये ... पण एकच गोष्ट ठाऊक आहे की इथून कसंतरी बाहेर पडायचयं ..... त्याने आपल्याला गाठायच्या आत. मागून आवाज येतोय का? की त्याचंच हॄदय त्याच्या छातीच्या पिंजर्यावर धडका मारतय? पायात पेटके येतायत ... त्राण कमी कमी होतय. पण निश्चय करून जीवाच्या आकांताने तो पळतोय. आणि मुठीत धरून ठेवलेली ती वस्तू????? दचकून त्याने ती पुन्हा चाचपून पाहतोय, तिच्याभोवतीची बोटं अधिकच घट्ट झालीत. ही वस्तू आपण किती शिताफीनं हस्तगत केली त्याच्या हातून पण मग त्यामुळेच तर तो खवळला. आता आपण त्याच्या तावडीत सापडून चालणारच नाही.